Tuesday 28 July 2020

मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते शताब्दी स्मारकात स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाचा युवानेते यशराज देसाई यांचे हस्ते शुभारंभ. वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघात वृक्षारोपण,गरीब कुटुंबाना वस्तू व विद्यार्थ्यांना शालेय वहयांचे वाटप.



     

     दौलतनगर दि. २८:-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व  शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे दि.27 रोजीचे वाढदिवसानिमित्त गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण मतदारसंघात दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामधील “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करणाऱ्या एकूण 60 विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण झालेले बीड जिल्हयातील अंबेजोगाई गावचे चंद्रशेखर घोडके यांचे ऑनलाईन मार्गदर्शनाचा ऑनलाईन शुभारंभ युवानेते यशराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
           कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी दि.27 रोजीचा त्यांचा वाढदिवस सोशल डिस्टटींग पाळत विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणसारख्या ग्रामीण,डोंगरी मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबर स्पर्धा परीक्षांचाही पुर्वतयारी करण्याकरीता अद्यावत डिजीटल संगणकीकृत अभ्यासिकेचा उपयोग व्हावा यादृष्टीने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे 60 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिकेतील मिनी ऑडीटीरियममध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे 60 विद्यार्थ्यांना विविध एमपीएससी, युपीएससी परीक्षा पास झालेल्यांचे मार्गदर्शनाचा नुकतेच आयपीएस उत्तीर्ण झालेले बीड जिल्हयातील अंबेजोगाई गावचे चंद्रशेखर घोडके यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे शुभारंभ पाटणचे युवानेते यशराज देसाई यांचे हस्ते करण्यात आला.तसेच लॉकडाऊन काळात गर्दी न करता समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा करावा असे आदेश असल्याने मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण तालुक्यातील येराड,मुळगाव,आडूळ,पाडळोशी,काळोली व तामकडे येथील सुमारे 500 गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा देण्याच्या हेतूतून आवश्यक ते संसारपयोगी साहित्य व धान्य वाटप, मतदारसंघातील मोरणा,चाफळ व तारळे  विभागातील 2000 शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप तर मरळी,पापर्डे,सोनवडे या ठिकाणी ५००० वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने याचा प्रारंभ ३०० वृक्षारोपण करण्यात आले असून विविध उपक्रमांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा ६० वा वाढदिवस गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण मतदारसंघात संपन्न झाला.
चौकट:- स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन कल्पना अतिशय उत्कृष्ट. मुख्यमंत्री ना.ठाकरे.
             लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामधील “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करणाऱ्या एकूण 60 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करण्याकरीता ऑनलाईन मार्गदर्शन आयोजीत करण्याची कल्पना अतिशय उत्कृष्ट असून या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री ना.देसाईंचे कौतुक केले आहे. याचा शुभारंभ माझे वाढदिवसानिमित्त झाला ही बाबही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.




No comments:

Post a Comment