दौलतनगर दि.११ :- गुरुवार दि.१४ नोव्हेंबर,२०१९ रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 1३० वी जयंती असून या जयंतीनिमित्ताने संपुर्ण देशामध्ये बालदिन साजरा करण्यात
येतो.
पाटण तालुक्यातील कोयना धरणास देशाचे स्व.पंतप्रधान पंडीतजी नेहरु यांनी
भेट दिली होती.त्यांचे नावाने याठिकाणी गार्डनही तयार करण्यात आले असून या नेहरु गार्डनमध्ये आमदार शंभूराज
देसाई यांच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून तालुकास्तरीय नेहरु जयंती व या जंयतीच्या निमित्ताने बालदिनाचा
कार्यक्रम तालुका प्रशासनाच्या वतीने नेहरु गार्डन,कोयनानगर
येथे सकाळी 09.30
वाजता आयोजीत केला असून आमदार शंभूराज देसाई यांचेसह तालुकास्तरीय
सर्व अधिकारी हे प्रमुख उपस्थित राहून या विभागातील लहान मुलांसह बालदिन साजरा
करण्यात येणार आहे.
मागील दोन वर्षापासून गुरुवार दि.१४ नोव्हेंबरचा बालदिन कार्यक्रम तालुका प्रशासनाच्या वतीने साजरा
करणेसंदर्भात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांना
सुचित केले असून या सर्व कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे
याचे सर्व नियोजन देण्यात आले आहे.प्रांताधिकारी यांनी सर्व संबधित शासकीय अधिकारी
यांची बैठक घेवून आमदार शंभूराज देसाईंचे सुचनेवरुन दि.१४ नोव्हेंबरच्या
बालदिनाच्या कार्यक्रमाचे पुर्ण नियोजन करण्यात आले आहे.दि.14 रोजीचे नेहरु जयंती व या निमित्ताने बालदिनाचा कार्यक्रम मोठया प्रमाणांत
साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून तालुक्याचे
आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून हा
तालुकास्तरीय कार्यक्रम होत असून गत दोन वर्षापासून
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना
जयंती सोहळयानिमित्त विनम्र अभिवादन व या निमित्ताने बालदिनाचा तालुकास्तरीय कार्यक्रम हा स्व. पंडीतजी नेहरु यांनी कोयनानगरला कोयना
धरणास भेट दिली होती त्याठिकाणी साजरा करण्याचे
ठरविल्यानुसार हा कार्यक्रम याठिकाणी प्रतिवर्षी होत आहे. यंदाच्या वर्षीही हा कार्यक्रम आयोजित
केला आहे.या दिवशी प्रथमत: तालुकयाचे आमदार शंभूराज देसाई व तालुका
प्रशासनाच्या वतीने पंडीतजी नेहरु यांच्या १३०
जयंतीनिमित्त पंडीतजी नेहरु
यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जयंती कार्यक्रम साजरा
करण्यात येणार असून आमदार शंभूराज देसाई यांच्या वतीने या विभागातील प्राथमिक तसेच
माध्यमिक शाळेतील बालकांना शालेय साहित्य म्हणून वहयाचे वाटप तसेच खावू वाटप
करण्यात येणार आहे.पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु व बालदिनाच्या कार्यक्रमास
मोठया संख्येने उपस्थित रहावे असे तालुका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले
आहे.
No comments:
Post a Comment