Tuesday 8 March 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 22 गांवातील अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविणेच्या कामांना 5 कोटी 50 लक्षचा निधी मंजूर. 22 गांवाना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजुर.

 


 

                दौलतनगर दि.08 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि कुशल नेतृत्वाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामीण भागातील गांवामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील 22 गांवामध्ये गावातंर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत प्रत्येक गांवास 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना.संदीपानराव भूमरे यांचेकडे केली होती. त्याप्रमाणे सन 2021-22 या आर्थिक वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघातील 22 गांवाना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांचा अशाप्रकारे 05 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याचा आदेश शासनाच्या रोजगार हमी विभागामार्फत काढण्यात आला आहे.

            गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई  यांचे विशेष प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील धामणी, गारवडे, नाटोशी, जाळगेवाडी, आंब्रुळे, डेरवण, सोनवडे, आबदारवाडी, काळगाव, नाडे, सळवे,  येराड,  कोकीसरे,  मरळी, ठोमसे, डावरी, चाळकेवाडी, आडूळपेठ, वेताळवाडी, ऊरुल, बांबवडे व चोपदारवाडी या 22 गांवामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याकरीता प्रत्येक गांवास 25 लक्ष रुपयांचा निधी या आदेशान्वये देण्यात आला आहे. या कामांना तालुकास्तरावरुनच शासनाच्या रोजगार हमी विभागामार्फत देण्यात आलेल्या आर्थिक मर्यादेत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणेबाबत तसेच ज्या कामांना जिल्हास्तरावरुन तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दयावयाच्या आहेत त्या कामांना जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर करुन मान्यता देणेबाबतची कार्यवाही करणेबाबत आदेशामध्ये नमुद करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी ग्रामीण भागातील डोंगरी व दुर्गम भागात ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवावेत ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली आणि त्यास तात्काळ मान्यताही दिली.रोजगार हमी विभाग मंत्री ना.संदीपानराव भूमरे यांचेकडे असल्याने  तात्काळ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील 22 गांवामध्ये या योजनेतंर्गत प्रत्येकी 25 लक्ष रुपये प्रमाणे अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्यास रोजगार हमी विभागाने निधी मंजुर करावा असा आग्रह धरला आणि या 22 गांवात अंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांस प्रत्येकी 25 लक्ष रुपयेप्रमाणे निधीही मंजुर करुन घेतला. या योजनेतंर्गत नाविन्यपुर्ण असा उपक्रम पाटण मतदारसंघातील 22 गांवात होत असल्याने धामणी, गारवडे, नाटोशी, जाळगेवाडी, आंब्रुळे, डेरवण, सोनवडे, आबदारवाडी, काळगाव, नाडे, सळवे,  येराड,  कोकीसरे,  मरळी, ठोमसे, डावरी, चाळकेवाडी, आडूळपेठ, वेताळवाडी, ऊरुल, बांबवडे व चोपदारवाडी या 22 गांवानी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना.संदीपानराव भूमरे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment