Tuesday 20 April 2021

शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ५ हजार जीप,रिक्षा वाहतूक,सलून व्यवसायिकांना धान्य वाटप.

 


दौलतनगर दि.20 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढू लागल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यभर संचारबंदी केली असून अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवसाय बंद असल्यामुळे पाटण मतदारसंघात व्यवसाय बंद झालेल्या हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम यातून प्रवासी व माल वाहतूक करणारे तसेच सलून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मायेचा आधार देत १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन ५००० कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघात हातावर पोट असणाऱ्या २१५०० कुटुंबाना १०-१० किलो धान्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले होते.

            कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असून हा संसर्ग रोखण्याकरीता राज्य शासनापुढे संचारबंदी आणि लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत १५ दिवसाची संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या काळात सर्वत्रच रोजगार,व्यवसाय  बंद झाले आहेत.ग्रामीण भागात तर रोजगार आणि व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे तसेच सलून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख  हे घरीच बसून आहेत.त्यांच्या कुटुंबांना आधार देणेकरीता ना.शंभूराज देसाईंचे नेतृत्वाखाली शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन ते व्यवसाय बंद झालेल्या कुटंबाना देण्याचे काम करण्यात येत आहे.

            या पॅकेटमध्ये गहू, तांदूळ,डाळ,तेल व साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिलेल्या सुचनानुसार त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची पॅकेट व्यवसाय व रोजगार बंद झालेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जावून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गांवागांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजीक अंतर ठेवून वाटप करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. येत्या देान दिवसात पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गांवागावांतील तसेच वाडीवस्तीतील व्यवसाय बंद झालेल्या या कुटुंबापर्यंत या धान्याचे वाटप पुर्ण होईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

           अडचणीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेकरीता नेहमीच धावून आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मागील वर्षी सलग दोन महिने ते पाटण मतदारसंघात कोरोनाचा संसर्ग होवू नये तसेच कोरोनाच्या संसर्गावर नियत्रंण रहावे याकरीता दररोज रस्त्यावर उतरुन काम करीत होते. कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत हे पहाताच त्यांनी तातडीने दौलतनगर येथे गतवर्षी ५० ऑक्सीजन बेडचे अद्यावत कोरोना उपचार सेटंर सुरु करुन अनेक कोरेाना रुग्णांना नवसंजिवनी मिळवून दिली. आता संचारबंदी आहे तर रोजगार व व्यवसाय बंद झालेल्यांच्या व्यथा ओळखून प्राधान्यक्रमाने जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून व्यवसाय करणाऱ्या गरीब कुटुंबांना मायेचा आधार मिळावा लॉकडाऊनच्या काळात त्यांची धान्याची अडचण दुर व्हावी याकरीता त्यांनी मागील वर्षाप्रमाणे यंदाही पुढाकार घेत शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे धान्य वाटपास सुरुवात केली आहे.

2 comments: