Monday 5 April 2021

संगमनगर धक्का ते घाटमाथा डांबरीकरण रस्त्याकरीता 16.85 कोटींचा निधी मंजूर. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पाठपुराव्याला यश. कोयना विभागातील जनतेने मानले गृहराज्यमंत्र्याचे विशेष आभार.

 





कोयनानगर दि.04:- राड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील उर्वरीत राहिलेल्या पाटण मतदारसंघातील संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या डांबरीकरणाच्या रस्त्याच्या कामास निधी मंजूर होणेकरीता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केल्या मुळेच एकूण 13.500 किमी रस्त्याच्या कामांकरीता 16.85 कोटी रुपयांचा निधी मंत्री ना.नितीन गडकरी यांनी मंजुर केला आहे.ना.शंभूराज देसाईंनी यासंदर्भात ना.नितीन गडकरी यांची अनेकदा भेटही घेतली असून दि.09 फेब्रुवारी, 2021 रोजी लेखी पत्राव्दारेही निधीची मागणी केली आहे. ना.शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्याला आलेले हे यश आहे. विशेष म्हणजे या कामांची निविदाही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे येत्या आठ ते दहा दिवसात कार्यारंभ आदेश देवून हे काम पावसाळयापुर्वी पुर्ण करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.या रस्त्यास निधी मंजुर केल्याबद्दल कोयना विभागातील जनतेने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे विशेष आभार मानले आहेत असे पत्रक शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, धोंडीराम भोमकर, शंतनू भोमकर नथूराम सावंत, निवृत्ती कदम यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

                 प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, कराड चिपळूण रस्त्यास राष्टी्रय महामार्गाचा दर्जा देवून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी सर्वप्रथम पाटण मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे राज्यामध्ये युतीचे सरकार सत्तेवर असताना सातत्याने केली होती.त्यानुसार राड-चिपळूण या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मागील पंचवार्षिकमध्ये मिळाला. यामध्ये कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या 13.500 कि.मी.च्या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करणेच्या कामांचा समावेश होता.

                कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण कामांकरीता आवश्यक असणारा निधी मिळाला त्यातील कराड ते पाटणपर्यंत रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे गेले आहे काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. या विभागात मोठया प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे उर्वरीत राहिलेल्या संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या 13.500 कि.मी.च्या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करणेच्या कामाकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करावा याकरीता ना.शंभूराज देसाईंनी दि.09 फेब्रुवारी, 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांना लेखी पत्र दिले.राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता धनजंय देशपांडे यांना या उर्वरीत राहिलेल्या कामांस आवश्यक असणारा निधीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना केल्या त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागाचे वतीने 16.85 कोटीचा निधी आवश्यक असल्याचे अंदाजपत्रक मंजुरीकरीता सादर केले त्यावरुन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी 13.500 किमी लांबीच्या पक्कया डांबरीकरणाच्या या रस्त्याकरीता 16.85 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

                 सदरच्या कामास लवकर सुरुवात करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाचे सचिव विनय देशपांडे यांना मंत्रालयीन स्तरावर अनेकदा बोलवून घेवून यासंदर्भात मंत्रालयामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच हे सर्व शक्य झाले असून या कामाची निविदाही ना.शंभूराज देसाईंच्या सुचनेवरुन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिध्द केली असून ठेकेदार निश्चित करुन कार्यारंभ आदेश देण्याचे काम कार्यालयीन स्तरावर सुरु आहे. येत्या आठ दिवसात या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी ना.शंभूराज देसाईंना दिली आहे.येत्या पावसाळयापुर्वी हे पक्के डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंनी कार्यकारी अभियंता यांनी दिल्या आहेत.लवकरच या कामांस सुरुवात होईल त्यामुळे कोयना विभागातील जनतेने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे विशेष आभार मानले असल्याचेही पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment