दौलतनगर दि.15 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना अतिवृष्टीच्या काळात नदीस येणाऱ्या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने 10 गावांना
पुर संरक्षक भिंती बांधण्यास राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन
द्यावा,अशी आग्रही मागणी ना.शंभूराज देसाईंनी सन 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये
आमदार असताना शासनाकडे केली होती. गत पंचवार्षिकमध्ये त्यांनी
07 गावांना नदीकाठी
पुरसंरक्षक भिंती भरघोस असा निधी मंजुर करुन आणला यातील तीन गांवाना निधी मिळणे
बाकी होते त्यातील बनपेठवाडी (येराड), गुंजाळी या दोन गावांना कोयना
नदीकाठी पुरसंरक्षक भिंती रुपये 06 कोटी 26 लाख 38 हजार
रुपयांचा निधी दि.
06 मार्च 2020 रोजी मंजूर करण्यात आला तर आता वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी सांगवड,ता.पाटण येथे कोयना नदीवर घाट बांधणेच्या कामांस 04 कोटी 99 लाख रुपयांचा
निधी मंजूर करुन दिला आहे. या कामांस प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय
शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 15 एप्रिल 2021 रोजी पारित केला आहे.
पाटण मतदारसंघातील
कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना धरणातून सोडण्यांत येणाऱ्या
पाण्यामुळे पुर आल्यानंतर धोका निर्माण होत असल्याने मतदारसंघातील कोयना
नदीकाठच्या 10
गावांना घाट व संरक्षक भिंत बांधणेच्या कामांस राज्य
शासनाने जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे
अंतर्गत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी आमदार असताना
ना.शंभूराज देसाईंची सन 2004 पासून राज्य शासनाकडे मागणी होती. यासंदर्भात त्यांनी विधानसभा सभागृहात दि. 03.08.2016 रोजी लक्षवेधी सुचनाही मांडली होती त्यावेळी तात्काळ या कामांना प्रशासकीय
मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन लक्षवेधी सुचनेला दिले होते.त्यानुसार मतदारसंघातील मंद्रुळहवेली, नेरळे, गिरेवाडी, पश्चिम सुपने,केसे,साजूर व
तांबवे या ०७ गावांना
कोयना नदीवर घाट व पुरसंरक्षक भिंती बांधण्यास आवश्यक असणारा निधी त्यांनी
गत पंचवार्षिकमध्येच मंजुर करुन आणला होता आज यातील बहूतांशी कामे मार्गी लागली आहेत.तर
उर्वरीत राहिलेल्या सांगवड, बनपेठवाडी(येराड) व गुंजाळी या तीन गांवातील कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व
घाट बांधणेकरीता ना.शंभूराज देसाईंनी अर्थमंत्री झालेनंतर जलसंपदा विभागाकडून
सविस्तर प्रस्ताव मागवून घेतला व या तीन गावापैकी बनपेठवाडी(येराड) व गुंजाळी या दोन गांवाना
आवश्यक असणारा निधी मंजूर केला.
तर जून 2011
च्या पावसाळयामध्ये अतिवृष्टी व कोयना नदीमध्ये सोडलेल्या जादा विसर्गामुळे कोयना नदीकाठच्या
सांगवड गावातील सिध्देश्वर मंदीरामागील सदरची भिंत ढासळली असल्याने सिध्देश्वर मंदिर
व लगतीची वस्ती यास धोका निर्माण झाला होता.वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी
यापूर्वीचे दोन ते तीन अधिवेशनामध्ये लक्षवेधी सुचना मांडली तसेच दि.04.02.2020 रोजीच्या
पत्रान्वये सदरची बाब पुनश्च: जलसंपदा मंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. सदर पत्रावर
जलसंपदा मंत्री यांनी सदर अंदाजपत्रक मान्यतेसाठी तातडीने सादर करावे असे निर्देश दिले
होते.त्यानुसार मौजे सांगवड,ता.पाटण येथे कोयना नदीवर घाट व पूरसंरक्षक भिंत बांधण्याच्या
कामासाठी रु.04 कोटी 21 लाख 76 हजार व अनुषंगिक खर्च रु. 76 लाख 63 हजार अशा एकूण रुपये
04 कोटी 98 लाख 39 हजार एवढया खर्चाच्या जलसंपदा विभागाच्या अंदाजपत्रकांस दि.15 एप्रिल
2021 रोजीचे जलसंपदा विभागाने पारित केलेल्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता
दिली आहे.लवकरच या कामाची प्रशासकीय कार्यवाही करण्यात येऊन निविदा प्रक्रिया झालेनंतर
तातडीने या कामांस सुरुवात होणार असल्याचे वित्तराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी म्हंटले
आहे.
Dada tumache khup khup Abhar .aaj Sangwad chya saurakshak bhint bandhanyache svapn purn jhale ahe .kharokhar apale shatashaha Abhar .
ReplyDeleteJayawantrao Patil Sangwadkar .
ReplyDeleteखूप छान साहेब
ReplyDelete