सातारा दि. 02 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-: कोरोनाच्या वाढत्या
प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत
त्या निर्बंधाची जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करावी, जिल्हयातील
पोलीस यंत्रणेने सतर्क राहून लोकहितार्थ कडक निर्बंध राबवावेत अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री
ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत जिल्हयातील पोलीस विभागाकडून करावयाच्या
उपाययोजनासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार
पडली. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक
अजयकुमार बन्सल,सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती आंचल दलाल,पोलीस उपअधिक्षक
(गृह) राजेंद्र साळुंखे,फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,दहिवडी
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख,कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित
पाटील,पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्यासह पोलीस विभागातील वरीष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
यावेळी
बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू
लागला आहे.राज्य शासनाने रात्री 8 नंतर संपुर्ण राज्यात संचारबंदी केली आहे.सर्वच
ठिकाणचे हॉटेल,रेस्टॉरंट रात्री 08 नंतर बंद करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत
मात्र राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट अनेक ठिकाणी उघडी दिसत आहेत.ती
वेळेवर बंद करतात का? याची तपासणी आपले पोलीस विभागाने करावी.त्याचबरोबर हॉटेल व
रेस्टॉरंटमध्ये शासनाने व प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंटचे क्षमतेपेक्षा 50 टक्केच
उपस्थिती ठेवणेसंदर्भात नियम घालून दिलेले आहेत हे नियम पाळतात याचीही तपासणी संबंधित पोलीस
स्टेशनच्या अधिकाऱ्याने करण्याच्या सुचना देण्यात याव्यात. जी हॉटेल, रेस्ट्रारंट नियमाचे
पालन करणार नाहीत त्यांचेवर कारवाई करुन शासनाच्या नियमानुसार हॉटेल, रेस्ट्रारंट
सात दिवस बंद ठेवावीत. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लघंन केले जात असेल त्याठिकाणी
पोलीसांनी तात्काळ कारवाई करावी. बाजार, मोठमोठया बाजारपेठा तसेच गर्दी होणाऱ्या
ठिकाणी नागरिक मास्कचा वापर करत नसतील तर त्यांच्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
जिल्हयातील नगरपालिका क्षेत्रात तसेच मोठमोठया शहरातील दुकानदारांनी कोरोनाची तपासणी
केली आहे का? याची खातरजमा करुनच त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी तर
यासंदर्भात ट्रेडींग असोशियनची पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेवून यासंदर्भात जागरुकता
निर्माण करावी. तसेच सायंकाळी बाजारपेठांमध्ये रात्री 8 वाजता दुकान बंद करणेसंदर्भात
07.30 पासूनच पोलीस गाडया बाजारपेठांमध्ये फिरवाव्यात. माईकद्वारे पुकारुन दुकानदारांना
सुचना कराव्यात.तसेच लग्नसमारंभांना 20 किंवा 50 लोकांच्यात देण्यात आलेल्या
परवानगीनुसार हे समारंभ होत आहेत का? यावर पोलीस यंत्रणेने बारकाईने लक्ष ठेवून
रहावे अशा सुचना जिल्हा पोलीस यंत्रणेला करुन सातारा जिल्हयातील जनतेनेही
पोलीसांना सहकार्य करावे व प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर,
वेळोवेळी हाताची स्वच्छता राखून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी मदत करावी व आपले
आरोग्य जपावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत करुन
जनतेच्या आरोग्यासाठीच पोलीस यंत्रणेला कडक निर्बंध राबविण्याच्या सुचना दिल्या
आहेत असेही त्यांनी सांगितले.
चौकट:-
जिल्हा पोलीस विभागाचे कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करावे.
कोरोनाचा
प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी सातारा जिल्हा पोलीस दलाने कोरोना केअर सेंटर
सुरु केले होते. प्रादुर्भाव कमी झालेनंतर ते बंद करण्यात आले ते पुन्हा
कार्यान्वीत करण्यात यावे असे सांगून याकरीता लागणारी औषधे जिल्हा आरोग्य
विभागाकडून मागवून घ्यावीत तसेच खाजगी डॉक्टर व त्यांची यंत्रणा यांना या केअर
सेंटरमध्ये पाचारण करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी काढावेत असेही
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment