Friday 8 November 2019

आमदार शंभूराज देसाईंना मिळालेली विजयाची हॅट्रीक साजरी करण्याकरीता दि.१७ रोजी दौलतनगरला विजयी महासभेचे आयोजन. विजयी महासभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.



                


दौलतनगर दि.०८ :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांना पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने विधानसभा निवडणूकीत मिळवून दिलेल्या विजयाच्या हॅट्रीकचा विजयोत्सव रविवार दि.१७ नोव्हेंबर,२०१९ रोजी दौलतनगर ता.पाटण येथे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी महासभेने साजरा करण्याचे नियोजन पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने करण्यात आले असून या विजयी महासभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार शंभूराज देसाई आमदार हॅट्रीक विजयी महासभेचे संयोजक यांच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                              संयोजकांनी प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हंटले आहे, पाटण विधानसभेचे लोकप्रिय आणि महाराष्ट्र विधानसभेतील पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटू आमदार म्हणून गौरविण्यात आलेले आमदार शंभूराज देसाई यांना पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने मोठया विश्वासाने आणि मोठया मताधिक्क्याने महाराष्ट्र विधानसभेत जाण्याची तीनवेळा संधी देवून पाटण मतदारसंघातील जनतेने आमदार शंभूराज देसाईंच्या विजयाची हॅट्रीक साधली आहे. या विजयाची हॅट्रीक विजयी महासभेने आमदार शंभूराज देसाईंच्या जन्म आणि कर्मभूमित मोठया उत्साहाने आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्याचे नियोजन आमदार शंभूराज देसाईंच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दि.१७ नोव्हेंबर,२०१९ रोजी दुपारी ०४.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथे करण्यात आले आहे.या विजयी महासभेला आमदार शंभूराज देसाई प्रमुख उपस्थित राहून पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या बरोबरीने आमदार हॅट्रीकचा विजयोत्सव साजरा करुन जनतेला संबोधित करणार आहेत. या विजयी महासभेला व आपल्या लाडक्या नेत्याला शुभार्शिवाद देणेकरीता पाटण मतदारसंघातील तमाम जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहून या विजयोत्सव सोहळयाचे साक्षीदार व्हावे अशी आग्रहाची विनंती व आवाहन आमदार शंभूराज देसाई आमदार हॅट्रीक विजयी महासभेचे संयोजक यांनी केले आहे.

1 comment: