Monday, 7 September 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने अदा केली 100 टक्के एफआरपी. एफआरपीची उर्वरीत 327 रु.प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.

 



दौलतनगर दि.07 :- दौलतनगर मरळी ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने नेहमीच कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने हंगाम 2019-20 मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफआरपीनुसार प्रतिटन रु.2657.54/- प्रमाणे उर्वरीत राहिलेली 327 रुपये ही रक्कम दि.07.09.2020 रोजी वर्ग केली असून कारखान्याने एफआरपीनुसार सर्वच्या सर्व 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खाती अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांव्दारे दिली आहे.

             पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 चे गळीत हंगामात एकूण 02 लाख 02 हजार 414 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 12.10% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 45 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे सन 2019-20 चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफआरपी रक्कम प्र.मे.टन रुपये 2657.54/- इतकी आहे.एफआरपीप्रमाणे एकूण गळीताच्या ऊसबिलाची रक्कम रुपये 5379.24 लाख इतकी होत असून कारखान्याने आतापर्यंत रुपये 4716.25 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली होती व उर्वरित एफआरपीप्रमाणे शिल्लक असणारी 327 रुपये प्रमाणे होणारी रक्कम रुपये 662.99 लाख कारखान्याने आज रोजी दि. 07.09.2020 रोजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती वर्ग केलेली आहे. दरम्यान केंद्र शासन व राज्य शासन यांचेकडून दि.31 मार्च,2020 अखेर रुपये 511.91 लाख विविध अनुदानाची रक्कम आपले कारखान्याला येणे आहे. तसेच सन 2020-21 मध्ये निर्यात साखर व बफर स्टॉक अनुदानाची 528.11 लाख अशी एकूण रुपये 1040.02 लाख इतकी अनुदानाची रक्कम आपले कारखान्यास येणे बाकी आहे. सदर रक्कम प्राप्त होण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. सन 2019-20 चा गळीत हंगाम संपलेपासून गेले 5 महिन्यात कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर संपूर्ण टाळेबंदीच्या काळामध्ये बाजारपेठा बंद असल्याने साखरेची बाजारातील कमी झालेली मागणी तसेच वेळोवेळी विक्री दरामध्ये झालेला बदल,कामगारांची देणी,वाहतुक खर्च वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड देत एफआरपीची उर्वरित रक्कम सभासदांना देण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवानेते यशराज देसाई व कारखाना व्यवस्थापनाने निधीची उपलब्धता करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 च्या गळीत हंगामातील 100 टक्के एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. तसेच सन 2020-21 चे गळीत हंगामाकरीता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाची नोंद करुन ऊस हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी पत्रकांत करण्यात आले आहे.

                   

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ढेबेवाडीला ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सज्ज.

 


 

दौलतनगर दि.०७ :-पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने कराड तसेच सातारा येथे पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात आठ दिवसापुर्वी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा यांना सुचित केले होते.आज ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सज्ज झाले आहे.

             गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात पुढाकार घेत त्यांनी स्वत: तालुका प्रशासनातील यासंदर्भातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच या कोवीड रुग्णालयाच्या सुरुवात करावयाच्या कामांची प्रत्यक्ष पहाणीही त्यांनी केली. त्यानतंर पुन्हा एकदा या कामाला गती देणेसंदर्भात अधिवेशनाला जाणेपुर्वी तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि येत्या दोन दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेत आणा असे आदेशित केले होते.त्यानुसार या कोवीड रुग्णालया करीता लागणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धता करण्याचेही त्यांनी सुचित केले होते.

          आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात सुरु होत असलेल्या ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय कोरोना रुग्णांवर उपचाराकरीता सज्ज झाले असून ना.शंभूराज देसाईंच्या सुचनेवरुन या कोवीड रुग्णालयाकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धताही याठिकाणी करण्यात आली आहे.या कोवीड रुग्णालयाचे सर्व नियंत्रण ना.शंभूराज देसाईंनी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडे दिले आहे. कोरोना रुग्णांकरीता आवश्यक असणारे ३५ बेड ऑक्सीजनसह रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.कोरोना रुग्णांवर उपचार करणेकरीता दोन नोडल वैद्यकीय अधिकारी, दोन वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील ०७ वैद्यकीय अधिकारी, १० अधिपरिचारीका, दोन औषनिर्माता, ०४ लॅब टेकनिशअन, एक कक्षसेवक व दोन सफाई कामगार याप्रमाणे ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात कोवीड रुग्णालयाकरीता एकूण ३१ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

          या रुग्ण्यालयात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील सर्व संबधित अधिकाऱ्यांना ना.शंभूराज देसाईंनी दिल्या आहेत.आठ दिवसापुर्वी पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील उपचाराच्या सुविधा प्राप्त होतील अशी आशा ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केली होती त्यानुसार त्यांनी हे रुग्णालय तालुका प्रशासनाच्या सहकार्यातून कोरोना बाधितांसाठी आजपासून सज्ज केले आहे.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण मतदारसंघातील 325 गावांगावात,वाडयावस्त्यांवर पोहचल्या टेंम्प्रेजर मशीन,आर्सेनिक अल्बम गोळया.डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पी.पी.ई. किट.

 

       

दौलतनगर दि.०७ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून पाटण मतदारसंघातील सुमारे 325 गांवागांवात तसेच वाडयावस्त्यांवर 500 टेंम्प्रेजर मशीन,आर्सेनिक अल्बम गोळयांच्या 4000 हजार डब्या तसेच मतदारसंघातील सर्व ग्रामीण रुग्णालये,13 प्राथमिक आरोग्य केंद्रे व ढेबेवाडी कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांना तसेच कोरोना बाधित रुग्णांची उपचाराकरीता ने-आण करणारे कर्मचारी यांना 1200 पी.पी.ई. किट देण्यात आले आहेत.

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुरुवातीपासूनच पाटण मतदारसंघात सतर्क राहून गेली 06 महिन्यापासून कार्यरत आहेत.मतदारसंघात कोरोनाचा प्रार्दुभाव ज्या-ज्या ठिकाणी झाला त्या गांवाना,वाडयावस्त्यांना भेटी देण्याची तसेच तेथील नागरिकांच्या लॉकडाऊन काळातील समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणेला बरोबर ठेवत प्राधान्याने मोहिम हातात घेतली. मतदारसंघाबरोबर सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यांतील प्रमुख ठिकाणांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेटी देत तेथील कोरोनाच्या अनुषंगानेच्या समस्या सोडविण्यासंदर्भातही त्यांनी मागील 06 महिन्यांच्या काळात भर दिला. पहिल्या टप्प्याचे लॉकडाऊन सुरु होताच पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 21 हजार कुटुंबांना एक-एक महिना पुरेल एवढे धान्य, संसारपयोगी साहित्य त्यांनी शिवसेना पक्षाच्या तसेच नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने मतदारसंघात वाटप केले.

            दोनच दिवसापुर्वी ना.शंभूराज देसाईंनी शिवसेना पक्षाच्या तसेच नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 325 गावे व वाडयावस्त्यांमध्ये ग्रामीण जनते पर्यंत तापाची तपासणी करणेकरीता 500 टेंम्प्रेजर मशीन,रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळयांच्या 4000 हजार डब्या, च्यवनप्राश डबे त्याचबरोबर मतदारसंघातील सर्व ग्रामीण रुग्णालये,13 प्राथमिक आरोग्य केंद्रे व ढेबेवाडी कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांना तसेच कर्मचारी यांना 1200 पी.पी.ई. किट देण्यात आले आहेत.कोरोनाच्या संकटात जनतेला आधार देण्याबरोबर मतदारसंघातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही दिलासा देण्याचे काम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई करीत आहेत.

 

Friday, 4 September 2020

ढेबेवाडीला ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालय रविवारपासून सेवेत आणा. कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,पाटण,तळमावले व तालुक्यातील प्रा.आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधा देण्याच्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 


 

दौलतनगर दि.०४ :- ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.जे काम शिल्लक राहिले आहे ते दोन दिवसात पुर्ण करुन याठिकाणी रविवारपासून कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार देण्यास सुरुवात करा तसेच या विभागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना उपचारासाठी स्वतंत्रपणे तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पुरेसा औषधसाठयासह सर्व सुविधा उपलब्ध करुन दया.त्याचबरोबर इतर भागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,पाटण तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वरीलप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आरोग्य व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

          गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह याठिकाणी ढेबेवाडी येथील ऑकसीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालय रविवार दि. ०६ सप्टेंबरपासून सुरु करणे तसेच या‍विभागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना उपचाराकरीता अद्यावत प्राथमिक आरोग्य केद्रांत सुविधा देणे व पाटण ग्रामीण रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्यासह औषधसाठा उपलब्ध करुन देणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीस जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठ्ठल्ये,पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एल.जगताप,पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, सा.बा.उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांची उपस्थिती होती.

              याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी ढेबेवाडी तसेच पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक हे दोन्हीही कोरोना बाधित आढळल्याने ढेबेवाडी याठिकाणी सुरु करावयाच्या ऑकसीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालयाकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्यासह पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन देणेसंदर्भात जिल्हा शल्यचिकिस्तक व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना दिल्या. सध्या ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांची माहिती घेत कोरोना रुग्णालयाकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी हे या विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध करुन देणेबाबत सुचित केले. ढेबेवाडी कोरोना ग्रामीण रुग्णालयात सध्या दोन वैद्यकीय अधिकारी असून वाढीवचे दोन वैद्यकीय अधिकारी तसेच एकूण १० परिचारिका, ०२ फार्मासिस्ट, ०२ लॅब टेक्नीशियन, वॉर्ड बॉय, स्वीपर,त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारी आणि दोन रुग्णवाहिकांना आवश्यक असणारे दोन चालक उपलब्ध करुन देणेसंदर्भात ना.देसाईंनी सुचना केल्या आहेत.तसेच वाढीवचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या राहण्याची याठिकाणी सोय करुन देण्याच्याही सुचना सा.बा.उपविभागाचे उपअभियंता यांना दिल्या आहेत.

            दरम्यान कोरोना व्यतिरिक्त रुग्णांची गैरसोय होवू नये याकरीता करावयाच्या उपाययोजना संदर्भातही आढावा घेताना ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच तालुक्यातील एकूण १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्या उपचार करण्याकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करुन देण्यात यावा.तसेच कोरोना रुग्णालयातील बायोमेडीकल वेस्टची विल्हेवाट लावण्याकरीता आवश्यक असणारी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात याव्यात असे ना.शंभूराज देसाईंनी सुचित केले असून दिलेल्या सुचनानुसार संबधित विभागाने अंमलबजावणी करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

चौकट:- कोरोना,कोरोना म्हणून इतर रुग्णांची गैरसोय नको- ना.शंभूराज देसाई.

             कोरोनाच्या भितीमुळे कोरोना नसलेल्या रुग्णांना उपचाराकरीता अनेक खाजगी रुग्णालयात नाकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना उपचार मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. याकरीता ढेबेवाडीचे कोरेाना रुग्णालय वगळता तालुक्यातील पाटणचे ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्यावर उपचार करण्याच्या सक्त सुचना दया असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

Thursday, 3 September 2020

ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेडअभावी गैरसोय होणाऱ्या जिल्हयातील कोरोना रुग्णांना मुंबई/ पुणे महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये व जंबो कोवीड सेटंरमध्ये बेड उपलब्ध करुन दयावेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली मुख्यमंत्र्याकडे आग्रही विनंती.

 


दौलतनगर दि.०३ :- सातारा जिल्हयातील शासकीय रुग्णालये तसेच शासनाने अधिग्रहण केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे मर्यादित बेड आहेत.जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड अभावी अनेक रुग्णांचे मृत्यूदेखील झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई/ पुणे येथे शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी व महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये तसेच शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये सातारा जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे आवश्यक बेड उपलब्ध करुन दयावेत अशी आग्रही विनंती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे.

                  सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. जिल्हया मध्ये शासकीय रुग्णालये तसेच शासनाने अधिग्रहण केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे मर्यादित बेड आहेत.कोरोना रुग्णांना आवश्यक ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड जिल्हयातील कार्यरत कोरोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड मिळाले नाहीत म्हणून अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना जिल्हयात घडल्या आहेत. कोरोना रुग्णांचे सातारा जिल्हयातील वाढते प्रमाण पहाता विलंब न लावता आपण सातारा जिल्हयाकरीता जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंर सुरु करण्यास तात्काळ मान्यताही दिली आहे. त्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरचे कामांस सुरुवात देखील करण्यात आली मात्र या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरचे काम पुर्ण होण्यास किमान ०१ महिन्याचा कालावधी लागणार आहे.त्यामुळे रुग्णांना मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे. असे ना.शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे निदर्शनास आणून दिले आहे.

                 दरम्यान मुंबई शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळू हळू कमी होत आहे.मुंबई/ पुणे येथे शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी व महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये तसेच शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये सातारा जिल्हयात वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध करुन देणेबाबत मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व सार्वजनीक आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी शासनाच्या तसेच मुंबई/ पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास आदेश दयावेत अशी ना.शंभूराज देसाईंनी आग्रहाची नम्र विनंती मुख्यमंत्री व सार्वजनीक आरोग्यमंत्री या दोघांकडे केली आहे.

               ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड अभावी सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांची  होणारी हेळसांड पहाता मी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व  सार्वजनीक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांची हेळसांड थांबविण्याकरीता मुंबई/ पुणे येथे महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये किंवा शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध करुन दयावेत असे लेखी पत्रच दिले आहे.सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे उपचार वेळेत मिळणेकरीता आम्ही प्रयत्नशील आहोतच त्याचबरोबर वरीलप्रमाणे जिल्हयातील कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय करणेकरीता व्यक्तीश: माझा राज्याचे मुख्यमंत्री व सार्वजनीक आरोग्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

 

Tuesday, 1 September 2020

साताऱ्याला करावयाच्या जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरची पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जिल्हास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना घेवून केली संयुक्तीक पहाणी.

 



सातारा दि.०१ :-सातारा जिल्हयामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेदिवंस वाढ होत असल्यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेवून राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे आग्रह धरीत साताऱ्यात 200 ऑक्सीजन बेड व 50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करणेस शासनाची दोनच दिवसापुर्वी मंजुरी घेतली. येत्या 15 दिवसात उभारावयाच्या या जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरच्या जागेची व जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना उपलब्ध करुन दयावयाच्या सुविधांची आज सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जिल्हयाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरच्या संबधित सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रत्यक्ष संयुक्तीकपणे पहाणी केली.

              जिल्हयामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ  पहाता रुग्णांच्या उपचाराकरीता जिल्हयाच्या ठिकाणी जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरची गरज ओळखून लवकरात लवकर साताऱ्यात 200 ऑक्सीजन बेड व 50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करणेसंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे,नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांचेबरोबर दुरध्वनीवरुन चर्चा करीत या सेंटरला तात्काळ मान्यताही घेतली.ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकारामुळे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभारण्याची सुत्रे तात्काळ हलली आणि मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांनी मुख्य सचिव संजयकुमार यांना तात्काळ आदेश देत या कामांला विलंब न लावता तातडीने सुरुवात करावी असे आदेश दिले. मुख्यमंत्री यांचे आदेश जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना देत तात्काळ या कामांस सुरुवात करण्याच्या सुचना राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत.

         पुणे येथे ज्याप्रमाणे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु केले आहे त्याप्रमाणे साताऱ्यात लवकरात लवकर हे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु होणेकरीता जिल्हाधिकारी यांनी स्वत: पुण्याच्या जम्बो कोवीड सेंटरची पहाणी करण्याचे ना.शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना त्याचदिवशी सुचित केले होते.त्यानुसार आज जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईं यांचा अधिकाऱ्यांसमवेत हा संयुक्तीक पहाणी दौरा आयोजीत करण्यात आला होता.सातारा येथील  शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीच्या परिसरात कशाप्रकारे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करता येईल याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना दिली. 15 दिवसाच्या आत हे सेंटर सुरु करणेसंदर्भातील सुचना जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी संबधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत हे सेंटर सुरु करणेसंदर्भात सर्वोत्तोपरी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी पहाणी दौऱ्यामध्ये सांगितले.

         साताऱ्यात जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु झालेनंतर जिल्हयामध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णांना आवश्यक त्या उपचाराच्या सुविधा देण्यास यामुळे चांगली मदत होणार आहे.केवळ एका विनंतीवरुन विलंब न लावता मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांनी साताऱ्यात जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करण्यास तातडीने मान्यता दिल्याबद्दल मी सातारा जिल्हयातील तमाम जनतेच्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, नगरविकास मंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांचे प्रथमत: आभार व्यक्त करतो व हे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभे करण्यास निधी कमी पडू देणार नसल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यावेळी बोलताना सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह,अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे,मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी अनरिुध्द आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जी.जगदाळे,महावितरणचे अधिक्षक अभियंता गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी अधिक्षक अभियंता वेदफाटक,ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे,उपविभागीय अधिकारी मुल्ला हे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Monday, 31 August 2020

ढेबेवाडीला ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करावयाच्या कामांची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली प्रत्यक्ष पहाणी. आठ दिवसात कोवीड रुग्णालयातून सुविधा देण्यास सुरुवात करण्याच्या केल्या सुचना.

           


दौलतनगर दि.३१ :- पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने कराड तसेच सातारा येथे पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे आठ दिवसापुर्वीच बैठक घेवून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा करुन तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या त्यानुसार या कोवीड रुग्णालयाच्या सुरुवात करावयाच्या प्रत्यक्ष कामांची पहाणी आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सर्व संबधित अधिकाऱ्यांना सोबत घेत ढेबेवाडी येथे केली.

            यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्यासमवेत पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.दत्तात्रय डोंगरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील,ढेबेवाडीचे  सपोनी उत्तम भजनावळे सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता विद्याधर शिंदे यांची उपस्थिती होती.

             ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भातील पहाणी दौऱ्यात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.ज्याप्रमाणे पाटण तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत त्याचप्रमाणे सातारा आणि कराड येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कराड अथवा सातारा येथे कोरोना रुग्णांवर उपचार करावयाच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक बेड उपलब्ध होत नाहीत म्हणून आठच दिवसापुर्वी पाटण तालुक्यात ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात मी सातारा जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा केली होती. त्याअनुषगांची पुर्वतयारी करुन हे कोवीड रुग्णालय लवकर सुरु करण्याच्या सुचनाही तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करण्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात या कोवीड रुग्णालयाचे काम पुर्ण करुन या रुग्ण्यालयात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील सर्व संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसात पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील उपचाराच्या सुविधा प्राप्त होतील अशी मला आशा आहे असे शेवठी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले.