Wednesday 9 January 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक उदघाटन समारंभाच्या नियोजनाकरीता आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.12 रोजी कारखाना कार्यस्थळावर बैठक.








                 दौलतनगर दि.०९ :-  लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राज्य शासनाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचा उदघाटन समारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व युतीच्या राज्य शासनातील विविध खात्यांचे मंत्रीमहोदय यांचे प्रमुख उपस्थितीत लवकरच कारखाना कार्यस्थळावर संपन्न होत असून या समारंभाचे नियोजन करणेकरीता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे प्रमुख,पाटण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.12 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 10.00 वा स्व.शिवाजीराव देसाई सांस्कृतिक भवन, दौलतनगर ता.पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध संस्थाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, शिवसेना, शंभूराज युवा संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजीत केली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयामार्फत प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
                                               पत्रकात म्हंटले आहे, राज्य शासनाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे भव्य असे शताब्दी स्मारक लोकनेते यांचे जन्मभूमित उभारण्यात आले आहे. या शताब्दी स्मारकाचा उदघाटन समारंभास राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिली असून लवकरच हा समारंभ राज्याचे मुख्यमंत्री व युतीच्या राज्य शासनातील विविध खात्यांचे मंत्री तसेच शिवसेना भाजप पक्षाचे विधानसभा सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या समारंभाचे नियोजन करणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना, शंभूराज युवा संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयामार्फत पत्रकात करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment