दौलतनगर दि. ३१:- वेळ रात्री १२ वाजून ४५ मिनींटे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा फोन खणखणला न्यूज १८ लोकमत मधून वृत्तनिवेदक बोलतोय,बॉलीवूड
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्ते प्रकरणी पाटणा (बिहार) चे पोलीस सिव्हील
ड्रेसमध्ये रिक्षामधून मुंबईत फिरत आहेत,महाराष्ट्र गृह विभागाची भूमिका काय?
गृहराज्यमंत्री म्हणून आपली प्रतिक्रिया हवी आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी केवळ घडयाळाकडे पाहिले रात्री १२ वाजून ४५ मिनींटे झाली होती आणि
फोनवरुनच याविषयासंदर्भात त्यांनी न्यूज १८ लोकमतच्या वृत्तनिवेदकास प्रतिक्रिया
देण्यास सुरुवात केली. वृत्तनिवेदकांचे म्हणणे आणि गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंची त्यावरची प्रतिक्रिया सलग ०५ मिनींटे सुरु होती. वेळेचे भान न ठेवता समोर
आलेला कोणताही विषय गृहराज्यमंत्री हाताळत असल्याने त्यांचा हा अलर्टपणा व सतर्कता
पुन्हा एकदा त्यांच्या रात्रीच्या वृत्तवाहिनीवरील प्रतिक्रियेमुळे अधोरेखित
झाल्याचे दिसून आले.
म्हणतात ना, राज्याचे मंत्री होणे आणि
मिळालेले मंत्रीपद सांभाळणे म्हणावे एवढे सोपे नाही त्यातच गृहखात्याचे
राज्यमंत्री. गृहखात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून या व्यक्तींना कायमच किती
सतर्क,अलर्ट आणि अद्यावत माहितीनिशी (अपडेट) राहावे लागते हे त्यांचे त्यांनाच
माहिती. सध्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे किती सतर्क,अलर्ट आणि अद्यावत
माहितीनिशी (अपडेट) आहेत हे त्यांनी गत सहा महिन्यात महाराष्ट्रातील जनतेला दाखवून
दिले आहे.ना.शंभूराज देसाईंची मंत्री म्हणून ही पहिलीच टर्म असली तरी त्यांचा प्रशासनातील
अनुभव चांगला आणि दांडगा आहे.कितीही गंभीर प्रश्न चुटकीदिशी सोडविण्याची
त्यांच्याकडे हातोटी आहे.त्यांचे आजोबा स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची
महाराष्ट्र राज्याचे करारी गृहमंत्री म्हणून ओळख होती व आजही ती कायम आहे. लोकनेते
यांचे सर्व गुण ना.शंभूराज देसाईंच्या मध्ये असून ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री
असले तरी महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये त्यांनी त्यांच्या मागील सहा
महिन्यांच्या राज्यमंत्रीपदाच्या कार्यातून गृहराज्यमंत्री म्हणून एक वेगळाच ठसा
राज्यामध्ये उमटविला आहे. राज्यातील राजकारण्यांच्या आणि जनतेच्या नजरेतही त्यांचे
गृहराज्यमंत्री म्हणून कार्यतत्परतेने सुरु असलेले काम दिसू लागले असून गृहराज्यमंत्री
म्हंटले की महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडी तात्काळ ना.शंभूराज देसाईंचेच नाव येवू
लागले आहे. ही अतिशोक्ती नाही तर वस्तूस्थिती बनली आहे.
राज्यामध्ये प्रतिरोज वेगवेगळया गंभीर
स्वरुपाच्या घटना घडत असतात त्यातच गृहखात्याशी निगडीत असणाऱ्या घटनांची संख्या
मोठी असल्यामुळे गृहराज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंना २४ तास अलर्ट आणि
अपडेट रहावे लागते. कधी कोणता विषय समोर येईल,त्यावर कोणता निर्णय घेवून
अंमलबजावणी करावी लागेल या सर्वांवर लक्ष ठेवून रहावे लागते. यामध्ये दिवस आहे का
रात्र हे पहाता येत नाही. शासनाकडून राज्याचे मुख्यमंत्री तसेच वरीष्ठ मंत्री यांनी
एखादया गंभीर घटनेबाबत गृहराज्यमंत्री म्हणून माहिती विचारल्यास त्या घटनेसंदर्भात
अपडेट राहून गृहविभागामार्फत कोणती भूमिका शासनाच्या वतीने घेतली आहे याबाबत इत्तंभूत
माहिती ठेवून अद्यावत रहावे लागत असते तसेच वृत्तवाहिन्यांकडूनही विचारणा
केल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून त्यासंदर्भातील शासनाची आणि गृहविभागाची भूमिका
स्पष्ट करावी लागते. ही भूमिका गृहराज्यमंत्री म्हणून ना. शंभूराज देसाई चोख
बजावित आहेत.
महाराष्ट्र गृह विभागातील पोलीस
यंत्रणेला आपलासा वाटणारा गृहराज्यमंत्री
म्हणून ना.देसाईंची ओळख राज्यामध्ये निर्माण झाली आहे.अभ्यासू आणि अपटेड
असणारे मंत्री म्हणूनही प्रसारमाध्यमांचे तसेच वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी त्यांच्याकडे
आकर्षित होत आहेत.राज्यात गृहविभागाशी कुठे घटना घडली की प्रसारमाध्यमांच्या नजरा
ना.शंभूराज देसाईंना शोधत असतात आणि ना.शंभूराज देसाईही कायम अलर्ट आणि सतर्क
असल्यामुळे प्रसारमाध्यमांना न डावलता ते प्रसारमाध्यमांशी निसंकोचपणे वार्तालाप
करतात. काल रात्रीची न्यूज १८ लोकमत वरील वार्तांकनाची घटनाही गंभीर असल्याने
त्यांनी वेळकाळ न पहाता आलेल्या फोनवरुन बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत
आत्महत्तेप्रकरणातील महाराष्ट्र गृह विभागाची भूमिका काय आहे हे स्पष्ट केले. भान
ठेवून योजना आखणारे आणि बेभान होवून त्या अंमलात आणणारे एक मंत्री म्हणून
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्यातील जनतेच्या आणि राज्यकर्त्यांच्या
नजरेत आपली प्रतिमा निर्माण केली आहे.