दौलतनगर दि.03(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-
कोविड 19 चा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या राज्य शासनाकडून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना,महिलांना कोविड 19 प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली
आहे.सातारा जिल्हयातील तमाम शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी पुढाकार घेत 45 वर्षांवरील
सर्व नागरिकांना,महिलांना कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरण करुन घेणेसंदर्भात जनजागृती करुन हि मोहिम यशस्वीरित्या राबवावी,असे आवाहन महाराष्ट्र
राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हयातील शिवसेना,युवासेना
पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र व दुरध्वनीव्दारे केले आहे.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी पदाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या
कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असून सदर आजाराने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या
संख्येत दैनंदिन वाढीचे प्रमाणही जास्त आहे. कोविड 19 चा संसर्ग होऊ नये म्हणून राज्य
शासनाकडून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना,महिलांना कोविड प्रतिबंधात्मक
लस देण्यास सुरुवात केली आहे.आपण आपले शिवसेना पक्षाचेवतीने यामध्ये पुढाकार घेऊन आपले
सातारा जिल्हयातील, विविध तालुक्यातील, त्या-त्या विभागातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,
विभागप्रमुख, शाखाप्रमुख, तमाम शिवसैनिक व युवासेना संघटनेच्या माध्यमातून जास्तीत
जास्त नागरिक व महिलांपर्यंत पोहचावे व 45 वर्षांवरील नागरिक महिलांनी कोविड प्रतिबंधात्मक
लस घेतली नाही. अशा नागरिक महिलांना आपले जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय
ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण करुन घेणेकरीता प्राधान्यक्रमाने कोविड 19 प्रतिबंधात्मक
लसीकरणाची मोहिम हाती घ्यावी. व ही मोहिम यशस्वीपणे पुर्ण करणेकरीता आपले शिवसेना पक्षाचेवतीने
सर्वोत्परी प्रयत्न करावेत, अशी विनंती गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment