Saturday 14 April 2018

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाटण तहसिल कार्यालयात विनम्र अभिवादन. आमदार शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.


     भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२७ व्या जयंतीनिमित्त पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण येथील तहसिल कार्यालयात त्यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन विन्रम अभिवादन करण्यात आले.
     यावेळी पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले,नायब तहसिलदार विजय माने,निवासी नायब तहसिलदार राजेंद्र जाधव,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आर.व्ही.पाटील,पंचायत समिती शिक्षणाधिकारी आर.पी.निकम हे शासकीय अधिकारी तर पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर,नगरसेविका सौ.मनिषा जंगम,बबनराव माळी,नानासाहेब पवार, शंकर कुंभार, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे तसेच पाटण इंदिरानगर येथील बौध्द समाजातील कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
    फक्त वही-पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण ही शिकवण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी शिकवण दिली आहे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी होत असून महामानव असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे १२७ व्या जयंतीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विन्रम अभिवादन करतो असे आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment