दौलतनगर दि.१४:-राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्राचे पोलादी
पुरुष,राज्याचे माजी गृहराज्यमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सातारा
जिल्हयातील सर्वात मोठे शताब्दी स्मारक लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी २०१४ ते २०१९ या कार्यकाळात आमदार
असताना लोकनेते यांचे जन्म आणि कर्मभूमित उभारले आहे.या स्मारकामध्ये ग्रामीण
भागातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना एमपीएससी, युपीएससी यासारख्या अनेक स्पर्धा
परीक्षांचा अभ्यास करता यावा याकरीता त्यांनी डिजीटल संगणकीकृत अभ्यासिका निर्माण
केली असून या डिजीटल ५० लॅपटॉपच्या माध्यमातून संगणकीकृत अभ्यासिकेचा लोकार्पण
सोहळा स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)
यांचे पुण्यतिथीच्या निमित्ताने गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कर्मभूमित सातारा जिल्हयातील सर्वात मोठे शताब्दी स्मारक शासनाच्या
वतीने उभारण्याचा संकल्प ना.शंभूराज देसाईंनी सन २०१४ ला पुनश्च: आमदार झालेनंतर
केला होता तो संकल्प त्यांनी या पाच वर्षात पुर्ण करुन दाखविला.त्यांचा हा संकल्प
त्यांनी “ड्रीम प्रोजेक्ट” म्हणून मार्गी लावला. शासनाच्या
माध्यमातून सातारा जिल्हयात प्रथमत:च ग्रामीण भागात भव्य अशी शताब्दी स्मारकाची
उभारणी करुन त्यांनी या स्मारकामध्ये स्वतंत्रपणे स्पर्धा परीक्षांच्या पुर्वतयारी
करीता लागणारी अद्यावत अशी अभ्यासिका निर्माण केली आहे.
पाटण सारख्या ग्रामीण आणि
डोंगरी भागातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबर स्पर्धा
परीक्षांचा अभ्यास करण्याकरीता या अद्यावत डिजीटल संगणकीकृत अभ्यासिकेचा उपयोग
व्हावा हा ना.शंभूराज देसाईंचा मनोदय असून या अद्यावत अभ्यासिकेमध्ये
महाविद्यालयीन मुलांमुलींकरीता सुमारे ३५०० पुस्तकांची लायब्ररी तयार करण्यात आली आहे
त्याचबरोबर एमपीएससी,युपीएससी यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास
करण्याकरीता ना.शंभूराज देसाईंनी विविध योजनांच्या माध्यमातून एमपीएससी,युपीएससीची
विविध प्रकारची नामांकीत प्रकाशकांची सुमारे १८५० पुस्तकांची लायब्ररी निर्माण
केली आहे.याच दालनात एमपीएससी,युपीएससीचे वाढीवचे संदर्भ घेणेकरीता ब्रँडेड
कंपनीचे ५० लॅपटॉप याठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थींनीना उपलब्ध करुन देण्यात आले
आहेत.या ५० लॅपटॉपना हायस्पीडचे इंटरनेट कनेक्शन,अद्यावत प्रींटर,ग्रुप डिस्कक्शन करीता
वेगळे दालन,व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे विविध एमपीएससी,युपीएससी परीक्षा पास झालेल्यांचे
मार्गदर्शन मिळणे करीताचीही सुविधा याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या सर्व
अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ३४ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दि.१२ जुलै,रोजी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात
आला.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई
तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
लोकनेते बाळासाहेब देसाई
शताब्दी स्मारक “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिका केंद्र या नावाने सुरु झालेल्या या
अभ्यासिका केंद्रात सध्या ५० पाटणसारख्या ग्रामीण आणि डोंगरी भागातील
विद्यार्थी-विद्यार्थींनी एमपीएससी, युपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा
अभ्यास करीत आहेत.नव्याने लोकार्पण झालेल्या संगणीकृत दालनाच्या माध्यमातून ५०
लॅपटॉपच्या माध्यमातून या विद्यार्थी-विद्यार्थींनींना वाढीवचे स्पर्धा परीक्षांचे
संदर्भ तसेच विविध प्रकारची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.स्पर्धा परीक्षांचा
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनींना संदर्भ पुस्तके देण्याकरीता याठिकाणी
स्वतंत्रपणे ग्रंथपालाची तसेच संगणकावरुन संदर्भीय माहिती देण्याकरीता स्वतंत्रपणे
केंद्र संचालकाची येथे नेमणूक करण्यात आली आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी
स्मारक “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिका केंद्र सातारा जिल्हयातील सर्वात मोठे
अभ्यासिका केंद्र निर्माण करण्याचा ना.शंभूराज देसाईंचा प्रयत्न असून हे अभ्यासिका
केंद्र जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे आणि अद्यावत असे केंद्र असून या
अभ्यासिका केंद्राकरीता आवश्यक असणारी सर्व यंत्रणा उभी करण्याचा मनोदय ना.शंभूराज
देसाईंनी व्यक्त केला आहे.भविष्यात एमपीएससी,युपीएससी यासारख्या अनेक स्पर्धा
परीक्षांचा अभ्यास करुन घेणेकरीता आठवडयातून एकदा नामांकीत ॲकॅडमीचे प्राध्यापक
तसेच एमपीएससी, युपीएससी विविध स्पर्धा परीक्षा पास झालेले मान्यवर यांचे ऑनलाईन व
ऑफलाईन मार्गदर्शन याठिकाणी आयोजीत करण्यात येणार आहे.
लोकनेते बाळासाहेब
देसाई शताब्दी स्मारक “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिका केंद्र हे अद्यावत असे केंद्र
उभारण्याचा आपण प्रयत्न केला असून या अभ्यासिका केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण
आणि डोंगरी भागातील विद्यार्थी-विद्यार्थींनींना त्यांच्या महाविद्यालयीन
अभ्यासाबरोबर विविध स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करण्याकरीता खुप मदत होणार असून
या केंद्रातून ग्रामीण व डोंगरी भागातील विद्यार्थी-विद्यार्थींनींनी अभ्यास करुन
आपला नावलौकीक वाढवावा अशी अपेक्षा त्यांनी या लोकार्पण सोहळयात बोलताना व्यक्त
केला.
No comments:
Post a Comment