दौलतनगर
दि.१4:- दि.१४ नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती संपुर्ण
देशामध्ये बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. पाटण
तालुक्यातील कोयना धरणास देशाचे पंतप्रधान पंडीतजी नेहरु यांनी भेट दिली होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे नावाने याठिकाणी गार्डनही तयार करण्यात
आले असून या नेहरु
गार्डनमध्ये आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तालुकास्तरीय पंडीत जवाहरलाल
नेहरु यांची 130 वी जयंती व या जंयतीच्या
निमित्ताने बालदिनाचा कार्यक्रम तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजीत करण्यात आला
होता.
आमदार शंभूराज देसाई व शासनाचे सर्व अधिकारी यांच्या प्रमुख
उपस्थितीत व विभागातील प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीतील लहान मुलांच्या समवेत हा
कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रांरभी आमदार शंभूराज देसाई यांच्या
हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयास व देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त नेहरु उद्यानातील
पंडीत नेहरू यांच्या अर्धाकृती पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले त्यांनतर
आमदार शंभूराज देसाई व तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत
लहान मुलांच्या समवेत आकाशात फुगे सोडून बालदिनही साजरा करण्यात आला बालदिनाच्या निमित्ताने आमदार शंभूराज
देसाई यांच्या वतीने या विभागातील प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना
शालेय साहित्य म्हणून वहयाचे,बॉलपेनचे व खावू
वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका
प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी आमदार शंभूराज
देसाई यांच्या समवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रवींद्र माने, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, कोयनानगरचे
सहाय्यक पोलिस निरीक्षक बावीकट्टे,शिवसेना
जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव
पाटील,
पंचायत समिती माजी सदस्य हरीष भोमकर,धोंडीराम
भोमकर, निजाम जमाते, गणपतभाई कदम,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व प्रमुख
पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाई
यांनी पंडीत नेहरु
यांच्या जंयतीनिमित्त नेहरु
यांना विनम्र अभिवादन
करुन उपस्थित बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना आमदार शंभूराज
देसाई म्हणाले,
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती संपुर्ण
देशामध्ये बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. पंडीत
जवाहरलाल नेहरु यांचा जयंती कार्यक्रम व या जंयतीच्या निमित्ताने बालदिनाचा
कार्यक्रम हा तालुका प्रशासनाच्या वतीने पाटण तालुक्यातील कोयना धरणास देशाचे
पंतप्रधान पंडीतजी नेहरु यांनी
भेट दिली होती
त्याठिकाणी आपण गत दोन वर्षापासून साजरा करीत आहे.आज
आयोजीत केलेला कार्यक्रम प्रातांधिकारी श्रीरंग तांबे
यांच्या समन्वयातून तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय
निटनेटका आयोजीत करण्यात आला आहे.कोयनानगर येथे देशाचे पहिले
पंतप्रधान पंडीतजी नेहरु
यांनी भेट दिल्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ याठिकाणी नेहरु उद्यान उभे करण्यात यावे याकरीता जी.आर.देसाई यांनी वेळप्रसंगी उपोषणही केले
होते.आज
याठिकाणी उभारण्यात आलेल्या नेहरु गार्डनचे रुपडे पालटण्याचा आपण प्रयत्न केला
असून कोयनानगर व कोयनानगरचा 10 किमीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत
करण्याकरीता कोयना पर्यटनाचा आराखडा युतीच्या शासनाकडे सादर केला होता त्या
आराखडयातील बहुतांशी कामांना युतीच्या शासनाने विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री
गिरीष महाजन यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे कोयना पर्यटनाच्या
कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.दोन वर्षापुर्वी नेहरु जयंतीच्या दिवशीच
कोयना पर्यटनाच्या माध्यमातून कोयनानगर व कोयनानगरचा परिसर विकसीत करण्याचा शब्द
मी दिला होता शब्द देवून मी थांबलो नाहीतर
कोयना पर्यटनाच्या माध्यमातून या विभागाचे रुपडे पालटण्याचा आपण प्रयत्न
केला असल्याचे सांगून कोयना नेहरु गार्डनमध्ये अजुनही काही नवीन करण्याकरीताचा
प्रयत्न माझा राहील असेही यावेळी आमदार शंभूराज
देसाई म्हणाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग
तांबे यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे स्वागत कार्यकारी अभियंता कुमार
पाटील
यांनी केले आभार तहसिलदार रवींद्र
माने यांनी मानले.
No comments:
Post a Comment