दौलतनगर दि.09 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे
लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे संकल्पनेतून त्यांचे कुशल
नेतृत्वाखाली राज्यातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या शासकीय योजनेतून संधी
मिळवून देण्यासाठी “माझा व्यवसाय माझा हक्क” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत व्यवसायासाठी
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे.पाटण
विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारांना शासकीय योजनेतून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध
करुन देण्याकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला
असून या योजनेचा भव्य शुभारंभ शनिवार दि.12 मार्च रोजी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून
प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, राज्याचे
लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी “माझा व्यवसाय माझा हक्क” उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमाअंतर्गत व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत
योजना राबविली आहे. बेरोजगार इच्छुक लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी 15% ते 35% शासकीय सबसिडी मिळणार आहे. याव्यतिरिक राज्यशासनाच्या
इतर व्याज परतावा योजनांचा सुद्धा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेमधून दुधवाहतूक, मालवाहतूक टेम्पो,
फूडट्रक, व्हेजिटेबल ट्रक, कोणतेही फिरते विक्री केंद्र व्यवसाय करता येणार आहे,
बँकांकडून 80 ते 95% कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना
संकटाला तोंड देताना अनेक युवकांना रोजगार गमवावा लागला. अनेकांची मोठी आर्थिक
हानी झाली. या पार्श्वूमीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण
विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना चला, स्वावलंबी बनुया, चला स्वयंरोजगार
उभारुया अशी घोषणा करीत बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उभा करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांना
' मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ' कार्यक्रमाच्या वतीने विविध व्यवसायांसाठी शासकीय
सबसिडीतून आपला स्वयंरोजगार उभे करण्यास मदत होणार आहे. व्यवसाय उभारणीसाठी योग्य
मार्गदर्शन आणि बँकांचे कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था या योजनेतून करण्यात येणार
आहे. मात्र, यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या
मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या
कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले
आहे. इच्छुकांनी अर्ज आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी शनिवार दि.12 मार्च रोजी दौलतनगर
ता.पाटण येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे. असेही आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment