Thursday 22 April 2021

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 38 वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुष्पचक्र अर्पण करुन केले अभिवादन.

 


 

           दौलतनगर दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची ३८ वी पुण्यतिथी कारखाना कार्यस्थळावर कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. दौलतनगर ता.पाटण येथील कारखाना कार्यस्थळावरील आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त पुर्णाकृती पुतळयास राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी पुष्पचक्र अर्पण करुन महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेच्या व राज्यशासनाचे वतीने विनम्र अभिवादन केले.

                कोविड 19 चा प्रादुर्भाव असलेकारणाने मागीलवर्षीप्रमाणे आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त श्री.गणपती मंदीरातून लोकनेतेसाहेब यांचे पादुका कारखाना कार्यस्थळावरील पुर्णाकृती पुतळयासमोर आणून पुजन करण्यात आले.त्यानंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांचे हस्ते पुतळयासमोर ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते साहेब यांचे पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली.कोविड १९ पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत शासनाच्या सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले.सातारा पोलीस दलाच्या बँडचे वतीने राष्ट्रगीत सादर करुन लोकनेतेसाहेब यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, ह.भ.प.जयवंतराव शेलार, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांची उपस्थिती होती.

Tuesday 20 April 2021

ऑक्सीजनअभावी रुग्णांची हेळसांड होवू देवू नका. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना.

 

 

           दौलतनगर दि.21 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. सातारा जिल्हयात सरासरी प्रतिरोज 1200 ते 1400 चे पुढे कोरोना बाधित होत आहेत.सगळीकडे रुग्णालयामध्ये बेडची क्षमता संपल्या आहेत.आपल्याकडे पाटण मतदारसंघात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये अनुक्रमे 50, 50 व 36 याप्रमाणे ऑक्सीजनचे बेड उपलब्ध आहेत.ज्या रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता आहे त्यांना ऑकसीजनचे बेड उपलब्ध करुन दयावेत.ऑकसीजनअभावी रुग्णांची हेळसांड होवू देवू नका अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या.

           दौलतनगर ता.पाटण येथे आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात पाटण तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील, कोयनानगरचे सपोनि माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची उपस्थिती  होती.

                   या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात व पाटण, ढेबेवाडी व दौलतनगर येथील कोरोना उपचार केंद्रातील उपलब्ध ऑकसीजन बेडच्या संदर्भात आढावा घेतला. आवश्यक असणारे ऑकसीजन बेड आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यां रुग्णांना व्हेन्टीलेटरची आवश्यकता आहे त्या रुग्णांना तात्काळ कराड अथवा सातारा येथे कुठे  व्हेन्टीलेटरचे बेड उपलब्ध होतात का ? याकरीता आपण प्रयत्नशील राहू परंतू प्राथमिक स्तरावर ऑकसीजन बेड उपलब्ध करुन देवून रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करावेत. पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. कोरोनाच्या तपासण्या वाढवा. कोरोना बाधिताच्या संपर्कात कोण आले आहे का? याचीही तपासणी करा असे सांगून आपण रेडझोनमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. लोकांच्यामध्ये भितीचे वातावरणच राहिले नाही त्यामुळे संख्या वाढायला लागली आहे यावर वेळीच आवश्यक ते सर्व निर्बंध घालणे गरजेचे आहे. आता तर शासनाने सकाळी 07 ते 11 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होईल.

                   कोरोना बाधितांना रेमडीसिव्हर इंजेक्शनची गरज भासत आहे. शासकीय कोटयानूसार कोरोना उपचार केंद्रांना ही इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आपल्या पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी येथे आवश्यक असणारी इंजेक्शन तात्काळ मागवून घ्यावीत व आवश्यकतेनुसार ही इंजेक्शन रुग्णांना दयावीत असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 चौकट:- संचारबंदी एकदम कडक करा:- ना.शंभूराज देसाई

             भाजीपाला व किराणा माल घेण्याकरीता मार्केटमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. शासनाने जी संचारबंदी लागू केली आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. संचारबंदी कडक केल्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार नाही.उद्यापासून पोलीस विभागाने संचारबंदी एकदम कडक करुन लोकांच्या गर्दीवर निर्बंध आणावेत वेळप्रसंगी कठोर पावले उचला असेही ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

चौकट:- तपासण्या व लसीकरणही करुन घ्या:- ना.शंभूराज देसाई

             कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने कोरोनाच्या तपासण्या करुन घ्या तसेच शासनाने जी लस उपलब्ध करुन दिली आहे या लसीकरणाचाही लाभ घेवून आपले जीव वाचवा असे भावनिक आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ५ हजार जीप,रिक्षा वाहतूक,सलून व्यवसायिकांना धान्य वाटप.

 


दौलतनगर दि.20 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढू लागल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यभर संचारबंदी केली असून अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवसाय बंद असल्यामुळे पाटण मतदारसंघात व्यवसाय बंद झालेल्या हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम यातून प्रवासी व माल वाहतूक करणारे तसेच सलून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मायेचा आधार देत १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन ५००० कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघात हातावर पोट असणाऱ्या २१५०० कुटुंबाना १०-१० किलो धान्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले होते.

            कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असून हा संसर्ग रोखण्याकरीता राज्य शासनापुढे संचारबंदी आणि लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत १५ दिवसाची संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या काळात सर्वत्रच रोजगार,व्यवसाय  बंद झाले आहेत.ग्रामीण भागात तर रोजगार आणि व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे तसेच सलून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख  हे घरीच बसून आहेत.त्यांच्या कुटुंबांना आधार देणेकरीता ना.शंभूराज देसाईंचे नेतृत्वाखाली शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन ते व्यवसाय बंद झालेल्या कुटंबाना देण्याचे काम करण्यात येत आहे.

            या पॅकेटमध्ये गहू, तांदूळ,डाळ,तेल व साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिलेल्या सुचनानुसार त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची पॅकेट व्यवसाय व रोजगार बंद झालेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जावून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गांवागांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजीक अंतर ठेवून वाटप करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. येत्या देान दिवसात पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गांवागावांतील तसेच वाडीवस्तीतील व्यवसाय बंद झालेल्या या कुटुंबापर्यंत या धान्याचे वाटप पुर्ण होईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

           अडचणीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेकरीता नेहमीच धावून आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मागील वर्षी सलग दोन महिने ते पाटण मतदारसंघात कोरोनाचा संसर्ग होवू नये तसेच कोरोनाच्या संसर्गावर नियत्रंण रहावे याकरीता दररोज रस्त्यावर उतरुन काम करीत होते. कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत हे पहाताच त्यांनी तातडीने दौलतनगर येथे गतवर्षी ५० ऑक्सीजन बेडचे अद्यावत कोरोना उपचार सेटंर सुरु करुन अनेक कोरेाना रुग्णांना नवसंजिवनी मिळवून दिली. आता संचारबंदी आहे तर रोजगार व व्यवसाय बंद झालेल्यांच्या व्यथा ओळखून प्राधान्यक्रमाने जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून व्यवसाय करणाऱ्या गरीब कुटुंबांना मायेचा आधार मिळावा लॉकडाऊनच्या काळात त्यांची धान्याची अडचण दुर व्हावी याकरीता त्यांनी मागील वर्षाप्रमाणे यंदाही पुढाकार घेत शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे धान्य वाटपास सुरुवात केली आहे.

Thursday 15 April 2021

सांगवड कोयना नदीकाठी घाट व पुरसंरक्षक भिंतीच्या कामाला वित्तमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले 04 कोटी 99 लाख रुपये मंजूर. प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय दि.15 एप्रिल रोजी पारित.

 

दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना अतिवृष्टीच्या काळात नदीस येणाऱ्या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने 10 गावांना पुर संरक्षक भिंती बांधण्यास राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा,अशी आग्रही मागणी ना.शंभूराज देसाईंनी सन 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये आमदार असताना शासनाकडे केली होती. गत पंचवार्षिकमध्ये त्यांनी 07 गावांना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती भरघोस असा निधी मंजुर करुन आणला यातील तीन गांवाना निधी मिळणे बाकी होते त्यातील बनपेठवाडी (येराड), गुंजाळी या दोन गावांना कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती रुपये 06 कोटी 26 लाख 38 हजार रुपयांचा निधी दि. 06 मार्च 2020 रोजी मंजूर करण्यात आला तर आता वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगवड,ता.पाटण येथे कोयना नदीवर घाट बांधणेच्या कामांस 04 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. या कामांस प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 15 एप्रिल 2021 रोजी पारित केला आहे.

                          पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना धरणातून सोडण्यांत येणाऱ्या पाण्यामुळे पुर आल्यानंतर धोका निर्माण होत असल्याने मतदारसंघातील कोयना नदीकाठच्या 10 गावांना घाट व संरक्षक भिंत बांधणेच्या कामांस राज्य शासनाने जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी आमदार असताना ना.शंभूराज देसाईंची सन 2004 पासून राज्य शासनाकडे मागणी होती. यासंदर्भात त्यांनी विधानसभा सभागृहात दि. 03.08.2016 रोजी लक्षवेधी सुचनाही मांडली होती त्यावेळी तात्काळ या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन लक्षवेधी सुचनेला दिले होते.त्यानुसार मतदारसंघातील मंद्रुळहवेली, नेरळे, गिरेवाडी, पश्चिम सुपने,केसे,साजूर व तांबवे या ०७ गावांना कोयना नदीवर घाट व पुरसंरक्षक भिंती बांधण्यास आवश्यक असणारा निधी त्यांनी गत पंचवार्षिकमध्येच मंजुर करुन आणला होता आज यातील बहूतांशी कामे मार्गी लागली आहेत.तर उर्वरीत राहिलेल्या सांगवड, बनपेठवाडी(येराड)  गुंजाळी या तीन गांवातील  कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता ना.शंभूराज देसाईंनी अर्थमंत्री झालेनंतर जलसंपदा विभागाकडून सविस्तर प्रस्ताव मागवून घेतला व या तीन गावापैकी बनपेठवाडी(येराड)  गुंजाळी या दोन गांवाना आवश्यक असणारा निधी मंजूर केला.

                          तर जून 2011 च्या पावसाळयामध्ये अतिवृष्टी व कोयना नदीमध्ये सोडलेल्या जादा विसर्गामुळे कोयना नदीकाठच्या सांगवड गावातील सिध्देश्वर मंदीरामागील सदरची भिंत ढासळली असल्याने सिध्देश्वर मंदिर व लगतीची वस्ती यास धोका निर्माण झाला होता.वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी यापूर्वीचे दोन ते तीन अधिवेशनामध्ये लक्षवेधी सुचना मांडली तसेच दि.04.02.2020 रोजीच्या पत्रान्वये सदरची बाब पुनश्च: जलसंपदा मंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. सदर पत्रावर जलसंपदा मंत्री यांनी सदर अंदाजपत्रक मान्यतेसाठी तातडीने सादर करावे असे निर्देश दिले होते.त्यानुसार मौजे सांगवड,ता.पाटण येथे कोयना नदीवर घाट व पूरसंरक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी रु.04 कोटी 21 लाख 76 हजार व अनुषंगिक खर्च रु. 76 लाख 63 हजार अशा एकूण रुपये 04 कोटी 98 लाख 39 हजार एवढया खर्चाच्या जलसंपदा विभागाच्या अंदाजपत्रकांस दि.15 एप्रिल 2021 रोजीचे जलसंपदा विभागाने पारित केलेल्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता दिली आहे.लवकरच या कामाची प्रशासकीय कार्यवाही करण्यात येऊन निविदा प्रक्रिया झालेनंतर तातडीने या कामांस सुरुवात होणार असल्याचे वित्तराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

 

संचारबंदीचे पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई सातारा जिल्हयातील ग्रामीण भागात अलर्ट. कोरेगाव,रहिमतपूर व मसूर येथे केली बंदोबस्ताची पाहणी. गर्दी टाळण्याकरीता करावयाच्या उपाययोजनासंदर्भात अधिकाऱ्यांना केल्या सूचना.

 

सातारा दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्र राज्यामध्ये काल रात्री आठ वाजल्यापासून लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सकाळपासून रस्त्यावर उतरुन पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना समवेत घेवून सातारा जिल्हयातील ग्रामीण भागाची प्रत्यक्ष पोलीस बंदोबस्ताची व कायदा सुव्यवस्थेची पहाणी केली.बाजारपेठा, तसेच मुख्य रस्त्यावर अशा विविध सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये,नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडू नयेत याकरीता संचारबंदी कडक करा व गर्दी थांबविण्या करीता करावयाच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा अशा सक्त सुचना त्यांनी महसूल,पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सातारा जिल्हयातील कोरेगाव,रहिमतपूर व मसूर विभागातील मुख्य बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवरील ग्रामीण भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांचेसोबत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे,शिवसेना संपर्कनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील हे पदाधिकारी तर कोरेगांव उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री पाटील,कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी  किंद्रे,कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,कोरेगांव तहसिलदार अमोल कदम,कराड तहसिलदार अमरदीप वाकडे,कोरेगांव पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे, रहिमतपुर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, रहिमतपुर सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड असे संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

               यावेळी गृहराज्यमंत्री ना.देसाईंनी कोरेगांव, रहिमतपुर व मसूर विभागामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने तालुका प्रशासनाच्या वतीने काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती अधिकारी यांचेकडून प्रथमत: घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोविड 19 चा संसर्ग सध्या दुप्पट वेगाने होत असल्याने राज्यात काल रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून जिल्हयामध्ये या रोगाने संसर्ग होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असताना संचारबंदीच्या काळामध्ये गर्दी होऊ नये याकरीता पोलीस व महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत.तुरळक ठिकाणी भाजी मंडई आणण्याच्या नावाखाली किंवा काही किरणा खरेदी करण्याच्या नावाखाली थोडीसी गर्दी आहे.आज पहिला दिवस आहे म्हणून आपण रस्त्यावर उतरणाऱ्यांना समजून सांगण्याचे काम करावे. खरोखरच काम असेल तरच नागरिकांनी घराचे बाहेर पडावे. संचारबंदीच्या काळात विनाकारण कोणी फिरताना दिसले किंवा संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना पुर्वीच दिल्या आहेत परंतू कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांमध्येही संचारबंदीचे नियम पाळले जात आहेत का? याची तपासणी पोलीस यंत्रणेने करावी यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर करावी यात हयगय करु नये.कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरीता जसे प्रशासन सज्ज आहे तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ची व त्यांच्या कुटुंबिंयांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

               संचारबंदीमध्ये तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरुच ठेवून नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनानेही ठेवावी.अडचणीच्या काळात जशी जनतेकडून आपण सहकार्याची अपेक्षा ठेवतो तशी जनतेचीही आपल्या प्रशासनाकडून अपेक्षा असते.सर्वांच्या सहकार्यातुन कोरोना विरुध्दचा सुरु असलेला लढा यशस्वी होणार आहे त्यामुळे प्रशासनाने जशी या महामारीच्या संकटात जनतेची काळजी घेण्याची गरज आहे तशीच जनतेनेही स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ती काळजी जनतेने घ्यावी अशी विनंती ना.शंभूराज देसाईंनी करुन संचारबंदीच्या पार्श्वभूमिवर प्रशासनातील अधिकाऱ्यांना तसेच जनतेला काही अडचणी असतील तर त्या त्यांनी जरुर सांगाव्यात शासनाच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा जरुर प्रयत्न केला जाईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगून सर्वच अधिकारीवर्ग खरोखरच चांगले काम करीत आहे या कामांबरोबर त्यांनी अजुनही सतर्क राहून काळजी घ्यावी असे ते शेवठी बोलताना म्हणाले.

Monday 5 April 2021

संगमनगर धक्का ते घाटमाथा डांबरीकरण रस्त्याकरीता 16.85 कोटींचा निधी मंजूर. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पाठपुराव्याला यश. कोयना विभागातील जनतेने मानले गृहराज्यमंत्र्याचे विशेष आभार.

 





कोयनानगर दि.04:- राड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील उर्वरीत राहिलेल्या पाटण मतदारसंघातील संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या डांबरीकरणाच्या रस्त्याच्या कामास निधी मंजूर होणेकरीता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केल्या मुळेच एकूण 13.500 किमी रस्त्याच्या कामांकरीता 16.85 कोटी रुपयांचा निधी मंत्री ना.नितीन गडकरी यांनी मंजुर केला आहे.ना.शंभूराज देसाईंनी यासंदर्भात ना.नितीन गडकरी यांची अनेकदा भेटही घेतली असून दि.09 फेब्रुवारी, 2021 रोजी लेखी पत्राव्दारेही निधीची मागणी केली आहे. ना.शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्याला आलेले हे यश आहे. विशेष म्हणजे या कामांची निविदाही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे येत्या आठ ते दहा दिवसात कार्यारंभ आदेश देवून हे काम पावसाळयापुर्वी पुर्ण करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.या रस्त्यास निधी मंजुर केल्याबद्दल कोयना विभागातील जनतेने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे विशेष आभार मानले आहेत असे पत्रक शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, धोंडीराम भोमकर, शंतनू भोमकर नथूराम सावंत, निवृत्ती कदम यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

                 प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, कराड चिपळूण रस्त्यास राष्टी्रय महामार्गाचा दर्जा देवून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी सर्वप्रथम पाटण मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे राज्यामध्ये युतीचे सरकार सत्तेवर असताना सातत्याने केली होती.त्यानुसार राड-चिपळूण या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मागील पंचवार्षिकमध्ये मिळाला. यामध्ये कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या 13.500 कि.मी.च्या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करणेच्या कामांचा समावेश होता.

                कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण कामांकरीता आवश्यक असणारा निधी मिळाला त्यातील कराड ते पाटणपर्यंत रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे गेले आहे काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. या विभागात मोठया प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे उर्वरीत राहिलेल्या संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या 13.500 कि.मी.च्या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करणेच्या कामाकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करावा याकरीता ना.शंभूराज देसाईंनी दि.09 फेब्रुवारी, 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांना लेखी पत्र दिले.राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता धनजंय देशपांडे यांना या उर्वरीत राहिलेल्या कामांस आवश्यक असणारा निधीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना केल्या त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागाचे वतीने 16.85 कोटीचा निधी आवश्यक असल्याचे अंदाजपत्रक मंजुरीकरीता सादर केले त्यावरुन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी 13.500 किमी लांबीच्या पक्कया डांबरीकरणाच्या या रस्त्याकरीता 16.85 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

                 सदरच्या कामास लवकर सुरुवात करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाचे सचिव विनय देशपांडे यांना मंत्रालयीन स्तरावर अनेकदा बोलवून घेवून यासंदर्भात मंत्रालयामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच हे सर्व शक्य झाले असून या कामाची निविदाही ना.शंभूराज देसाईंच्या सुचनेवरुन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिध्द केली असून ठेकेदार निश्चित करुन कार्यारंभ आदेश देण्याचे काम कार्यालयीन स्तरावर सुरु आहे. येत्या आठ दिवसात या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी ना.शंभूराज देसाईंना दिली आहे.येत्या पावसाळयापुर्वी हे पक्के डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंनी कार्यकारी अभियंता यांनी दिल्या आहेत.लवकरच या कामांस सुरुवात होईल त्यामुळे कोयना विभागातील जनतेने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे विशेष आभार मानले असल्याचेही पत्रकात म्हंटले आहे.

Saturday 3 April 2021

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम यशस्वी करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे जिल्हयातील शिवसेना,युवासेना पदाधिकाऱ्यांना आवाहन.

 

दौलतनगर दि.03(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- कोविड 19 चा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या राज्य शासनाकडून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना,महिलांना  कोविड 19 प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली आहे.सातारा जिल्हयातील तमाम शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी पुढाकार घेत 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना,महिलांना  कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेणेसंदर्भात जनजागृती करुन हि मोहिम यशस्वीरित्या राबवावी,असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हयातील शिवसेना,युवासेना पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र व दुरध्वनीव्दारे केले आहे.

                         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पदाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असून सदर आजाराने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढीचे प्रमाणही जास्त आहे. कोविड 19 चा संसर्ग होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना,महिलांना  कोविड  प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली आहे.आपण आपले शिवसेना पक्षाचेवतीने यामध्ये पुढाकार घेऊन आपले सातारा जिल्हयातील, विविध तालुक्यातील, त्या-त्या विभागातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, तमाम शिवसैनिक व युवासेना संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिक व महिलांपर्यंत पोहचावे व 45 वर्षांवरील नागरिक महिलांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली नाही. अशा नागरिक महिलांना आपले जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण करुन घेणेकरीता प्राधान्यक्रमाने कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहिम हाती घ्यावी. व ही मोहिम यशस्वीपणे पुर्ण करणेकरीता आपले शिवसेना पक्षाचेवतीने सर्वोत्परी प्रयत्न करावेत, अशी विनंती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केली आहे.

 

  

Friday 2 April 2021

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पोलीस विभागाने कडक निर्बंध राबवा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या जिल्हा पोलीस यंत्रणेला सूचना.

 


सातारा दि. 02 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-:  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत त्या निर्बंधाची जिल्हा पोलीस विभागाने  जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करावी, जिल्हयातील पोलीस यंत्रणेने सतर्क राहून लोकहितार्थ कडक निर्बंध राबवावेत अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.

              सातारा येथील शासकीय विश्रामगृहात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत जिल्हयातील पोलीस विभागाकडून करावयाच्या उपाययोजनासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती आंचल दलाल,पोलीस उपअधिक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे,फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख,कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्यासह पोलीस विभागातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

              यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.राज्य शासनाने रात्री 8 नंतर संपुर्ण राज्यात संचारबंदी केली आहे.सर्वच ठिकाणचे हॉटेल,रेस्टॉरंट रात्री 08 नंतर बंद करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत मात्र राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट अनेक ठिकाणी उघडी दिसत आहेत.ती वेळेवर बंद करतात का? याची तपासणी आपले पोलीस विभागाने करावी.त्याचबरोबर हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये शासनाने व प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंटचे क्षमतेपेक्षा 50 टक्केच उपस्थिती ठेवणेसंदर्भात नियम घालून दिलेले आहेत हे नियम पाळतात  याचीही  तपासणी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने करण्याच्या सुचना देण्यात याव्यात. जी हॉटेल, रेस्ट्रारंट नियमाचे पालन करणार नाहीत त्यांचेवर कारवाई करुन शासनाच्या नियमानुसार हॉटेल, रेस्ट्रारंट सात दिवस बंद ठेवावीत. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लघंन केले जात असेल त्याठिकाणी पोलीसांनी तात्काळ कारवाई करावी. बाजार, मोठमोठया बाजारपेठा तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी नागरिक मास्कचा वापर करत नसतील तर त्यांच्यांवर दंडात्मक कारवाई करावी. जिल्हयातील नगरपालिका क्षेत्रात तसेच मोठमोठया शहरातील दुकानदारांनी कोरोनाची तपासणी केली आहे का? याची खातरजमा करुनच त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी तर यासंदर्भात ट्रेडींग असोशियनची पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेवून यासंदर्भात जागरुकता निर्माण करावी. तसेच सायंकाळी बाजारपेठांमध्ये रात्री 8 वाजता दुकान बंद करणेसंदर्भात 07.30 पासूनच पोलीस गाडया बाजारपेठांमध्ये फिरवाव्यात. माईकद्वारे पुकारुन दुकानदारांना सुचना कराव्यात.तसेच लग्नसमारंभांना 20 किंवा 50 लोकांच्यात देण्यात आलेल्या परवानगीनुसार हे समारंभ होत आहेत का? यावर पोलीस यंत्रणेने बारकाईने लक्ष ठेवून रहावे अशा सुचना जिल्हा पोलीस यंत्रणेला करुन सातारा जिल्हयातील जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे व प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, वेळोवेळी हाताची स्वच्छता राखून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी मदत करावी व आपले आरोग्य जपावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत करुन जनतेच्या आरोग्यासाठीच पोलीस यंत्रणेला कडक निर्बंध राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.

चौकट:- जिल्हा पोलीस विभागाचे कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करावे.

            कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी सातारा जिल्हा पोलीस दलाने कोरोना केअर सेंटर सुरु केले होते. प्रादुर्भाव कमी झालेनंतर ते बंद करण्यात आले ते पुन्हा कार्यान्वीत करण्यात यावे असे सांगून याकरीता लागणारी औषधे जिल्हा आरोग्य विभागाकडून मागवून घ्यावीत तसेच खाजगी डॉक्टर व त्यांची यंत्रणा यांना या केअर सेंटरमध्ये पाचारण करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी काढावेत असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.