Friday 4 January 2019

नेत्यावरचे असेही प्रेम, वधूवरांनी देवदर्शनाला जाताना रस्त्यातच घेतले नेत्यांचे आर्शिवाद.






दौलतनगर दि.०४:- सर्वसामान्यांच्या सुखदु:खात २४ तास बाराही महिने वाहून घेतलेले नेतृत्व म्हणून पाटणचे विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंकडे पाटण मतदारसंघातील जनता पहाते. त्यांचेवरील निस्सिम प्रेमापोटी आमदार शंभूराज देसाईंना पाटण मतदारसंघातील जनता आपल्या कुटुंबियातील प्रत्येक मंगल समारंभप्रसंगी आर्वजुन निमंत्रीत करते.पापर्डे येथील सातारा स्थायिक कार्यकर्त्यांच्या मुलाच्या अशाच एका लग्नसोहळयास आमदार शंभूराज देसाईंना निमंत्रीत करण्यात आले होते मात्र त्यादिवशी लग्नसोहळयांची मोठी तिथ असल्याने मतदारसंघातील लग्नसोहळयांच्या घाईगडबडीत त्यांना सातारा येथील या लग्नसोहळयास उपस्थित रहाता आले नाही दुसरे दिवशी पापर्डे येथील ते नवदांपत्य देवदर्शनाला जात असताना त्या मार्गावर त्यांना आमदार शंभूराज देसाईंची गाडी दिसली गाडीला हात करुन या नवदांपत्याने आमदार शंभूराज देसाईंना थांबवून आपणांस घाईगडबडीमुळे आमचे लग्नास येता आले नाही असे सांगून त्या नवदांपत्यांने त्यांचे रस्त्यातच आर्शिवाद घेतल्याचा प्रसंग पाटणमध्ये घडला असल्याने नेत्यावरील कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे असणारे प्रेम यातून किती मोठे आहे हे दिसून आले याची चर्चा सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात झाली.
                   सामाजीक आणि राजकीय जीवनात काम करीत असताना पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे नेहमीच त्यांचे मतदारसंघात जनतेच्या प्रेमापोटी नवनवीन उपक्रम राबवित असतात.मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील मंगल समारंभांना त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या मुलाच्या असो वा मुलीच्या शुभविवाहाला,लग्नांच्या पुजेला आमदार शंभूराज देसाई हे लावत असलेली हजेरी ही सातारा जिल्हयात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. वर्षाकाठी ते 500 हुन अधिक मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मुलांमुलींच्या लग्नसोहळयांना हजेरी लावतात यातून त्यांचेवर मतदारसंघातील जनतेचे असणारे प्रेम किती मोठे आहे हे दिसून येते.लग्नसोहळयांची मोठी तिथ असेल तर लग्नसोहळयांच्या भेटीचा दौरा ते आदल्या दिवशी आखतात व त्याप्रमाणे ते लग्नसोहळयांना भेटी देतात.त्यादिवशी घडले असे पापर्डे ता.पाटण येथील स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री.विलास शिदु पाटील यांचे चि.विक्रम याचा शुभविवाह रविवार दि.30 डिसेंबर रोजी सातारा येथे होता. त्या लग्नसोहळयास पाटण मतदारसंघातील जादा लग्नसोहळे असल्याने आमदार शंभूराज देसाईंना सातारा येथे हजर राहता आले नाही. तसेच दि.३1 डिसेंबर रोजीही लग्नसोहळयांची मोठी तिथ असल्याने आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघातील लग्न सोहळयांना भेटी देत असताना पापर्डे येथील श्री.विलास पाटील यांचे कुटुंबियांतील नवदांपत्य हे देवदर्शना करीता पापर्डे येथे आले असताना त्या मार्गावर त्यांना आमदार शंभूराज देसाईंची गाडी दिसली गाडीला हात करुन या नवदांपत्याने आमदार शंभूराज देसाईंना थांबविले व आपणांस घाईगडबडीमुळे काल आमचे लग्न सोहळयास येता आले नाही असे सांगून आम्हास आर्शिवाद दया असे सांगत त्या नवदांपत्यांने आमदार शंभूराज देसाई यांचे रस्त्यातच आर्शिवाद घेतले याचा या नवदांपत्यांना खुप आंनद वाटला यावेळी काढण्यात आलेले छायाचित्र चर्चा सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झाल्याने या घटनेकडे अनेकांनी आप्रुपतेने पहात सर्वसामान्यांच्या सुखदु:खात पाठीशी ठाम उभा राहणारा नेता म्हणून आमदार शंभूराज देसाईंचे कौतुक केले. सर्वसामान्यांनी निवडलेला नेता कसा असावा तर तो उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्यासारखा असावा याचा प्रत्यय पाटण मतदारसंघातील जनतेला नेहमीच त्यांच्या अशा या विविध उपक्रमातून आणि त्यांच्या संपर्कातून आला आहे व येत असतो. त्याचे आप्रुप करावे एवढे थोडेच.          




No comments:

Post a Comment