दौलतनगर दि.20:- लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून
मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे
आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून
दिली.सहकाराबरोबर
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या
रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर
झाले आहे.त्यांचा सहकाराचा
आणि शैक्षणिक वारसा आम्ही लिलया पेलत आहोत. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील
जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते
बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या
पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या
पाठबळाच्या जीवावर आपली यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र
राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार
शंभूराज देसाईंनी केले.
ते दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र
दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजित स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)
यांचे 79 व्या जयंती सोहळया प्रसंगी बोलत होते.यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),मा.जयराज देसाई(दादा) यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन
अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत
पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,सुनील पानस्कर, विजय
सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर
पाटील,डी.एम.शेजवळ,संतोष गिरी,पांडूरंग शिरवाडकर, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे,शिवदौलत
बँकेचे चेअरमन संजय देशमुख,बशीर खोंदू,विजय पवार,विजय शिंदे,अभिजित पाटील,आनंदराव
चव्हाण,कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई,चिफ अकौंटंट विनायक देसाई
यांचेसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व कार्यकर्ते,कारखाना अधिकारी व कर्मचारी
यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी कार्यक्रमावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील
माध्यमिक,उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील व विशेष प्राविण्य
मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मुक-बधीर विद्यार्थ्यांना गणेश वाटप हे
कार्यक्रम या जयंती सोहळया दिवशी घेण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नामदार
शंभूराज देसाई म्हणाले,मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा करणे शक्य
नव्हते,त्या काळात एक लाख टनही
ऊस तालुक्यात उपलब्ध नव्हता परंतू आदरणीय लोकनेते
साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी लिलया पार
पाडली. पाटण तालुकयात
मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि या
विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे.लोकनेते साहेबांनी
तालुक्याचे नंदनवन करण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते तालुक्यातील कोयना धरणामुळे,पाटण खोऱ्यातील घाट फोडून
रस्ते करण्याच्या दुरदृष्टीच्या निर्णयामुळे पुर्ण झाले कोयना नदीकाठी उपसा
जलसिंचन योजना उभारुन या माध्यमातून साखर कारखान्यांस मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध
होईल हा त्यांचा दृष्टीकोन होता तो सफल झाला.स्व.शिवाजीराव देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले आणि
शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा करण्यात त्यांनी खुप कष्ट सोसले,भागभांडवल उभा करण्यात
मोठया अडचणी असतानाही तालुकाभर फिरुन त्यांनी भागभांडवल गोळा केले आणि सहकारी
तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली,अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या
मालकीचा करुन दिला.स्व. आबासाहेबांनी केलेल्या या
महत्त्वपूर्ण कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतकऱ्यांना कधीही न फेडता येणारे
आहे.देसाई
कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील आणि
तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असून त्यांनी घालून दिलेले शेतकरी हिताचे
धोरण राबविणे हिच खऱ्या अर्थाने स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांना श्रध्दांजली ठरणार असून पाटण
तालुक्यात सहकार क्षेत्रात स्व.शिवाजीराव
देसाईसाहेबांनी केलेले कार्य या विभागाच्या इतिहासातील सोनेरी पर्व ठरले आहे.लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब स्व.आबासाहेब
यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना
प्रामाणिकपणे पाठबळ दिले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की कारखान्याचा 49 वा
गळीत हंगाम अनेक अडचणींना सामोरे जात पार पाडत आहोत.कमी क्षमता असलेल्या
कारखान्यांना गाळप क्षमता वाढ करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याचा चांगला निर्णय
राज्य शासनाने घेतल्याने आपल्या कारखान्यास 16 कोटींचे शासकीय भागभांडवल मिळाले
आहे. मरळीच्या माळरानावर लोकनेते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला साखर कारखाना
शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन देण्यात स्व.आबासाहेबांचे मोलाचे योगदान आहे. लोकनेते साहेब व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार
आम्ही पाटण तालुक्यात काम करीत आहोत.गेल्या 25 वर्षापासून आपण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व
शिक्षण समुहाचेवतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना प्रोत्साहन देण्याचे
काम करत आहे. हाच विचार आणि आदर्श घेवून आम्ही भविष्यातही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी
शेवठी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment