पाटण तालुक्याचे दैवत,महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब
देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात गुरुवारी मोठया उत्साहात
पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुहाचे प्रमुख व तालुक्याचे आमदार
शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून गत तीन वर्षापासून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब
देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेचे हे चौथे वर्ष असून चित्ररथ व गौरव यात्रेला तालुक्यातील
हजारों जनतेने उदंड असा प्रतिसाद दिला.मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या
जनतेने रथामधील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादुकांचे दर्शन घेवून त्यांच्या पवित्र
स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सकाळी ०९.३० वाजता सुरु झालेली ही चित्ररथ व गौरवयात्रा
सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत संपुर्ण तालुकाभर सुरु होती.आमदार शंभूराज देसाई या गौरवयात्रेला
स्वत: हजर असल्याने हा भव्य सोहळा अत्यंत शांततेत पार पडला.
लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी पाटण तालुक्यातील
दौलतनगर येथे आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पारायण सोहळा आयोजित
केला जातो.यावर्षीही २३ एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथी
सोहळयानिमित्त शुक्रवार दि.२० पासून २३ एप्रिल पर्यंत कारखाना कार्यस्थळावर पारायण
सोहळा संपन्न होत आहे. गत तीन वर्षापासून आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून
पारायण सोहळयाच्या आदल्या दिवशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता
केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देणेकरीता त्यांच्या कार्याचा चित्ररथ याची गौरवयात्रा
व गौरवयात्रेच्या पुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा साजरा करण्यात
येत असून तालुक्यातील तब्बल ३३ गावांतून हे चित्ररथ व गौरवयात्रा मार्गक्रमण करते.
यावेळी या गावांच्या आसपासची गावे व वाडयावस्त्यांतील लोकनेतेप्रेमी जनता मोठया संख्येने
उपस्थित असते. गुरुवारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती
पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते
या सोहळयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्याचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,
तहसिलदार रामहरी भोसले हे शासनाच्या वतीने अभिवादन करणेकरीता दौलतनगर येथे उपस्थित
होते.
लोकनेते
बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी,
फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते. तालुक्यातील
दौलतनगर कारखाना, गव्हाणवाडी,चोपदारवाडी,सुर्यवंशीवाडी,पापर्डे,मारुलहवेली फाटा,गारवडे,
बहुले फाटा,सोनाईचीवाडी,वेताळवाडी,निसरे,निसरे फाटा, आबदारवाडी,मल्हारपेठच्या सर्व
वाडया,नारळवाडी,येराडवाडी,नाडे नवारस्ता,आडूळ गावठाण,आडूळपेठ,लुगडेवाडी फाटा,येरफळे,
म्हावशी,पाटण,नेरळे,माणगाव,पेठशिवापूर,कुसरुंड,शिंदेवाडी,सुळेवाडी मार्गे पुन्हा दौलतनगर
असा या पालखी सोहळयाचा मार्ग होता.एकूण ३३ गावातून मार्गक्रमण करणा-या सोहळयाचे मोठया
उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी सोहळयाचे महिला वर्गाकडून
पूजन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले. या सोहळयाच्या मार्गक्रमणावर भगवे
झेंडे लावण्याबरोबर प्रत्येक गावामध्ये रांगोळीही काढण्यात आल्या होत्या.लोकनेते बाळासाहेब
देसाई यांना विनम्र अभिवादन करणारे बॅनर पालखी सोहळयाच्या मार्गावर लक्ष वेधून घेत
होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखाना,कोयना परिसर कामगार संघटना,शिवदौलत सहकारी बँक, स्व. शिवाजीराव
देसाई पॉलिटेक्निक कॉलेज,श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर अँड सिनिअर कॉलेज,दौलत औद्योगिक
प्रशिक्षण संस्था व मोरणा शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयांनी तसेच जिल्हा परिषद
व पंचायत समिती सदस्य यांनी लोकनेते यांच्या जीवनावरील विविध विषयांना स्पर्श करणारे
आकर्षक चित्ररथ साकारले होते. सुमारे १४ आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले
होते.तर हजारो कार्यकर्ते लोकनेत्यांच्या नावाने जयजयकार करत सोहळयात सामील झाले होते.यामुळे
पालखी सोहळयातील संपुर्ण वातावरण लोकनेतेमय झाले होते. स्वत: आमदार देसाई नेतृत्व करीत
असलेली ही अनोखी मिरवणूक तब्बल सात तास भर उन्हात अत्यंत उत्साहात संपन्न झाली.संपुर्ण
मिरवणूकीमध्ये तालुका पोलिस प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात
आला होता. सहभागी चित्ररथामध्ये लोकनेत्यांनी साकारलेल्या वास्तू सर्वांचे लक्ष वेधून
घेत होत्या.याचवेळी आमदार देसाई यांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येत होते.या
अनोख्या सोहळयात प्रत्येक ठिकाणी उत्साही संस्था कार्यकर्त्यांकडून मिरवणूकीत सहभागी
झालेल्यांना सरबत,पोहे,चहा,केळी अशा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.एकंदरीत दौलतनगर
या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने होणा-या पारायण सोहळयाच्या
आदल्यादिवशीच लोकनेते यांच्या या चित्ररथ गौरवयात्रेमुळे संपुर्ण पाटण तालुका ख-या
अर्थाने लोकनेतेमय झाला. हे वातावरण या ठिकाणी २३ एप्रिलपर्यंत पहावयास मिळणार आहे.गौरवयात्रेत
सहभागी झालेल्या सर्वांचे आमदार शंभूराज देसाई यांनी आभार मानले. यावेळी मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.यशराज देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,
कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, व सर्व संचालक मंडळ,शिवदौलत
सहकारी बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांची
प्रमुख उपस्थिती होती.
चौकट :- लोकनेत्यांना
अभिवादन करण्याकरीता प्रत्येक कार्यालयासमोर शासकीय यंत्रणा सज्ज.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची चित्ररथ व गौरवयात्रा हि कराड पाटण
या प्रमुख राज्य मार्गावरुन जात असताना मल्हारपेठ पासून पाटण शहरामध्ये असणा-या सर्व
शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी हे कर्मचा-यांसह लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब
यांचे पादुकांना अभिवादन करण्याकरीता प्रत्येक कार्यालयासमोर सज्ज होती. पाटण पंचायत
समितीच्या वतीने पंचायत समितीच्या प्रांगणात लोकनेते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन विनम्र अभिवादन केले.
चौकट :- पालखी
सोहळा मार्गावर मल्हारपेठ येथे भजनाचा कार्यक्रम.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची चित्ररथ व गौरवयात्रा ज्या मार्गावरुन
मार्गक्रमण करणार होती त्या मार्गावर मंडप घालून मल्हारपेठ येथेील ग्रामस्थांनी भजनाच्या
कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या भजन सोहळयात आमदार शंभूराज देसाई हे स्वत: उपस्थित
राहून त्यांनी एकतारी भजनामध्ये सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment