Tuesday 14 July 2020

पाटण विधानसभा मतदारसंघातील मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पुर्ण करा. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.



                  दौलतनगर दि.14:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना,मुख्यमंत्री पेयजल योजना,कोयना भूकंप पुनर्वसन निधी,स्थानिक विकास कार्यक्रम, जलस्वराज्य टप्पा २, २५१५ योजना व विशेष घटक नळ पाणी पुरवठा योजना अशा विविध योजनांमधून पाटण व कराड तालुक्यातील पाणी पुरवठा विभागाकडे मंजुर एकूण १०१ नळ पाणी पुरवठा योजना मंजुर केल्या असून या सर्व योजनांची कामे लवकरात लवकर मुदतीत पुर्ण करुन गावांना पाणी मिळवून दया, मुदतीत योजनांची कामे पुर्ण झाली नाही तर कारवाईला सामोरे जा अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी पाणी पुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
                    सातारा येथील शासकीय विश्रामगृहात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली पाटण विधानसभा मतदारसंघामधील पाटण व कराड तालुक्यातील सुपने मंडलमधील गांवामध्ये वरील विविध योजना मार्फत शासनाच्या माध्यमातून ना.शंभूराज देसाईंनी मागील टर्ममध्ये आमदार असताना मंजुर केलेल्या १०१ पाणी पुरवठा योजनांच्या सद्यपरिस्थिती संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी सातारा जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) अविनाश फडतरे, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता एस.एस.शिंदे,गटविकास अधिकारी श्रीमती मिना साळुंखे,पाटणचे प्रभारी उपअभियंता ए.वाय.खाबडे, कराडचे उपअभियंता सुनिल आडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
                याप्रसंगी ना. शंभूराज देसाईंनी बैठकीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना,मुख्यमंत्री पेयजल,कोयना भूकंप पुनर्वसन निधी,स्थानिक विकास कार्यक्रम,जलस्वराज्य टप्पा २, २५१५ योजना व विशेष घटक नळ पाणी पुरवठा योजना या विविध योजनेतंर्गत मंजुर करुन आणलेल्या सर्व कामांचा योजनानिहाय सद्यपरिस्थितीसंदर्भात आढावा  घेतला. यातील किती योजनांची कामे पुर्ण आहेत, किती योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत, किती दिवसात कोणती योजना पुर्ण होणार याचा सविस्तर आढावा घेत कोणत्या कामांत काही अडचणी असतील तर त्याची माहिती दयावी त्या अडचणी तात्काळ सोडविल्या जातील परंतू पाणी पुरवठा योजनांची कामे पुर्ण करणेसंदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी कसलीही हयगय करु नये लवकरात लवकर मुदतीत या योजनांची कामे पुर्ण करुन या १०१ गांवाना पुरेसे पाणी उपलब्ध करुन दयावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
               दरम्यान यातील मागील वर्षी ई भूमिपुजन झालेल्या ५१ नळ पाणी पुरवठा योजनांचा त्यांनी प्राधान्याने आढावा घेतला यातील ३१ योजना पुर्ण झाल्या असून २१ योजना या अंतिम टप्प्यात आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली लवकरात लवकर यातील उर्वरीत योजना पुर्णत्वाकडे नेण्यासंदर्भाने पाणी पुरवठा विभागा मार्फत प्रयत्न केले जात असून दुसऱ्या टप्प्यात ४९ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु करणेसंदर्भात कार्यवाही विभागाने केली आहे माहे डिसेंबर २०२० पर्यंत या सर्व योजना पुर्ण करण्याकरीता पाणी पुरवठा विभागाने तयारी केली असून लवकरात लवकर मुदतीत दुसऱ्या टप्प्यातील योजनांचीही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
        यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांनी या १०१ पाणी पुरवठा योजनांच्या संदर्भात व्यक्तीश: लक्ष देवून या सर्व योजना मुदतीत कशाप्रकारे पुर्ण होवून या गांवातील लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन दयावे असे सांगून पाणी पुरवठा विभागाकडे आवश्यक असणारी उपअभियंता, शाखा अभियंता यांची रिक्त पदे तात्काळ भरणेसंदर्भातील प्रस्ताव कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाकडे सादर करावा, पाणी पुरवठा विभागाचे मंत्री यांचेकडून आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगत १०१ नळ पाणी पुरवठा योजनांची विभागनिहाय जबाबदारी संबधित शाखा अभियंत्याकडे देवून त्या योजना संबधित शाखा अभियत्यांकडून पुर्ण करुन घ्याव्यात अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या.   

No comments:

Post a Comment