दौलतनगर दि. 24:- महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी
ठाकरे यांनी दि.27 रोजीचा माझा वाढदिवस साजरा करु नका,वाढदिवसानिमित्त विविध
शिबीरे तसेच पक्षसंघटना वाढविण्याकरीता प्रयत्न करा असे आदेश राज्यातील
शिवसैनिकांना दिले आहेत.या आदेशांचे पालन करीत राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये गावनिहाय
स्थापन केलेल्या शाखांचे ऑनलाईन उद्घाटन करुन संघटना वाढीची अनोखी भेट
पक्षप्रमुखांना देण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या पाटण मतदारसंघात लोकनेते
बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामधील “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिकेमध्ये स्पर्धा
परीक्षांची पुर्वतयारी करणाऱ्या 60 विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण
तज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शनाचा ऑनलाईन शुभारंभ, गोरगरीबांना धान्य,कपडे,शालेय
विद्यार्थ्यांना वह्या वाटप,वृक्षलागवड असे विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले
असून असेच कार्यक्रम गृहराज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपुर्ण सातारा जिल्हयात
घेण्यात येणार आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख
उध्दवजी ठाकरे यांनी दि.27 रोजीचा त्यांचा वाढदिवस सोशल डिस्टटींग पाळणेकरीता
ऑनलाईन विविध शिबीरे तसेच लॉकडाऊन काळात गर्दी न करता समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
करावा असे आदेश दिले असल्याने सातारा जिल्हयातील राज्याचे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई,शिवसेना पक्षाचे जिल्हयातील संपर्कप्रमुख प्रा.नितीन
बानुगडे-पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे 60 व्या वाढदिवसानिमित्त
सातारा जिल्हयातील विविध तालुक्यांमध्ये शिवसेनेची पक्षसंघटना वाढविण्यासाठी
गावनिहाय शाखा सुरु करुन त्यांचे ऑनलाईन उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला तसेच
मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटामुळे हैरान झालेल्या सातारा
जिल्हयातील विविध तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासा देणेकरीता गोरगरीबांना आवश्यक
ते धान्य व कपडे,संसारपयोगी साहित्य तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप,काही
ठिकाणी मास्क वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यादृष्टीने गृहराज्यमंत्री
शंभूराज देसाई,संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील,जिल्हयातील सर्व
जिल्हाप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक यांनी तयारी सुरु केली आहे.
दि.27 रोजी गृहराज्यमंत्री शंभूराज
देसाई,संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील,जिल्हयातील सर्व जिल्हाप्रमुख हे
जिल्हयाच्या ठिकाणी उपस्थित राहून सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यामधील
तालुकाप्रमुख यांच्याशी झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन संपर्क करुन शिवसेना
पक्षाच्या गावनिहाय शाखांचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. सकाळी 11.00 वा हा ऑनलाईन
कार्यक्रम सातारा येथे आयोजीत करण्यात आला आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
यांच्या पाटण मतदारसंघात मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे 60 व्या वाढदिवसानिमित्त
पाटण मतदारसंघात लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामधील “महाराष्ट्र दौलत”
अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करणाऱ्या पाटणसारख्या ग्रामीण आणि डोंगरी भागातील गरीब
कुटुंबातील 60 विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण
तज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शनाचा ऑनलाईन शुभारंभ तसेच त्यांचे पदाधिकारी व
कार्यकर्ते यांच्या मार्फत मतदारसंघातील गोरगरीबांना धान्य,कपडे,शालेय
विद्यार्थ्यांना घरपोहोच वह्या वाटप,विविध भागात वृक्षलागवड असे कार्यक्रम आयोजीत
करण्यात आले आहेत.
पाटणसारख्या ग्रामीण,डोंगरी मतदारसंघातील गरीब कुटुंबातील
मुलामुलींना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबर स्पर्धा परीक्षांचाही पुर्वतयारी
करण्याकरीता अद्यावत डिजीटल संगणकीकृत अभ्यासिकेचा उपयोग व्हावा हा ना.शंभूराज
देसाईंचा मनोदय असून मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे
60 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून “महाराष्ट्र दौलत” अभ्यासिकेमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे 60 विद्यार्थ्यांना विविध एमपीएससी,युपीएससी परीक्षा पास झालेल्यांचे
मार्गदर्शन मिळणेसाठीचा शुभारंभ मिनी ऑडीटीरियममध्ये पाटणचे युवानेते यशराज देसाई
यांचे हस्ते होणार असून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे नुकतेच आयपीएस
उत्तीर्ण झालेले बीड जिल्हयातील अंबेजोगाई गावचे चंद्रशेखर घोडके हे एमपीएससी,युपीएससी पुर्वपरीक्षांच्या संदर्भात
मार्गदर्शन करणार आहेत.
No comments:
Post a Comment