Saturday 12 November 2022

नामदार चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचे चेअरमन यशराज देसाई(दादा) यांचे शुभहस्ते उद्घाटन. चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी मरळी संघाकडून क्रिकेट खेळत लुटला आनंद.

 

दौलतनगर दि.2:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजीचे वाढदिवसाचे औचित्य साधून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे मार्गदर्शनाखाली व मा.यशराज देसाई युवा मंच पाटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने नामदार चषक 2022 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ व क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे शुभहस्ते दौलतनगर,ता.पाटण येथे पार पडला.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,प्रकाशराव जाधव,विजयराव जंबुरे,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,सुरेश पानस्कर,उद्योजक नवनाथ पाळेकर,सचिन पवार,सरपंच राजेंद्र माळी,दिपक गव्हाणे,प्रविण पाटील,राजेंद्र सणस,संजय सणस,संग्राम पाटील,गणेश भिसे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

                   दौलतनगर,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजीचे वाढदिवसाचे औचित्य साधून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे मार्गदर्शनाखाली व मा.यशराज देसाई युवा मंच पाटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने नामदार चषक पाटण 2022 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नामदार चषक पाटण 2022 या क्रिकेट स्पर्धेसाठी वेदांत उद्योग समुहाचे अध्यक्ष नवनाथ पाळेकर यांचेकडून प्रथम क्रमांकाचे 1,11,111/- रु. व चषक, कलागोविंद को-ऑप.के्रडीट सोसायटी साकुर्डीचे संस्थापक सचिन पवार यांचेकडून व्दितीय क्रमांकाचे 77,777/-रु. व चषक,गणेश भिसे,साईराज कन्स्ट्रक्शन पाटण यांचेकडून तृतीय क्रमांकाचे 55,555/- रु व चषक. व श्री.राजू सोमनाथ चव्हाण यांचेकडून चौथ्या क्रमांकाचे 33,333/-रु. व चषक याप्रमाणे विजेत्या संघांना बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच मॅन ऑफ दी सिरीजसाठी 32 इंची एल.ई.डी.,उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज,सलग तीन षटकार,सलग तीन चौकार व सलग तीन विकेट अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. या नामदार चषक 2022 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ व क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे शुभहस्ते दौलतनगर,ता.पाटण येथे आज सकाळी 09.00 वा. पार पडला.यावेळी मरळी व सुर्यवंशीवाडी या दोन संघामध्ये पहिला सामना झाला.

चौकट:नामदार चषक 2022 क्रिकेट स्पर्धेत चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी मरळी संघाकडून खेळत लुटला आनंद.

मा.यशराज देसाई यांना पहिल्यापासूनच क्रिकेट खेळण्याची मोठी आवड आहे.ज्या ठिकाणी त्यांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळते त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष क्रिकेट खेळत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत असतात.मध्यंतरी  त्यांनी  पाटण विधानसभा मतदारसंघात एका‍ विवाहप्रसंगी भेट देत असताना लग्नस्थळाजवळ क्रिकेट खेळत असलेल्या मुलांसोबत क्रिकेट खेळत आनंद लुटला होता. आज राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून मा.यशराज देसाई युवा मंच पाटण तालुका यांचेवतीने आयोजित नामदार चषक 2022 क्रिकेट स्पर्धेप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी मरळी संघाकडून क्रिकेटचा सामना खेळत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाजीला केलेल्या चौकार व षटकार यांना उपस्थित प्रेक्षकांनी चांगली साद दिली.

No comments:

Post a Comment