मुंबई दि.10 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष,राज्याचे करारी माजी गृहमंत्री व पाटण
तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 112 वी जयंतीनिमित्त मुंबई येथे अर्थसंकल्पीय
अधिवेशन सुरु असल्याने राज्याचे गृह, वित्त
व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी मुंबई येथील त्यांचे सुरुची या शासकीय निवासस्थानी लोकनेते बाळासाहेब देसाई
यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी त्यांचे समवेत
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू परीक्षित थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख
जयवंतराव शेलार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,गृहराज्यमंत्री यांचे खाजगी सचिव व
विशेष कार्यासन अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Thursday 10 March 2022
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 112 वी जयंतीनिमित्त. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरुची शासकीय निवासस्थानी केले विनम्र अभिवादन.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment