Thursday, 19 April 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ गौरव यात्रेची उत्साहात मिरवणूक मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेने केले लोकनेते साहेबांना विनम्र अभिवादन


         पाटण तालुक्याचे दैवत,महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात गुरुवारी मोठया उत्साहात पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुहाचे प्रमुख व तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून गत तीन वर्षापासून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेचे हे चौथे वर्ष असून चित्ररथ व गौरव यात्रेला तालुक्यातील हजारों जनतेने उदंड असा प्रतिसाद दिला.मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेने रथामधील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादुकांचे दर्शन घेवून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सकाळी ०९.३० वाजता सुरु झालेली ही चित्ररथ व गौरवयात्रा सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत संपुर्ण तालुकाभर सुरु होती.आमदार शंभूराज देसाई या गौरवयात्रेला स्वत: हजर असल्याने हा भव्य सोहळा अत्यंत शांततेत पार पडला.
              लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पारायण सोहळा आयोजित केला जातो.यावर्षीही २३ एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त शुक्रवार दि.२० पासून २३ एप्रिल पर्यंत कारखाना कार्यस्थळावर पारायण सोहळा संपन्न होत आहे. गत तीन वर्षापासून आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या आदल्या दिवशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देणेकरीता त्यांच्या कार्याचा चित्ररथ याची गौरवयात्रा व गौरवयात्रेच्या पुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा साजरा करण्यात येत असून तालुक्यातील तब्बल ३३ गावांतून हे चित्ररथ व गौरवयात्रा मार्गक्रमण करते. यावेळी या गावांच्या आसपासची गावे व वाडयावस्त्यांतील लोकनेतेप्रेमी जनता मोठया संख्येने उपस्थित असते. गुरुवारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते या सोहळयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्याचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले हे शासनाच्या वतीने अभिवादन करणेकरीता दौलतनगर येथे उपस्थित होते.
              लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी, फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते. तालुक्यातील दौलतनगर कारखाना, गव्हाणवाडी,चोपदारवाडी,सुर्यवंशीवाडी,पापर्डे,मारुलहवेली फाटा,गारवडे, बहुले फाटा,सोनाईचीवाडी,वेताळवाडी,निसरे,निसरे फाटा, आबदारवाडी,मल्हारपेठच्या सर्व वाडया,नारळवाडी,येराडवाडी,नाडे नवारस्ता,आडूळ गावठाण,आडूळपेठ,लुगडेवाडी फाटा,येरफळे, म्हावशी,पाटण,नेरळे,माणगाव,पेठशिवापूर,कुसरुंड,शिंदेवाडी,सुळेवाडी मार्गे पुन्हा दौलतनगर असा या पालखी सोहळयाचा मार्ग होता.एकूण ३३ गावातून मार्गक्रमण करणा-या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी सोहळयाचे महिला वर्गाकडून पूजन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले. या सोहळयाच्या मार्गक्रमणावर भगवे झेंडे लावण्याबरोबर प्रत्येक गावामध्ये रांगोळीही काढण्यात आल्या होत्या.लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विनम्र अभिवादन करणारे बॅनर पालखी सोहळयाच्या मार्गावर लक्ष वेधून घेत होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना,कोयना परिसर कामगार संघटना,शिवदौलत सहकारी बँक, स्व. शिवाजीराव देसाई पॉलिटेक्निक कॉलेज,श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर अँड सिनिअर कॉलेज,दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मोरणा शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयांनी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी लोकनेते यांच्या जीवनावरील विविध विषयांना स्पर्श करणारे आकर्षक चित्ररथ साकारले होते. सुमारे १४ आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले होते.तर हजारो कार्यकर्ते लोकनेत्यांच्या नावाने जयजयकार करत सोहळयात सामील झाले होते.यामुळे पालखी सोहळयातील संपुर्ण वातावरण लोकनेतेमय झाले होते. स्वत: आमदार देसाई नेतृत्व करीत असलेली ही अनोखी मिरवणूक तब्बल सात तास भर उन्हात अत्यंत उत्साहात संपन्न झाली.संपुर्ण मिरवणूकीमध्ये तालुका पोलिस प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहभागी चित्ररथामध्ये लोकनेत्यांनी साकारलेल्या वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.याचवेळी आमदार देसाई यांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येत होते.या अनोख्या सोहळयात प्रत्येक ठिकाणी उत्साही संस्था कार्यकर्त्यांकडून मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना सरबत,पोहे,चहा,केळी अशा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.एकंदरीत दौलतनगर या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने होणा-या पारायण सोहळयाच्या आदल्यादिवशीच लोकनेते यांच्या या चित्ररथ गौरवयात्रेमुळे संपुर्ण पाटण तालुका ख-या अर्थाने लोकनेतेमय झाला. हे वातावरण या ठिकाणी २३ एप्रिलपर्यंत पहावयास मिळणार आहे.गौरवयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे आमदार शंभूराज देसाई यांनी आभार मानले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.यशराज देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, व सर्व संचालक मंडळ,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट :- लोकनेत्यांना अभिवादन करण्याकरीता प्रत्येक कार्यालयासमोर शासकीय यंत्रणा सज्ज.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची चित्ररथ व गौरवयात्रा हि कराड पाटण या प्रमुख राज्य मार्गावरुन जात असताना मल्हारपेठ पासून पाटण शहरामध्ये असणा-या सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी हे कर्मचा-यांसह लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे पादुकांना अभिवादन करण्याकरीता प्रत्येक कार्यालयासमोर सज्ज होती. पाटण पंचायत समितीच्या वतीने पंचायत समितीच्या प्रांगणात लोकनेते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
चौकट :- पालखी सोहळा मार्गावर मल्हारपेठ येथे भजनाचा कार्यक्रम.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची चित्ररथ व गौरवयात्रा ज्या मार्गावरुन मार्गक्रमण करणार होती त्या मार्गावर मंडप घालून मल्हारपेठ येथेील ग्रामस्थांनी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या भजन सोहळयात आमदार शंभूराज देसाई हे स्वत: उपस्थित राहून त्यांनी एकतारी भजनामध्ये सहभाग घेतला.


Tuesday, 17 April 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जंयती साजरी. आमदार शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.

       निश्चयाचा महामेरु,बहूतजनांशी आधारु । अखंड स्थितीचा निधारु श्रीमंत योगी ॥ युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती पंरपरेनुसार वैशाख शुध्द व्दितीयेस साजरी होते.आज पारंपारिक तिथीनुसार साजरी होणारी शिवजंयती दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे हस्ते युगपुरुष छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांचे अर्धाकृती पुतळयास पुष्पहार व पुष्प अर्पण करुन विन्रम अभिवादन करुन मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
     याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मध्ययुगीन भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर युगपुरुष होऊन गेले. राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराज यांनी अभूतपुर्व विक्रम प्रस्थावित केले आहे त्यांच्या दुरदृष्टीचे प्रतिबिंब त्यांच्या कल्याणकारी प्रशासनात उमटले आहेत.युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जे आदर्श घालून दिले आहेत त्या आदर्शानुसार आपण सर्वांनी वाटचाल करुन शिवजयंती साजरी करण्यात यावी. ६ जुन १६७४ रोजी रायगडावर साजरा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे स्वातंत्रयांची मंगल पहाट होती. मातब्बर शत्रुंशी लढून स्वराज्याची स्थापना केल्यानंतर साजरा करण्यात आलेला राज्याभिषेक हा अपूर्व व अलौकीक सोहळा होता. स्वराज्याचे सुराज्यात आणि सुराज्याचे रामराज्यात रुपातंर करण्यासाठी शिवचरित्र हे एखादया सोन्याच्या खाणीप्रमाणे समाजाला नवी दिशा दाखविणारे आहे. याचे अवलोकन नव्या पिढीने जरुर करावे असे आवाहन करुन आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने त्यांचे जयंतीनिमित्ताने विन्रम अभिवादन करीत असल्याचे शेवठी बोलताना स्पष्ट केले. यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, संचालक आनंदराव पाटील,कारखान्याचे अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच शिवभक्त यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Monday, 16 April 2018

अजितदादा अन् माझेमधे बोलण्याची राजकीय प्रगल्बता अजुन तुम्हाला यायची आहे. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांवर प्रतिहल्ला.


     माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकर (बच्चु दादा) मला वाटले आपण राष्ट्रवादी पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सानिध्यात आणि पिताश्रींच्या मार्गदर्शनाखाली प्रगल्ब झाला असाल पण बच्चुदादा अजुनपण बालिशपणेच बोलतात हे मला माहित नव्हते.दोनवेळा कारखाना,एकदा आमदारकी लढविलेला हा युवा नेता अजुनही बालिशच असून यांचा हा बालिशपणा कधी जाणार.अहो निष्क्रीय माजी सभापती,अडीच वर्षे वडीलकृपेने सभापतीपद मिळाले म्हणजे जादा ज्ञान मिळाले असे समजू नका,विषय तुमच्या नेत्यांना दिलेल्या प्रतिउत्तराचा होता,तुमच्या नाकाला मिरची का झोंबली,बरोबर सत्यजिंतसिंह पाटणकर तुम्हीच तेवढे पक्षनिष्ठ आहात ना? अजितदादा अन् माझेमधे बोलण्याची राजकीय प्रगल्बता अजुन तुम्हाला यायची आहे. असा प्रतिहल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरावर केला असून पक्षनिष्ठा,विकास कामे, ऊसाचा दर आणि तालुक्याची वाट कुणी लावली याची उत्तरे ऐकण्याची हौस आणि हिम्मत तुमच्यात असेल तर समोरासमोर या. तारीख तुमची, वेळ तुमची, ठिकाण तुमचे मग बघू असे जाहिर आव्हानही त्यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिले आहे.
    माजी आमदार निष्क्रीय सुपुत्र सत्यजितसिहं पाटणकर तुमचे कर्तृत्वच ते काय ? वडीलांच्याकृपेने एकदा अडीच वर्षासाठी सभापती झालात आणि काय दिवे लावले. म्हणे निर्मल सभापती, पाटणची अवस्था पहा म्हणजे पाटणची वाट कुणी लावली हे लक्षात येईल.मी तोंड उघडण्याचे प्रतिउत्तर तुमच्या नेत्यांना दिले आहे मला आव्हान देण्याएवढे तुम्ही अजून मोठे आणि स्वत:ला महान समजू नका, तुमची राजकीय प्रगल्बता किती आहे हे तालुक्यातील जनतेने एकदा नव्हे तीनदा दाखवून दिली आहे. दोन वेळा कारखान्याच्या आणि एकवेळा विधानसभेला तालुक्यातील जनतेनेच तुम्हाला तुमची जागा दाखविली आहे.पक्षनिष्ठेची भाषा बोलणारे पाटणकर महाशय, राजकारण्याच्या पलीकडे एक मैत्रीचे नाते असते ते तुम्हाला अजून उमजलेच नाही ज्यांनी तुमच्या वाडवडीलांना हाताला धरून राजकारणात आणले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे तुम्ही,तुम्हाला मैत्री काय समजणार?पक्ष वेगवेगळे असले तरी माणुसकी सोडायची नसते.अजितदादांकडून चुक झाली म्हणून ते आत्मक्लेश करायला आले, आपला मित्र आत्मक्लेश करतोय म्हणून मी माणुसकीच्या नात्याने तिथे गेलो होतो.त्यांनी मला जवळ घेतले आणि तुम्हाला लांब बसविले ते तुमच्या निष्क्रीयतेमुळे. एवढी तर समज तुम्हाला असेल असे मला वाटले होते आता त्यांचे राजकारण करुन स्टेजवरुन दादांना बोलायला लावण्यासारखे त्यांत काहीच नव्हते. बर असू दे दादा बोलले असले तरी ते आजही माझे मित्रच आहेत.दोन मोठी माणसे बोलताना लहानांनी त्यात तोंड घालू नये असे म्हणतात, दादाला का भेटलो हे आम्ही दोघे मित्र बघून घेऊ. बच्चुदादा तुम्ही त्यात मधे लुडबुड करु नका. पक्षनिष्ठा काय असते हे मला शिकवणारे पाटणकर सारंगबाबा पाटील यांची पदवीधरची निवडणुक आठवते का ? पक्षाने सारंगबाबांना तिकीट दिले असताना त्यांच्या विरोधात कुणाच्या सांगण्यावरून तुमचे कार्यकर्ते पाटणमध्ये बुथ थाटून बसले होते ? तेव्हा कुठे गेली होती पक्षनिष्ठा? दुसरे उदाहरण तुमच्याच पक्षाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना चुकीच्या पध्दतीने अटक झाली त्यावेळी कुठे लपून बसला होता.सातारा येथे खा.श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता तेव्हा साता-यात येऊन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणारे पाटणकर मला तुम्ही पक्षनिष्ठा शिकवताय. दक्षिणेतल्या काकांचे, काका आणि आम्ही पाहून घेऊ ज्या काकांच्या जीवावर यापुर्वी अनेक वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता तुम्हाला मिळाली आणि मिळवत होता त्यांचे मुलाने बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी केली तेव्हा काकांचे उपकार समजून तरी त्यांचे मुलाला मतदान करायचे होते.ते का केले नाही हे आपण पितापुत्र स्पष्ट करु शकाल काय? जिल्हा नियोजनच्या निवडणूकीत रयत आघाडीची राष्ट्रवादीबरोबर अगोदरच बोलणी सुरु होती. तत्पुर्वी आमची आणि खा.श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज युती झाली होती. मग काकांच्या मुलांचा काटा काढण्याचा प्रश्नच कुठे येतो?
  हि झाली पक्षनिष्ठा आता कारखाना, ज्यांनी देसाई कारखान्याला सुरुवातीपासून पाण्यात पाहिले त्या पाटणकरांना कारखान्यावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही.आमचा कारखाना सुरु तरी आहे.अनेकवेळा घोषणा केलेल्या आणि ज्याच्यासाठी लाखो रुपये गोळा केलेल्या कोयना शुगर का पाटण खांडसरी याचे काय झाले यावर का मूग गिळून गप्प बसलाय.कोयना शुगरची वीट कधी रचणार ते आधी सांगा मग आमचे कारखान्याचे माप काढा. कारण कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी आणि कामगारांनी अनेकदा तुम्हाला तुमची जागा दाखविली आहे.पुन्हा ती आजमावयाची तुमची हौस असेल तर जरुर कारखान्याचे सभासद आणि कामगार तुमची हौस पुर्ण करतील. मी कुणाचे गोडवे गायचे हे केवळ एक माजी आमदार पुत्र म्हणून ओळख असणा-या सत्यजितसिंह पाटणकरांनी मला शिकवू नये. बोटींग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरावर गृह विभागानेच घेतला आहे उलट तो सुरु करणेकरीता मी गृहराज्यमंत्री यांचेबरोबर याची प्रत्यक्ष पहाणी करुन हा व्यवसाय सुरु करण्याची शिफारस केली हे शासनदरबारी जावून पहा एकदा. कोयना पर्यटन, कोयना पर्यटन काय केले हो पर्यटनासाठी, दुस-यांच्या उद्योगासाठी स्वत:च्या जागा बडया धेंडयांना विकायला लावणारे पर्यटनाची आणि प्रकल्पाची भाषा तुम्हाला शोभत नाही. पवनचक्की प्रकल्प तालुक्यात आणल्याच्या बडाया मारणारे आहो शेतक-यांच्या जागाही तुम्ही काढून घेतल्या.हे डॉ. भारत पाटणकरांना माहिती नसावे कदाचित, विकासाच्या मुद्यावर पाटण्कर पुत्र विकासाचे तुम्हाला कळतेच काय? पंचायत समितीतील शेष फंड वगळता तुम्हाला काय माहिती तर आहे का ? आता निवडणुकीला तालुक्यात फिराल तेव्हा कळेल कुठे कुठे आणि कसा कसा विकास झालाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचे सरकार असताना जे तुमच्या वडीलांना जमले नाही तो विकास साध्य करुन दाखविला आहे. सत्यजितसिंह पाटणकर तुम्हाला एक सल्ला द्यावसा वाटतो, अशी पत्रकबाजी करुन बोलण्यापेक्षा आता निवडणुकीला तुम्हीच माझेबरोबर लढणार आहात. हे जर तुमचे निश्चित झाले असेल तर निवडणुकीचा धुरळा तर उडेलच परंतु निवडणुकीआधीच समोरासमोर स्टेज लावा,तारीख,ठिकाण,वेळ तुम्हीच ठरवा,तुमचा प्रश्न माझे उत्तर, माझा प्रश्न तुमचे उत्तर मग जनतेला कळेल आमदारकीची स्वप्न पाहणारा युवा नेता किती राजकीय प्रगल्ब आहे ते का अजून बालिशच आहे ते. असा प्रतिहल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजिंतसिंह पाटणकरांवर केला आहे.

Saturday, 14 April 2018

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाटण तहसिल कार्यालयात विनम्र अभिवादन. आमदार शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.


     भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२७ व्या जयंतीनिमित्त पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण येथील तहसिल कार्यालयात त्यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन विन्रम अभिवादन करण्यात आले.
     यावेळी पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले,नायब तहसिलदार विजय माने,निवासी नायब तहसिलदार राजेंद्र जाधव,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आर.व्ही.पाटील,पंचायत समिती शिक्षणाधिकारी आर.पी.निकम हे शासकीय अधिकारी तर पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर,नगरसेविका सौ.मनिषा जंगम,बबनराव माळी,नानासाहेब पवार, शंकर कुंभार, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे तसेच पाटण इंदिरानगर येथील बौध्द समाजातील कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
    फक्त वही-पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण ही शिकवण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी शिकवण दिली आहे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी होत असून महामानव असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे १२७ व्या जयंतीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विन्रम अभिवादन करतो असे आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व माझे प्रयत्नांचे फलित. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत तालुक्यातील एकूण १९,३१४ शेतक-यांना ३३ कोटी १५ लाख ५६ हजार ५२० रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ. :- आमदार शंभूराज देसाई.


      युती शासनाच्या सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना २०१७ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व माझे प्रयत्नांना फलित प्राप्त झाले असून आमचे सातत्याच्या प्रयत्नामुळे या योजनेत पाटण तालुक्यातील एकूण १९ हजार ३१४ शेतक-यांना ३३ कोटी १५ लाख ५६ हजार ५२० रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला असून शासन निर्णयातील पात्रता निकषानुसार तालुक्यातील १६,०२७ इतक्या नियमित कर्जदार शेतक-यांना अनुदान रुपाने २२ कोटी १९ लाख ६६ हजार ८८३ रुपये बचत खात्यावर जमा करण्यात आले असून ३ हजार १८५ थकबाकीदार शेतक-यांना एकूण रुपये ९ कोटी ९६ लाख ३४ हजार ९९३ रुपये त्यांचे थकबाकी कर्जापोटी असे एकूण १९,३१४ शेतक-यांना ३३ कोटी १५ लाख ५६ हजार ५२० रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजनेतंर्गत तालुक्यातून १०२ शेतक-यांनी रक्कम रुपये दीड लाखांवरील रक्कम भरली असून या शेतक-यांच्या खात्यावर ९९ लाख ५४ हजार ६४४ रुपये रक्कम कर्ज आणि व्याज माफीपोटी जमा झाली असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
       आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे की, युतीच्या शासनाने कर्ज काढावे परंतू महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतक-यांना संपुर्ण कर्जमाफी दयावी अशी मागणी आम्ही सातत्याने विधानसभेत व विधानसभेच्या बाहेरही युतीच्या शासनाकडे करीत होतो. आमचा शिवसेना पक्ष राज्यातील शेतक-यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी याकरीता सुरवातीपासूनच आग्रही होता.मी युती शासनातील एक घटक असलो तरी सन २०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना पक्षाचा प्रतोद म्हणून कर्जमाफीच्या विषयावरील चर्चेच्या वेळी मी स्वत: राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीचा विषय शासनापुढे मांडताना शासनाने कर्ज काढावे आणि राज्यातील गोरगरीब,कर्जबाजारी शेतक-यांना कर्जमाफी मिळवून दयावी अशी आक्रमक भूमिका घेतली होती.युतीच्या शासनाने महाराष्ट्र राज्यातील कर्जबाजारी शेतक-यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा एैतिहासिक निर्णय घेतला त्यातील २२ हजार कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर आजमितीला जमा झालेले असून या निर्णयास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देवून युतीच्या शासनाने शेतक-यांचा ख-या अर्थाने सन्मान केला आहे.राज्यातील कर्जबाजारी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आघाडी शासनाने केवळ ढोंग केले होते आघाडी सरकारच्या वतीने ७० हजार कोटींची कर्जमाफी यापुर्वी केलेली असल्याच्या केवळ बतावण्या मारल्या जात आहेत. ७० हजार कोटींची कर्जमाफी सांगण्यात येत असली तरी महाराष्ट्राच्या वाटयाला केवळ ७,५०० कोटी रुपयेच त्याकाळात आले होते हे शासकीय आकडेवारीवरुन अनेकदा स्पष्ट झाले आहे. आघाडी सरकारने दिलेली कर्जमाफी ही कर्जबाजारी असणा-या शेतक-यांच्या खात्यावर जमा होण्याएैवजी चार चाकी गाडया तसेच अलिशान बंगले असणा-या शेतक-यांना मिळाली होती हे जगजाहीर आहे.युती शासनाने केलेली कर्जमाफी एैतिहासिक असून ती आघाडी सरकारला करता आली नाही म्हणूनच ते घरी आणि युती शासन सत्तेवर आहे. आमचे पाटण तालुक्यातील या अगोदरच्या लोकप्रतिनिधींना तर हे जमलेही नाही असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांचे नाव न घेता लगावित पाटण तालुक्यातील १९ हजार ३१४ शेतक-यांची यादी प्राप्त झाली असून कर्जमाफीची एकूण रक्कम ३३ कोटी १५ लाख ५६ हजार ५२० रुपये इतकी रक्कम शेतक-यांच्या नावावर प्रत्यक्षात जमा करण्यात आलेली आहे. दरम्यान अनमॅच यादीतील ४ हजार १० शेतक-यांची माहिती संबधित संस्थेमार्फत तयार करुन तालुकास्तरीय समिती व शासकीय लेखापरिक्षक यांचेकडून तपासणी करुन बँकामार्फत पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून या यादीवर कार्यवाही करण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील एकूण २३ हजार ३२४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार असून शासनाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व माझे प्रयत्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली असून युती शासनाचे आभार मानतो असेही त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.     
चौकट:- मंत्रीगटाच्या बैठकीत उध्दवजी ठाकरे आणि माझी आग्रही भूमिका.
राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची योजना मंत्रीगटाने मंत्रीगटाच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचेकडे आणली त्यावेळी उध्दवजी ठाकरे यांनी मला या मंत्रीगटाच्या बैठकीकरीता पाचारण केले होते तेव्हा कर्जमाफीचे पात्रतेचे निकष्‍ ठरविताना नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांना २५ टक्के व्याजसवलत किंवा रु २५ हजार पर्यंत अनुदान दयावे असा आग्रह मी धरला होता तर उध्दवजी ठाकरे यांनी कर्जमाफीची मर्यादा १ लाख रुपयांवरुन दीड लाख रुपयांवर नेण्याचा शासनाने प्रयत्न करावा असे सांगितले होते त्यानुसारच कर्जमाफीमध्ये रु २५ हजार पर्यंत अनुदान व कर्जमाफीची मर्यादा दीड लाख करण्यात आली आहे.


Friday, 13 April 2018

पाणी टंचाईच्या बाबतीत अधिका-यांनी अजिबात हयगय करु नये. आमदार शंभूराज देसाई यांच्या अधिका-यांना सुचना.

पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील वाडयांना टंचाई काळात टँकरने पाणी पुरविण्याची संख्या आता पाच ते सहा एवढीच राहिली आहे परंतू डोंगरपठारावरील गावामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर विंधन विहीरी काढून देण्याची मोठया प्रमाणात मागणी आहे.सुमारे ३२ गांवे व वाडयावस्त्यांमध्ये ४१ विधंन विहीरीची आवश्यकता असून याचा मार्चअखेर करण्यात आलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला असून यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करणेसंदर्भात दि.६ एप्रिल रोजीच जिल्हाधिकारी,सातारा यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा केली आहे त्यानुसार प्रत्यक्ष स्थळपहाणी करणेकरीताचे पथकही देण्यात आले आहे.अजुनही काही ठिकाणी विंधन विहीरीं तसेच नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीची आवश्यकता असेल तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने माहे एप्रिल,मे महिन्यामध्ये टंचाई काळातील उपाययोजना करणेकरीताचा पुरवणी आराखडा सादर करुन तो जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावा पाणी टंचाईमुक्तीकरीता लागणारा निधी आणण्यास मी कुठेही कमी पडणार नाही परंतू पाणी टंचाईच्या बाबतीत संबंधित अधिका-यांनी अजिबात हयगय करु नये अशा सूचना आमदार शंभूराज देसाई यांनी अधिका-यांना केल्या.
       आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती पाटणच्या सभागृहात माहे एप्रिल, मे महिन्यामध्ये जाणवणा-या पाणी टंचाई काळातील उपाययोजना करणेकरीता व पाणी टंचाई मुक्तीकरीता लागणारा निधी आणण्याकरीता प्रस्ताव तयार करुन सादर करण्याची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी तहसिलदार रामहरी भोसले, पंचायत समिती गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आर.व्ही.पाटील व त्यांचे सर्व शाखा अभियंता, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,आशिष आचरे,सौ.सुग्रा खोंदू,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,संतोष गिरी,सौ.निर्मला देसाई,सौ. सीमा मोरे,सौ.सुभग्रा शिरवाडकर, माजी सदस्य बशीर खोंदू, बबनराव भिसे,यांच्यासह पाणी टंचाई जाणवणारे गावातील ग्रामस्थ,सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक,ग्रामविसतार अधिकारी,तलाठी मंडल अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, माहे डिसेंबर पासून माहे एप्रिल, मे महिन्यापर्यंत तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागात डोंगरपठारावर पाणी टंचाई जाणवणा-या गांवाना व वाडयावस्त्यांना पाणी टंचाई जाणवू नये याकरीता आराखडा तयार करुन तो सादर करण्यात आला आहे यामध्ये पाच ते सहा गांवानाच एप्रिल, मे महिन्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.सध्या एक दोन गांवाना टँकरने पाणी देण्यात येत आहे.तसेच ज्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्त्या करावयाच्या आहेत त्याचाही आराखडा सादर करण्यात आला आहे.तसेच विंधन विहीरींची मोठया प्रमाणात मागणी टंचाई जाणवू म्हणून अनेक गांवानी आणि वाडयावस्त्यांनी केली आहे त्यानुसार एकूण ३२ गांवे व वाडयावस्त्यांना ४१ ठिकाणी विंधन विहीरी देण्याची मागणी आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची दि.०६ एप्रिल रोजीच भेट घेतली आहे त्यांनी तात्काळ अशा ठिकाणांची स्थळपहाणी करुन याठिकाणी विंधन विहीरी देणेबाबतचे आदेश संबधित यंत्रणांना दिले आहेत याचा पाठपुरावा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी करावा पाणी टंचाईमुक्तीकरीता लागणारा निधी आणण्यास मी कुठेही कमी पडणार नाही असे सांगून ते म्हणाले, माहे एप्रिल आणि मे ते जुन पर्यंत टंचाई जाणवणा-या अजुनही काही गांवाची आणि वाडयावस्त्यांची मागणी असेल तर या गावांचे पाणी टंचाईचे प्रस्ताव तात्काळ मागवून घेवून याचाही पुरवणी आराखडा तयार करावा यामध्ये ज्याठिकाणी विहिरींचे उद्भव बळकटीकरण करणे, विहिरीमध्ये पाण्याची वाढ होण्याकरीता आडवी बोअर मारणे याची आवश्यकता असेल तर याचाही समावेश या पुरवणी आराखडयात करावा अशा सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. त्यानुसार बैठकीस उपस्थित असणारे ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पुरवणी आराखडा तयार करणेसंदर्भातील कामे सुचीत केली त्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करणेसंदर्भात आमदार देसाई यांनी आदेश दिले. उपस्थितांचे स्वागत तहसिलदार रामहरी भोसले यांनी केले,आभार गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी मानले.
चौकट:- निमंत्रण देवूनही राष्ट्रवादीचे जि.प.व पं.स सदस्य बैठकीस गैरहजर, पाणीटंचाईतही राजकारण.

तालुक्यातील पाणी टंचाईसंदर्भात तालुक्यातील ग्रामस्थांबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच सदस्यांना या बैठकीकरीता निमंत्रित करावे अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना केल्या होत्या.या बैठकीस निमंत्रण देवूनही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती व राष्ट्रवादीचे जि.प.आणि प.स.सदस्य हे गैरहजर असल्याने पाणी टंचाईमध्येही याठिकाणी राजकारण पहावयास मिळाले.



लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्त दि.२० एप्रिलपासून दौलतनगरला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास सुरुवात दि. १९ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते यांचे चित्ररथ व गौरवयात्रेचे नियोजन.


महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर, ता. पाटण या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरील दौलत औदयोगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात मागील आठ वर्षाप्रमाणे यंदाही नवव्या वर्षी भव्य अशा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण्‍ सोहळयाची सुरुवात शुक्रवार दि.२० एप्रिल, २०१८ पासून होणार असून दि. २३ एप्रिल पर्यंत हे तीन दिवसीय पारायण याठिकाणी होणार आहे.तत्पुर्वी गुरुवार दि. १९ एप्रिल, २०१८ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने मागील तीन वर्षापासून सुरु करण्यात आलेले लोकनेतेसाहेब यांचे जीवनचरीत्राची माहिती देणारे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पारायण सोहळयाच्या अगोदरच्या दिवशी पाटण तालुक्यात काढण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकाव्दारे दिली आहे.
सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येत असून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही दि. २३ एप्रिल, २०१८ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ३५ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि. २० ते २४ एप्रिल, २०१८ पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना गुरुवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई संहकारी उदयोग समुहात कार्यान्वित असणा-या विविध संस्थांचे वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले असून या चित्ररथाचे व गौरव यात्रेचा प्रारंभ हा गुरुवार दि.१९ एप्रिल रोजी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून हा चित्ररथ व गौरवयात्रा चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेलीफाटा, सोनाईचीवाडी, नावडी, निसरेफाटा, मल्हारपेठ, नवारस्ता, आडूळपेठ, आडूळ गावठाण, येरफळे, पाटण, नेरळे, मोरगिरी, नाटोशी,  सोनवडे मार्गे पुन्हा कारखाना कार्यस्थळापर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. व शुक्रवार दि. २० एप्रिल रोजी पारायण् सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन हभप जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते व उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्व्लन करुन करण्यात येणार आहे.या पारायण सोहळयात शुक्रवार दि. २० एप्रिल २०१८ रोजी हभप बाजीराव मामा कराडकर, मठाधिपती, कराडकर मठ यांचे प्रवचन तर हभप मच्छिंद्र महाराज निकम, विनोदाचार्य नेवासा यांचे किर्तन, शनिवार दि. २१ एप्रिल, २०१८ रोजी हभप दशरथ महाराज जाधव, तडवळे, कोरेगाव यांचे प्रवचन तर हभप पारस महाराज मुथा, रामायणाचार्य,अहमदनगर यांचे किर्तन आणि रविवार दि. २२ एप्रिल, २०१८ रोजी हभप भिकाजी महाराज शिंदे,कोल्हापूर यांचे प्रवचन तर हभप पांडूरंग महाराज घुले, अध्यक्ष,गाथा मंदिर श्रीक्षेत्र देहु यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त सोमवार दि. २३ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वा.आमदार श्री. शंभूराज देसाईसाहेब व सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत हभप तुकाराम हजारे महाराज अथणी बेळगाव यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे प्रमुख तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे नववे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झाले आहे.लोकनेते यांचे जीवनकार्यावरील विविध कार्याच्या संदर्भात तयार करण्यात येणा-या चित्ररथ व गौरव यात्रेचे तालुक्यातील जनतेतून मोठया प्रमाणांत कौतुक व स्वागत करण्यात येत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारायण सोळयाचा व चित्ररथ व गौरवयात्रेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.