Friday, 10 March 2023

पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी अर्थसंकल्पातून 75कोटींचा निधी मंजूर.

 


         

दौलतनगर दि.10:- पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची  अतिवष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. दळण वळणाच्यादष्टीने महत्तवाच्या असलेल्या या रस्त्यांचे पुनर्बांधणीकरीता राज्याचे अर्थसंकल्पातून भरीव निधी मंजूर होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री  ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारशी करत पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे व पुलांच्या कामासाठी अर्थसंकल्पातून 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दपत्रकांत दिली आहे.

         प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची  अतिवष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. दळण वळणाच्यादष्टीने महत्तवाच्या असलेल्या या रस्त्यांचे पुनर्बांधणीकरीता राज्याचे अर्थसंकल्पातून भरीव निधी मंजूर होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री  ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारशी करत पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे व पुलांचे कामासाठी अर्थसंकल्पातून 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पाटण येथे सुरु असलेल्या प्रशासकीय इमारतीचे कामासाठी 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे व पुलांचे मंजूर कामांमध्ये नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-58 किमी 0/00 ते 5/00 भाग नवारस्ता ते मरळी रस्ता सुधारणा 08 कोटी, चरेगांव चाफळ दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी. 20/500 ते 21/500  (भाग -येरफळे ते त्रिपुडी  ) त्रिपुडी पुलाचे पोहोचमार्ग व त्यावरील बॉक्स सेलचे बांधकाम 04 कोटी, निसरे मारुल गुढे काळगांव रस्ता प्रजिता - 54 कि.मी. 0/00 ते 35/350 (भाग- कि.मी. 8/500 ते 15/00 टेळेवाडी  ते शिद्रुकवाडी फाटा )  ची सुधारणा 04 कोटी, गमेवाडी कडववाडी पाडळोशी मसुगडेवाडी रस्ता रस्ता सुधारणा करणे ता.पाटण, जि.सातारा भाग पाडळोशी ते मसुगडेवाडी 8/000 ते 10/000 ची सुधारणा 02 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.17/00 ते 22/500 -(तामीणे ते पाणेरी )ची  रुंदीकरणासह सुधारणा 05 कोटी, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्ता प्रजिमा 128 किमी 7/00 ते 10/00 भाग मुरुड ते मालोशी रस्ता सुधारणा 01 कोटी, इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 कि.मी.12/00 ते 16/00 जवळ(भाग- निवी ते सलतेवाडी ) सुधारणा 03 कोटी, डिचोली  नवजा  हेळवाक  मोरगिरी  साजूर  तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा 148 किमी 2/00 ते 09/00 भाग नवजा डिचोली ते  कामरगावं रस्त्याची सुधारणा 06 कोटी, डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन  रस्ता रा.मा.148 कि.मी.64/450 येथे साजूर,ता.कराड गावाजवळ पुलाचे बांधकामासहीत कि.मी.62/500 ते 65/00 भाग साजूर ते उत्तर तांबवे मध्ये रस्त्याची सुधारणा 04 कोटी, नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजुर तांबवे वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रा.मा. 148 कि.मी. 61/200 येथे  काढोली गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम 05 कोटी, नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 वर तारळे,ता.पाटण गावाजवळ तारळी नदीवर मोठा पूल 08 कोटी असा 50 कोटी या कामांना रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तर डोंगरी व दुर्गम भागातील दळण वळणाच्या दष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गावपोहोच रस्ते असलेल्या ग्रामीण मार्गाचे दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये सोनवडे  ते खांडेकरवाडी रस्ता सुधारणा ग्रामा 239 25 लाख,झाकडे रस्ता ग्रामा 187 सुधारणा 35 लाख,खुडुपलेवाडी ते गावडेवाडी  रस्ता ग्रामा 64 सुधारणा 100 लाख,जाधववाडी जोडरस्ता (चाफळ)ग्रामा 127 सुधारणा 25 लाख,नाव ते गोवारे पोहोच रस्ता ग्रामा 193 सुधारणा 70 लाख,शितपवाडी  ग्रामा 293 रस्ता सुधारणा 30 लाख,मत्रेवाडी  ग्रामा 314 रस्ता भाग पवारवाडी ते निवी रस्ता सुधारणा 150 लाख,जंगलवाडी चाफळ जोडरस्ता ग्रामा 126 सुधारणा 40 लाख,डेरवण कोळेकरवाडी रस्ता ग्रामा 130 सुधारणा 40 लाख,शिरळ काजारवाडी जोडरस्ता ग्रामा 172 रस्ता सुधारणा 15 लाख,सोनाईचीवाडी रस्ता ग्रामा 138 रस्ता सुधारणा 30 लाख,प्रजिमा 29 ते कारवट गुणुगलेवाडी रस्ता ग्रामा 91 सुधारणा 70 लाख,बिबी मकाईचीवाडी रस्ता ग्रामा 103 रस्ता सुधारणा 30 लाख,पाटण टोळेवाडी घेरादातेगड विठ्ठलवाडी सावंतवाडी नाणेल रस्ता ग्रामा 114 भाग टोळेवाडी पोहोच रस्ता सुधारणा 60 लाख,खोणोली कोचरेवाडी रस्ता ग्रामा 121 सुधारणा 35 लाख,वाघजाईवाडी नाणेगाव जाळगेवाडी चव्हाणवाडी रस्ता ग्रामा 123 भाग चव्हाणवाडी ते वरची जाळगेवाडी रस्ता सुधारणा 70 लाख,येराड जोडरस्ता रोमनवाडी ढेरुगडेवाडी ग्रामा 175 भाग हुंबरपेढा ते ढेरुगडेवाडी सुधारणा 70 लाख,मान्याचीवाडी ते गुंजाळी रस्ता ग्रामा 184 सुधारणा 20 लाख,कुसरुंड ते शिंदेवाडी पाटीलवस्ती रस्ता ग्रामा 229 सुधारणा 30 लाख,रामा 148 ते हुंबरवाडी  रस्ता ग्रामा 237 सुधारणा 30 लाख,रामा 136 ते सुभाषनगर रस्ता ग्रामा 250  सुधारणा 30 लाख,कोरिवळे टेळेवाडी रस्ता ग्रामा 272 टेळेवाडी गावातील लांबीत सुधारणा 30 लाख,पाडळोशी नारळवाडी  तावरेवाडी ग्रामा 119 सुधारणा 35 लाख,पानवळवाडी मालदन रस्ता ग्रामा 297 सुधारणा 40 लाख,वेताळवाडी खिलारवाडी रस्ता ग्रामा 137 सुधारणा 30 लाख,प्रजिमा 54 ते मोरेवाडी रस्ता ग्रामा 333 भाग मान्याचीवाडी ते चव्हाणवाडी रस्ता सुधारणा 30 लाख,माटेकरवाडी वरेकरवाडी कुंभारगाव रस्ता ग्रामा 342 सुधारणा 50 लाख,मोगरवाडी कोंजवडे रस्ता ग्रामा 372  सुधारणा 20 लाख,सडावाघापूर ता.पाटण बोर्गेवाडी मेंढोशी श्री माऊली मंदिर ते सडावाघापूर रस्ता ग्रामा 80 सुधारणा 40 लाख,भालेकरवाडी धडामवाडी वाल्मिकी ग्रामा 245 सुधारणा 100 लाख,सवारवाडी बेंदवाडी ते कडवे बु ग्रामा 7 भाग माळवस्ती सवारवाडी बेंदवाडी रस्ता सुधारणा 40 लाख,नुने जाधववाडी रस्ता ग्रामा 29 सुधारणा 20 लाख,दुसाळे चव्हाणवाडी रस्ता ग्रामा 44 सुधारणा 25 लाख,वजरोशी करमाळे रस्ता ग्रामा 51 सुधारणा 40 लाख,मणदुरे स्वागतवाडी दिवशी खुर्द रस्ता ग्रामा 61 सुधारणा 15 लाख,प्रजिमा 29 काठी टेक ते आवसरी भाग आवसरी ते काठी रस्ता ग्रामा 55 सुधारणा 50 लाख,प्रजिमा 57 ते म्हारवंड भारसाखळे रस्ता ग्रामा 58 सुधारणा 50 लाख,जाईचीवाडी  मराठवाडी रस्ता ग्रामा 70 सुधारणा 80 लाख,धडामवाडी केरळ ते खिवशी राजवाडा रस्ता ग्रामा 74 सुधारणा 25 लाख,कुसवडे फाटा ते काठीटेक पळासरी रस्ता ग्रामा 54 सुधारणा 40 लाख,गोठणे जोडरस्ता ग्रामा 206 सुधारणा 70 लाख,डिगेवाडी काळेवाडी रस्ता ग्रामा 251 सुधारणा 60 लाख,प्रजिमा 37 ते पाबळवाडी ग्रामा 42 रस्ता सुधारणा 40 लाख,चिंचेवाडी वजरोशी रस्ता ग्रामा 45 सुधारणा 30 लाख,दुसाळे ते सडा दुसाळे रस्ता ग्रामा 43 भाग सडादुसाळे पोहोच रस्ता 40 लाख,दिवशी जुंगठी ग्रामा 72 भाग जुंगठी ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 50 लाख,देवघर तामकणे रस्ता ग्रामा 87 सुधारणा 40 लाख,कोंढावळे हरीजनवस्ती रस्ता ग्रामा 160 सुधारणा 15 लाख,देवघर गोवारे रस्ता ग्रामा 193 सुधारणा 25 लाख,शिंदेवाडी धजगाव धडामवाडी रस्ता ग्रामा 380 सुधारणा 15 लाख,मारगवस्ती मणदुरे रस्ता ग्रामा 386 सुधारणा 15 लाख,चोपडी जोडरस्ता ग्रामा 240 सुधारणा 30 लाख,जिंती जितकरवाडी रस्ता ग्रामा 304 सुधारणा करणे भाग भातडेवाडी ते जितकरवाडी सुधारणा 20 लाख,पांढरेपाणी रस्ता ग्रामा 207 सुधारणा 25 लाख,गमेवाडी ते डेळेवाडी पोहोच रस्ता ग्रामा 148 खडी.,डांबरीकरण 70 लाख,तांबवे डेळेवाडी रस्ता सुधारणा 30 लाख,पश्चिम सुपने जोमलिंग रस्ता ग्रामा 142 सुधारणा 30 लाख,आरेवाडी ते दक्षिण तांबवे रस्ता ग्रामा 145 सुधारणा 50 लाख,वस्ती साकुर्डी जोडरस्ता  सुधारणा 30 लाख,पाडळी केसे रस्ता ग्रामा 147 सुधारणा 20 लाख,तांबवे मोळेवाडी आरेवाडी गमेवाडी पाठरवाडी रस्ता ग्रामा 147 भाग साजूर गमेवाडी ते डेळेवाडी सुधारणा 30 लाख या कामांचा समावेश आहे. राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण  यांनी अर्थसंकल्पामध्ये रस्ते व पुलांच्या कामांसाठी भरघोस असा निधी मंजूर केल्याबद्यल ना.शंभूराज देसाई यांनी  आभार मानले.तर मंजूर कामे तातडीने सुरु करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांची अधिवेशन संपताच ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेऊन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन कामे सुरु करण्यासंदर्भात सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

Wednesday, 8 March 2023

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा दि.10 मार्च रोजी 113 वा जयंती सोहळा कार्यक्रम. महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई येथे करणार अभिवादन.

 


दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 113 वा जयंती सोहळा कार्यक्रम शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता  ना.शंभूराज देसाई यांचे शासकीय निवासस्थान "पावनगड" (बी-04), येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ना. शंभूराजजी देसाई व इतर मान्यवर हे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. तसेच दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथील “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजीत करण्यात आलेल्या जयंती सोहळा कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठा हातभार लागला आहे. असे हे पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जयंती सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून सध्या मुंबई येथे राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने ना.शंभूराजजी देसाई हे मुंबई येथे आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ना. देसाई यांचे  शासकीय  निवासस्थान "पावनगड" (बी-04), येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ना. शंभूराजजी देसाई व इतर मान्यवर हे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. दरम्यान स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 113 वा जयंती सोहळा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा)  यांच्या  प्रमुख उपस्थितीत  दौलतनगर ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत”लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता  आयोजीत करण्यात आला आहे.                 स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद,हितचिंतक यांनी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांना अभिवादन करण्याकरीता मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी पत्रकात केले आहे.

Thursday, 23 February 2023

दौलतनगर,ता.पाटण येथे शनिवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचेकरीता एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन.

 

दौलतनगर दि.23:- पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पध्दतीने करण्याबरोबर राज्य शासनाच्या विविध योजना ह्या ग्रामस्तराव प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची एकदिवशीय कार्यशाळा शनिवार दि. 25 फेब्रुवारी  2023 रोजी सकाळी 10.00 वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केली आहे. या एकदिवशीय कार्यशाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार आहे.यावेळी सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.या एकदिवशीय कार्यशाळेच्या पहिल्या प्रशिक्षण सत्रामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील हे सकाळी 11.30 ते 12.30 वा. पर्यंत सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामपंचायतीच्या कामकाजातील सक्रीय सहभाग या विषयावार तर दुपारी 12.30 ते 01.30 वा. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य पुणेचे राज्यप्रकल्प संचालक आनंद भंडारी यांचे ग्रामपंचायत विकास आराखडा जीपीडीपी व ई ग्रामस्वराज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 02.30 ते 03.30 वा.पर्यंत पंचायत समिती संगमनेर जि.अहमदनगरचे सहायक गट विकास अधिकारी संदिप वायाळ हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामसमृध्दी या विषयावर तर दुपारी 03.30 ते 04.30 वा.पर्यंत यशदा तथा संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था महाराष्ट्र राज्य पुणे चे उपसंचालक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचे शाश्वत विकास उद्दीष्टये व विविध शासकीय योजनांमध्ये लोकसहभाग याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.तर सायं.04.30 ते 5.00 वा. यावेळेत एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप होणार असून यावेळी समारोपप्रसंगी सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंतशी व सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले हे मार्गदर्शन करणार असून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सदर एकदिवशीय कार्यशाळेला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका संघटनेचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Thursday, 16 February 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना आसवनी/इथेनॉल/को-जनरेशन प्रकल्प उभारणार. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा निर्णय. राज्य शासन सर्वोत्परी सहकार्य करणार-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई.

 

दौलतनगर दि.16:- पाटणची अर्थवाहिणी असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने बीओओटी / बीओटी तत्त्वावर आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्प उभारण्यासाठी विशेष सर्व साधारण सभेचे आयोजन केले होते.यावेळी उपस्थित सभासदांनी इथेनॉल प्रकल्प बीओओटी / बीओटी तत्वावर उभारण्यासाठी एकमताने मंजूरी देत प्रकल्प्‍ उभारण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे संचालक मंडळाला देण्यात आले. या सभेकरीता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना.शंभूराज देसाई हेऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्पासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटीबद्द असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी ऑनलाईन बोलताना दिली.

             लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केली होती यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे, सर्जेराव जाधव,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,जालंदर पाटील,विजयराव मोरे,संतोष गिरी,बबनराव भिसे,प्रकाशराव जाधव, विजयराव जंबुरे,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई,फायनान्स मॅनेंजर व्ही.ए.देसाई यांचेसह सर्व संचालक मंडळ, शिवदौलत बॅंकेचे चेअरमन संजय देशुमख, ऊस उत्पादक सभासद पदाधिकारी व कार्यकर्ते,कारखाना अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

                याप्रसंगी बोलताना ना.देसाई म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्योच माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी उभारलेला हा कारखाना स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांनी काटकसरीचे धोरण अवलंबून चालवला,कमी कालावधीमध्ये आपला कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा केला. सध्या महाराष्ट्रीचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व मंत्रीमंडळ हे सहकारी साखर कारखान्यांचा विस्तारवाढ करण्यासाठी  सकारात्क असून,आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यालाही राज्य  शासनाकडून  विस्तारवाढीकरीताआर्थिक मदताचा शासन निर्णय  झाला असून कारखान्याचा निधी वर्ग होण्याचा प्रस्ताव दाखल ही केला असून, याच वर्षात या निधीची तरतूद करुन आपल्या कारखान्यास निधी वितरित करण्याबाबत शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. पाटण सारख्या डोंगरी व दुर्गम अशा तालुक्यामध्ये पहिल्यापासून आपण अडचणीच्या काळामध्ये कारखाना चालवला. सध्या महाराष्ट्रामध्ये 1250 मे.टन क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये आपला एकमेव सहकारी साखर कारखाना चांगल्या पध्दतीने सुरु असून 1250 मे.टन क्षमतेचे अनेक कारखाने बंद पडले,अवसानात,लिलावात निघाले.सध्या सहकार क्षेत्रामध्ये अनेक नविन बाबी समोर येत आहेत. पाच हजार मे.टन क्षमतावाढीबरोबर डिस्टीलरी/इथेनॉल उत्पादन अशा उपपदार्थांचे उत्पादन करण्याचे धोरण राज्य शासनाकडून राबविण्यासाठी सहकार्य करण्यात येत आहे.  

       दरम्यान चेअरमन यशराज देसाई म्हणाले 2500 मे.टन.क्षमतावाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन सध्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. शासनाच्या भाग भांडवलातून कर्ज उभारणी करत हे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याची सरासरी गाळप क्षमता वाढ झाली आहे.कारखान्याचे गाळप क्षमता वाढीबरोबर इथेनॉलचे उत्पादन करणे गरजेचे असून आसवनी/ इथेनॅाल / को-जनरेशन प्रकल्प उभारणीसाठी जादा खर्च अपेक्षित असल्याने बीओओटी / बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारण्यासाठी आजची ही विशेष सर्व साधारण सभा घेण्यात आली. सध्या केंद्र शासनाने इथेनॉल उत्पादन करण्याचे धोरण राबविले असून इथेनॉल प्रकल्प फायद्यात आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी सर्व सभासदांच्या सहकार्यातून सभासदांच्या हिताचाच निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात येईल असे शेवटी त्यांनी सांगीतले.

 चालू वर्षी राज्यामध्ये ऊसाचे 25 ते 30 टक्के उत्पादन कमी झाले आहे. आपले कारखान्याचे विस्तारीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच विस्तारीकरणाचे दुसऱ्या टप्प्याचे काम चालू करत आहोत.कारखान्याचे विस्तारीकरणासाठी कर्ज घेतले असून उपपदार्थ प्रकल्पासाठी सुमारे 125 कोटी खर्च अपेक्षित असून दोन्ही कर्ज मिळून अंदाजे 175कोटी कर्ज कारखान्यास  आर्थिकदृष्टया जास्त होणार असून तो न परवडणारा आहे. 60 केएलपीडी डिस्टीलरी 213 दिवस चालली तर साखरेपेक्षा 18 ते 19 कोटी रुपये जादा उत्पन्न मिळणार आहे. आपले कारखान्याचे सारख हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असूनही आपण इतर कारखान्यांच्या बरोबर ऊस दर देत असल्याने सर्व सभासदांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपले कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. स्वागत व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी केले तर आभार संचालक बबनराव शिंदे यांनी मानले.

Monday, 13 February 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत होणार दुरुस्ती. नाडे ढेबेवाडी रस्त्यावरील सांगवड गावाजवळील कोयना नदीवरील पुलाचे दुरुस्तीसाठी 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 


 

   दौलतनगर दि.13 :- पाटण तालुक्यातील नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 वर किमी 1/120 मध्ये सांगवड गावाजवळ कोयना नदीवर असलेल्या पुलाच्या दुरुस्तीकरीता निधी मंजूर होण्याकरीताचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाडे ढेबेवाडी या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता निधी मंजूरीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला होता.त्यानुसार सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता सन 2022-23 चे रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या मंजूर निधीतून सांगवड येथील पुलाचे मजबूतीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्‍दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील दळण-वळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नाडे ढेबेवाडी या रस्त्यावरील सांगवड गावाजवळ कोयना नदीवर मोठया पूलाची उभारणीचे कामाला दि.10 एप्रिल 1958 ला सुरुवात होऊन दि. 31 मार्च 1963 ला या पुलाचे काम झाले. तेव्हापासून या पुलावरुन वाहतूक सुरळीत सुरु आहे. दरम्यानच्या कामालवधीमध्ये कोयना परिसरासह पाटण तालुक्यात प्रती वर्षी होणा-या अतिवृष्टीने कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे  सांगवड येथील या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे होते. प्रती वर्षी किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत होती. परंतु या पुलाचा कालावधीचा विचार करता याचे मजबुतीकरणासाठी भरीव निधीची तरतुद होण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई  यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाडे ढेबेवाडी या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता निधी मंजूरीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला. तद्नंतर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सांगवड येथील पुलाचे दुरुस्तीकरीता सन 2022-23 चे रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 02 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव(रस्ते) यांनी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांना लेखी पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.सन 2022-23 मध्ये रस्ते देखभाल दुरुस्ती अंतर्गत योजनेतर तरतूदीमधून रस्ते दुरुस्ती करणेचा कार्यक्रम संदर्भानुसार हा मंजूर निधी प्राप्त झाला असून या निधीतून सांगवड येथील कोयना नदीवरील मोठया  पुलाचे मजबुतीकरणासह दुरुस्तीचे काम पुर्णत्वाकडे जाणार आहे.दरम्यान नाडे ढेबेवाडी या प्रमुख जिल्हा मार्गावरील सांगवड येथील पुलाचे मंजूर असलेले हे काम तातडीने पुर्ण होण्याकरीता लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात येऊन हे सांगवड पुलोच दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून रविवार दि. 19 रोजी दौलतनगर,ता.पाटण येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन. पुणे,सातारा व कोल्हापूर येथील विविध 50 कंपन्यांचा असणार सहभाग.

 

दौलतनगर दि.13:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक व युवतींना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई  शताब्दी स्मारक येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरीता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर नोकरी महामेळाव्यामध्ये पुणे,सातारा व कोल्हापूर येथील विविध नामवंत कंपन्यांचा सहभागी होणार असून या नोकरी महामेळाव्यामध्ये इयत्ता 05 वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या युवक युवतींना नोकरी मिळण्याच्यादृष्टीने मोफत सहकार्य करण्यात येणार आहे.दरम्यान या नोकरी महामेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक व युवतींनी दौलत नोकरी महामेळाव्याचे वेबाईवरील फॉर्म आवश्यक त्या माहितीसह भरुन ऑनलाईन नोंदणी करावी.तसेच रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09 ते सायं.05 यावेळेत दौलतनगर(मरळी), ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे उपस्थित राहिलेल्या युवक युवतींच्या दोन सत्रामध्ये मुलाखती घेण्यात येणार असून मुलाखत व निवड झालेल्या युवक युवतींचे निवडपत्रांचे वाटपही  यावेळी करण्यात येणार आहे. दौलतनगर ता.पाटण येथील रविवारी होणाऱ्या नोकरी महामेळाव्यामध्ये मॅन्यूफॅक्चरिंग टेलिकॉम,बँकींग फायनान्स,बीपीओ/केपीओ रिटेल,ट्रेनिंग हॉटेल्स व सिक्यूरिटी हॉस्पीटॅलिटी या सेक्टरच्या माध्यमातून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याने या रोजगार महामेळाव्यामध्ये पाटण विधासभा मतदारसंघातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Thursday, 9 February 2023

मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघात मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून 276 शाखांचे शुभारंभ.

 


  दौलतनगर दि.09:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे दि.09 फेब्रुवारी रोजीच्या वाढदिवसानिमित्त ठाणे ,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक यांनी मतदारसंघामध्ये पक्षसंघटना वाढविण्याच्या दृष्टीने वाढदिवसाची एक अनोखी भेट मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना दिली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या गावो-गावी तब्बल 276 नवीन शांखाचा शुभारंभ स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या या संकल्पनेला पाटण विधानसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या वतीने गावोगावी बाळासाहेबांची शिवसेना शाखांचा शुभारंभ करत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमीत्त  अनोखी भेट दिली. ना.शंभूराज देसाई  यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे  मुंबई येथील निवासस्थानी भेट देत पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वाढदिवस अभिष्टचिंतन केले व मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

         वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघेसाहेब यांची माणसुकीची शिकवण यांच्या आधारे बाळासाहेबांची शिवसेना जनसेवेत कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या सूत्रानुसार कार्यरत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभारंभ करण्यात असलेल्या २76 शाखा जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्पर राहतील, सोबतच युवा सेना, महिला आघाडीच्या माध्यमातून युवकांसह महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल असा विश्वास मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तसेच सर्व स्थानिक पदाधिकारी, शाखाप्रमुख, शिवसैनिक व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाटण तालुक्यात ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त गावो-गावी पक्ष संघटना वाढविण्यासाठी गावनिहाय शाखा सुरु करुन एकाच दिवशी या शाखांचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 276 शाखांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.यामध्ये नाणेगाव पुनर्वसन,माजगाव,चाफळ,जाळगेवाडी खालची ,जाळगेवाडी वरची,माजगाव माळवस्ती, जाधववाडी, माथणेवाडी, कवठेकरवाडी,सुर्याचीवाडी,कडववाडी,तोरस्करवाडी,नाणेगाव खुर्द,केळाली,मसुगडेवाडी केळोली,बाटेवाडी,तावरेवाडी,नारळवाडी,मसुगडेवाडी,पाडळोशी,कोचरेवाडी,दाढोली,बाबरवाडी,मसुगडेवाडी दाढोली,खोणोली,डेरवण,शिंगणवाडी,सडावाघापूर,सडाबोडकी,सडानिनाई,सडादाढोली,सडादुसाळे,दुसाळे,बांधवाट,चिंचेवाडी,पांढरवाडी,तारळे,आंबळे,वेखंडवाडी, राहुडे, निवडे, नुने, दुटाळवाडी, जाधववाडी, लोरेवाडी, कोंजवडे, भुडकेवाडी खालची,भुडकेवाडी वरची,कडवे बुद्रुक,केळेवाडी वरची, पाडेकरवाडी, घाटेवाडी, मालोशी, मुरुड, धुमकवाडी,आवर्डे,मरळोशी,वाघळवाडी ढोरोशी, आंबेवाडी, जन्नेवाडी, जुगाईवाडी, बोर्गेवाडी, घोट, सावरघर, बांबवडे, खडकवाडी,जंगलवाडी,जिमनवाडी,बागलेवाडी,मोगरवाडी,गर्जेवाडी, कडवे खुर्द, जगदाळवाडी, गोरेवाडी, तोंडोशी,गायमुखवाडी,कळंबे,बामणेवाडी,डफळवाडी,वाझोली,सुपुगडेवाडी,कुठरे,पवारवाडी,मोरेवाडी,निगडे,घोटील,पाचुपतेवाडी,गुढे,तळमावले,साईकडे,करपेवाडी,शिद्रुकवाडी,खळे,काढणे,बागलवाडी,तुपेवाडी,मानेगाव,मान्याचीवाडी,कुंभारगाव,चाळकेवाडी,गलमेवाडी,कुंभारगाव,काळगाव,वेताळ,कुमाळ,लोटलेवाडी,मस्करवाडी,काळगाव, करपेवाडी, धनगरवाडा, भरेवाडी, रामिष्टेवाडी, येळेवाडी,घोटील,निगडे,कसणी,निवी, उमरकांचन, सावंतवाडी, धनावडेवाडीमराठवाडी,भोसगाव,ढेबेवाडी,साबळेवाडी,मालदन,सुतारवाडी,जिंती,मोडकवाडी,माईगडेवाडी,सातर,अनुतेवाडी,कोळेकरवाडी,मेंढ,जाधववाडी,मत्रेवाडी,आंब्रुळकरवाडी,मान्याचीवाडी,महिंद,सणबूर,जानुगडेवाडी,शितपवाडी,नाडे,पांढरवाडी तेलेवाडी,क्रांतीनगर माथणेवाडी,आडूळ पेठ,आडूळ गावठाण,कवरवाडी,मुळगाव, आंब्रुळे, नेरळे, चेवलेवाडी,चोपडी,बेलवडे,त्रिपुडी,नाडोली,डिगेवाडी,साजूर,उत्तरतांबवे,गमेवाडी,आबईचीवाडी,सोनाईचीवाडी,ठोमसे,येराडवाडी,नारळवाडी,जमदाडवाडी,मल्‍हारपेठ1,मल्हारपेठ2,नवसरवाडी,गणेवाडी,तांबेवाडी,आबदारवाडी,गिरेवाडी,बोडकेवाडी,ऊरुल,मंद्रुळहवेली,वेताळवाडी,खिलारवाडी,शेडगेवाडी,नावडी,भारसाखळे,वनकुसवडे,घाणबी,वाटोळे,दिवशीखुर्द,मराठवाडी,जुंगठी,खिवशी,म्हारवंड,निवकणे,मणदुरे,कोकीसरे,मोरगिरी,पेठशिवापूर,नाटोशी,सातेवाडी,झाकडे,‍दिक्षी,धावडे,गुरेघर,काहिर,आटोली,कळकेवाडी,किल्लेमोर‍गिरी,आटोली,आंब्रग,पाचगणी,गोकूळतर्फपाटण, पांढरेपाणी,बाहे,शिद्रुकवाडीधावडे,वाडीकोतावडे,कदमवाडीनाटोशी,कुसरुंड,आंबेघरतर्फमरळी, गोकूळनाला,कोयनानगर,देशमुखवाडी,ऐनाचीवाडी,हुंबरळी,तोरणे,कामरगाव,मानाईनगर,नवजा,रासाटी,आंबेघर किसरुळे, किसरुळे, किसरुळे भराडेवस्ती, बोपोली, गोवारे, देवघर, येराड, तामकडे, टोळेवाडी, आंबवणे, कातवडी, कवडेवाडी,तामकणे,घाणव,चिटेघर,येरफळे,कोतावडेवाडी साखरी,केरळ,धडामवाडी केरळ, काळोली, पिंपळोशी, बोंद्री, जाईचीवाडी, बिबी,सलतेवाडी ताटेवाडी,लुगडेवाडी,मारुल तर्फ पाटण, शिरळ, हुंबरवाडी, सोनवडे, शिंदेवाडी, सुळेवाडी,डावरी,धजगाव,भिलारवाडी,मारुलहवेली,दिवशीबु,पापर्डे,गारवडे,बहुले,हावळेवाडी,जरेवाडी,पाळेकरवाडी,कोरिवळे,टेळेवाडी,मरळी,गव्हाणवाडी,चोपदारवाडी,सांगवड,सुर्यवंशीवाडी चौगुलेवाडी,विहे नविन वसाहत,विहे जुने गाव या गावांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या शाखांचा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच युवा सेना व महिला आघाडी यांच्या 59 शाखांचा ही सोबत शुभारंभ केला.

  चौकट:-ना.एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रमांना साजरा.

        महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे गुरुवार दि. 09 रोजीचा वाढदिवस हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून पाटण मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व ग्रामीण रुग्णालय  पाटण व ढेबेवाडी येथे सर्व रोग निदान व रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

चौकट: मुख्यमंत्र्याकडून ना.शंभूराज देसाई यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या विविध उपक्रमाचे केले कौतुक.

          मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणेकरीता ठाणे ,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या एका दिवसामध्ये तब्बल 276 शाखांचे गावो-गावी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आले. यशस्वी शुभारंभ केल्याबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपक्रमाचे कौतुक करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.