Thursday 22 April 2021

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 38 वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुष्पचक्र अर्पण करुन केले अभिवादन.

 


 

           दौलतनगर दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची ३८ वी पुण्यतिथी कारखाना कार्यस्थळावर कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. दौलतनगर ता.पाटण येथील कारखाना कार्यस्थळावरील आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त पुर्णाकृती पुतळयास राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी पुष्पचक्र अर्पण करुन महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेच्या व राज्यशासनाचे वतीने विनम्र अभिवादन केले.

                कोविड 19 चा प्रादुर्भाव असलेकारणाने मागीलवर्षीप्रमाणे आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त श्री.गणपती मंदीरातून लोकनेतेसाहेब यांचे पादुका कारखाना कार्यस्थळावरील पुर्णाकृती पुतळयासमोर आणून पुजन करण्यात आले.त्यानंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांचे हस्ते पुतळयासमोर ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते साहेब यांचे पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली.कोविड १९ पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत शासनाच्या सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले.सातारा पोलीस दलाच्या बँडचे वतीने राष्ट्रगीत सादर करुन लोकनेतेसाहेब यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, ह.भ.प.जयवंतराव शेलार, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment