दौलतनगर
दि.०७ :- पाटण तालुक्यात माहे
जुलै, ऑगस्टमध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे ग्रामीण
तसेच इतर जिल्हा मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांचे तसेच पुलांचे मोठया
प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसान झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांची
पुर्नंबांधणी करणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी राज्याचे
बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केली होती त्यानुसार त्यांनी पाटण
तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांच्या
पुर्नंबांधणीकरीता ०५ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला असून सदरचा निधी
या कामांना उपलब्धही करुन दिला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
आमदार शंभूराज
देसाईंनी दिलेल्या माहितीमध्ये पाटण तालुक्यातील खालील रस्त्यांच्या व पुलांच्या
कामांना निधी उपलब्ध झाला आहे. चरेगाव चाफळ दाढोली रस्त्यावरील क्षतिग्रस्त
कॉजवेच्या ठिकाणी नविन पुलाचे बांधकाम 70 लाख, चिपळूण कराड रस्ता किमी 74/600 ते
90/00 क्षतिग्रस्त पुलाची व पोहोच रस्त्याची दुरुस्ती ३० लाख, तसेच या रस्त्यावर किमी
74/600 ते 90/00 या लांबीमध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे खचलेल्या व खराब झालेल्या
रस्त्याची दुरुस्ती २५ लाख, तारळे पाटण रस्त्यावरील किमी 7/740 ते 39/200 खचलेल्या
रस्त्याची पुर्नस्थापना २५ लाख, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता किमी 0/00 ते 38/00
मध्ये खचलेल्या रस्त्याची पुर्नस्थापना ८० लाख, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता किमी 0/00
ते 11/850,नागठाणे तारळे पाटण रस्ता किमी 7/740 ते 39/200 व पाटण मणदुरे जळव तारळे
रस्ता प्रजिमा 57 किमी 0/00 ते 38/00 अतिवृष्टीमुळे रस्त्यावर कोसळलेल्या दरडी
काढणे १२ लाख,नवजा हेळवाक मोरगिरी साजूर रस्ता किमी 18/00 ते 62/500 मध्ये रस्त्याच्या
भरावाची पुर्नस्थापना ६ लाख, ढेबेवाडी सणबूर महिंद नाटोशी मोरगिरी संगमनगर धक्का
रस्ता किमी 25/200 ते 42/500 रस्त्याच्या भरावाची पुर्नस्थापना २५ लाख, नवजा
हेळवाक मोरगिरी साजूर रस्ता किमी 18/00 ते 44/00 मध्ये क्षतिग्रस्त झालेल्या
मोऱ्यांची दुरुस्ती १६ लाख, तसेच याच रस्त्यावरील किमी 44/00 ते 62/500 मध्ये लहान पुलांचे व हेडवॉलचे
बांधकाम करणे मोऱ्यांची पुर्नस्थापना ७६ लाख, नाडे सांगवड ढेबेवाडी रस्ता किमी
0/00 ते 20/700 मध्ये क्षतिग्रस्त झालेल्या मोरींची दुरुस्ती १० लाख,निसरे मारुल
गुढे काळगाव भुरभुशी रस्ता किमी 0/00 ते 35/350 मध्ये क्षतिग्रस्त झालेल्या
मोऱ्यांची दुरुस्ती १५ लाख, मानेवाडी कुंभारगाव गलमेवाडी येवती रस्ता किमी 0/00 ते
10/00 मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती ५ लाख, नवजा हेळवाक मोरगिरी साजूर किमी 18/00 ते
44/00 मध्ये अतिवृष्टीमुळे रस्त्यावर कोसळलेल्या दरडी काढणे ४ लाख, ढेबेवाडी सणबूर
महिंद नाटोशी मोरगिरी संगमनगर धक्का रस्ता प्रजिमा 55 किमी 25/200 ते 76/00 भाग
47/300 ते 51/300,55/400 ते 56/800 किमी 73/00 ते 76/00 मध्ये व मानेवाडी
कुंभारगाव गलमेवाडी रस्ता किमी 0/00 ते 10/00 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ५ लाख,
नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 किमी 0/00 ते 20/700 मध्ये
कोसळलेल्या दरडी काढणे ७ लाख, ढाणकल जि.प.शाळा दुरुस्ती २.१९ लाख,दिक्षी जि.प.शाळा
दुरुस्ती २.६१ लाख, मरड धनगरवाडा गावपोहोच रस्ता सुधारणा २० लाख, वाटोळे जरआवाड
पाणवठा ते घाणबी रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, कळंबे ते डफळवाडी रस्ता खडीकरण
डांबरीकरण २५ लाख, बोत्रेवाडी दऱ्यातील मोरेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख,
निवी ते निगडेवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण ७.५० लाख, मरळी चव्हाणडाग स्मशानभूमी
रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, तारळे जंगलवाडी फडतरवाडी रस्ता दुरुस्ती व
संरक्षक भिंत १० लाख, मुरुड लोरेवाडी गावापोहोच रस्ता दुरुस्ती १० लाख, मरळी येथील
निनाईमंदिर ते पाकाळरस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख असा एकूण ०५ कोटी २८ लाख ३०
हजार रुपयांचा निधी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे
नुकसान झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना मंजुर होवून तो उपलब्धही झाला
आहे. लवकरच नुकसान झालेल्या कामांच्या पुर्नंबांधणीस सुरुवात करावी अशा सुचना
सार्वजनीक बांधकाम व जिल्हा परीषद बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना दिल्या
असल्याचे ही आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment