दौलतनगर दि.१8:- पाटण विधानसभा
मतदारसंघाचे उत्कृष्ट ससंदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे विशेष प्रयत्नातून
पाटण विधानसभा मतदारसंघात ग्रामीण आणि डोंगरी भागातील सन २०१७-१८ च्या आराखडयामधील
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, कोयना भूकंप
पुनर्वसन निधी समिती व जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मंजूर
झालेल्या एकूण ५४ नळ पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन राज्यांचे मुख्यमंत्री
ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व पाणी पुरवठामंत्री ना. बबनराव लोणीकर यांचे व
राज्यातील प्रमुख् मान्यवर मंत्रीमहोदय व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार
दि.२१ जानेवारी,२०१९ रोजी दौलतनगर, ता. पाटण या ठिकाणी करण्यात येणार असल्याची
माहिती आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
ना.देवेंद्र फडणवीस व पाणी
पुरवठामंत्री ना. बबनराव लोणीकर आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाटण विधानसभा
मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाठपुरावा करुन पाटण या डोंगरी व दुर्गम
मतदारसंघातील गांवे व वाडयावस्त्यांकरीता नव्याने पाणी पुरवठा योजना करणेकरीता सन
२०१७-१८ च्या आराखडयामधील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण
पेयजल योजना, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती व जिल्हा नियोजन समितीच्या विशेष
घटक योजनेअंतर्गत ५४ गांवे व वाडयावस्त्यांना एकूण १२ कोटी ४१ लाख ९९ हजार
रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. पाटण मतदारसंघात एका वर्षात एवढया मोठया
प्रमाणात ग्रामीण आणि डोंगरी भागात प्रथमच नळ पाणी पुरवठा योजनांची कामे आमदार
शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झाली आहेत. या ५४ नळ पाणी पुरवठा
योजनांचा मतदारसंघातील ५१ हजार ४८६ जनतेला लाभ मिळणार असून राज्याचे मुख्यमंत्री
ना.देवेंद्र फडणवीस यांचे हस्तेच या योजनांचे ई भूमिपुजन करण्याचा आमदार शंभूराज
देसाई यांचा अट्टाहास होता तो दि.२१ जानेवारी रोजी पुर्ण होत आहे.पाटण
मतदारसंघात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल
योजनेअंतर्गत सुर्याचीवाडी (नाणेगाव),मस्करवाडी (काळगाव),धनगरवाडा
(काळगाव),शितपवाडी,बाचोली, डावरी, म्हारवंड
(निवकणे),आबदारवाडी,आवर्डे,दुसाळे,आंब्रुळे,नावडी,चोपदारवाडी,कदमवाडी
(नाटोशी),बांधवाट, पाबळवाडी,तळीये पश्चिम
(मणेरी),गव्हाणवाडी,पेठशिवापूर,गारवडे,नाटोशी,मरळी,व सुपने मंडलातील आरेवाडी,
बेलदरे व पश्चिम सुपने तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर मौजे नाडे व
मौजे सोनाईचीवाडी व कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून मंजूर ढोकावळे गोकूळ (नाव),
डिगेवाडी व काळेवाडी, दुधडेवाडी (मरळी), सातर, देशमुखवाडी,जुने गावठाण
विहे,जंगमवाडी धजगाव,हारुगडेवाडी (नाडोली),तोंडोशी,कोळेवाडी (डेरवण),
म्हाळूंगेवस्ती शिवंदेश्वर,गमेवाडी,बोडकेवाडी,साबळेवाडी,मान्याचीवाडी (गुंजाळी)
तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष घटक योजनेतून मंजूर ऊरुल बौध्दवस्ती,कुसरुंड
बौध्दवस्ती, डावरी बौध्दवस्ती, सळवे मातंगवस्ती, चोपदारवाडी बौध्दवस्ती, आंबेघर
तर्फ मरळी बौध्दवस्ती, आटोली बौध्दवस्ती, काळगाव बौध्दवस्ती, नाडोली मातंगवस्ती,शिवंदेश्वर
मागासवस्ती व मसुगडेवाडी (केळोली) बौध्दवस्ती,जलस्वराज प्रकल्प टप्पा क्र. २ मधून
मंजूर शिद्रुकवाडी (काढणे) अशा एकूण ५4 नळ पाणी पुरवठा योजनां मंजूर झाल्या आहेत.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनांचे ई भूमिपूजन झालेनंतर
लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान पाटण मतदारसंघातील या
५४ गावांनी आमदार शंभूराज देसाई, मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व पाणी पुरवठा
मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचे अभिनंदनाचे फलक गावा- गावांमध्ये लावले आहेत.
No comments:
Post a Comment