Saturday 12 March 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व साकव पूल पुनर्बांधणीचे कामांना 30 कोटींचा निधी मंजूर.

 


             दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये पाटण मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी,दुर्गम भागातील गावांना जोडणारे रस्ते व साकव पूलांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते व साकव पूलांच्या नुकसानीमुळे गावांचा दळण-वळणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. नुकसानग्रस्त रस्ते व साकव पूलांचे पुनर्बांधणीकरीता भरीव निधी मंजूर होणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी एकूण 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामीण मार्ग व साकव पूल यांचे दुरुस्तीसाठी या आर्थिक वर्षासाठी 3054 रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क या योजनेअंतर्गत 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यासंदर्भात दि. 07 मार्च 2021 रोजी शासनाच्या ग्रामविकास विभागाने शासन निर्णयही पारित केला आहे.

             पाटण तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त रस्ते व साकव पूलांचे पुनर्बांधणीकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नामुळे पहिल्या टप्प्यामध्ये मंजुर झालेल्या 30 कोटी रुपयांच्या निधीमध्ये 106 कामांचा समावेश असून उर्वरीत 20 कोटींच्या निधीचीही कामे ग्रामीण विकास विभागाकडे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मंजूर कामांमध्ये घाणबी ते वाटोळे रस्ता सुधारणा 30 लाख,चिटेघर (नायकवडेवाडी) रस्ता 7 लाख,कारवट फाटा ते विठ्ठलवाडी (शिरळ) रस्ता 30 लाख,ढाणकल ते महादेव मंदिर रस्ता 20 लाख,हेळवाक रस्ता 20 लाख,नाव पोहोच रस्ता 20 लाख,ऐनाचीवाडी रस्ता 20 लाख,नवजा रस्ता 20 लाख,हुंबरळी पोहोच रस्ता 30 लाख,घाटमाथा जोडरस्ता 15 लाख,घाटमाथा किसरुळे केमसे रस्ता 20 लाख,जंगलवाडी (तारळे) रस्ता 15 लाख,तारळे ते फडतरवाडी घाट रस्ता 20 लाख,दुसाळे ते चव्हाणवाडी रस्ता 15 लाख,मालोशी पोहोच रस्ता 15 लाख, महाडीकवाडी (नुने) पोहोच रस्ता 15 लाख,मरळोशी फाटा ते वाघळवाडी (ढोरोशी) रस्ता 15 लाख,प्रजिमा 25 ते जिमनवाडी (जळकेवस्ती)रस्ता 20 लाख,कडवे खुर्द ते गर्जेवाडी रस्ता 20 लाख,कडवे फाटा ते भुडकेवाडी आवर्डे रस्ता 15 लाख,लोरेवाडी नुने गावपोहोच रस्ता 15 लाख,प्रजिमा 37 ताटेवाडी सलतेवाडी(बिबी) रस्ता 20 लाख,केळोली ते विरेवाडी घाट रस्ता 25 लाख,जाधववाडी(चाफळ) पोहोच रस्ता 20 लाख,कोळेकरवाडी (डेरवण) रस्ता 30 लाख,गमेवाडी ते चाफळ ते जाळगेवाडी 20 लाख,वेताळवाडी खिलारवाडी रस्ता 15 लाख,शेडगेवाडी(विहे) ते कदममळा पोहोच रस्ता 20 लाख,नारळवाडी(मल्हारपेठ) ते मंदुळहवेली रस्ता 15  लाख,चेवलेवाडी(नेरळे) येथील रस्ता 25 लाख,डावरी गावपोहोच रस्ता 15 लाख,धजगाव (धडामवाडी) पोहोच रस्ता 25 लाख,पाळेकरवाडी ते मारुलहवेली रस्ता 30 लाख,डावरी बौध्दवस्ती ते जुळेवाडी वाल्मिकी रस्ता व संरक्षक भिंत 30 लाख,कदमवाडी (नाटोशी) रस्ता 10 लाख,गुरेघर(आटोली) रस्ता 10 लाख,सुतारवाडी(मोरेवाडी) रस्ता  15 लाख, उमरकांचन ते कोळेकरवाडी रस्ता 20 लाख,वरपेवाडी(सळवे) ते उधवणे फाटा रस्ता 30 लाख,कंकवाडी (बनपूरी) रस्ता 15 लाख, उधवणे पोहोच रस्ता 20 लाख,कारळे पाटीलआवाड ते पोकळयाचीवाडी रस्ता 30 लाख,शितपवाडी जोडरस्ता संरक्षक भिंत व रस्ता 30 लाख,येळेवाडी लोटलेवाडी मस्करवाडी रस्ता 25 लाख,लोहारवाडी(काळगाव) पोहोच रस्ता 15 लाख,मालदन फाटा ते पाचुपतेवाडी रस्ता 30 लाख,शिद्रुकवाडी ते डुबलवाडी रस्ता 20 लाख,गुढे शिबेवाडी खालची जोडरस्ता 15 लाख, शिबेवाडी ते वायचळवाडी रस्ता 20 लाख,मान्याचीवाडी (गुढे) पोहोच रस्ता 25 लाख,बिबी मकाईचीवाडी पोहोच साकव पूल व रस्ता 30 लाख,ससेवाडी (सळवे) येथील वांग नदीवरील फरशी पुल दुरुस्ती व रस्ता 15 लाख,काळगाव (कुमाळ) रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे व रस्ता 25 लाख,जाईचीवाडी मराठवाडी ते फुरसाईवाडी रस्ता 40 लाख,कातवडी ते पिंपळोशी साकवसह रस्ता 38 लाख,वनकुसवडे ते पळासरी येथे साकव पूलासह रस्ता 35 लाख,आंबवणे ग्रामा 82 साकव पूलासह रस्ता 40 लाख, चाफोली ते आरल  रस्त्यावर दोन साकव पूलासह रस्ता 60 लाख,वन ते सुतारवस्ती (वनकुसवडे) साकव पूलासह रस्ता 35 लाख,जौरातवाडी (भारसाखळे) रस्त्यावरील ओढयावर साकव व रस्ता 45 लाख,खुडुपलेवाडी पोहोच रस्त्यावरील ओढयावर साकव सह रस्ता 40 लाख,चाफोली दिवशी खुर्द चिटेघर केर रस्ता तीन ठिकाणी साकव, रस्ता 100 लाख,मालोशी ते पाडेकरवाडी रस्ता साकव पूलासह 40 लाख,जळव ते बामणेवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी स्लॅब ड्रेनसह रस्ता 40 लाख, रोमनवाडी (येराड)जोड रस्ता रोमनवाडी ढेरुगडेवाडी येथे दोन साकव पूल व रस्ता 45 लाख,हुंबरणे ते पांढरेपाणी रस्त्यावरील ओढयावर साकव व रस्ता 80 लाख,चिरंबे मणेरी ग्रामा 374 रस्त्यावरील ओढयावर साकव व रस्ता 35 लाख,सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्ता दोन साकव पूलासह पोहोच रस्ता 100 लाख,नाणेगाव खुर्द ते चव्हाणवाडी रस्ता 30 लाख, बाजे वरसरकून पोहोच रस्ता 70 लाख,मरळी ते सोनवडे रस्ता 30 लाख,जन्नेवाडी (घोट) येथे पोहोच रस्त्याकरीता संरक्षक भिंत 15 लाख,पाबळवाडी पोहोच रस्ता संरक्षक भिंत व रस्ता 15 लाख,मल्हारपेठ ते सोंडेवाडी पोहोच रस्त्यावर जि.प.शाळेजवळ संरक्षक भिंत  15 लाख,पाटीलवस्ती शिंदेवस्ती (कुसरुंड) रस्ता संरक्षक भिंत बांधणे 15 लाख, गोकूळ तर्फ पाटण  मोरणा नदीवरील पुलाशेजारी सरंक्षक भिंत बांधणे 25 लाख,काळगाव ते मस्करवाडी रस्त्यावरील गावझरा येथे संरक्षक भिंत 25 लाख,कुंभारगाव समाज मंदिर शेजारील  रस्त्यावर संरक्षक भिंत 20 लाख,सदुवर्पेवाडी (सळवे) येथील वांग नदीवरील फरशी पुल दुरुस्ती 15 लाख,बाचोली पोहोच रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती 30 लाख,खळे येथील वांग नदीवरील पुलाची दुरुस्ती 20 लाख,काढणे वांग नदीवरील पुलाची दुरुस्ती  20 लाख,जाईचीवाडी (बोंद्री) रस्त्यावरील ओढयावर स्लॅब ड्रेन दुरुस्ती 10 लाख, गोरेवाडी (मुरुड) येथे माळवस्ती रस्त्यावर स्लॅब ड्रेन दुरुस्ती 20 लाख, शिवंदेश्वर येथे रस्त्यावरील ओढयावर साकव 30 लाख,ढाणकल (किसरुळे) येथे रस्तावरील ओढयावर साकव 30लाख,मालदन बंडेवाडी येथील रस्त्यावरील ओढयावर साकव  30 लाख,सळवे येथील गावदरी ओढयावर साकव पूल 30 लाख,सळवे यादववाडी येथील ओढयावर साकव पूल 30 लाख, शिंदेवाडी(आंबवडे खुर्द) ते चोरगेवाडी रस्त्यावर साकव पूल 30 लाख,मालदन फाटा ते पाचुपतेवाडी रस्ता जाधववाडी फाटयाजवळील ओढयावर साकव 30 लाख,वाझोली येथे गावपोहोच रस्त्यावरील ओढयावर साकव 30 लाख,बादेवाडी (धामणी) मुख्य रस्त्यावर साकव पूल 30 लाख,खळे देसाई आवाड येथील ओढयावर साकव व संरक्षक भिंत 25 लाख, गुढेकरवाडी (पानवळवाडी) पोहोच रस्त्यावर साकव 25 लाख,बोंद्री तापणीच्या ओढयावर साकव बांधणे 35 लाख,भारसाखळे ते म्हारवंड रस्त्यावर साकव  35 लाख,वजरोशी येथे चौकामध्ये मुख्य रस्त्यावर साकव 35 लाख,मुरुड ते मालोशी  रस्त्यावर मुरुड ओढयावर साकव पूल 35 लाख,रोमनवाडी(येराड) येथे थोरल्या ओढयावर साकव पूलासह संरक्षक भिंत 40 लाख,डेरवण येथे चिखल ओढयावर साकव  35 लाख,चाफळ ते जाधववाडी रस्ता ग्रामा 127 वर नांदलाई ओढयावर साकव 35 लाख, धावडे गोकूळ व धावडे शिद्रुकवाडी हायस्कूल येथील ओढयावर साकव 70 लाख,सळवे ते पाळशी रस्त्यावर तीन साकव 90 लाख,आवर्डे रस्ता सुधारणा 20 लाख, कडयाखालची (मेंढोशी) रस्ता 15 लाख या कामांचा समावेश आहे.मंजूर झालेल्या कामांच्या लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने हि कामे मार्गी लावण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment