दौलतनगर दि.०७ :- यंदाच्या वर्षी मोठया प्रमाणात पावसाळा
असल्याने मंजुर झालेली विकासकामे करण्याकरीता संबधित यंत्रणांना अडचणी येत होत्या.
आता पावसाळा संपलाय, मोठया पावसाची शक्यता कमी आहे त्यामुळे सार्वजनीक बांधकाम,
जिल्हा परीषद बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाकडे मंजुर असणारी अनेक विकासकामे
पावसाच्या कारणाने रेंगाळली आहेत ही रेंगाळलेली कामे तात्काळ सुरु करा. अशा सुचना
आमदार शंभूराज देसाईंनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना देवून बहूतांशी विकासकामे ही
बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाकडेच असल्यामुळे कार्यभारात सुधारणा करा कुठल्याही
अधिकाऱ्याची चालढकल आता चालणार नाही असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी
अधिकाऱ्यांना सांगितले.
पाटण
तहसिल कार्यालयातील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहामध्ये आमदार शंभूराज
देसाईंच्या अध्यक्षतेखाली सन २०१८-२०१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाच्या
विविध योजनांमधून मंजुर करुन आणलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेणेकरीता बैठक
आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी वरीलप्रमाणे आमदार शंभूराज देसाईंनी
अधिकाऱ्यांना सुचना केल्या. यावेळी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार
रवींद्र माने,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय पाटील,अजित पाटील,जिल्हा
परीषद बांधकाम विभागाचे भंडारी,पाणी पुरवठा विभागाचे खाबडे,तालुका कृषी अधिकारी
अविनाश मोरे,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता गायकवाड, जलसंधारण
विभागाचे उपअभियंता पदमाळे,एमएसईबीचे उपअभियंता कांबळे यांच्यासह तालुकास्तरीय
सर्व विभागांचे अधिकारी, सहाय्यक अधिकारी,शाखा अभियंता यांची प्रमुख उपस्थिती
होती.
याप्रसंगी
प्रारंभी आमदार शंभूराज देसाईंनी सार्वजनीक बांधकाम, जिल्हा परीषद बांधकाम व पाणी
पुरवठा विभागातील या दोन आर्थिक वर्षात मंजुर झालेल्या कामांचा आढावा घेतला. मोठया
प्रमाणात बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाकडे विविध योजनांमधून विविध विकासकामे
मंजुर आहेत. या दोन्ही विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून पावसाळयामध्ये
प्रशासकीय मान्यता, निविदा प्रसिध्दी, कार्यारंभ आदेश ही तांत्रिक कामे मार्गी लावण्याच्या सुचना
दिल्या होत्या त्याप्रमाणे या दोन्ही विभागाकडील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही तांत्रिक
कामे बऱ्याच प्रमाणात मार्गी लावली आहेत. आता निवडणूकाही झाल्या आहेत आणि पावसाचे
प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे पावसाची आणि निवडणूकीची सबब आता चालणार नाही या
तिन्ही विभागांना आठ दिवसाचा कालावधी देण्यात येत आहे.या आठ दिवसाच्या
कालावधीमध्ये त्यांच्या त्यांच्या विभागाकडे मंजुर असणारी कामे लवकरात लवकर सुरु
करण्याचे नियोजन या अधिकाऱ्यांनी करावे आठ दिवसानंतर कोणतेही कारण एैकून घेतले
जाणार नाही जनतेच्या हितासाठी जी कामे मंजुर करुन आणली आहेत ती वेळेत पुर्ण करण्याची
जबाबदारी जशी ठेकेदाराची आहे तशीच जबाबदारी अधिकाऱ्यांची ही आहे त्यामुळे
अधिकाऱ्यांनीच चालढकल करु नये. येत्या आठ दिवसात पुनश्च: या तिन्ही विभागाकडून
सुरु करण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला जाईल असे सांगून आमदार शंभूराज
देसाईंनी जलसंधारण,एमएसईबी,कृष्णा खोरे विकास महामंडळ,कृषी विभाग या विभागाकडील कामांचा आढावा घेतला.त्याचबरोबर
माहे ऑक्टोंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाटण
तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याच्या दृष्टीने कोणीही
शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतलीच आहे
परंतू झालेले पंचनामे लवकरात लवकर शासनाकडे मदतीकरीता सादर करावेत अशा सुचना
प्रांताधिकारी,तहसिलदार व कृषी अधिकारी यांना आमदार शंभूराज देसाईंनी दिल्या. तसेच
अतिवृष्टीमध्ये डोंगराखाली वसलेल्या गांवाना, वाडयांना नैसर्गिक आपत्ती
निवारणामधून ९ गांवामध्ये तात्पुरते निवारा शेड उभारण्याची कामे मंजुर केली आहेत.
सदरच्या ०९ गांवामध्ये व वाडयामध्ये या कामांना सुरुवात करण्यात आली आहे मात्र या
कामांना गती नाही त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामांना गती दयावी
त्याचबरोबर एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी तालुका विकास आराखडयातंर्गत विद्युत
विकासाची कामे करण्याकरीता आणलेल्या निधीचे पहिल्या टप्प्यांचे ०५.५० कोटी
रुपयांची निविदा प्रसिध्द होवून कार्यारंभ आदेशही दिला आहे ती कामे लवकर सुरु करावित
असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले. उपस्थितांचे स्वागत प्रांताधिकारी
श्रीरंग तांबे यांनी केले व आभार तहसिलदार रवींद्र माने यांनी मानले.
चौकट:-
प्रतिक्षालय इमारतीच्या नुतनीकरणाकरीता निधी मंजुर करु.- आमदार देसाई.
सन २००४ ते २००९ या कालावधीत शासकीय बैठका तसेच तहसिल कार्यालयात येणाऱ्या पाटण
तालुक्यातील नागरिकांकरीता बसण्याचे ठिकाण म्हणून आपण ही प्रतिक्षालय इमारत बांधली
आहे. इमारत बांधून बरीच वर्षे झाली या प्रतिक्षालयाचे नुतनीकरण करणे आवश्यक असून
बांधकाम विभागाने नुतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करावे त्यास निधी मंजुर करु असेही
आमदार शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.
No comments:
Post a Comment