Sunday 12 July 2020

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची ३४ वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन. पुण्यतिथीनिमित्त दौलतनगरला ५००० वृक्षलागवडीचा शुभारंभ.


                            

               दौलतनगर दि. ०९:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३४ वा पुण्यतिथी कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) 34 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळयास,समाधीस पुष्पचक्र व महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी विनम्र अभिवादन केले. दरम्यान स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे धाकटे बंधू कै.अरुणराव देसाई (काकासाहेब) यांचेही प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
            स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यस्मरण दिन विविध शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रतिवर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो. दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षीचा पुण्यस्मरण दिन अत्यंत साध्यापध्दतीने केवळ स्व.आबासाहेब यांचे पुतळा, समाधी व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत साजरा करण्यात आला.स्व.शिवाजीराव देसाई यांचे 34 व्या पुण्यतिथीनिमित्ताने दौलतनगर (मरळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सामाजिक अंतर ठेवत राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते सुमारे ५००० वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जयराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
           यावेळी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, ॲङ डी.पी.जाधव,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,संजय गांधी निराधार येाजना समितीचे अध्यक्ष भरत साळूंखे, अभिजित पाटील, माजी सदस्य राजेंद्र चव्हाण,बबनराव शिंदे,नामदेवराव साळूंखे,जालिंदर पाटील,बशीर खोंदू,संचालक बबनराव भिसे,सोमनाथ खामकर,सरपंच राजाराम माळी,माजी सरपंच प्रवीण पाटील,मधूकर भिसे यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment