दौलतनगर
दि.07: लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2019-20
च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते
बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी
सभासदांना पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन 2130 रुपयांप्रमाणे एफआरपीची 80 टक्के रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच
वर्ग केली असून एफआरपीचा प्रतिटन 200 रुपयेप्रमाणे दुसरा
हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली
असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे
दिली आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर
ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 चे गळीत हंगामात 02
लाख 02 हजार 414 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 12.10% सरासरी साखर उताऱ्यांने 02
लाख 45 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे.मागील
सन 2019-20
च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील
गाळपास आलेल्या ऊसाला एकूण
एफआरपीच्या 80 टक्केप्रमाणे होणारा पहिला हप्ता प्रतिटन रुपये 2130 नुसार होणारे बिल ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे.
दरम्यान माहे मार्च
महिन्यापासून देशासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारी रोखण्यासाठी सुरु
असलेल्या लॉकडाऊनमुळे सन 2019-20 च्या गळीत हंगामाध्ये उत्पादित झालेल्या साखर
विक्रीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे या गळीत हंगामात उत्पादित साखरेचा उठाव न
झाल्याने तसेच साखरेच्या दरात झालेली घसरण
यामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला होता. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार
शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजनामध्ये
मोठी काटकसर करण्याचे धोरण राबविले असून कारखाना कार्यक्षेत्रातील
ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन
आलेल्या परिस्थितीचा योग्य नियोजनातून सामना करत केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार एफआरपीचा रक्कमेपोटी दुसरा हप्ता माहे जुलै महिन्यामध्ये
पहिल्या आठवडयात देण्याचे नियोजन केले असल्याचे यापुर्वीच सांगीतले होते.
महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली
युवा नेते यशराज देसाई व कारखाना संचालक मंडळाने सन 2019-20 च्या गळीत हंगामात
कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतिटन 200 रुपये
इतकी रक्कम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. तरी सन
2019-20 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक
शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा, अशी
माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
No comments:
Post a Comment