Saturday, 12 March 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व साकव पूल पुनर्बांधणीचे कामांना 30 कोटींचा निधी मंजूर.

 


             दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये पाटण मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी,दुर्गम भागातील गावांना जोडणारे रस्ते व साकव पूलांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते व साकव पूलांच्या नुकसानीमुळे गावांचा दळण-वळणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. नुकसानग्रस्त रस्ते व साकव पूलांचे पुनर्बांधणीकरीता भरीव निधी मंजूर होणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी एकूण 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामीण मार्ग व साकव पूल यांचे दुरुस्तीसाठी या आर्थिक वर्षासाठी 3054 रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क या योजनेअंतर्गत 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यासंदर्भात दि. 07 मार्च 2021 रोजी शासनाच्या ग्रामविकास विभागाने शासन निर्णयही पारित केला आहे.

             पाटण तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त रस्ते व साकव पूलांचे पुनर्बांधणीकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नामुळे पहिल्या टप्प्यामध्ये मंजुर झालेल्या 30 कोटी रुपयांच्या निधीमध्ये 106 कामांचा समावेश असून उर्वरीत 20 कोटींच्या निधीचीही कामे ग्रामीण विकास विभागाकडे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मंजूर कामांमध्ये घाणबी ते वाटोळे रस्ता सुधारणा 30 लाख,चिटेघर (नायकवडेवाडी) रस्ता 7 लाख,कारवट फाटा ते विठ्ठलवाडी (शिरळ) रस्ता 30 लाख,ढाणकल ते महादेव मंदिर रस्ता 20 लाख,हेळवाक रस्ता 20 लाख,नाव पोहोच रस्ता 20 लाख,ऐनाचीवाडी रस्ता 20 लाख,नवजा रस्ता 20 लाख,हुंबरळी पोहोच रस्ता 30 लाख,घाटमाथा जोडरस्ता 15 लाख,घाटमाथा किसरुळे केमसे रस्ता 20 लाख,जंगलवाडी (तारळे) रस्ता 15 लाख,तारळे ते फडतरवाडी घाट रस्ता 20 लाख,दुसाळे ते चव्हाणवाडी रस्ता 15 लाख,मालोशी पोहोच रस्ता 15 लाख, महाडीकवाडी (नुने) पोहोच रस्ता 15 लाख,मरळोशी फाटा ते वाघळवाडी (ढोरोशी) रस्ता 15 लाख,प्रजिमा 25 ते जिमनवाडी (जळकेवस्ती)रस्ता 20 लाख,कडवे खुर्द ते गर्जेवाडी रस्ता 20 लाख,कडवे फाटा ते भुडकेवाडी आवर्डे रस्ता 15 लाख,लोरेवाडी नुने गावपोहोच रस्ता 15 लाख,प्रजिमा 37 ताटेवाडी सलतेवाडी(बिबी) रस्ता 20 लाख,केळोली ते विरेवाडी घाट रस्ता 25 लाख,जाधववाडी(चाफळ) पोहोच रस्ता 20 लाख,कोळेकरवाडी (डेरवण) रस्ता 30 लाख,गमेवाडी ते चाफळ ते जाळगेवाडी 20 लाख,वेताळवाडी खिलारवाडी रस्ता 15 लाख,शेडगेवाडी(विहे) ते कदममळा पोहोच रस्ता 20 लाख,नारळवाडी(मल्हारपेठ) ते मंदुळहवेली रस्ता 15  लाख,चेवलेवाडी(नेरळे) येथील रस्ता 25 लाख,डावरी गावपोहोच रस्ता 15 लाख,धजगाव (धडामवाडी) पोहोच रस्ता 25 लाख,पाळेकरवाडी ते मारुलहवेली रस्ता 30 लाख,डावरी बौध्दवस्ती ते जुळेवाडी वाल्मिकी रस्ता व संरक्षक भिंत 30 लाख,कदमवाडी (नाटोशी) रस्ता 10 लाख,गुरेघर(आटोली) रस्ता 10 लाख,सुतारवाडी(मोरेवाडी) रस्ता  15 लाख, उमरकांचन ते कोळेकरवाडी रस्ता 20 लाख,वरपेवाडी(सळवे) ते उधवणे फाटा रस्ता 30 लाख,कंकवाडी (बनपूरी) रस्ता 15 लाख, उधवणे पोहोच रस्ता 20 लाख,कारळे पाटीलआवाड ते पोकळयाचीवाडी रस्ता 30 लाख,शितपवाडी जोडरस्ता संरक्षक भिंत व रस्ता 30 लाख,येळेवाडी लोटलेवाडी मस्करवाडी रस्ता 25 लाख,लोहारवाडी(काळगाव) पोहोच रस्ता 15 लाख,मालदन फाटा ते पाचुपतेवाडी रस्ता 30 लाख,शिद्रुकवाडी ते डुबलवाडी रस्ता 20 लाख,गुढे शिबेवाडी खालची जोडरस्ता 15 लाख, शिबेवाडी ते वायचळवाडी रस्ता 20 लाख,मान्याचीवाडी (गुढे) पोहोच रस्ता 25 लाख,बिबी मकाईचीवाडी पोहोच साकव पूल व रस्ता 30 लाख,ससेवाडी (सळवे) येथील वांग नदीवरील फरशी पुल दुरुस्ती व रस्ता 15 लाख,काळगाव (कुमाळ) रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे व रस्ता 25 लाख,जाईचीवाडी मराठवाडी ते फुरसाईवाडी रस्ता 40 लाख,कातवडी ते पिंपळोशी साकवसह रस्ता 38 लाख,वनकुसवडे ते पळासरी येथे साकव पूलासह रस्ता 35 लाख,आंबवणे ग्रामा 82 साकव पूलासह रस्ता 40 लाख, चाफोली ते आरल  रस्त्यावर दोन साकव पूलासह रस्ता 60 लाख,वन ते सुतारवस्ती (वनकुसवडे) साकव पूलासह रस्ता 35 लाख,जौरातवाडी (भारसाखळे) रस्त्यावरील ओढयावर साकव व रस्ता 45 लाख,खुडुपलेवाडी पोहोच रस्त्यावरील ओढयावर साकव सह रस्ता 40 लाख,चाफोली दिवशी खुर्द चिटेघर केर रस्ता तीन ठिकाणी साकव, रस्ता 100 लाख,मालोशी ते पाडेकरवाडी रस्ता साकव पूलासह 40 लाख,जळव ते बामणेवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी स्लॅब ड्रेनसह रस्ता 40 लाख, रोमनवाडी (येराड)जोड रस्ता रोमनवाडी ढेरुगडेवाडी येथे दोन साकव पूल व रस्ता 45 लाख,हुंबरणे ते पांढरेपाणी रस्त्यावरील ओढयावर साकव व रस्ता 80 लाख,चिरंबे मणेरी ग्रामा 374 रस्त्यावरील ओढयावर साकव व रस्ता 35 लाख,सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्ता दोन साकव पूलासह पोहोच रस्ता 100 लाख,नाणेगाव खुर्द ते चव्हाणवाडी रस्ता 30 लाख, बाजे वरसरकून पोहोच रस्ता 70 लाख,मरळी ते सोनवडे रस्ता 30 लाख,जन्नेवाडी (घोट) येथे पोहोच रस्त्याकरीता संरक्षक भिंत 15 लाख,पाबळवाडी पोहोच रस्ता संरक्षक भिंत व रस्ता 15 लाख,मल्हारपेठ ते सोंडेवाडी पोहोच रस्त्यावर जि.प.शाळेजवळ संरक्षक भिंत  15 लाख,पाटीलवस्ती शिंदेवस्ती (कुसरुंड) रस्ता संरक्षक भिंत बांधणे 15 लाख, गोकूळ तर्फ पाटण  मोरणा नदीवरील पुलाशेजारी सरंक्षक भिंत बांधणे 25 लाख,काळगाव ते मस्करवाडी रस्त्यावरील गावझरा येथे संरक्षक भिंत 25 लाख,कुंभारगाव समाज मंदिर शेजारील  रस्त्यावर संरक्षक भिंत 20 लाख,सदुवर्पेवाडी (सळवे) येथील वांग नदीवरील फरशी पुल दुरुस्ती 15 लाख,बाचोली पोहोच रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती 30 लाख,खळे येथील वांग नदीवरील पुलाची दुरुस्ती 20 लाख,काढणे वांग नदीवरील पुलाची दुरुस्ती  20 लाख,जाईचीवाडी (बोंद्री) रस्त्यावरील ओढयावर स्लॅब ड्रेन दुरुस्ती 10 लाख, गोरेवाडी (मुरुड) येथे माळवस्ती रस्त्यावर स्लॅब ड्रेन दुरुस्ती 20 लाख, शिवंदेश्वर येथे रस्त्यावरील ओढयावर साकव 30 लाख,ढाणकल (किसरुळे) येथे रस्तावरील ओढयावर साकव 30लाख,मालदन बंडेवाडी येथील रस्त्यावरील ओढयावर साकव  30 लाख,सळवे येथील गावदरी ओढयावर साकव पूल 30 लाख,सळवे यादववाडी येथील ओढयावर साकव पूल 30 लाख, शिंदेवाडी(आंबवडे खुर्द) ते चोरगेवाडी रस्त्यावर साकव पूल 30 लाख,मालदन फाटा ते पाचुपतेवाडी रस्ता जाधववाडी फाटयाजवळील ओढयावर साकव 30 लाख,वाझोली येथे गावपोहोच रस्त्यावरील ओढयावर साकव 30 लाख,बादेवाडी (धामणी) मुख्य रस्त्यावर साकव पूल 30 लाख,खळे देसाई आवाड येथील ओढयावर साकव व संरक्षक भिंत 25 लाख, गुढेकरवाडी (पानवळवाडी) पोहोच रस्त्यावर साकव 25 लाख,बोंद्री तापणीच्या ओढयावर साकव बांधणे 35 लाख,भारसाखळे ते म्हारवंड रस्त्यावर साकव  35 लाख,वजरोशी येथे चौकामध्ये मुख्य रस्त्यावर साकव 35 लाख,मुरुड ते मालोशी  रस्त्यावर मुरुड ओढयावर साकव पूल 35 लाख,रोमनवाडी(येराड) येथे थोरल्या ओढयावर साकव पूलासह संरक्षक भिंत 40 लाख,डेरवण येथे चिखल ओढयावर साकव  35 लाख,चाफळ ते जाधववाडी रस्ता ग्रामा 127 वर नांदलाई ओढयावर साकव 35 लाख, धावडे गोकूळ व धावडे शिद्रुकवाडी हायस्कूल येथील ओढयावर साकव 70 लाख,सळवे ते पाळशी रस्त्यावर तीन साकव 90 लाख,आवर्डे रस्ता सुधारणा 20 लाख, कडयाखालची (मेंढोशी) रस्ता 15 लाख या कामांचा समावेश आहे.मंजूर झालेल्या कामांच्या लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने हि कामे मार्गी लावण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

Thursday, 10 March 2022

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 112 वी जयंतीनिमित्त. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरुची शासकीय निवासस्थानी केले विनम्र अभिवादन.



          मुंबई दि.10 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे करारी माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 112 वी जयंतीनिमित्त मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मुंबई येथील त्यांचे सुरुची या शासकीय निवासस्थानी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी त्यांचे समवेत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू परीक्षित थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,गृहराज्यमंत्री यांचे खाजगी सचिव व विशेष कार्यासन अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कार्य अजरामर. लोकनेतेसाहेब यांच्या कार्याला शोभेल असे काम करुया. युवा नेते यशराज देसाईंनी व्यक्त केल्या भावना.


दौलतनगर दि.10 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले कार्य सांगण्याएवढा मी मोठा नाही, स्व.लोकनेतेसाहेब यांचे कार्य अवघा महाराष्ट्र जाणून आहे. स्व.लोकनेतेसाहेब यांनी राज्याचे विविध खात्याचे मंत्री म्हणून केलेले कार्य अजरामर आहे. दुरदृष्टी लाभलेले नेते स्व.साहेबांच्या रुपाने आपल्या मतदारसंघाला नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्याला लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य असून डोंगरी आणि दुर्गम भागात वसलेल्या आपल्या पाटण तालुक्याला देशाच्या नकाशावर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आपल्या मतदारसंघात लोकनेतेसाहेब यांच्या कार्याला शोभेल असे कार्य सर्वांचे लाडके नेते राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब करीत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेतेसाहेब,स्व.आबासाहेब यांच्या नावाने सुरु असणाऱ्या विविध संस्थां नावारुपास आणण्याचे कार्य या संस्थामधील पदाधिकारी, विश्वस्तांनी करावे हीच खरी लोकनेतेसाहेब यांच्या जयंतीदिनी श्रध्दाजंली ठरणार असल्याची भावना युवानेते यशराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.

                दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाच्या “महाराष्ट्र दौलत” सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 112 व्या जयंती सोहळयाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख माजी चेअरमन ॲड मिलींद पाटील,माजी विरोधी पक्षनेते डी.पी.जाधव,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थाचे पदाधिकारी,जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य व लोकनेतेप्रेमी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.प्रारंभी युवा नेते यशराज देसाई,रविराज देसाई यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

                   याप्रसंगी बोलताना यशराज देसाई म्हणाले,स्व.लोकनेतेसाहेब यांनी पाटण तालुक्याचा कायापालट केला. राज्याच्या महत्वाच्या खात्यांचे करारी मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपुर्ण महाराष्ट्र राज्याला परिचीत आहे. त्यांच्या कार्याचे छोटसं प्रतिबंध म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी मागील पंचवार्षिक मध्ये आमदार असताना राज्य शासनाच्या निधीतून लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे भव्य असे चिरंतन स्मारक उभे केले. शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासही त्यांनी राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन आणला हे काम सध्या प्रगतीपथावर सुरु आहे. लोकनेते साहेब यांच्या नावाने सुरु असलेल्या विविध संस्था नावारुपास आणण्याचे कार्य ना.शंभूराज देसाईसाहेब करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेतेसाहेब यांच्या नावाला व कार्याला शोभेल असे कार्य या संस्थामधील पदाधिकारी, विश्वस्थांनी करणे गरजेचे आहे.लोकनेतेसाहेब,स्व.आबासाहेब यांच्या नावाने सुरु असणाऱ्या संस्था चांगल्या चालविणे आपले सर्वांचे कर्तव्य असून या दोन महान नेत्यांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करीत असताना खऱ्या अर्थाने हीच श्रध्दांजली  ठरणार आहे अशा भावना व्यक्त करुन ते म्हणाले, मंत्री झालेनंतर अनेक नेत्यांचा मतदारसंघातील जनतेशी जनसंपर्क कमी होतो परंतु ना.शंभूराज देसाईसाहेबांचा जनसंपर्क कमी झाला नाही,उलट त्यामध्ये वाढच झाली असून त्यांनी त्यांच्या कार्याचा चढता आलेख ठेवला आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.

                    याप्रंसगी रविराज देसाई यांनीही मनोगते व्यक्त केले.उपस्थितांचे स्वागत अशोकराव पाटील यांनी केले व आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले. कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सह.उद्योग समुहातील सर्व संस्थाचे अधिकारी,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

चौकट :-  लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे लवकरच विस्तारीकरण करणार.

              आपला कारखाना ग्रामीण, डोंगरी भागात असला तरी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर कारखान्याच्या बरोबरीने आपणही स्पर्धेत उतरण्याकरीता कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांचे संमतीने लोकनेते साहेब यांचे जयंती कार्यक्रमानिमित्त कारखान्याच्या विस्तारीकरणाची घोषणा करताना अत्यानंद होत आहे.

Wednesday, 9 March 2022

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधीचा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे हस्ते दि.12 रोजी भव्य शुभारंभ

 


 

            दौलतनगर दि.09 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे संकल्पनेतून त्यांचे कुशल नेतृत्वाखाली राज्यातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या शासकीय योजनेतून संधी मिळवून देण्यासाठी “माझा व्यवसाय माझा हक्क” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारांना शासकीय योजनेतून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला असून या योजनेचा भव्य शुभारंभ शनिवार दि.12 मार्च रोजी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

         प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी “माझा व्यवसाय माझा हक्क” उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत योजना  राबविली आहे. बेरोजगार इच्छुक लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी 15% ते 35% शासकीय सबसिडी मिळणार आहे. याव्यतिरिक राज्यशासनाच्या इतर व्याज परतावा योजनांचा सुद्धा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेमधून दुधवाहतूक, मालवाहतूक टेम्पो, फूडट्रक, व्हेजिटेबल ट्रक, कोणतेही फिरते विक्री केंद्र व्यवसाय करता येणार आहे, बँकांकडून 80 ते 95% कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना संकटाला तोंड देताना अनेक युवकांना रोजगार गमवावा लागला. अनेकांची मोठी आर्थिक हानी झाली. या पार्श्वूमीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना चला, स्वावलंबी बनुया, चला स्वयंरोजगार उभारुया अशी घोषणा करीत बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उभा करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांना ' मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ' कार्यक्रमाच्या वतीने विविध व्यवसायांसाठी शासकीय सबसिडीतून आपला स्वयंरोजगार उभे करण्यास मदत होणार आहे. व्यवसाय उभारणीसाठी योग्य मार्गदर्शन आणि बँकांचे कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था या योजनेतून करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे. इच्छुकांनी अर्ज आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी शनिवार दि.12 मार्च रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे. असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

Tuesday, 8 March 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 22 गांवातील अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविणेच्या कामांना 5 कोटी 50 लक्षचा निधी मंजूर. 22 गांवाना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजुर.

 


 

                दौलतनगर दि.08 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि कुशल नेतृत्वाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामीण भागातील गांवामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील 22 गांवामध्ये गावातंर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत प्रत्येक गांवास 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना.संदीपानराव भूमरे यांचेकडे केली होती. त्याप्रमाणे सन 2021-22 या आर्थिक वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघातील 22 गांवाना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांचा अशाप्रकारे 05 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याचा आदेश शासनाच्या रोजगार हमी विभागामार्फत काढण्यात आला आहे.

            गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई  यांचे विशेष प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील धामणी, गारवडे, नाटोशी, जाळगेवाडी, आंब्रुळे, डेरवण, सोनवडे, आबदारवाडी, काळगाव, नाडे, सळवे,  येराड,  कोकीसरे,  मरळी, ठोमसे, डावरी, चाळकेवाडी, आडूळपेठ, वेताळवाडी, ऊरुल, बांबवडे व चोपदारवाडी या 22 गांवामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याकरीता प्रत्येक गांवास 25 लक्ष रुपयांचा निधी या आदेशान्वये देण्यात आला आहे. या कामांना तालुकास्तरावरुनच शासनाच्या रोजगार हमी विभागामार्फत देण्यात आलेल्या आर्थिक मर्यादेत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणेबाबत तसेच ज्या कामांना जिल्हास्तरावरुन तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दयावयाच्या आहेत त्या कामांना जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर करुन मान्यता देणेबाबतची कार्यवाही करणेबाबत आदेशामध्ये नमुद करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी ग्रामीण भागातील डोंगरी व दुर्गम भागात ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवावेत ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली आणि त्यास तात्काळ मान्यताही दिली.रोजगार हमी विभाग मंत्री ना.संदीपानराव भूमरे यांचेकडे असल्याने  तात्काळ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील 22 गांवामध्ये या योजनेतंर्गत प्रत्येकी 25 लक्ष रुपये प्रमाणे अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्यास रोजगार हमी विभागाने निधी मंजुर करावा असा आग्रह धरला आणि या 22 गांवात अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांस प्रत्येकी 25 लक्ष रुपयेप्रमाणे निधीही मंजुर करुन घेतला. या योजनेतंर्गत नाविन्यपुर्ण असा उपक्रम पाटण मतदारसंघातील 22 गांवात होत असल्याने धामणी, गारवडे, नाटोशी, जाळगेवाडी, आंब्रुळे, डेरवण, सोनवडे, आबदारवाडी, काळगाव, नाडे, सळवे,  येराड,  कोकीसरे,  मरळी, ठोमसे, डावरी, चाळकेवाडी, आडूळपेठ, वेताळवाडी, ऊरुल, बांबवडे व चोपदारवाडी या 22 गांवानी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना.संदीपानराव भूमरे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

पाटण मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तीमधील अभ्यासिकांना 01 कोटींचा निधी मंजूर.

 

 


         दौलतनगर दि.08 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तीमधील कामांना निधी मंजूर होण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे विविध कामांच्या शिफारशी केल्या होत्या.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तींमध्ये अभ्यासिका बांधणेच्या कामांना 01 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.03 मार्च 2022 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय पारित केला आहे.

                राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा /गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरुन मान्यता देण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही योजना राज्यस्तरावर सन 2018-19 पासून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला.सदर योजनेमध्ये घ्यावयाच्या कामांमध्ये वाढ करुन त्यामध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींशी निगडीत स्थळे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टया महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे,त्यांची स्मारके उभारणे व अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा सांस्कृतिक विकास अंतर्गत वाचनालय,अभ्यासिका,धम्म केंद्र,विपश्यना केंद्र,प्रशिक्षण केंद्र या कामांचा समावेश करण्यात आला.

                 त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तीमधील कामांना निधी मंजूर होण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे विविध कामांच्या शिफारशी केल्या होत्या.यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तींमध्ये अभ्यासिका बांधणेच्या कामांना 01 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या कामांमध्ये हुंबरणे बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,बाहे बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,धावडे बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,आंबेघर तर्फ मरळी बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,किल्ले मोरगिरी मातंगवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,सोनवडे बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,सोनाईचीवाडी मातंगवस्तीमध्ये अभ्यासिका 10 लाख या कामांचा समावेश आहे.मागासवर्गीय वस्तींमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या या मंजूर अभ्यासिकांच्या कामांची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

चौकट:- गृहमंत्री यांच्या प्रयत्नातून यापुर्वी 15 अभ्यासिकेंची दिमाखदार कांमे.

            गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 15 गांवातील मागासवर्गीय वस्तीमध्ये यापुर्वी अभ्यासिकेंची दिमाखदार कामे झाली असून मागासवर्गीय वस्तीमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थींनींना या अभ्यासिकांचा चांगला लाभ होत आहे.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पुनश्च: 41 गावात 42 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांना मंजूरी.

 


 

                दौलतनगर दि.०8(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती. शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दुसऱ्या टप्प्यात पुनश्च: मतदारसंघातील 41 गावात सुमारे 42 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार सन 2022-23 वर्षाच्या वार्षिक आराखडयामध्ये या 41 गावातील सुमारे 42 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करत या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो प्रभाग) यांचेकडून दि. 03 मार्च 2022 रोजी शासन निर्णय पारित केला आहे.

           पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य,शेत मालाची वाहतूकीसाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता याकरीता शासनाच्या  मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी शेत/पाणंद रस्त्यांच्या आराखडा तयार करण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना करीत या रस्त्यांच्या कामांच्या शिफारशी राज्याचे रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे केलेल्या शिफारशीनुसार दुसऱ्या टप्प्यात या 41 गावांतील शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी दिली आहे.

               मंजूरी देण्यात आलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये प्रत्येक गांवाना एक किलोमीटरप्रमाणे पाणंद रस्त्यांची कामे देण्यात आली आहेत यामध्ये आबदारवाडी ऊरुल घाट आबदारवाडी ते मल्हारपेठ पाणंद रस्ता,गव्हाणवाडी  खरेदी ते सुळेवाडी रस्ता,सोनवडे  स्मशानभूमी ते शिव रस्ता,आडूळपेठ कराड चिपळूण रोड ते मळा रस्ता,बेलवडे खुर्द मळीचा माळ ते धावर पूल रस्ता,दिवशी बु.वाडी घाटदरा ते पडशिवार पाणंद रस्ता,टेळेवाडी पडेवाडी शिवार ते काळवट सनद रस्ता,जानुगडेवाडी मंद्रुळकोळे खुर्द ते मदनेवस्ती  रस्ता,पवारवाडी कुठरे पवारवाडी ते सर्व्हे नं.मळा रस्ता,काढणे बौध्दवस्ती काढणे ते शिव रस्ता, मंद्रुळहवेली म्हारवडा मुलाणकी ते पानस्करवाडी रस्ता,नवसरी चावर रस्ता,येराडवाडी ठाणमपट्टी रस्ता,जमदाडवाडी शिरचा रस्ता,मुरुड मुरुड ते तोंडोशी पूल रस्ता,डेरवण डेरवण फाटा ते आंब्रुळकी रस्ता,मुळगाव डोंगरुबा मंदिर ते नदीकाठ रस्ता,त्रिपुडी नायकवडा ते आंबाटेक रस्ता,सांगवड म्हसोबा ते गडकर रस्ता,हावळेवाडी हावळेवाडी ते जखिण रस्ता,येराड येराड ते काळू माळ रस्ता खडीकरण,येराड रामाचावाडा ते जोतिबाचीवाडी रस्ता,वेताळवाडी  ते इरिगेशन रस्ता, बनपेठवाडी पाटण कराड चिपळूण रोड ते कुकुरटेक रस्ता,बनपेठवाडी कराड चिपळूण रोड ते जानाईचावाडा रस्ता,चोपदारवाडी सरकारी दवाखाना ते बिगा रस्ता, मल्हारपेठ ते दिंडूकलेवाडी व मल्हारपेठ ते नारळवाडी रस्ता,कडवे बुद्रुक बेंदवाडी ते माळवाडी कडवे बुद्रुक रस्ता,नविवाडी (जिंती) नविवाडी जिंती  ते कारळे फाटा रस्ता,बनपूरी पेठबनपूरी ते बाचोली रस्ता,कसणी निनाईवाडी जि.प शाळा ते पाणवटा रस्ता, साबळेवाडी मालदन साबळेवाडी सळवे रस्ता,शेडगेवाडी विहे रस्ता खडीकरण,मालोशी मालोशी येथे रस्ता,मत्रेवाडी निवास मत्रे यांचे घर ते भवानी देवस्थान रस्ता,मारुलहवेली धंद शिवार बेंद ते कारखाना रस्ता रस्ता,गव्हाणवाडी पायरन ते गतकुळी रस्ता,मुरुड मुरुड ते मळवी रस्ता,बहुले  बहुलेश्वर देऊळ ते बेंद रस्ता,मालदन  ते साबळेवाडी रस्ता,येराड ते तामकडे रस्ता या कामांचा समावेश आहे. मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना पूरक कुशल निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सुचनाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.