Thursday 31 January 2019

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडून पाटण मतदारसंघातील 39 गावांना ०३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.




­­
          दौलतनगर दि.३१:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून ३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
          प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील ३९ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर होणेकरीता दि.०३.१०.२०१८ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ३९ विविध विकासकामांना ३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना  दि.२८ जानेवारी, २०१९ रोजीचे पत्रानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये मोरेवाडी (चिखलेवाडी) अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख, वायचळवाडी कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, पाचुपतेवाडी मालदन अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, म्हाळूंगेवस्ती सातर अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, शेंडेवाडी कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, किल्लेमोरगिरी ते गुंजाळी रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख, गुरेघर अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.50 लाख, नहिंबे तळीये सुतारवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.50 लाख, मणेरी साळूंखे वार्ड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 300 मीटर 6.97 लाख, सदुवर्पेवाडी सळवे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, कोदळ पुनर्वसन अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,वेताळवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, तळमावले नवीन वसाहत अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, रामिष्टेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख, मस्कवाडी नं.1 उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख,पोकळेवाडी कारळे रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,बाचोली जोतिर्लिंगनगर अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, धामणी स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण 125 मीटर  10.00 लाख, कसणी ते धनगरवाडा रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, काजारवाडी खळे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, रुवले विठ्ठल साळूंखे घर ते हिंदुराव साळूंखे यांचे घर काँक्रीटीकरण 250 मीटर 5.00 लाख, शिंद्रुकवाडी ते डुबलवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख, ऊरुल अंतर्गत सनगरवाडी व पोळाचीवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 9.98 लाख, जाधववाडी चाफळ अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.27 लाख, जाईचीवाडी बोंद्री रस्ता खडीकरण डांबरीकरण  5.00 लाख, आवर्डे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, दुटाळवाडी नुने अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, मालोशी पोहोच रस्ता डांबरीकरण 10.00 लाख, धुमुकवाडी मुरुड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख, ताईचीवाडी शिरळ पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 6.00 लाख, पिराजीचीवाडी हुंबरळी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, कराड चिपळूण रोड ते पांढरवाडी तेलेवाडी नाडे रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख, राजवाडा घाणव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 4.99 लाख, म्हारकवस्ती मणदुरे गावपोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 6.00 लाख, मरड गावपोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 9.99 लाख, हुंबरळी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, करामळे वजरोशी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 9.99 लाख, नाणेल ता. पाटण येथे सभामंडप बांधणे. 7.00 लाख, जंगलवाडी तारळे येथे सभामंडप बांधणे 7.00 लाख असे एकूण ३ कोटी ५३ लाख १०,९०० रुपयांचा निधी मंजुर झाला असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

Wednesday 30 January 2019

पाटण तालुक्यातील सहा तलाठी कार्यालय इमारतींचे कामांना 01 कोटी 68 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.





दौलतनगर दि.2९:- पाटण तालुक्यातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणीच्या 06 तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्याकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शासकीय इमारत बांधणे या योजनेअंतर्गत 01 कोटी 68 लक्ष 46 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्यामध्ये ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण काम  करणा-या महसूल विभागाचा तलाठी सजा असलेल्या गावांमध्ये स्वंतत्र अशी तलाठी कार्यालय नसल्याने बहुतांशी तलाठी कार्यालयांचे दैनंदिन कामकाज हे त्या त्या संबंधित मंडल कार्यालयमध्ये सुरु होते. त्यामुळे महसूल विभागाचा स्वतंत्र तलाठी सजा असूनही तलाठी कार्यालयाची इमारत नसल्याने सर्व सामान्य जनतेला आपल्या कामांकरीता नाहक त्रास होत होता. ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्वतंत्र तलाठी सजा असलेल्या परंतु तलाठी कार्यालयाची इमारत नसलेल्या ठिकाणी नविन तलाठी कार्यालय इमारतींचे कामांना मजूरी देण्यात येऊन नविन तलाठी कार्यालय इमारतींचे कामांना निधी मंजूर होणेसाठी मी राज्याचे महसूलमंत्री व महसूल राज्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर महसूल विभागाकडून तातडीने संबंधित तलाठी कार्यालय इमारतींचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह मंजूरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यानुसार सन 2018-19 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शासकीय इमारत बांधणे या योजनेतून दि.29/01/2019 चे पत्रान्वये पाटण मतदारसंघातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणीच्या 06 तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्याकरीता 01 कोटी 68 लक्ष 46 हजार रुपये एवढया निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये तारळे तलाठी कार्यालय इमारत 28.52 लक्ष, ऊरुल तलाठी कार्यालय इमारत 28.46 लक्ष, मल्हारपेठ तलाठी कार्यालय इमारत 28.39 लक्ष, नाडे तलाठी कार्यालय इमारत 28.33 लक्ष, आडूळ पेठ तलाठी कार्यालय इमारत 28.31 लक्ष, बहुले तलाठी कार्यालय इमारत 26.45 लक्ष या नविन तलाठी कार्यालय इमारतींचे कामांचा समावेश असून लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने हि कामे हाती घेण्यात येणार असलेची माहिती आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत दिली आहे.

Tuesday 29 January 2019

वाडयापासून हाकेच्या अंतरावरील गांवाना माजी आमदारांना पाणी देता आले नाही हे दुर्दैव. आमदार शंभूराज देसाईंचे विरोधकांवर टिकास्त्र.






दौलतनगर दि.2९:- माजी आमदारांचा बालेकिल्ला  म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यातील मणदुरे भागाची सुरुवात सुरुल आणि बिबी या गांवापासून होते.ही दोन्ही गांवे माजी आमदारांच्या हाकेच्या अंतरावरील गावे असून सुरुल या गांवाला पिण्याच्या पाण्यासाठी २० रुपये मोजुन पाण्याचे बॅरल विकत घ्यावे लागत असल्याचे आणि बिबी गांवातील महिलांना डोक्याने पिण्याचे पाणी वाहून आणावे लागत असल्याचे आमचेबरोबर सर्वांनीच पाहिले आहे.विकासाच्या केवळ पोकळ गप्पा मारणाऱ्या माजी आमदारांना हाकेच्या अंतरावरील या गांवाना पाणी देता आले नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे टिकास्त्र आमदार शंभूराज देसाईंनी विरोधकांवर केले असून पिण्याच्या पाण्याच्या योजनेतही राजकारण करणाऱ्या या मंडळीनी या विभागातील जनतेचा आतापर्यंत केवळ राजकारणासाठीच वापर केला आहे त्यामुळे जो विकास करतोय त्याचे पाठीशी या विभागाने ठाम उभे रहावे असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी मणदुरे भागातील जनतेला केले.
            बिबी,ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजुर केलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.या योजनेकरीता आमदार शंभूराज देसाईंनी दि.07 मे,2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार 45 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी कार्यक्रमास पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी, शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,पांडुरंग घाडगे,यशवंत जाधव,कारखान्याचे संचालक शंकर शेजवळ,बबनराव भिसे,पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर,नगरसेविका सौ.मनिषा जंगम,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश जाधव,ॲड.तानाजी घाडगे,दादा जाधव,बापुराव सावंत,विलास कुऱ्हाडे, पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता एम डी.आरळेकर,बबनराव माळी,रामभाऊ देसाई,महादेव जाधव,महादेव पवार,दादासो पवार,दिनकर देसाई,खाशाबा जाधव,कृष्णत देसाई,विठ्ठल देसाई,आत्माराम कदम, रघूनाथ चव्हाण, रघूनाथ देसाई, राजाराम लोहार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,बिबी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे विरोधकांनीच विनाकारण राजकारण केले.शासनाच्या योजना मंजुर करणेकरीता मतदारसंघाच्या आमदारांची शिफारस लागते.यापुर्वी बिबी गांवच्या योजनेकरीता ढोबळपणे २५ लाख रुपयांचा निधी पाणी पुरवठा विभागाने प्रस्तावित केला होता परंतू या रक्कमेमध्ये ही योजना पुर्ण होत नसल्याने या योजनेकरीता आवश्यक असणारा ४४ लाख ९९ हजार म्हणजेच ४५ लाख रुपयांचा निधी मंजुर करावा असे मी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री यांचेकडे प्रस्तावित केले.यामध्ये या विभागातील वाटोळे या गांवाचाही समावेश आहे या दोन्ही योजना दि.07 मे,2016 रोजीच्या एकाच शासन निर्णयानुसार मंजुर झाल्या.वाटोळे गावच्या योजनेचे काम पुर्णत्वाकडे जात आले आहे. असे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना ही राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २०१४ ला मुख्यमंत्री झालेनंतर २०१५ साली अंमलात आणली.गांवातील विरोधक मंडळी कितीही म्हणत असली तरी २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमध्ये या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा समावेश त्यांचे शिफारशीने झाला आहे.ही बाब गांवातील सर्वांनाच माहिती आहे.विरोधकांच्या बालेकिल्लयातील पाण्याच्या योजनेचे श्रेय आम्हाला मिळू नये याकरीता गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात गांवातील विरोधक मंडळीनी विरोधकांना आणून या योजनेचे भूमिपुजन केले.विरोधकांनी भूमिपुजन करुनही एक वर्ष झाले तरी या योजनेचे काम का सुरु होवू शकले नाही.जे आपण केले आहे त्याला केलेच म्हणावे परंतू आपल्या विरोधकांच्या हातात गेल्या चार वर्षात कोणतीही सत्ता नसताना ते ही योजना कशी मंजुर करुन आणतील याचा विचार या गांवातील मंडळीनी करावा.विरोधकांच्या भूलथापा गांवातील महिलांबरोबर सर्वांच्याच लक्षात आल्या आहेत म्हणूनच गांवातील महिलांनी मला तुमच्याच हस्ते या योजनेचा शुभारंभ करा असा अट्टाहास माझेकडे धरला होता.आज या भूमिपुजनाकरीता या विभागाचे शासकीय अधिकारीही माझेसमवेत उपस्थित आहेत.मी कोणत्याही कामांचे भूमिपुजन करताना त्या कामांची निविदा प्रसिध्द झाली का? कार्यारंभ आदेश दिला का? हे पाहूनच भूमिपुजन करीत असतो.या विभागातील जनतेने विकास करणाऱ्यांच्या पाठीशी रहाणे गरजेचे आहे.पाटणपासून पुर्वेकडील गांवामध्ये पाहिले तर एका-एका गांवात तीन ते चार विकासकांमे सुरु आहेत. त्या मानाने आपण कुठे आहोत याचाही विचार या विभागाने करावा. असे आवाहन करीत त्यांनी सुरुल गांवातील युवकांच्या आग्रहास्तव या गांवाची पिण्याच्या पाण्याची योजना यावर्षीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये प्रस्तावित केली आहे भविष्यात ती योजना मंजुर होवून आल्यानंतर विरोधक ही आम्हीच मंजुर करुन आणल्याचा डांगोरा पिटतील हे नव्याने सांगायला नको असा टोलाही त्यांनी शेवठी बोलताना लगाविला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश जाधव यांनी केले.रामभाऊ देसाई यांनी मनोगत व्यक्त करुन उपस्थितांचे आभार मानले.यावेळी बिबी गांवातील ग्रामस्थ,युवक,महिला या मोठया संख्येने उपस्थित होत्या.
चौकट:- भूमिपुजनाला गावातील महिलांची लक्षणीय उपस्थिती,महिलांनी मानले आमदार देसाईंचे जाहीर आभार.
             साहेब, तुमच्याशिवाय हे काम पुर्णच होवू शकत नाही असे सांगत बिबी गावातील महिलांनी आमदार शंभूराज देसाईंची आठ दिवसापुर्वी कारखाना कार्यस्थळावर भेट घेतली आणि आमच्या योजनेचा नारळ तुम्हीच फोडा असा आग्रह धरला. योजनेच्या शुभारंभाप्रसंगी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती व महिलांनी औक्षण करुन आमदार शंभूराज देसाईंचे पाणी योजना मंजुर केलेबद्दल त्यांनी जाहीर आभार मानले.


Thursday 24 January 2019

शताब्दी स्मारकाच्या उदघाटनाची गर्दी,आमदार शंभूराज देसाईंना देणार आमदारकीची पुन्हा वर्दी.


                                
                    
                                 
 दौलतनगर दि.24:- पाटण तालुक्याचे दैवत व भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कर्म आणि जन्मभूमित आमदार शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नातून युती शासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या “महाराष्ट्र दौलत” या शताब्दी स्मारकाचा उदघाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते व राज्यातील विविध मंत्रीमहोदय व शिवसेना भाजप पक्षाचे विविध आमदार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये “न भूतो न भविष्यती” अशा उच्चांकी व रेकॉर्ड ब्रेक गर्दीमध्ये मोठया दिमाखात संपन्न झाला.आमदार शंभूराज देसाईंच्या अपेक्षेपेक्षा जास्त जनतेची उच्चांकी गर्दी या समारंभाला उपस्थित होती आणि हीच गर्दी आमदार शंभूराज देसाईंना २०१९ ला पुन्हा आमदारकीची वर्दी देणारी ठरणार असल्याची चर्चा संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात एैकावयास मिळत आहे.
                        या महिन्याभरात दोन समारंभ पाटण मतदारसंघातील जनतेने पाहिले या दोन्ही समारंभाची तुलना पाटण मतदारसंघातील जनता करीत आहे.यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचा उदघाटन सोहळा हाच सरस ठरला असाच निष्कर्ष पाटणमधील जनतेने काढला आहे.लोकनेते यांचेवरील प्रेमापोटी व निष्ठेपोटी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेची मांदियाळी समारंभास पहावयास मिळाली यंदाच्या वर्षी कोयनेला जेवढा पुर आला नाही त्याहून अधिक जनसागर यादिवशी समारंभात पहावयास मिळाला.यामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी गत साडेचार वर्षात पाटण मतदारसंघात केलेल्या अतुलनीय विकासकामांचाही मोलाचा वाटा आहे.असे मानले जाते. समारंभामध्ये खरा सुसंस्कृतपणा दाखविला तो या समारंभाचे संयोजक आमदार शंभूराज देसाईंनी.त्यांनी विरोधकांचे साधे नावही संपुर्ण सभेमध्ये घेतले नाही.मतदारसंघात आमदार शंभूराज देसाईंना विरोधक आता शिल्लकच राहिला नाही अशीच भूमिका सभामंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या मनामध्ये समोरचा जनसमुदाय पाहून दिसून आली.आमदार शंभूराज देसाई काय आहेत,मतदारसंघातील जनतेसाठी त्यांचा जीव किती तुटतो याचा प्रत्यय सर्वच मान्यवरांनी आणि उपस्थित जनसमुदायाने या सभेमध्ये दिला.
                       आमदार शंभूराज देसाईंनी मी संघर्षातून कसा उभा राहिलो,मला राजकारणातून दुर करण्याचा कुठुन कुठुन आणि कसा प्रयत्न झाला हे सांगत जनसमुदायाची मने जिंकत त्यांनी स्वत:साठी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे काहीही न मागता मुख्यमंत्री यांनी मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने मला इतके दिले आहे त्याचे दाखले देत आणि आभार व्यक्त करीत माझ्या मतदारसंघातील जनतेकरीता शासनाकडून अजुन एवढे मिळणे बाकी आहे असे सांगत त्यांनी जनहिताच्या दृष्टीने अनेक मागण्या मुख्यमंत्र्याकडे केल्या. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषणात आमदार शंभूराज देसाई हाडाचा नेता आहे जनतेप्रती त्यांची असणारी भावना मला चांगलीच माहिती आहे त्यांनी मागावे आणि मी ते दयावे असे सांगून आमदार शंभूराज देसाईंना माझे कायमच सहकार्य राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिलेली ग्वाही पाटण मतदारसंघातील जनतेला या समारंभात बरेच काही देवून गेली.
                       यापुर्वी पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या सभा पाहिल्या तर पक्षाच्या नेत्यांच्या मागून जिल्हयातील आमदारमहोदयांची उपस्थित आपण सर्वजण ग्रहीतच धरतो परंतू इथे असे घडले नाही आमदार शंभूराज देसाईंनी मंत्री ना.एकनाथ शिंदे,ना.बबनराव लोणीकर,ना.विजय शिवतारे,ना.सदाभाऊ खोत,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील,आमदार शिवाजीराव नाईक,आमदार अनिल बाबर,आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सत्यजित पाटील,आमदार धनंजय उर्फ सधीर गाडगीळ,आमदार उल्हास पाटील,आमदार विलासराव जगताप, आमदार डॉ.गौतम चाबुकस्वार,आमदार प्रकाश आबिटकर,आमदार नारायण पाटील,आमदार सुरेश भाऊ खाडे,आमदार उदय सामंत,माजी आमदार प्रा.सुनिल धांडे या युतीच्या मान्यवरांना निमंत्रीत करुन एकाच व्यासपीठावर नेत्यांची मोट कशाप्रकारे बांधता येते हे दाखवून दिले.आमदार शंभूराज देसाईंचा हाच मुसद्दीपणा वाखणण्याजोगा आहे अशीही चर्चा पाटण मतदारसंघात सध्या सुरु आहे.              
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या किमयेमुळे मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्री बारा आमदारांची समारंभास उपस्थिती.                            
             या उदघाटन सोहळयास मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेसमवेत राज्यातील युती शासनाचे सहा मंत्री गण तर युतीतील बारा आमदार महोदय यांची उपस्थिती आणि त्याहून अधिक पाटण मतदारसंघातील जनतेची अलोट गर्दी ही लक्षणीय होती.पश्चिम महाराष्ट्रातील आमदार मंडळीशी सलोख्याचे संबध असल्यानेच पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही आमदार मंडळी सभेकरीता उपस्थित होती आणि हीच खरी किमया आमदार शंभूराज देसाईंची आहे.
चौकट:- परवाच्या गर्दीने पाटण मतदारसंघातील यापुर्वीच्या सर्व सभांचा विक्रमच मोडला.
             आतापर्यंत पाटण तालुक्यात झालेल्या विविध सभांमध्ये देसाई गटाने कधीही खुर्चा लावून कोणतीही सभा आयोजीत केली नाही.परवाही मंडपात भारतीय बैठक ठेवण्यात आली होती एक एकरच्या मंडपात जेवढी गर्दी होती तेवढेच लोक मंडपाच्या चारी बाजूला उभे होते तर अनेकांना जागा न मिळाल्याने मंडपाच्या पुर्वेकडील रस्त्यावर सुमारे १ किमी अंतरावर लोक सभा एैकण्यास बसले होते.परवाच्या उच्चांकी व रेकॉर्ड ब्रेक गर्दीने पाटण मतदारसंघातील यापुर्वीच्या सर्वच सभांचा विक्रमच मोडीत काढला.या सभेमध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षवेदी ठरली.

Wednesday 23 January 2019

न भूतो न भविष्यती अशा उच्चांकी गर्दीमध्ये महाराष्ट्र दौलतचे उदघाटन सोहळयास उपस्थित राहून समारंभ यशस्वी केलेबद्दल मतदारसंघातील सर्वांचे आमदार शंभूराज देसाईंनी मांनले जाहीर आभार.


             


दौलतनगर दि. २३- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्म
आणि जन्मभूमित महाराष्ट्र राज्यातील युती शासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या "महाराष्ट्र दौलत" या शताब्दी
स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे न भूतो न भविष्यती अशा उच्चांकी गर्दीमध्ये दिमाखदार असे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते व राज्यातील विविध मंत्रीमहोदय व शिवसेना भाजप पक्षाचे विविध आमदार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मोठया दिमाखात संपन्न झाले. या समारंभाकरीता पाटण विधानसभा मतदारसंघातील लोकनेतेप्रेमी जनतेने अलोट अशी गर्दी करुन समारंभास भरभरून प्रतिसाद दिला. उच्चांकी व रेकॉर्ड ब्रेक गर्दीने राज्याचे मुख्यमंत्रीही भारावून गेले होते.समारंभाकरीता भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल पाटण मतदारसंघातील तमाम जनतेचे आणि हा समारंभ अतिशय नियोजनबध्द करुन यशस्वी केलेबद्दल सर्वांचे आमदार शंभूराज देसाईनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
                 पाटण तालुक्याचे दैवत आणि भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेवरील प्रेमापोटी आणि
निष्टेपोटी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेची मांदियाळी "महाराष्ट्र दौलत" या शताब्दी स्मारकाचे
उदघाटन समारंभास पहावयास मिळाली.या उद्धाटन सोहळयास पाटण मतदारसंघातील जनतेने अलोट अशी
गर्दी करुन समारंभास भरभरुन प्रतिसाद दिला. जनतेच्या प्रतिसादामुळेच सदरचा समारंभ मोठया दिमाखात संपन्न
झाला. याची जाणिव आम्हास आहे.समारंभाकरीता आलेली जनतेची ही मांदियाळी पाहून राज्याचे मुख्यमंत्रीही
भारावून गेले होते. लोकनेते साहेब यांचेवरील जनतेचे असणारे प्रेम आणि देसाई घराण्यावरील निष्ठा ही या
गर्दीमुळे दिसून आली. न भूतो न भविष्यती अशा उच्चांकी गर्दीमध्ये हा उदघाटन सोहळा संपन्न झाला याचा आम्हास खूप आनंद आहे जे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद पाटण मतदारसंघातील जनतेने आम्हास दिला. त्याबद्दल जनतेचे जाहीर आभार व्यक्त करणे माझे आद्य कर्तव्य आहे. मी जाहीरपणे पाटण मतदारसंघातील लोकनेते प्रेमी जनतेचे आणि उदघाटन समारंभ यशस्वी करणा-या सर्वांचे मनःपुर्वक जाहीर आभार व्यक्त करतो.
                लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्य उभारणीत दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल
महाराष्ट्र शासनाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करणेकरीता त्यांचे कर्म आणि जन्मभूमि असणा-या पाटण तालुक्यात
त्यांचे भव्य असे शताब्दी स्मारक उभारण्यास शासनाने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने
भरघोस असा निधी दिला. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे हे ऋण कधीही न विसरता येणारे आहे.मी त्यांचेही
आभार व्यक्त करतो.शताब्दी स्मारक उभारण्याचे कामाचा शुभारंभ आणि शताब्दी स्मारकाचे उदघाटन राज्याचे
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते मोठ्या दिमाखात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्याच्या
तोलामोलात पार पडले याचा मनस्वी आनंद खुप आहे. उदघाटन समारंभास माझे विनंतीवरुन राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे.पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर.सातारा जिल्हयाचे
पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री ना.विजय शिवतारे.सातारा जिल्हयाचे सहपालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री
ना. सदाभाऊ खोत,कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,सातारा लोकसभा
मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, आमदार शिवाजीराव नाईक,आमदार अनिल
बाबर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सत्यजित पाटील, आमदार धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ, आमदार
उल्हास पाटील,आमदार विलासराव जगताप,आमदार डॉ.गौतम चाबुकस्वार,आमदार प्रकाश आबिटकर,
आमदार नारायण पाटील,आमदार सुरेश भाऊ खाडे,आमदार उदय सामंत,माजी आमदार प्रा.सुनिल धांडे हे प्रमुख
मान्यवरही उपस्थित राहिले या सर्वांचा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा नातू आणि पाटण विधानसभा
मतदारसंघाचा आमदार म्हणून जाहीरपणे मन:पूर्वक जाहीर आभार व्यक्त करतो असेही आमदार शंभूराज देसाई
यांनी पत्रकात म्हंटले आहे.


लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने वंदनीय स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विन्रम अभिवादन. आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत जयंती समारंभ संपन्न.




दौलतनगर दि.23 :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ९२ व्या जयंती दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.
                     दौलतनगर ता.पाटण याठिकाणी स्व.शिवाजीराव देसाई सांस्कृतिक भवन याठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ९२ व्या जयंती दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. प्रारंभी तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार शंभूराज देसाई यांनी विन्रम अभिवादन केले.
                      याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,आपल्या उद्योग समुहाचे श्रध्दास्थान महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध महाराष्ट्राला परिचीत आहेत.शिवसेना पक्षाच्या उभारणीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे प्रतिपादन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यातून केले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्याकरीता स्व.बाळासाहेब ठाकरे हे कारखाना कार्यस्थळावर आले होते. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत माझा शिवसेना पक्षात प्रवेश झाला त्यांच्या माध्यमातून मला सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जाण्याने शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. मुंबईत राहणाऱ्या गावाकडील जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम स्व. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले.गावाकडचा माणूस मुंबईसारख्या मायानगरीत ताठ मानेने उभा होता आणि आजही आहे तो स्व. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. त्यांचे अनंत उपकार महाराष्ट्रातील जनतेवर असून आपल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या तसेच पाटण तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे ९२ व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.जयवंतराव शेलार,लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, संचालक पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे,राजेंद्र गुरव,राजाराम मोहिते,पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर,जंगम,शफीभाई सातारकर,जे.ए.पाटील,अमोल मोहिते मरळीचे सरपंच राजेंद्र माळी व इतर मान्यवर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच,जय मल्हार संघटना पाटण तालुका यांचे सर्व पदाधिकारी, कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कामगार सेवा सोसायटी तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते,शिवसैनिक याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होते.
चौकट:- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीचे औचित्य साधून शिवसेना सदस्य नोंदणीचा आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते शुभारंभ.
 हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ९२ जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना पक्षाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे हस्ते करण्यात आला संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व नवनिर्वाचीत शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे.


Saturday 19 January 2019

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे “महाराष्ट्र दौलत” शताब्दी स्मारकाचा सोमवार २१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते उदघाटन समारंभ.




 दौलतनगर दि.१8:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्म आणि जन्मभूमित महाराष्ट्र राज्यातील युती शासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाचा पहिल्या टप्प्याचे दिमाखदार उद्घाटन व दुस-या टप्प्याचे भूमिपूजन असा भव्य समारंभ,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते व राज्यातील विविध मंत्रीमहोदय व शिवसेना भाजप पक्षाचे विविध आमदार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार दि. २१ जानेवारी,२०१९ रोजी दुपारी ०१.३० वा. दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी संपन्न होत असून या समारंभाबरोबरच पाटण विधानसभा मतदार संघातील तारळी धरणातून ५० मीटर हेडवरील जमीन क्षेत्रास पाणी देण्याच्या योजनांचे ई-भूमिपूजन व पहिल्यांदाच राज्यात सर्वात जास्त म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ५४ गावातील नळ पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन असा संयुक्तीक समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती या समारंभाचे निमंत्रक आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                         प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्म आणि जन्मभूमित लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्य उभारणीत दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांचे पाटण तालुक्यात भव्य असे शताब्दी स्मारक उभारावे अशी आमची राज्य शासनाकडे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जन्मशताब्दी वर्षापासून मागणी होती त्या मागणीस सध्या राज्यात कार्यरत असलेल्या युतीच्या शासनाने मुर्हुत स्वरुप देवून सन २०१५ मध्ये १० कोटी रुपयांचा निधी मंजुर करीत पाटण तालुक्यातील दौलतनगर, येथील जन्मभूमित शताब्दी स्मारक उभारण्याचे कामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते भूमिपुजन करुन करण्यात आला होता नुकतेच या शताब्दी स्मारकाचा पहिला टप्पा पुर्णत्वाकडे गेला असून या शताब्दी स्मारकाचे उदघाटनही राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते सोमवार दि. २१ जानेवारी,२०१९ रोजी आयोजीत करण्यात आले आहे.उदघाटनानंतर आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे हे शताब्दी स्मारक महाराष्ट्र दौलत या नावाने ओळखले जाणार आहे.शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामांमध्ये  आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे उभारण्यात आलेल्या ५० फुट उंचीच्या पुतळयाचे अनावरणही मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. हा पुतळा देशामध्ये पहिल्यांदा पाटण तालुक्यात उभारण्यात आला आहे.याचबरोबर शताब्दी स्मारकाच्या दुस-या टप्प्यास आवश्यक असणारा निधी राज्य शासनाकडून मिळावा याकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून याचेही भूमिपूजन यादिवशी आयोजीत करण्यात आले आहे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील तारळी धरणातून ५० मीटर हेडवरील जमीन क्षेत्रास पाणी देण्याच्या योजनांचे ई-भूमिपूजन समारंभ व राज्यात पहिल्यांदा युती शासनाच्या काळातील सर्वात जास्त एकाचवेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील ५४ नळ पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन असा संयुक्तीक समारंभ सोमवारी दौलतनगर, ता. पाटण याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते,जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन,सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर,परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते,जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री ना.राम शिंदे,उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई,कामगार,भूकंप पुनर्वसन व कौशल्य विकास मंत्री ना.संभाजीराव पाटील निलंगेकर,पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम,रोजगार हमी व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री ना.विजय शिवतारे,सातारा जिल्हयाचे सहपालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत, सहकार राज्यमत्री ना. गुलाबराव पाटील,ग्रामविकास राज्यमंत्री ना. दादाजी भुसे,कै.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, आमदार शिवाजीराव नाईक,आमदार अनिल बाबर,आमदार सुरेश हाळवणकर,आमदार सत्यजित पाटील,आमदार धनंजय उर्फ सधीर गाडगीळ,आमदार उल्हास पाटील, आमदार विलासराव जगताप,आमदार चंद्रदिप नरके,आमदार अमल महाडीक,आमदार राजेश क्षिरसागर,आमदार डॉ.गौतम चाबुकस्वार, आमदार प्रकाश आबिटकर,आमदार नारायण पाटील,आमदार सुरेश गोरे,आमदार सदानंद चव्हाण,आमदार उदय सामंत, आमदार वैभव नाईक,आमदार राजन साळवी व आमदार भरतशेठ गोगावले या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे.

पाटण मतदारसंघातील ५४ नळ पाणी पुरवठा योजनांचा सोमवारी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते ई भूमिपूजन समारंभ.




 दौलतनगर दि.१8:- पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट ससंदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे विशेष प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघात ग्रामीण आणि डोंगरी भागातील सन २०१७-१८ च्या आराखडयामधील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती व जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एकूण ५४ नळ पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन राज्यांचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व पाणी पुरवठामंत्री ना. बबनराव लोणीकर यांचे व राज्यातील प्रमुख्‍ मान्यवर मंत्रीमहोदय व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.२१ जानेवारी,२०१९ रोजी दौलतनगर, ता. पाटण या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
                    ना.देवेंद्र फडणवीस व पाणी पुरवठामंत्री ना. बबनराव लोणीकर आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाठपुरावा करुन पाटण या डोंगरी व दुर्गम मतदारसंघातील गांवे व वाडयावस्त्यांकरीता नव्याने पाणी पुरवठा योजना करणेकरीता सन २०१७-१८ च्या आराखडयामधील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती व जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजनेअंतर्गत ५४ गांवे व वाडयावस्त्यांना एकूण १२ कोटी ४१ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. पाटण मतदारसंघात एका वर्षात एवढया मोठया प्रमाणात ग्रामीण आणि डोंगरी भागात प्रथमच नळ पाणी पुरवठा योजनांची कामे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झाली आहेत. या ५४ नळ पाणी पुरवठा योजनांचा मतदारसंघातील ५१ हजार ४८६ जनतेला लाभ मिळणार असून राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे हस्तेच या योजनांचे ई भूमिपुजन करण्याचा आमदार शंभूराज देसाई यांचा अट्टाहास होता तो दि.२१ जानेवारी रोजी पुर्ण होत आहे.पाटण मतदारसंघात  राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सुर्याचीवाडी (नाणेगाव),मस्करवाडी (काळगाव),धनगरवाडा (काळगाव),शितपवाडी,बाचोली, डावरी, म्हारवंड (निवकणे),आबदारवाडी,आवर्डे,दुसाळे,आंब्रुळे,नावडी,चोपदारवाडी,कदमवाडी (नाटोशी),बांधवाट, पाबळवाडी,तळीये पश्चिम (मणेरी),गव्हाणवाडी,पेठशिवापूर,गारवडे,नाटोशी,मरळी,व सुपने मंडलातील आरेवाडी, बेलदरे व पश्चिम सुपने तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर मौजे नाडे व मौजे सोनाईचीवाडी व कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून मंजूर ढोकावळे गोकूळ (नाव), डिगेवाडी व काळेवाडी, दुधडेवाडी (मरळी), सातर, देशमुखवाडी,जुने गावठाण विहे,जंगमवाडी धजगाव,हारुगडेवाडी (नाडोली),तोंडोशी,कोळेवाडी (डेरवण), म्हाळूंगेवस्ती शिवंदेश्वर,गमेवाडी,बोडकेवाडी,साबळेवाडी,मान्याचीवाडी (गुंजाळी) तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष घटक योजनेतून मंजूर ऊरुल बौध्दवस्ती,कुसरुंड बौध्दवस्ती, डावरी बौध्दवस्ती, सळवे मातंगवस्ती, चोपदारवाडी बौध्दवस्ती, आंबेघर तर्फ मरळी बौध्दवस्ती, आटोली बौध्दवस्ती, काळगाव बौध्दवस्ती, नाडोली मातंगवस्ती,शिवंदेश्वर मागासवस्ती व मसुगडेवाडी (केळोली) बौध्दवस्ती,जलस्वराज प्रकल्प टप्पा क्र. २ मधून मंजूर शिद्रुकवाडी (काढणे) अशा एकूण ५4 नळ पाणी पुरवठा योजनां मंजूर झाल्या आहेत. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनांचे ई भूमिपूजन झालेनंतर लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
                 दरम्यान पाटण मतदारसंघातील या ५४ गावांनी आमदार शंभूराज देसाई, मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचे अभिनंदनाचे फलक गावा- गावांमध्ये लावले आहेत.

Saturday 12 January 2019

आमदार शंभूराज देसाईंचे जनता दरबारात सुमारे २१८ समस्यांवर जागेवरच कार्यवाही. बहूतांशी विकासकामांचा निपटारा झाल्याने जनता दरबारामध्ये वैयक्तीक समस्या जास्त





दौलतनगर दि.११ :- पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व समस्या जागेवर सोडविण्याकरीता पाटणचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आज पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या जनता दरबारमध्ये आमदार शंभूराज देसाईंनी सुमारे २१८ समस्यांवर जागेवरच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून समस्यांची सोडवणूक करण्याची कार्यवाही पुर्ण केली.सकाळी ११.३० वा सुरु झालेला जनता दरबार दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुमारे ४ तास तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सुरु होता.जनता दरबारास पाटण व कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख व जिल्हास्तरीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                            सन २०१४ ला आमदार झालेपासून पाटणला आज पार पडलेला आमदार शंभूराज देसाई यांचा पाचवा जनता दरबार होता.सकाळी १०.३० वाजलेपासून पाटण मतदारसंघातील नागरिक तसेच महिला या जनता दरबारास उपस्थित होत्या.अत्यंत नियोजनबध्द जनता दरबाराचे आयोजन आमदार शंभूराज देसाईंनी केले होते सकाळी लवकर येणाऱ्या नागरिक तसेच महिलांना नंबरचे कुपन देण्यात आले होते त्यानुसार नंबरप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची समस्या आमदार शंभूराज देसाईंनी एैकून घेत त्याठिकाणी जागेवरच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी समोर आलेल्या समस्यांवर कार्यवाही केली.शासकीय यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी जनता दरबारास उपस्थित असल्याने अनेक समस्या या जागेवरच सोडविण्यात आल्या.नागरिकांनीही आपल्या समस्या या लेखी स्वरुपात आणल्याने त्यावर शेरे मारत आमदार शंभूराज देसाईंनी संबधित अधिकाऱ्यांना सदरचे प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या सुचना केल्या.
                       मागील चार जनता दरबारातील पहिल्या दोन जनता दरबारामध्ये मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात लेखी निवेदने आमदार शंभूराज देसाईंकडे आली होती.त्या निवेदनावर आमदार शंभूराज देसाईंनी गत दोन वर्षात मोठया प्रमाणात कार्यवाही करुन विविध विकासकामे मार्गी लावल्याने या जनता दरबारामध्ये विकासकामांची निवेदने कमी आणि वैयक्तीक कामांची निवेदने जादा असे दिसून आले.जनता दरबारामध्ये आलेल्या प्रत्येक निवेदनाची माहिती तसेच यावरील कार्यवाही पुर्ण झाल्याशिवाय आमदार शंभूराज देसाईंनी जनता दरबार संपविला नाही प्रत्येक निवेदनाचे टिपन त्यांच्या कार्यालयाकडून घेण्यात येत होते. यातील किती प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत याचीही माहिती देण्यात येत होती.आजच्या जनता दरबारमध्ये रेशनिंग दुकानदारांकडून रेशनिंग मिळत नाही तर रेशनिंग कार्ड बदलून हवे आहे विभक्त करण्यात आलेल्या रेशनिंग कार्डावर धान्य मिळावे,धरण प्रकल्पातील बाधित धरणग्रस्तांचे संकलन दुरुस्त करुन मिळाले नाही,ते मिळावे तसेच धरणग्रस्तांना देण्यात आलेल्या जमिनींचा कब्जा मिळावा,सात बाराची नोंद होत नाही ती करुन दयावी,विजेचे पोल गंजलेले आहेत ते बदलून मिळावेत,शेतीकरीता वीजकनेक्शन दयावे अशा स्वरुपाच्या निवेदनांचा समावेश होता.तालुकास्तरावरील समस्यांचे जागेवरच निपटारा करीत जे जिल्हास्तरावरील तसेच राज्यस्तरावरील समस्या आहेत त्यां समस्यांची निवेदने घेवून याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. पाटण मतदारसंघातील सुपने मंडलातील जनताही आपल्या समस्यां व विकासकामासंदर्भातील अडी-अडचणी मांडण्यासाठी जनता दरबारामध्ये उपस्थित होते.
                       आमदार शंभूराज देसाईंनी सन २००४ ते २००९ या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या असणाऱ्या प्रलंबित समस्यांचे व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणींचे तातडीने निराकरण करणेकरीता तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांचेसमवेत जनता दरबार आयोजित करण्याची नविन संकल्पना राबविल्याने तालुक्यातील जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकारी यांचेसमोर होत होता.तीच पध्दत त्यांनी २०१४ ला पुनश्च: आमदार झालेनंतर राबविल्याने या जनता दराबारामध्ये जनतेच्या वेळेची व आर्थिक बचत होत असल्याने आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पहावयास मिळते.आमदार शंभूराज देसाईंचे जनता दरबारामध्ये आम्हास न्याय मिळतो अशी भावना पाटण मतदारसंघातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे.गटतट न पहाता येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे निराकारण स्वत: आमदार शंभूराज देसाई यांचेकडून केले जात असल्याने त्यांच्या जनता दरबारास जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आजच्या जनता दरबारासही जनतेने चांगला प्रतिसाद देत आमदार शंभूराज देसाईंकडून आपल्या समस्या सोडवूण घेतल्या. जनता दरबारास उपस्थितांचे स्वागत पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी केले तर आभार कराडचे नायब तहसिलदार शंकर माने यांनी मानले.


Wednesday 9 January 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक उदघाटन समारंभाच्या नियोजनाकरीता आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.12 रोजी कारखाना कार्यस्थळावर बैठक.








                 दौलतनगर दि.०९ :-  लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राज्य शासनाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचा उदघाटन समारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व युतीच्या राज्य शासनातील विविध खात्यांचे मंत्रीमहोदय यांचे प्रमुख उपस्थितीत लवकरच कारखाना कार्यस्थळावर संपन्न होत असून या समारंभाचे नियोजन करणेकरीता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे प्रमुख,पाटण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.12 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 10.00 वा स्व.शिवाजीराव देसाई सांस्कृतिक भवन, दौलतनगर ता.पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध संस्थाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, शिवसेना, शंभूराज युवा संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजीत केली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयामार्फत प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
                                               पत्रकात म्हंटले आहे, राज्य शासनाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे भव्य असे शताब्दी स्मारक लोकनेते यांचे जन्मभूमित उभारण्यात आले आहे. या शताब्दी स्मारकाचा उदघाटन समारंभास राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिली असून लवकरच हा समारंभ राज्याचे मुख्यमंत्री व युतीच्या राज्य शासनातील विविध खात्यांचे मंत्री तसेच शिवसेना भाजप पक्षाचे विधानसभा सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या समारंभाचे नियोजन करणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना, शंभूराज युवा संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयामार्फत पत्रकात करण्यात आले आहे.

Tuesday 8 January 2019

आमदार शंभूराज देसाईंचा शुक्रवार दि.११ जानेवारी रोजी पाटणला जनता दरबार. जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी निमंत्रित.




दौलतनगर दि.08 :- पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व समस्या जागेवर सोडविण्याकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली  शुक्रवार दि.११ जानेवारी,२०१९ सकाळी १०.०० वा.पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.या जनता दरबारामध्ये आमदार शंभूराज देसाई हे पाटण मतदारसंघातील सुपने मंडलसह जनतेच्या समस्यांचे व विकास कामासंदर्भातील अडी-अडचणी जाणून घेणार आहेत,तसेच या जनता दरबारास पाटण व कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख व जिल्हास्तरीय अधिकारी यांनाही निमंत्रित केले असून या जनता दरबारास जनतेने आपल्या समस्या घेऊन मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले  आहे.
                           आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, आमदार शंभूराज देसाई यांनी सन २००४ ते २००९ या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या असणाऱ्या प्रलंबित समस्यांचे व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणींचे तातडीने निराकरण करणेकरीता तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांचेसमवेत जनता दरबार आयोजित करण्याची नविन संकल्पना राबविल्याने तालुक्यातील जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकारी यांचेसमोर होत होता. त्यामुळे जनतेच्या वेळेची व आर्थिक बचत होत असल्याने आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण होते. आमदार शंभूराज देसाई यांनी अशाच पध्दतीने सन २०१४ ला पुनश्च: आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या पहिल्या महिन्यातच दि.२४.११.२०१४,दि.०७.११.२०१५,दि.०१.१२.२०१६ व दि.20.02.2018 रोजी पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात जनता दरबारांचे आयोजन केले होते.या चारही जनता दरबारास मतदारसंघातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. अशाचप्रकारे पाटण मतदारसंघातील कराड तालुक्यातील सुपने मंडलकरीताही त्यांनी स्वतंत्र्य जनता दरबाराचे आयोजन करुन या विभागातील जनतेचे प्रश्न जागेवरच मार्गी लावले होते.
                     दरम्यान दि.११ जानेवारी २०१९ रोजी आयोजित केलेल्या पाचव्या जनता दरबारास जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांना निमंत्रित करण्यात आले आहे.त्यामुळे दि.११जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता तहसिल कार्यालय,पाटण या ठिकाणी  आयोजित केलेल्या जनता दरबारास सुपने मंडलसह पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले प्रलंबित प्रश्न,समस्या तसेच विकासकामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करण्यासाठी आपल्या समस्यांची लेखी निवेदने आमदार शंभूराज देसाई यांचकडे सादर करावीत असे आवाहनही शेवटी पत्रकांत केले आहे.

कोयना धरणातील पाणीसाठयाचे नियोजन करा. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना.






दौलतनगर दि.०8:- पाटण तालुक्यातील ११० गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पाटण आणि कराड तालुक्यातील कोयना नदीकाठचे जमिनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खाजगी योजनांच्या माध्यमातून ओलिताखाली येत असते.पाटण तालुक्यातील कोयना धरणामध्ये गतवर्षीपेक्षा १२.२९७ टीएमसी ने पाणीसाठा कमी आहे. पुर्वेकडे मोठया प्रमाणात सिंचनाकरीता पाण्याची मागणी होत असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आल्याने ते थेट सांगली जिल्हयाकडे जात आहे त्यामुळे पाटण व कराड तालुक्यातील कोयना नदीपात्र कोरडे पडत आहे. धरणातील पाणी हे माहे जुन महिन्यापर्यंत प्रथम प्राधान्याने पिण्याच्या वापराकरीता तसेच शेतामधील उभी पिके वाचविण्याकरीता राखून ठेवणे गरजेचे असल्याची मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांचेकडे केली यावर कोयना धरणातील पाणीसाठयाचे नियोजन करा अशा सुचना जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांना बैठकीत दिल्या.
                 आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांचे दालनात पाटण तालुक्यातील कोयना धरणातील व कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध धरण प्रकल्पातील पाणी हे पाटण तालुक्यात ११० गांवामध्ये दुष्काळ जाहीर झालेच्या पार्श्वभूमिवर राखून ठेवणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती.याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांचेसह सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर,रोहयो उपजिल्हाधिकारी संजय पाटील,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
              सुरवातीस आमदार शंभूराज देसाईंनी,शासनाने पाटण तालुक्यातील ११० गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.तालुक्यातील कोयना धरणासह कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध धरण प्रकल्पातील पाण्याची पातळी गतवर्षीपेक्षा घटलेली आहे.कोयना धरणातील तर १२.२९७ टीएमसी पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी आहे.पाटण तालुक्यातील ११० गांवे दुष्काळ जाहीर केली आहेत तशीच कराड तालुक्यातीलही १०० हुन अधिक गांवामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.दोन्ही तालुक्यातील कोयना नदीकाठचे जमिनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खाजगी योजनांच्या माध्यमातून ओलिताखाली येत आहे.धरणातील घटलेला पाणीसाठा लक्षात घेता या तालुक्यातील सर्व धरणातील पाणी हे माहे जुन महिन्यापर्यंत प्रथम प्राधान्याने पिण्याच्या वापराकरीता तसेच शेतामधील उभी पिके वाचविण्याकरीता राखून ठेवावे यासंदर्भात योग्य नियोजन होणे गरजेचे आहे यासंदर्भात मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्येही हा विषय जिल्हयाचे पालंकमंत्री व आपलेकडे मांडला होता जिल्हयाचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री ना.विजय शिवतारे यांनाही मी यासंदर्भात आपले अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करावी अशी मागणी केली आहे ही बाब जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली.तसेच मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षी ९० टक्के होता आता तो ६५ टक्केपर्यंत आला आहे.ही गंभीर बाब आहे.तारळी,उत्तरमांड व वांग मराठवाडी तसेच महिंद धरण प्रकल्पातील पाणीसाठा समाधानकारक आहे परंतू पिण्याच्या पाण्याकरीता व शेतातील उभी पिके वाचविण्याकरीता नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
                  यावर सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी १ जुन ते ३१ मे असा पाणीसाठा मोजला जातो.पुर्वेकडे यावर्षी गतवर्षीपेक्षा सिंचनाकरीता पाण्याचा वापर मोठया प्रमाणात झाला आहे.पुर्वेकडून सांगली जिल्हयातून पाण्याची मागणी होत असल्याने पाणीवापराचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे.सांगली पाटबंधारे मंडळ यांना पाणीवाटप समितीची बैठक आयोजीत करण्याचे लेखी पत्र दिले आहे.त्यानुसार दि.08 रोजी ही बैठक असून १० ते २० टक्के पाणी गतवर्षीपेक्षा कोयना धरणामध्ये जादा ठेवण्याची गरज असल्याची मागणी आम्ही बैठकीत करणार आहे.असे त्यांनी सांगितले यावर जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी सातारा जिल्हयातील पाटण आणि कराड तालुक्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या गांवाची परिस्थिती पहाता आमदार शंभूराज देसाईं यांचे मागणी आहे त्याप्रमाणे कोयना धरणातील पाण्याचे नियोजन करावे व आम्हास पाण्याची यावेळी मोठया प्रमाणात गरज असल्याचे सांगली पाटबंधारे मंडळ यांना कळविण्यात यावे असे सुचित केले तर पाटण तालुक्यातील इतर धरण प्रकल्पातील पाणीसाठा राखून ठेवणेसंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर बैठका आयोजीत कराव्यात अशाही सुचना जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या व कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.