दौलतनगर दि.24:- पाटण
तालुक्याचे दैवत व भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कर्म आणि जन्मभूमित
आमदार शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नातून युती शासनाच्यावतीने उभारण्यात
आलेल्या “महाराष्ट्र दौलत” या शताब्दी स्मारकाचा उदघाटन सोहळा राज्याचे
मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते व राज्यातील विविध मंत्रीमहोदय व
शिवसेना भाजप पक्षाचे विविध आमदार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये “न भूतो न भविष्यती” अशा उच्चांकी व रेकॉर्ड ब्रेक गर्दीमध्ये
मोठया दिमाखात संपन्न झाला.आमदार शंभूराज देसाईंच्या अपेक्षेपेक्षा जास्त जनतेची उच्चांकी
गर्दी या समारंभाला उपस्थित होती आणि हीच गर्दी आमदार शंभूराज देसाईंना २०१९ ला
पुन्हा आमदारकीची वर्दी देणारी ठरणार असल्याची चर्चा संपुर्ण पाटण विधानसभा
मतदारसंघात एैकावयास मिळत आहे.
या महिन्याभरात दोन समारंभ पाटण
मतदारसंघातील जनतेने पाहिले या दोन्ही समारंभाची तुलना पाटण मतदारसंघातील जनता
करीत आहे.यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचा उदघाटन
सोहळा हाच सरस ठरला असाच निष्कर्ष पाटणमधील जनतेने काढला आहे.लोकनेते यांचेवरील
प्रेमापोटी व निष्ठेपोटी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेची मांदियाळी समारंभास
पहावयास मिळाली यंदाच्या वर्षी कोयनेला जेवढा पुर आला नाही त्याहून अधिक जनसागर यादिवशी
समारंभात पहावयास मिळाला.यामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी गत साडेचार वर्षात पाटण
मतदारसंघात केलेल्या अतुलनीय विकासकामांचाही मोलाचा वाटा आहे.असे मानले जाते.
समारंभामध्ये खरा सुसंस्कृतपणा दाखविला तो या समारंभाचे संयोजक आमदार शंभूराज
देसाईंनी.त्यांनी विरोधकांचे साधे नावही संपुर्ण सभेमध्ये घेतले नाही.मतदारसंघात
आमदार शंभूराज देसाईंना विरोधक आता शिल्लकच राहिला नाही अशीच भूमिका सभामंचावर
उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या मनामध्ये समोरचा जनसमुदाय पाहून दिसून
आली.आमदार शंभूराज देसाई काय आहेत,मतदारसंघातील जनतेसाठी त्यांचा जीव किती तुटतो
याचा प्रत्यय सर्वच मान्यवरांनी आणि उपस्थित जनसमुदायाने या सभेमध्ये दिला.
आमदार शंभूराज देसाईंनी
मी संघर्षातून कसा उभा राहिलो,मला राजकारणातून दुर करण्याचा कुठुन कुठुन आणि कसा प्रयत्न
झाला हे सांगत जनसमुदायाची मने जिंकत त्यांनी स्वत:साठी राज्याच्या
मुख्यमंत्र्याकडे काहीही न मागता मुख्यमंत्री यांनी मतदारसंघातील जनतेच्या
हिताच्या दृष्टीने मला इतके दिले आहे त्याचे दाखले देत आणि आभार व्यक्त करीत
माझ्या मतदारसंघातील जनतेकरीता शासनाकडून अजुन एवढे मिळणे बाकी आहे असे सांगत
त्यांनी जनहिताच्या दृष्टीने अनेक मागण्या मुख्यमंत्र्याकडे केल्या.
मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषणात आमदार शंभूराज देसाई हाडाचा नेता आहे
जनतेप्रती त्यांची असणारी भावना मला चांगलीच माहिती आहे त्यांनी मागावे आणि मी ते
दयावे असे सांगून आमदार शंभूराज देसाईंना माझे कायमच सहकार्य राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी
दिलेली ग्वाही पाटण मतदारसंघातील जनतेला या समारंभात बरेच काही देवून गेली.
यापुर्वी पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या सभा
पाहिल्या तर पक्षाच्या नेत्यांच्या मागून जिल्हयातील आमदारमहोदयांची उपस्थित आपण
सर्वजण ग्रहीतच धरतो परंतू इथे असे घडले नाही आमदार
शंभूराज देसाईंनी मंत्री ना.एकनाथ शिंदे,ना.बबनराव लोणीकर,ना.विजय
शिवतारे,ना.सदाभाऊ खोत,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे माजी
आमदार नरेंद्र पाटील,आमदार शिवाजीराव नाईक,आमदार अनिल बाबर,आमदार सुरेश हाळवणकर, आमदार
सत्यजित पाटील,आमदार धनंजय उर्फ सधीर गाडगीळ,आमदार उल्हास पाटील,आमदार विलासराव
जगताप, आमदार डॉ.गौतम चाबुकस्वार,आमदार प्रकाश आबिटकर,आमदार नारायण पाटील,आमदार
सुरेश भाऊ खाडे,आमदार उदय सामंत,माजी आमदार
प्रा.सुनिल धांडे या युतीच्या मान्यवरांना निमंत्रीत करुन एकाच व्यासपीठावर नेत्यांची
मोट कशाप्रकारे बांधता येते हे दाखवून दिले.आमदार शंभूराज देसाईंचा हाच मुसद्दीपणा
वाखणण्याजोगा आहे अशीही चर्चा पाटण मतदारसंघात सध्या सुरु आहे.
चौकट:-
आमदार शंभूराज देसाईंच्या किमयेमुळे मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्री बारा आमदारांची
समारंभास उपस्थिती.
या उदघाटन सोहळयास मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेसमवेत राज्यातील
युती शासनाचे सहा मंत्री गण तर युतीतील बारा आमदार महोदय यांची उपस्थिती आणि
त्याहून अधिक पाटण मतदारसंघातील जनतेची अलोट गर्दी ही लक्षणीय होती.पश्चिम
महाराष्ट्रातील आमदार मंडळीशी सलोख्याचे संबध असल्यानेच पश्चिम महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यातून ही आमदार मंडळी सभेकरीता उपस्थित होती आणि हीच खरी किमया आमदार
शंभूराज देसाईंची आहे.
चौकट:-
परवाच्या गर्दीने पाटण मतदारसंघातील यापुर्वीच्या सर्व सभांचा विक्रमच मोडला.
आतापर्यंत पाटण तालुक्यात झालेल्या विविध सभांमध्ये देसाई गटाने कधीही
खुर्चा लावून कोणतीही सभा आयोजीत केली नाही.परवाही मंडपात भारतीय बैठक ठेवण्यात
आली होती एक एकरच्या मंडपात जेवढी गर्दी होती तेवढेच लोक मंडपाच्या चारी बाजूला
उभे होते तर अनेकांना जागा न मिळाल्याने मंडपाच्या पुर्वेकडील रस्त्यावर सुमारे १
किमी अंतरावर लोक सभा एैकण्यास बसले होते.परवाच्या उच्चांकी व रेकॉर्ड ब्रेक गर्दीने
पाटण मतदारसंघातील यापुर्वीच्या सर्वच सभांचा विक्रमच मोडीत काढला.या सभेमध्ये
महिलांची उपस्थिती ही लक्षवेदी ठरली.
No comments:
Post a Comment