माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकर (बच्चु दादा)
मला वाटले आपण राष्ट्रवादी पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सानिध्यात आणि पिताश्रींच्या
मार्गदर्शनाखाली प्रगल्ब झाला असाल पण बच्चुदादा अजुनपण बालिशपणेच बोलतात हे मला माहित
नव्हते.दोनवेळा कारखाना,एकदा आमदारकी लढविलेला हा युवा नेता अजुनही बालिशच असून यांचा
हा बालिशपणा कधी जाणार.अहो निष्क्रीय माजी सभापती,अडीच वर्षे वडीलकृपेने सभापतीपद मिळाले
म्हणजे जादा ज्ञान मिळाले असे समजू नका,विषय तुमच्या नेत्यांना दिलेल्या प्रतिउत्तराचा
होता,तुमच्या नाकाला मिरची का झोंबली,बरोबर सत्यजिंतसिंह पाटणकर तुम्हीच तेवढे पक्षनिष्ठ
आहात ना? अजितदादा अन् माझेमधे बोलण्याची राजकीय प्रगल्बता अजुन तुम्हाला यायची आहे.
असा प्रतिहल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरावर केला असून पक्षनिष्ठा,विकास
कामे, ऊसाचा दर आणि तालुक्याची वाट कुणी लावली याची उत्तरे ऐकण्याची हौस आणि हिम्मत
तुमच्यात असेल तर समोरासमोर या. तारीख तुमची, वेळ तुमची, ठिकाण तुमचे मग बघू असे जाहिर
आव्हानही त्यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिले आहे.
माजी आमदार निष्क्रीय सुपुत्र सत्यजितसिहं पाटणकर
तुमचे कर्तृत्वच ते काय ? वडीलांच्याकृपेने एकदा अडीच वर्षासाठी सभापती झालात आणि काय
दिवे लावले. म्हणे निर्मल सभापती, पाटणची अवस्था पहा म्हणजे पाटणची वाट कुणी लावली
हे लक्षात येईल.मी तोंड उघडण्याचे प्रतिउत्तर तुमच्या नेत्यांना दिले आहे मला आव्हान
देण्याएवढे तुम्ही अजून मोठे आणि स्वत:ला महान समजू नका, तुमची राजकीय प्रगल्बता किती
आहे हे तालुक्यातील जनतेने एकदा नव्हे तीनदा दाखवून दिली आहे. दोन वेळा कारखान्याच्या
आणि एकवेळा विधानसभेला तालुक्यातील जनतेनेच तुम्हाला तुमची जागा दाखविली आहे.पक्षनिष्ठेची
भाषा बोलणारे पाटणकर महाशय, राजकारण्याच्या पलीकडे एक मैत्रीचे नाते असते ते तुम्हाला
अजून उमजलेच नाही ज्यांनी तुमच्या वाडवडीलांना हाताला धरून राजकारणात आणले त्यांच्या
पाठीत खंजीर खुपसणारे तुम्ही,तुम्हाला मैत्री काय समजणार?पक्ष वेगवेगळे असले तरी माणुसकी
सोडायची नसते.अजितदादांकडून चुक झाली म्हणून ते आत्मक्लेश करायला आले, आपला मित्र आत्मक्लेश
करतोय म्हणून मी माणुसकीच्या नात्याने तिथे गेलो होतो.त्यांनी मला जवळ घेतले आणि तुम्हाला
लांब बसविले ते तुमच्या निष्क्रीयतेमुळे. एवढी तर समज तुम्हाला असेल असे मला वाटले
होते आता त्यांचे राजकारण करुन स्टेजवरुन दादांना बोलायला लावण्यासारखे त्यांत काहीच
नव्हते. बर असू दे दादा बोलले असले तरी ते आजही माझे मित्रच आहेत.दोन मोठी माणसे बोलताना
लहानांनी त्यात तोंड घालू नये असे म्हणतात, दादाला का भेटलो हे आम्ही दोघे मित्र बघून
घेऊ. बच्चुदादा तुम्ही त्यात मधे लुडबुड करु नका. पक्षनिष्ठा काय असते हे मला शिकवणारे
पाटणकर सारंगबाबा पाटील यांची पदवीधरची निवडणुक आठवते का ? पक्षाने सारंगबाबांना तिकीट
दिले असताना त्यांच्या विरोधात कुणाच्या सांगण्यावरून तुमचे कार्यकर्ते पाटणमध्ये बुथ
थाटून बसले होते ? तेव्हा कुठे गेली होती पक्षनिष्ठा? दुसरे उदाहरण तुमच्याच पक्षाचे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना चुकीच्या पध्दतीने अटक झाली त्यावेळी
कुठे लपून बसला होता.सातारा येथे खा.श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज यांनी सत्कार समारंभ
आयोजित केला होता तेव्हा साता-यात येऊन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणारे पाटणकर मला तुम्ही
पक्षनिष्ठा शिकवताय. दक्षिणेतल्या काकांचे, काका आणि आम्ही पाहून घेऊ ज्या काकांच्या
जीवावर यापुर्वी अनेक वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची
सत्ता तुम्हाला मिळाली आणि मिळवत होता त्यांचे मुलाने बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी
केली तेव्हा काकांचे उपकार समजून तरी त्यांचे मुलाला मतदान करायचे होते.ते का केले
नाही हे आपण पितापुत्र स्पष्ट करु शकाल काय? जिल्हा नियोजनच्या निवडणूकीत रयत आघाडीची
राष्ट्रवादीबरोबर अगोदरच बोलणी सुरु होती. तत्पुर्वी आमची आणि खा.श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज
युती झाली होती. मग काकांच्या मुलांचा काटा काढण्याचा प्रश्नच कुठे येतो?
हि झाली पक्षनिष्ठा आता कारखाना, ज्यांनी देसाई
कारखान्याला सुरुवातीपासून पाण्यात पाहिले त्या पाटणकरांना कारखान्यावर बोलण्याचा नैतिक
अधिकारच नाही.आमचा कारखाना सुरु तरी आहे.अनेकवेळा घोषणा केलेल्या आणि ज्याच्यासाठी
लाखो रुपये गोळा केलेल्या कोयना शुगर का पाटण खांडसरी याचे काय झाले यावर का मूग गिळून
गप्प बसलाय.कोयना शुगरची वीट कधी रचणार ते आधी सांगा मग आमचे कारखान्याचे माप काढा.
कारण कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी आणि कामगारांनी अनेकदा तुम्हाला तुमची जागा दाखविली
आहे.पुन्हा ती आजमावयाची तुमची हौस असेल तर जरुर कारखान्याचे सभासद आणि कामगार तुमची
हौस पुर्ण करतील. मी कुणाचे गोडवे गायचे हे केवळ एक माजी आमदार पुत्र म्हणून ओळख असणा-या
सत्यजितसिंह पाटणकरांनी मला शिकवू नये. बोटींग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरावर
गृह विभागानेच घेतला आहे उलट तो सुरु करणेकरीता मी गृहराज्यमंत्री यांचेबरोबर याची
प्रत्यक्ष पहाणी करुन हा व्यवसाय सुरु करण्याची शिफारस केली हे शासनदरबारी जावून पहा
एकदा. कोयना पर्यटन, कोयना पर्यटन काय केले हो पर्यटनासाठी, दुस-यांच्या उद्योगासाठी
स्वत:च्या जागा बडया धेंडयांना विकायला लावणारे पर्यटनाची आणि प्रकल्पाची भाषा तुम्हाला
शोभत नाही. पवनचक्की प्रकल्प तालुक्यात आणल्याच्या बडाया मारणारे आहो शेतक-यांच्या
जागाही तुम्ही काढून घेतल्या.हे डॉ. भारत पाटणकरांना माहिती नसावे कदाचित, विकासाच्या
मुद्यावर पाटण्कर पुत्र विकासाचे तुम्हाला कळतेच काय? पंचायत समितीतील शेष फंड वगळता
तुम्हाला काय माहिती तर आहे का ? आता निवडणुकीला तालुक्यात फिराल तेव्हा कळेल कुठे
कुठे आणि कसा कसा विकास झालाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचे सरकार असताना जे तुमच्या
वडीलांना जमले नाही तो विकास साध्य करुन दाखविला आहे. सत्यजितसिंह पाटणकर तुम्हाला
एक सल्ला द्यावसा वाटतो, अशी पत्रकबाजी करुन बोलण्यापेक्षा आता निवडणुकीला तुम्हीच
माझेबरोबर लढणार आहात. हे जर तुमचे निश्चित झाले असेल तर निवडणुकीचा धुरळा तर उडेलच
परंतु निवडणुकीआधीच समोरासमोर स्टेज लावा,तारीख,ठिकाण,वेळ तुम्हीच ठरवा,तुमचा प्रश्न
माझे उत्तर, माझा प्रश्न तुमचे उत्तर मग जनतेला कळेल आमदारकीची स्वप्न पाहणारा युवा
नेता किती राजकीय प्रगल्ब आहे ते का अजून बालिशच आहे ते. असा प्रतिहल्ला आमदार शंभूराज
देसाईंनी सत्यजिंतसिंह पाटणकरांवर केला आहे.
मा . महोदय ,2019 ला जनता संधी देणार त्यानंतर आपण आमच्या सत्यजित दादांचे राजकीय प्रगल्बता पाहू शकता जनतेने स्वीकारली आहे ती.
ReplyDelete