दौलतनगर दि.2९:- माजी आमदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यातील मणदुरे भागाची
सुरुवात सुरुल आणि बिबी या गांवापासून होते.ही दोन्ही गांवे माजी आमदारांच्या
हाकेच्या अंतरावरील गावे असून सुरुल या गांवाला पिण्याच्या पाण्यासाठी २० रुपये
मोजुन पाण्याचे बॅरल विकत घ्यावे लागत असल्याचे आणि बिबी गांवातील महिलांना
डोक्याने पिण्याचे पाणी वाहून आणावे लागत असल्याचे आमचेबरोबर सर्वांनीच पाहिले
आहे.विकासाच्या केवळ पोकळ गप्पा मारणाऱ्या माजी आमदारांना हाकेच्या अंतरावरील या गांवाना
पाणी देता आले नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे टिकास्त्र आमदार शंभूराज देसाईंनी
विरोधकांवर केले असून पिण्याच्या पाण्याच्या योजनेतही राजकारण करणाऱ्या या मंडळीनी
या विभागातील जनतेचा आतापर्यंत केवळ राजकारणासाठीच वापर केला आहे त्यामुळे जो
विकास करतोय त्याचे पाठीशी या विभागाने ठाम उभे रहावे असे आवाहन आमदार शंभूराज
देसाईंनी मणदुरे भागातील जनतेला केले.
बिबी,ता.पाटण
येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजुर केलेल्या नळ पाणी पुरवठा
योजनेच्या भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.या योजनेकरीता आमदार शंभूराज
देसाईंनी दि.07 मे,2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार 45 लाख रुपयांचा निधी मंजुर
करुन दिला आहे.यावेळी कार्यक्रमास पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई
माळी, शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव
पाटील,पांडुरंग घाडगे,यशवंत जाधव,कारखान्याचे संचालक शंकर शेजवळ,बबनराव भिसे,पाटण
नगरपंचायतीचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर,नगरसेविका सौ.मनिषा जंगम,माजी पंचायत समिती
सदस्य सुरेश जाधव,ॲड.तानाजी घाडगे,दादा जाधव,बापुराव सावंत,विलास कुऱ्हाडे, पाणी
पुरवठा उपविभागाचे उपअभियंता एम डी.आरळेकर,बबनराव माळी,रामभाऊ देसाई,महादेव
जाधव,महादेव पवार,दादासो पवार,दिनकर देसाई,खाशाबा जाधव,कृष्णत देसाई,विठ्ठल
देसाई,आत्माराम कदम, रघूनाथ चव्हाण, रघूनाथ देसाई, राजाराम लोहार आदी मान्यवरांची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
बोलताना आमदार देसाई म्हणाले,बिबी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे
विरोधकांनीच विनाकारण राजकारण केले.शासनाच्या योजना मंजुर करणेकरीता मतदारसंघाच्या
आमदारांची शिफारस लागते.यापुर्वी बिबी गांवच्या योजनेकरीता ढोबळपणे २५ लाख
रुपयांचा निधी पाणी पुरवठा विभागाने प्रस्तावित केला होता परंतू या रक्कमेमध्ये ही
योजना पुर्ण होत नसल्याने या योजनेकरीता आवश्यक असणारा ४४ लाख ९९ हजार म्हणजेच ४५
लाख रुपयांचा निधी मंजुर करावा असे मी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री यांचेकडे प्रस्तावित
केले.यामध्ये या विभागातील वाटोळे या गांवाचाही समावेश आहे या दोन्ही योजना दि.07
मे,2016 रोजीच्या एकाच शासन निर्णयानुसार मंजुर झाल्या.वाटोळे गावच्या योजनेचे काम
पुर्णत्वाकडे जात आले आहे. असे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल
योजना ही राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २०१४ ला
मुख्यमंत्री झालेनंतर २०१५ साली अंमलात आणली.गांवातील विरोधक मंडळी कितीही म्हणत
असली तरी २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमध्ये या गावच्या पिण्याच्या
पाण्याच्या योजनेचा समावेश त्यांचे शिफारशीने झाला आहे.ही बाब गांवातील सर्वांनाच
माहिती आहे.विरोधकांच्या बालेकिल्लयातील पाण्याच्या योजनेचे श्रेय आम्हाला मिळू
नये याकरीता गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात गांवातील विरोधक मंडळीनी विरोधकांना आणून
या योजनेचे भूमिपुजन केले.विरोधकांनी भूमिपुजन करुनही एक वर्ष झाले तरी या योजनेचे
काम का सुरु होवू शकले नाही.जे आपण केले आहे त्याला केलेच म्हणावे परंतू आपल्या
विरोधकांच्या हातात गेल्या चार वर्षात कोणतीही सत्ता नसताना ते ही योजना कशी मंजुर
करुन आणतील याचा विचार या गांवातील मंडळीनी करावा.विरोधकांच्या भूलथापा गांवातील
महिलांबरोबर सर्वांच्याच लक्षात आल्या आहेत म्हणूनच गांवातील महिलांनी मला
तुमच्याच हस्ते या योजनेचा शुभारंभ करा असा अट्टाहास माझेकडे धरला होता.आज या
भूमिपुजनाकरीता या विभागाचे शासकीय अधिकारीही माझेसमवेत उपस्थित आहेत.मी कोणत्याही
कामांचे भूमिपुजन करताना त्या कामांची निविदा प्रसिध्द झाली का? कार्यारंभ आदेश
दिला का? हे पाहूनच भूमिपुजन करीत असतो.या विभागातील जनतेने विकास करणाऱ्यांच्या
पाठीशी रहाणे गरजेचे आहे.पाटणपासून पुर्वेकडील गांवामध्ये पाहिले तर एका-एका
गांवात तीन ते चार विकासकांमे सुरु आहेत. त्या मानाने आपण कुठे आहोत याचाही विचार या
विभागाने करावा. असे आवाहन करीत त्यांनी सुरुल गांवातील युवकांच्या आग्रहास्तव या
गांवाची पिण्याच्या पाण्याची योजना यावर्षीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये प्रस्तावित
केली आहे भविष्यात ती योजना मंजुर होवून आल्यानंतर विरोधक ही आम्हीच मंजुर करुन
आणल्याचा डांगोरा पिटतील हे नव्याने सांगायला नको असा टोलाही त्यांनी शेवठी
बोलताना लगाविला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश जाधव यांनी केले.रामभाऊ देसाई यांनी
मनोगत व्यक्त करुन उपस्थितांचे आभार मानले.यावेळी बिबी गांवातील ग्रामस्थ,युवक,महिला
या मोठया संख्येने उपस्थित होत्या.
चौकट:- भूमिपुजनाला गावातील महिलांची लक्षणीय
उपस्थिती,महिलांनी मानले आमदार देसाईंचे जाहीर आभार.
साहेब, तुमच्याशिवाय हे काम पुर्णच होवू शकत
नाही असे सांगत बिबी गावातील महिलांनी आमदार शंभूराज देसाईंची आठ दिवसापुर्वी
कारखाना कार्यस्थळावर भेट घेतली आणि आमच्या योजनेचा नारळ तुम्हीच फोडा असा आग्रह
धरला. योजनेच्या शुभारंभाप्रसंगी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती व
महिलांनी औक्षण करुन आमदार शंभूराज देसाईंचे पाणी योजना मंजुर केलेबद्दल त्यांनी जाहीर
आभार मानले.
No comments:
Post a Comment