दौलतनगर दि. 09:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३४ वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.१२ जुलै,२०२० रोजी सकाळी १०.३० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये
कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत
साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने दौलतनगर (मरळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ५०००
वृक्षलागवडीचा शुभारंभ राज्याचे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते व मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,
युवा नेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना
कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षा प्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३४ वा पुण्यतिथी कार्यक्रम रविवार दि.१२ जुलै,२०२० रोजी सकाळी १०.३० वा. दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत केला आहे.कोरोनाच्या संकटामुळे हा
कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने होणार असून पुण्यतिथीनिमित्त राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावरील स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुतळयास,समाधीस
पुष्पचक्र व शताब्दी स्मारकामध्ये स्व.आबासाहेब यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे स्व.(आबासाहेब) यांचे प्रतिमेसमोर भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने दौलतनगर (मरळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते
सुमारे ५००० वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात येणार असून
दोन ते तीन दिवसात या परिसरात ५००० वृक्षांच्या लागवडीचे काम पुर्ण करण्यात येणार
आहे.
No comments:
Post a Comment