Saturday 12 January 2019

आमदार शंभूराज देसाईंचे जनता दरबारात सुमारे २१८ समस्यांवर जागेवरच कार्यवाही. बहूतांशी विकासकामांचा निपटारा झाल्याने जनता दरबारामध्ये वैयक्तीक समस्या जास्त





दौलतनगर दि.११ :- पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व समस्या जागेवर सोडविण्याकरीता पाटणचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आज पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या जनता दरबारमध्ये आमदार शंभूराज देसाईंनी सुमारे २१८ समस्यांवर जागेवरच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून समस्यांची सोडवणूक करण्याची कार्यवाही पुर्ण केली.सकाळी ११.३० वा सुरु झालेला जनता दरबार दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुमारे ४ तास तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सुरु होता.जनता दरबारास पाटण व कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख व जिल्हास्तरीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                            सन २०१४ ला आमदार झालेपासून पाटणला आज पार पडलेला आमदार शंभूराज देसाई यांचा पाचवा जनता दरबार होता.सकाळी १०.३० वाजलेपासून पाटण मतदारसंघातील नागरिक तसेच महिला या जनता दरबारास उपस्थित होत्या.अत्यंत नियोजनबध्द जनता दरबाराचे आयोजन आमदार शंभूराज देसाईंनी केले होते सकाळी लवकर येणाऱ्या नागरिक तसेच महिलांना नंबरचे कुपन देण्यात आले होते त्यानुसार नंबरप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची समस्या आमदार शंभूराज देसाईंनी एैकून घेत त्याठिकाणी जागेवरच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी समोर आलेल्या समस्यांवर कार्यवाही केली.शासकीय यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी जनता दरबारास उपस्थित असल्याने अनेक समस्या या जागेवरच सोडविण्यात आल्या.नागरिकांनीही आपल्या समस्या या लेखी स्वरुपात आणल्याने त्यावर शेरे मारत आमदार शंभूराज देसाईंनी संबधित अधिकाऱ्यांना सदरचे प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या सुचना केल्या.
                       मागील चार जनता दरबारातील पहिल्या दोन जनता दरबारामध्ये मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात लेखी निवेदने आमदार शंभूराज देसाईंकडे आली होती.त्या निवेदनावर आमदार शंभूराज देसाईंनी गत दोन वर्षात मोठया प्रमाणात कार्यवाही करुन विविध विकासकामे मार्गी लावल्याने या जनता दरबारामध्ये विकासकामांची निवेदने कमी आणि वैयक्तीक कामांची निवेदने जादा असे दिसून आले.जनता दरबारामध्ये आलेल्या प्रत्येक निवेदनाची माहिती तसेच यावरील कार्यवाही पुर्ण झाल्याशिवाय आमदार शंभूराज देसाईंनी जनता दरबार संपविला नाही प्रत्येक निवेदनाचे टिपन त्यांच्या कार्यालयाकडून घेण्यात येत होते. यातील किती प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत याचीही माहिती देण्यात येत होती.आजच्या जनता दरबारमध्ये रेशनिंग दुकानदारांकडून रेशनिंग मिळत नाही तर रेशनिंग कार्ड बदलून हवे आहे विभक्त करण्यात आलेल्या रेशनिंग कार्डावर धान्य मिळावे,धरण प्रकल्पातील बाधित धरणग्रस्तांचे संकलन दुरुस्त करुन मिळाले नाही,ते मिळावे तसेच धरणग्रस्तांना देण्यात आलेल्या जमिनींचा कब्जा मिळावा,सात बाराची नोंद होत नाही ती करुन दयावी,विजेचे पोल गंजलेले आहेत ते बदलून मिळावेत,शेतीकरीता वीजकनेक्शन दयावे अशा स्वरुपाच्या निवेदनांचा समावेश होता.तालुकास्तरावरील समस्यांचे जागेवरच निपटारा करीत जे जिल्हास्तरावरील तसेच राज्यस्तरावरील समस्या आहेत त्यां समस्यांची निवेदने घेवून याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. पाटण मतदारसंघातील सुपने मंडलातील जनताही आपल्या समस्यां व विकासकामासंदर्भातील अडी-अडचणी मांडण्यासाठी जनता दरबारामध्ये उपस्थित होते.
                       आमदार शंभूराज देसाईंनी सन २००४ ते २००९ या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या असणाऱ्या प्रलंबित समस्यांचे व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणींचे तातडीने निराकरण करणेकरीता तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांचेसमवेत जनता दरबार आयोजित करण्याची नविन संकल्पना राबविल्याने तालुक्यातील जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकारी यांचेसमोर होत होता.तीच पध्दत त्यांनी २०१४ ला पुनश्च: आमदार झालेनंतर राबविल्याने या जनता दराबारामध्ये जनतेच्या वेळेची व आर्थिक बचत होत असल्याने आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पहावयास मिळते.आमदार शंभूराज देसाईंचे जनता दरबारामध्ये आम्हास न्याय मिळतो अशी भावना पाटण मतदारसंघातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे.गटतट न पहाता येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे निराकारण स्वत: आमदार शंभूराज देसाई यांचेकडून केले जात असल्याने त्यांच्या जनता दरबारास जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आजच्या जनता दरबारासही जनतेने चांगला प्रतिसाद देत आमदार शंभूराज देसाईंकडून आपल्या समस्या सोडवूण घेतल्या. जनता दरबारास उपस्थितांचे स्वागत पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी केले तर आभार कराडचे नायब तहसिलदार शंकर माने यांनी मानले.


No comments:

Post a Comment