दौलतनगर दि.09 :- राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे 56 व्या वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने शारिरीक तपासणी करुन तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचेकडून योग्य तो सल्ला व आवश्यक ते औषधोपचार करुन आरोग्याची काळजी घेण्यासाठी गुरुवार दि. 17 नोव्हेंबर,2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 या वेळेमध्ये दौलतनगर,ता.पाटण येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावेतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
चौकट: युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन.
गतवर्षी ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य असे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठया प्रमाणांत युवकांनी या रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करुन रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मोठा हातभार लावला होता.यंदाच्या वर्षी ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन केले असून या सर्व रोग निदान शिबीरामध्ये मतदारसंघातील जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे,असे आवाहन वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट: नामदार चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचे चेअरमन मा.यशराज देसाई यांचे शुभहस्ते शनिवारी उद्घाटन.
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून मा.यशराज देसाई युवा मंच पाटण तालुका यांचेवतीने आयोजित नामदार चषक 2022 या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 09.00 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.
No comments:
Post a Comment