Saturday 26 November 2022

पोलीस भरती प्रक्रीयेचे अर्ज सादर केल्यानंतरच्या कालावधीत भूकंपग्रस्त दाखला सादर करण्याची सवलत देणेसंदर्भात राज्य शासन सकारात्मक - पालकमंत्री ना.शंभूराज देसाई

 


दौलतनगर दि.6:- महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाकडून सध्या राज्यात 20 हजार रिक्त पदांसाठी पोलीस भरती  प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या भरती प्रक्रिये अंतर्गत उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी  दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. परंतु नुकताच माझे सातत्याचे पाठपुराव्यानंतर भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबतचा शासन निर्णय महसूल व वन (मदत व पुनर्वसन) विभागाने दि. 24 नोव्हेंबर, 2022 रोजी  पारित केला आहे. यामुळे आता मूळ भूकंपग्रस्ताने किंवा त्याच्या पात्र कुटुंबियाने नामनिर्देशित केलेल्या कुटुंबातील नातू, नातूची पत्नी, व नात, पणतू, पणतूची पत्नी व पणती, खापर पणतू खापर पणतूची पत्नी, खापर पणती या पिढीपर्यंत भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करता येणार असून राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भूकंपग्रस्त दाखल्यांचे सुधारित व्याख्येनुसार पात्र उमेदवार वंचित राहू नये या करीता पोलीस भरती प्रक्रीयेचे अर्ज सादर केल्यानंतरच्या प्रक्रिये दरम्यान सुधारित व्याख्येनुसार मिळणारा भूकंपग्रस्त दाखला सादर करण्याची सवलत देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे विनंती केली असून महाराष्ट्र शासन या निर्णयासंदर्भात सकारात्मक असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पुढे म्हंटले आहे की, सन १९६७ साली कोयना जलाशय परिसरात झालेल्या 6.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाने पाटण तालुक्यात होत्याचे नव्हते केले होते. थरकाप उडवणाऱ्या त्या घटनेने पाटण तालुका दु:ख आणि वेदनेच्या गर्तेत गेला होता. पण तेव्हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी भूकंपग्रस्तांना धीर दिला. इथे पाय रोवून उभे राहून त्यांनी परिस्थिती पूर्ववत केली होती. कोयना भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्त म्हणून मिळणारे दाखले १९९५ च्या शासन निर्णयातील संकुचित व्याख्येमुळे मिळणे बंद झाले होते. मात्र सन २००४ साली मी आमदार झाल्यापासूनच कोयना भूकंपग्रस्तांवरील या अन्यायाबाबत सभागृहात आणि सभागृहाबाहेरही कायम आवाज उठवून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच २०१५ पासून भूकंपग्रस्तांना दाखले पूर्ववत मिळू लागले.परंतु भूकंपग्रस्तांना शासकीय नोकरीत २ टक्के आरक्षणाचा लाभ १९९५ च्या शासन निर्णयातील व्याख्येनुसारच दिला जात होता. त्यामुळे मूळ भूकंपग्रस्तांच्या वारसांना लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. तसेच मूळ भूकंपग्रस्त मृत पावला असल्यास किंवा वयोमानानुसार तो नोकरीसाठी अपात्र ठरत नसल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र त्याच्या पात्र कुटुंबियांना हस्तांतरित करण्याबाबतही धोरण निश्चित नव्हते. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांच्या वेदना जाणून घेत मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखालील राज्य शासनाने व्याख्येत बदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता मूळ भूकंपग्रस्ताने किंवा त्याच्या पात्र कुटुंबियाने नामनिर्देशित केलेल्या कुटुंबातील नातू, नातूची पत्नी, व नात, पणतू, पणतूची पत्नी व पणती, खापर पणतू खापर पणतूची पत्नी, खापर पणती या पिढीपर्यंत भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करता येणार  आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाचेवतीने गृह विभागातील विविध सुमारे 20 हजार रिक्त पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरु असून या पोलीस भरती  प्रक्रिये अंतर्गत उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी  कालावधी  दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत आहे. या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघासह राज्यातील भूकंपग्रस्त कुटुंबातील अनेक युवक-युवती सहभागी झाले असून नुकताच भूकपंग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबतचा शासन निर्णय पारित झाला असल्याने राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भूकंपग्रस्त दाखल्यांचे सुधारित व्याख्येनुसार पात्र उमेदवार वंचित राहू नये या करीता सदरची पोलीस भरती प्रक्रीयेच्या अर्ज सादर केल्यानंतरच्या प्रक्रिये दरम्यान सुधारित व्याख्येनुसार मिळणारा भूकंपग्रस्त दाखला सादर करण्याची सवलत देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे विनंती केली असून महाराष्ट्र शासन या निर्णयासंदर्भात सकारात्मक असून लवकरच यासंदर्भात शासनाचे धोरण स्पष्ट होईल असे शेवटी त्यांनी सांगीतले.

Friday 25 November 2022

कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर २७ वर्षांनंतर न्याय! मा. ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे शासन निर्णय जारी भूकंपग्रस्तांच्या पात्र कुटुबियांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत शासकीय नोकरीतील 2 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार



दौलतनगर दि.5:- सन १९६७ साली कोयना जलाशय परिसरात झालेल्या भूकंपाची झळ सोललेल्या भूकंपग्रस्तांच्या पात्र कुटुंबियांना शासकीय नोकरीतील २ टक्के आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या १९९५ च्या शासन निर्णयातील 'भूकंपग्रस्त कुटुंब' या व्याख्येत सुधारणा करणारा शासन निर्णय पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने जारी केला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भूकंपग्रस्तांच्या वेदना समजून घेत याबाबत संवेदनशीलतेने निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे ५४ हजार कोयना भूकंपग्रस्तांच्या तिसऱ्या पिढ्यांमधील आणि पात्र कुटुंबियांमधील वारसदारांना आता भूकंपग्रस्त दाखला मिळून शासकीय नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेता येईल.  

                सन १९६७ साली कोयना जलाशय परिसरात झालेल्या साडेसहा रिश्टर स्केलच्या भूकंपाने पाटण तालुक्यात होत्याचे नव्हते केले होते. त्यात शेकडो जणांचे जीव गेले, हजारभर पशुधन बळी गेले, ४० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. थरकाप उडवणाऱ्या त्या घटनेने पाटण तालुका दु:ख आणि वेदनेच्या गर्तेत गेला होता. पण तेव्हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी भूकंपग्रस्तांना धीर दिला. इथे पाय रोवून उभे राहून त्यांनी परिस्थिती पूर्ववत केली होती. त्यांचा वारसा लाभलेल्या मा. ना. शंभूराज देसाई यांनीदेखील कोयना भूकंपग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेतली. कोयना भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्त म्हणून मिळणारे दाखले १९९५ च्या शासन निर्णयातील संकुचित व्याख्येमुळे मिळणे बंद झाले होते. मात्र, २००४ साली आमदार झाल्यापासूनच मा. ना. शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंपग्रस्तांवरील या अन्यायाबाबत सभागृहात आणि सभागृहाबाहेरही कायम आवाज उठवला. त्यांच्या अखंड पाठपुराव्यामुळेच २०१५ पासून भूकंपग्रस्तांना दाखले पूर्ववत मिळू लागले. 

                परंतु भूकंपग्रस्तांना शासकीय नोकरीत २ टक्के आरक्षणाचा लाभ १९९५ च्या शासन निर्णयातील व्याख्येनुसारच दिला जात होता. त्यामुळे मूळ भूकंपग्रस्तांच्या वारसांना लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. तसेच मूळ भूकंपग्रस्त मृत पावला असल्यास किंवा वयोमानानुसार तो नोकरीसाठी अपात्र ठरत असल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र त्याच्या पात्र कुटुंबियांना हस्तांतरित करण्याबाबतही धोरण निश्चित नव्हते. याबाबत गेल्या तीन वर्षांपासून मा. ना. शंभूराज देसाई पाठपुरावा करत होते. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे याबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत त्यांची याबाबत सविस्तर चर्चा झाली. भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांच्या वेदना जाणून घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्याख्येत बदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता मूळ भूकंपग्रस्ताने किंवा त्याच्या पात्र कुटुंबियाने नामनिर्देशित केलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या तिसऱ्या पिढीपर्यंत भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करता येणार आहे. यामुळे कोयना भूकंपग्रस्तांना २७ वर्षांनंतर न्याय मिळाला असून भूकंपग्रस्त आणि पाटणवासीयांमध्ये आनंद व समाधानाची भावना आहे. 

 चौकट:- भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी नेहमी कटिबद्ध-नामदार शंभूराज देसाई

आमचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोयना भूकंपानंतर संवेदनशीलतेने इथे स्थिती पूर्ववत केली होती. त्यांच्या प्रेरणेमुळे मी देखील विधानसभेत आणि सभागृहा बाहेरही भूकंपग्रस्तांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवत आलो आहे. भूकंपग्रस्तांच्या पात्र वारसदारांना व कुटुंबियांना शासकीय नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने याबाबतच्या शासन निर्णयातील व्याख्येत सुधारणा करावी यासाठी गेली तीन वर्षे पाठपुरावा करत होतो. व्याख्येतील सुधारणेमुळे आता कोयना भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांना तिसऱ्या पिढीपर्यंत शासकीय नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेता येईल, याचा आनंद आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना या निर्णयाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी नेहमी कटिबद्ध राहू, हा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.  

Sunday 20 November 2022

स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- नामदार शंभूराज देसाई. दौलतनगर,ता.पाटण येथे 79 वा जयंती सोहळयात प्रतिपादन.


दौलतनगर दि.20:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली.सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे.त्यांचा सहकाराचा आणि शैक्षणिक वारसा आम्ही लिलया पेलत आहोत. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केले.

                ते दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजित स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 79 व्या जयंती सोहळया प्रसंगी बोलत होते.यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),मा.जयराज देसाई(दादा) यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,सुनील पानस्कर, विजय सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,डी.एम.शेजवळ,संतोष गिरी,पांडूरंग शिरवाडकर, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,बशीर खोंदू,विजय पवार,विजय शिंदे,अभिजित पाटील,आनंदराव चव्हाण,कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई,चिफ अकौंटंट विनायक देसाई यांचेसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी कार्यक्रमावेळी पाटण‍ विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक,उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मुक-बधीर विद्यार्थ्यांना गणेश वाटप हे कार्यक्रम या जयंती सोहळया दिवशी घेण्यात आला.

                 याप्रसंगी बोलताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले,मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा करणे शक्य नव्हते,त्या काळात एक लाख टनही ऊस तालुक्यात उपलब्ध नव्हता परंतू आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी लिलया पार पाडली. पाटण तालुकयात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि या विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे.लोकनेते साहेबांनी तालुक्याचे नंदनवन करण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते तालुक्यातील कोयना धरणामुळे,पाटण खोऱ्यातील घाट फोडून रस्ते करण्याच्या दुरदृष्टीच्या निर्णयामुळे पुर्ण झाले कोयना नदीकाठी उपसा जलसिंचन योजना उभारुन या माध्यमातून साखर कारखान्यांस मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध होईल हा त्यांचा दृष्टीकोन होता तो सफल झाला.स्व.शिवाजीराव देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा करण्यात त्यांनी खुप कष्ट सोसले,भागभांडवल उभा करण्यात मोठया अडचणी असतानाही तालुकाभर फिरुन त्यांनी भागभांडवल गोळा केले आणि सहकारी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली,अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन दिला.स्व. आबासाहेबांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतकऱ्यांना कधीही न फेडता येणारे आहे.देसाई कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील आणि तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असून त्यांनी घालून दिलेले शेतकरी हिताचे धोरण राबविणे हिच खऱ्या अर्थाने स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांना श्रध्दांजली ठरणार असून पाटण तालुक्यात सहकार क्षेत्रात स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांनी केलेले कार्य या विभागाच्या इतिहासातील सोनेरी पर्व ठरले आहे.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब स्व.आबासाहेब यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना प्रामाणिकपणे पाठबळ दिले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की कारखान्याचा 49 वा गळीत हंगाम अनेक अडचणींना सामोरे जात पार पाडत आहोत.कमी क्षमता असलेल्या कारखान्यांना गाळप क्षमता वाढ करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याचा चांगला निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आपल्या कारखान्यास 16 कोटींचे शासकीय भागभांडवल मिळाले आहे. मरळीच्या माळरानावर लोकनेते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन देण्यात स्व.आबासाहेबांचे मोलाचे योगदान आहे. लोकनेते साहेब व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही पाटण तालुक्यात काम करीत आहोत.गेल्या 25 वर्षापासून आपण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचेवतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. हाच विचार आणि आदर्श घेवून आम्ही भविष्यातही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.

  

Friday 18 November 2022

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वा वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,मंत्रीमंडळातील मान्यवर मंत्री व लोकप्रतिनिधींसह जिल्हयातील मान्यवरांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिनी दौलतनगर येथे कार्यकर्ते,हितचिंतक यांची मोठी गर्दी.

 


दौलतनगर दि.18:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वाढदिवस कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर ता. पाटण येथे सामाजीक विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते,पदाधिकारी व हितचिंतक यांची मोठी गर्दी झाली  होती.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी व मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण सौ. स्मितादेवी देसाई, सौ. अस्मितादेवी देसाई यांनी केले.यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे त्यांनी आशिर्वाद घेतले. त्यावेळी त्यांचे बंधू रविराज देसाई, चिरंजीव यशराज देसाई, कन्या कु. ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

          त्यानंतर पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेशाचे अभिषेक करुन तसेच मरळी गावची ग्रामदैवत श्री निनाई देवीचे दर्शन घेतले.यावेळी मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचेवतीने नामदार शंभूराज देसाई यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करणेत आले. त्यानंतर त्यांनी कै. सौ. वत्सलादेवी देसाई,स्व. शिवाजीराव देसाई समाधी व पुर्णाकृती पुतळा,लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 या गळीत हंगामामधील उत्पादित साखर पोत्यांचे पोती पूजन करुन शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरेसाहेब यांचे 10 वे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे हस्ते तालुक्यातील गोर-गरीब महिलांना ब्लँकेट व चटईंचे वाटप व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येऊन शिवदौलत सहकारी बँकेच्या दौलतनगर येथील शाखेच्या 19 व्या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच शिवदौलत बँकेमार्फत कर्ज दिलेल्या नविन वाहनांचे वितरण करण्यात आले. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन व नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाटण अंतर्गत लहान मुलांचे शालेय साहित्याचे प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.सकाळी 11 ते 04 वा.पर्यंत ते दौलतनगर,ता.पाटण येथील शिव-विजय सभागृहामध्ये शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित होते. नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते दुपारी 04 वा. मा.यशराज देसाई (दादा) युवा मंच पाटण तालुका यांचेवतीने आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.सायंकाळी 06 ते 10 वा.पर्यंत शंभू दौलत जल्लोष 2022 हा मराठी सिनेकलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्पुर्वी पाटण विधानसभा मतदारसंघातील शंभूराज युवा संघटना ग्रामस्थ मरळी,पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी,शिवदौलत सहकारी बँक,कोयना परिसर कामगार संघटना व पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई सातारा मित्र मंडळ यांचेवतीने  वहीतुला करण्यात आली.तसेच ग्रामपंचायत आबदारवाडी यांचेवतीने शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघ लि.दौलतनगर यांनी उत्पादित केलेल्या पेढयांची वहितूला करण्यात आली.

                वाढदिनी नामदार शंभूराज देसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. नामदार शंभूराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधानसेभेचे विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दुरध्वनीद्वारे,तर ना.उदय सामंत, ना.संदिपान भुमरे,ना.दादा भुसे,ना.संजय राठोड, ना.अब्दुल सत्तार, ना.गुलाबराव पाटील,माजी मंत्री राम शिंदे,माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार श्रीमंती छत्रपती उदयनराजे भोसले, माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार अनिल(भाऊ)बाबर,आमदार शहाजीबापू पाटील,आमदार प्रकाश आबीटकर,आमदार ज्ञानेश्वर चौगुले, महेश शिंदे, यांनी प्रत्यक्ष भेटून तर श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,आमदार दिपक चव्हाण,आमदार किशोर जोरगेवार,आमदार मकरंद पाटील,आमदार आमदार जयकुमार गोरे,आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार प्रविण दरेकर,आमदार गणपतराव गायकवाड,आमदार रविंद्र फाटक,आमदार प्रकाश सुर्वे,माजी आमदार दिलीप येळगावकर,धैर्यशिल कदम,खासदार रणजितसिहं मोहिते पाटील,प्रशांत परिचारक,मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शशिकांत जाधव,नगरसेवक ठाणे संजय मोरे,राजेंद्रसिंह यादव कराड,ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी  मनोज जिंदाल,आयुक्त विजय सुर्यवंशी माजी आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार सुनिल धांडे,खंडाळयाचे माजी सभापती नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील, परिक्षित थोरात,ॲङ इंद्रजित चव्हाण,प्रकाश तवटे,जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारे, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख,जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण, सहा.आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, सार्वजनिक बांधकाम विभाग संजय मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मनोज खैरमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड,कराडचे रणजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार,परेश शेठ,उपविभागीय अधिकारी सुनील गाढे,तहसिलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी गोरख शेलार, गटशिक्षणाधिकारी दिपाली बोरकर,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे,उपअभियंता  सुनील बसुगडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही.डी.शिंदे,अरुण जाधव,नरभट,सय्यद,अक्षय देसाई,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे घंटे,संदिप पाटील,संग्रामसिंह भोसले,ए.जे.पाटील,आरोग्य विभागाचे प्रमोद खराडे,कुराडे,शिकलगार,कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील,माजी व्हा. चेअरमन राजाराम पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, शशिकांत निकम,सोमनाथ खामकर,सर्जेराव जाधव, प्रशांत पाटील,सुनील पानस्कर,बळीराम साळूंखे,भागोजी शेळके,विजय सरगडे,शंकरराव पाटील,बबनराव शिंदे,लक्ष्मण बोर्गे,सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर, शिवदौलत बँकेच्या चेअरमन संजय देशमुख,व्हा.चेअरमन सौ.कुसुम मोहिते,माजी चेअरमनॲड.मिलिंद पाटील, संचालक चंद्रकांत पाटील, सुनील पवार,अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर,वाय.के.जाधव, मधुकर पाटील,नेताजी मोरे,पांडूरंग निकम,रणजित शिंदे,माणिक पवार,हेमंत पवार,चंद्रकांत कांबळे शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष इंदुताई मिसाळ,किरण सुर्यवंशी,अशोक झिमरे,महेश शिद्रुक,विजय बाबर,अनिता जाधव,विलास कुराडे, कुणाल चंदुगडे,दिपक गव्हाणे,विजय साळुंखे,माजी जि.प.सदस्य डी.वाय.पाटील,जालंदर पाटील, बशीर खेांदू, ॲङडी.पी.जाधव,प्रकाशराव जाधव,बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी, पंजाबराव देसाई, सीमा मोरे, सुभद्रा शिरवाडकर,पांडूरंग शिरवाडकर,पाटण नगरपंचायतीचे नगरसेविका शैलजा मिलिंद पाटील,आस्मा इनामदार, माजी नगरसेवक अब्दुलगणी चाफेरकर, माजी नगरसेविका मनिषा जंगम,नाना पवार,मनोज पाटील,मिलिंद पाटील,बबनराव माळी,अमोल पाटील,प्रकाश पवार, शैलेंद्र शेलार,सावळाराम लाड, सदानंद साळूंखे, दिलीप सपकाळ, गणेश भिसे,किसन गालवे,उत्तम मोळावडे,विजयराव मोरे,टी.डी.जाधव,शिवाजीराव शेवाळे,आप्पा मगरे,डी.एम.शेजवळ,नथूराम कुंभार,राजेंद्र चव्हाण,अमोल चव्हाण,अभिजित चव्हाण,धनाजी केंडे, विष्णू पवार,अरविंद पवार,नाना साबळे,संपत कोळेकर,संजय शिर्के,विलास गायकवाड, प्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम,दादा जाधव,संतोष पवार,शंकर पाटील,किसन कवर, बाळासो सुर्यवंशी, बाजीराव रांजणे,चंद्रकांत जगताप,राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम,रविंद्र सपकाळ,रामभाऊ कदम,रविंद्र जाधव,नाना पवार,गोरख चव्हाण,प्रविण पाटील,शिवाजी जाधव,मनोहर कडव,राजेंद्र पाटील,प्रकाशराव नेवगे,जे.एम.पवार,मनोज मोहिते,राजाराम मोहिते,ॲङ बाबूराव नांगरे, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे,अभिजित पाटील, कारखान्याचे माजी संचालक मधूकर भिसे, प्रकाश नेवगे, आनंदराव चव्हाण,गजानन जाधव,अशोकराव डिगे,शंकर शेजवळ,राजेंद्र गुरव,विकास गिरी-गोसावी, विजयराव जंबुरे,बबनराव भिसे, विश्वास पाटील,सौ.विश्रांती  जंबुरे देशमुख, वसंत कदम,जोतिराज काळे,दिपक साळूंखे, अमोल मोहिते,राजू सणस, रघुनाथ पानस्कर,शंकर पवार,राजेंद्र माळी,लक्ष्मण संकपाळ,पांडूरंग बेबले,प्रविण पाटील,संग्राम पाटील,संजय सणस,अभिजित पवार,राजेंद्र दशवंत,किरण दशवंत,वैभव देशमुख,सचिन पवार,राहूल पाटील, ,नवनाथ पाळेकर,प्रशांत मोहिते,महेश पाटील,राजू चव्हाण,प्रशांत मोरे,मुज्जमिल खोंदू,वैभव पवार,अनिकेत देसाई, डी.एम.शेजवळ,महादेव पाटील,रामचंद्र कुंभार,भरत बादल,बाळासाहेब भाकरे,महिपती गायकवाड,नामदेवराव साळूंखे,रणजित शिंदे,विजय पवार(फौजी),सागर सपकाळ,राहूल घाडगे,दै.पुढारीचे सतीश मोरे,उपसंपादक अमोल चव्हाण,अशोक मोहने,चंद्रजित पाटील,महेश पाटील,तुषार देशमुख, दै.तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दिपक प्रभावळकर,संभाजी भिसे,दै.मुक्तागिरी विद्या म्हासुर्णेकर,दै.लोकमतचे निलेश साळुंखे, दैनिक प्रभात अमित शिंदे,विजय सुतार,विजय लाड,किशोर गुरव,संदिप राजे,संदिप गायकवाड,दैनिक सकाळचे अरुण गुरव,विजय लाड यांच्यासह विविध गावातील सरपंच,उपसरपंच,तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका कार्यकारीणीचे पदाधिकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका,जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका,कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच बाळासाहेबांची शिवसेना,युवासेना महिला आघाडी सातारा जिल्हा या संघटनांचे सर्व कार्यकर्ते,हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.