Tuesday 8 March 2022

पाटण मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तीमधील अभ्यासिकांना 01 कोटींचा निधी मंजूर.

 

 


         दौलतनगर दि.08 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तीमधील कामांना निधी मंजूर होण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे विविध कामांच्या शिफारशी केल्या होत्या.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तींमध्ये अभ्यासिका बांधणेच्या कामांना 01 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.03 मार्च 2022 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय पारित केला आहे.

                राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा /गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरुन मान्यता देण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही योजना राज्यस्तरावर सन 2018-19 पासून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला.सदर योजनेमध्ये घ्यावयाच्या कामांमध्ये वाढ करुन त्यामध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींशी निगडीत स्थळे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टया महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे,त्यांची स्मारके उभारणे व अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा सांस्कृतिक विकास अंतर्गत वाचनालय,अभ्यासिका,धम्म केंद्र,विपश्यना केंद्र,प्रशिक्षण केंद्र या कामांचा समावेश करण्यात आला.

                 त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तीमधील कामांना निधी मंजूर होण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे विविध कामांच्या शिफारशी केल्या होत्या.यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तींमध्ये अभ्यासिका बांधणेच्या कामांना 01 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या कामांमध्ये हुंबरणे बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,बाहे बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,धावडे बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,आंबेघर तर्फ मरळी बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,किल्ले मोरगिरी मातंगवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,सोनवडे बौध्दवस्तीमध्ये अभ्यासिका 15 लाख,सोनाईचीवाडी मातंगवस्तीमध्ये अभ्यासिका 10 लाख या कामांचा समावेश आहे.मागासवर्गीय वस्तींमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या या मंजूर अभ्यासिकांच्या कामांची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

चौकट:- गृहमंत्री यांच्या प्रयत्नातून यापुर्वी 15 अभ्यासिकेंची दिमाखदार कांमे.

            गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 15 गांवातील मागासवर्गीय वस्तीमध्ये यापुर्वी अभ्यासिकेंची दिमाखदार कामे झाली असून मागासवर्गीय वस्तीमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थींनींना या अभ्यासिकांचा चांगला लाभ होत आहे.

No comments:

Post a Comment