दौलतनगर दि.01 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-
पाटण
तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व मल्हारपेठ येथील मोठी बाजारपेठ,वाढते गुन्हे तसेच कराड
ते चिपळूण या राज्यमार्गाचे एन.एच.199 ई असे महामार्गाचे नव्याने वर्गीकरण झाल्याने
वाढत्या रस्ते अपघातांचा विचार करता तसेच कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता स्वतंत्र पोलीस
ठाणेची निर्मिती व्हावी अशी सातत्याची मागणी लक्षात घेऊन मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या अनेक
वर्षांच्या मागणीला मान्यता दिल्यानंतर मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या प्रत्यक्ष
कामकाजास आजपासून सुरुवात करण्यात येत आहे.यामुळे मल्हारपेठ पोलीस ठाणे व
परिसरातील गावांमध्ये या नवीन पोलीस ठाण्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
मल्हारपेठ,ता.पाटण येथे नवीन पोलीस ठाण्याचे शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी
ते बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव
पाटील,व्हा.राजाराम पाटील,संचालक अशोकराव डिगे,शशिकांत निकम,शिवदौलत सहकारी बँकेचे
चेअरमन ॲङमिलिंद पाटील,चंद्रकांत पाटील,संजय गांधी निराधार योजना समितीचे मा.अध्यक्ष
भरत साळूंखे,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,शिवाजी देसाई,पोलीस अधिक्षक अजयकुमार
बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,पाटणचे
पोलीस निरिक्षक चौखंडे,मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरिक्षक उत्तम भापकर आदी
मान्यवर उपस्थिती होते.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यामधील मध्यवर्ती बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असणाऱ्या मल्हारपेठ,ता.पाटण येथील औट पोस्टचे अपग्रेडेशन करुन तेथे नवीन पोलीस स्टेशन करणेकरीता सन 2001 मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सन 2007 मध्ये या प्रस्तावा संदर्भात विधानसभेत तारांकीत प्रश्न दाखल केलेनंतर तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी सदर प्रस्ताव हा तपासणीकामी पोलीस महासंचालक यांचेकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले होते. परंतु मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित राहिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मल्हारपेठ ता.पाटण हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नविन पोलीस स्टेशन होण्याकरीता माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. दरम्यान गृहराज्यमंत्री झालेनंतर प्रथमत: गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड,अप्पर पोलीस महासंचालक जग्गनाथन,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके,सातारा पोलीस अधिक्षकासह गृह विभागाचे व वित्त विभागाच्या अव्वर सचिव गावकर यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱी या अधिकाऱ्यांचे बैठकीमध्ये मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करणेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पुर्ण करुन विलंब न करता हा प्रस्ताव मान्यतेकरीता शासनाकडे सादर करा अशा सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या होत्या.या मागणीची गंभीर्याने आणि तात्काळ दखल घेऊन पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आस्थापनेवरील पाटण पोलीस ठाणे व उंब्रज पोलीस ठाणेचे विभाजन करून मल्हारपेठ दुरक्षेत्र आणि चाफळ दुरक्षेत्र यांचे उन्नतीकरण करून नवीन मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्माण करण्यास तसेच त्याअनुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास शासनाच्या गृह विभागाने निर्णय घेत दि. 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी गृह विभागाने मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या शासन निर्णय पारित केला. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या मल्हारपेठ पोलीस ठाणे व कर्मचारी वसाहत इमारतीचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये दि. 24 जून 2021 रोजी पार पडल्यानंतर मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्राची जुनी इमारत पाडून याठिकाणी उभ्या रहात असलेल्या पोलीस ठाण्याच्यानवीन सुसज्ज इमातीचे काम सध्या वेगाने सुरु आहे.नव्याने निर्माण झालेल्या मल्हारपेठ पोलीस ठाण्याचा प्रत्यक्ष कामकाजाचा शुभारंभ आज करण्यात आला असून मल्हारपेठ पोलीस ठाण्यासाठी सहाययक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक,सहाययक पोलीस उपनिरीक्षक यांचेसह 30 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे मनुष्यबळ देण्यात आले आहे. नवीन मल्हारपेठ पोलीस ठाण्याची अधिसूचना निर्गमित केल्यानंतर या पोलीस ठाण्यांतर्गत चाफळ, मल्हारपेठ, नाडे, मारुलहवेली, मरळी या विभागातील विविध 52 गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगत मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्मितीबाबत आदेश निर्गमित झाल्यानंतर आवश्यक त्या बाबींची पूर्तता करुन मल्हारपेठ पोलीस ठाणे येथे प्रत्यक्ष कामकाजास आजपासून सुरुवात होत आहे. यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे
No comments:
Post a Comment