निश्चयाचा महामेरु,बहूतजनांशी आधारु । अखंड स्थितीचा
निधारु श्रीमंत योगी ॥ युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती पंरपरेनुसार वैशाख
शुध्द व्दितीयेस साजरी होते.आज पारंपारिक तिथीनुसार साजरी होणारी
शिवजंयती दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्यात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे हस्ते
युगपुरुष छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांचे अर्धाकृती पुतळयास पुष्पहार व पुष्प
अर्पण करुन विन्रम अभिवादन करुन मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मध्ययुगीन
भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर युगपुरुष
होऊन गेले. राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी
महाराज यांनी अभूतपुर्व विक्रम प्रस्थावित केले आहे त्यांच्या दुरदृष्टीचे प्रतिबिंब
त्यांच्या कल्याणकारी प्रशासनात उमटले आहेत.युगपुरुष छत्रपती
शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जे आदर्श
घालून दिले आहेत त्या आदर्शानुसार आपण सर्वांनी वाटचाल करुन शिवजयंती साजरी करण्यात
यावी. ६ जुन १६७४ रोजी रायगडावर साजरा करण्यात आलेला छत्रपती
शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे स्वातंत्रयांची मंगल पहाट होती. मातब्बर शत्रुंशी लढून स्वराज्याची स्थापना केल्यानंतर साजरा करण्यात आलेला
राज्याभिषेक हा अपूर्व व अलौकीक सोहळा होता. स्वराज्याचे सुराज्यात
आणि सुराज्याचे रामराज्यात रुपातंर करण्यासाठी शिवचरित्र हे एखादया सोन्याच्या खाणीप्रमाणे
समाजाला नवी दिशा दाखविणारे आहे. याचे अवलोकन नव्या पिढीने जरुर
करावे असे आवाहन करुन आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष
छत्रपती शिवाजी महाराज यांना पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने त्यांचे
जयंतीनिमित्ताने विन्रम अभिवादन करीत असल्याचे शेवठी बोलताना स्पष्ट केले. यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन
राजाराम पाटील, संचालक आनंदराव पाटील,कारखान्याचे
अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच शिवभक्त यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment