Friday, 12 October 2018

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ४ रस्त्यांच्या कामांना ८ कोटी ०१ लक्ष रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.



     राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संशोधन व विकास अंतर्गत सन २०१७-१८ करीता सुचविण्यात आलेल्या चार रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१० ऑक्टोंबर,२०१८ रोजी पारित केला असून चार रस्त्यांच्या कामांकरीता ८ कोटी ०१ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत संशोधन व विकास अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी चार कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे गतवर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते. या कामांना राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या चार रस्त्यांच्या कामांकरीता ८ कोटी ०१ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजुर दिला आहे. यामध्ये महाबळवाडी ते सडादाढोली रस्ता करणे २.५०० किमी १ कोटी ५४ लाख ३२ हजार,जळवखिंड ते जांभेकरवाडी रस्ता करणे १.२५० किमी ८८ लाख ६० हजार,शिरळ ते मिरासवाडी रस्ता करणे १.२५० किमी ७६ लाख ६४ हजार व गणेवाडी ठोमसे पोहोच रस्ता करणेकरीता ५.५६० किमी ४ कोटी ४१ लाख १६ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे तर या चारही कामांची पाच वर्षाकरीता नियमीत देखभाल दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे सडादाढोली रस्ता ९ लाख ४१ हजार, जांभेकरवाडी रस्ता ०४ लाख ९३ हजार,मिरासवाडी रस्ता ४ लाख ३७ हजार व गणेवाडी ठोमसे रस्ता २१ लाख ८२ हजार रुपयांची तरतूदही शासनाने केली असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१० ऑक्टोंबर,२०१८ रोजी पारित केला आहे या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या चार गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Thursday, 11 October 2018

तालुक्यातील युवकांच्या गराडयात युवा नेते यशराज देसाईंचा वाढदिवस उत्साहात साजरा. युवकांच्या आग्रहास्तव दौलतनगरला झालेल्या वाढदिवसामुळे युवकांच्या उत्साहात वाढ.


        पाटण तालुक्यातील युवकांच्या आग्रहास्तव दि.१०ऑक्टोंबर रोजी पाटणचे युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस दौलतनगर ता.पाटण याठिकाणी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.युवकांच्या गराडयात आणि मांदियाळीत सुमारे तीन ते चार तास वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारणारे युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचा यंदाच्या वर्षी युवकांच्या आग्रहास्तव दौलतनगरला आयोजीत केलेल्या वाढदिवसामुळे पाटण तालुक्यातील युवकांच्या उत्साहामध्ये वाढ झाली असून यशराज देसाईंचा वाढदिवस पाटण तालुक्यातील युवक वर्गाने उत्सवाप्रमाणे तालुक्यात साजरा केला.
       पाटणचे लोकप्रिय आमदार उत्कृष्ट संसदपटु यांचे चिरंजीव आणि अल्पावधीतच पाटण तालुक्यातील युवकांच्या गळयातील ताईत बनलेले यशराज देसाई यांचेकडे पाटण तालुक्यातील युवकवर्ग हा पाटणचे युवा नेतृत्व म्हणून पाहू लागला आहे.तालुक्यातील युवक वर्गात यशराज देसाई यांची मोठी के्रझ असून तालुक्यातील विविध निवडणूकीच्या प्रचाराच्या माध्यमातून तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून यशराज देसाई यांनी आपल्या अभ्यासू वकृत्वशैलीमुळे युवकांच्या मनामध्ये युवा नेतृत्वाचे स्थान पटकावले आहे.यंदाच्या वर्षी यशराज यांचा वाढदिवस हा दौलतनगर ता.पाटण याठिकाणी साजरा करावयाचा असा आग्रह पाटण तालुक्यातील युवा वर्गाने केला त्याप्रमाणे हा वाढदिवस कारखाना कार्यस्थळावर मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
       सुरवातीस तालुक्याचे मुख्यव्दार असणा-या चाफळ फाटा याठिकाणी चाफळ विभागाच्या वतीने यशराज देसाईंचे जंगी स्वागत तालुक्यात करण्यात आले.त्यानंतर त्यांनी मरळी गावची ग्रामदैवत श्री निनाई देवीचे दर्शन घेवून    कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब),स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळा,लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करुन कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. कारखाना कार्यस्थळावर वाढदिवसानिमित्त त्यांचे हस्ते शालेय मुलांना खाऊवाटप,शालेय साहित्यांचे वाटप  करण्यात आले.युवा कार्यकर्त्यांनी व शंभूराज युवा संघटना पाटण तालुका यांच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार शुभेच्छा देणा-या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हार,तुरे,गुच्छ न आणता मोठया प्रमाणात शालेय साहित्य,वहया यशराज देसाईंना शुभेच्छांच्या रुपाने भेट दिल्या.पाटण तालुक्यातील प्रत्येक विभागातील युवक तसेच आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वा खालील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी यशराज देसाईंची दुपारी ०४ वाजेपर्यंत कारखाना कार्यस्थळावर भेट घेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुपारी ०४ नंतर सातारा येथील निवासस्थानी त्यांनी श्रीमती विजयादेवी देसाई मासाहेब,आई सौ.स्मितादेवी देसाई, काकी सौ.अस्मितादेवी देसाई यांचे आर्शिवाद घेतले. भगिनी ईश्वरी देसाई, बंधू जयराज देसाई व आदित्यराज देसाई यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या.
      सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दुरध्वनीवरुन यशराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.दौलतनगरला प्रारंभी वडील आमदार शंभूराज देसाई,चुलते मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे यशराज यांनी आर्शिवाद घेतले.कारखाना कार्यस्थळावर प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,नायब तहसिलदार राजेंद्र तांबे,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,माजी उपसभापती डी आर पाटील,कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक अशोक डिगे,बबनराव भिसे,गजानन जाधव,आंनदराव चव्हाण,शशिकांत निकम,सोमनाथ खामकर विकास गिरी गोसावी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,सुग्रा खोंदू, प्रदिप पाटील तांबवे,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,सौ.सुभद्रा शिरवाडकर,सौ.सिमा मोरे,बशीर खोंदू,नथुराम कुंभार,माजी संचालक टि डी जाधव,बबनराव शिंदे,अशोकराव पाटील रासाटी, बबनराव माळी,सदानंद साळुंखे,शंभूराज युवा संघटनेतील भरत साळुंखे,अभिजित पाटील,नाना साबळे,अंकुश महाडिक, मनोज मोहीते,माणिक पवार,एकनाथ जाधव,गौरव परदेशी,संजय पवार,सचिन जाधव,रणजित पाटील,तुषार चव्हाण, उत्तम मोळावडे,शंकर पवार,किसन गालवे,गणेश भिसे,बाबा मोकाशी,सुनील शेडगे,मुजम्मील खोंदु,विष्णु पवार,दादा जाधव,अभय आफळे,शंकर देसाई,डॉ.विजय संकपाळ,मनोज पाटील,जोतिराज काळे,सुरेश कदम,सचिन पाटील बेलदरे, सुरेश जाधव,राजाराम मोहिते,शंकर साळुंखे नथुराम सावंत,जयवंत पवार,धनंजय केंडे,दिलिपराव जानुगडे,प्रकाश तवटे, दिलीप सपकाळ,अशोक पाटील तळीये,अमोल पाटील,विजय शिंदे,रमेश गालवे,दिनकर कोळेकर,तुषार देशमुख,प्रसाद देवळेकर,विनायक भोमकर,संदिप,राजेश चव्हाण,गोविंद गोटुगडे,बाळासाहेब सुर्यवंशी,महेश पाटील,दिलीप भिलारे,रणजित शिंदे, विकास देशमुख,सुनील देसाई, संजय जाधव,नेताजी मोरे,विश्वास निकम,शंकर माने,नवनाथ पाळेकर या प्रमुख युवा कार्यकर्त्यांसह तालुक्याच्या प्रत्येक विभागातील शंभूराज युवा संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यशराज देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Tuesday, 9 October 2018

पवनचक्की वाहतूकीमुळे खराब झालेल्या ८ रस्त्यांच्या कामांना १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर. प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय दि.०८ ऑक्टोंबर रोजी पारित. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.­­


­­
     पाटण तालुक्यात पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मिळणेकरीता राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. पाटण तालुक्यात पवनचक्कीच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या एकूण ८ रस्त्यांची कामे ऊर्जामंत्री यांचेकडे प्रस्तावित केली होती या ८ रस्त्यांच्या कामांना १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आवश्यक होता आवश्यक असणारा तो निधी राज्याचे ऊर्जामंत्री यांनी मंजुर केला असून या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि.०८ ऑक्टोंबर, २०१८ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. 
      आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगावर मोठया प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला आहे.या पवनऊर्जा प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतुकीमुळे तालुक्यातील डोंगरपठारावर जाणा-या ग्रामीण रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली होती. या दुरावस्था व वाहतूकीच्यादृष्टीने अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर होणेकरीता राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे पाटण तालुक्यातील ८ ग्रामीण रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती. या रस्त्यांना आवश्यक असणारा निधी मंजुर होणेकरीता सन २०१७ च्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तारांकीत प्रश्न तसेच लक्षवेदी सुचनाही मांडली आहे.लक्षवेदी सुचनेला उत्तर देताना यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीनुसार पवनऊर्जा प्रकल्पाच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या ०८ रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल असे उत्तर दिले होते. त्यानुसार राज्याचे ऊर्जामंत्री यांनी पाटण तालुक्यात पवनऊर्जा प्रकल्पांच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या गावडेवाडी ते खुडुपलेवाडी रस्ता ग्रामा ६४ ची दुरुस्ती करणे ३.०० किमी करीता १ कोटी ८ लाख ७८ हजार, घोट ते जन्नेवाडी ग्रामा ३९ ची दुरुस्ती करणे ७.०० किमीकरीता १ कोटी ३६ लाख,९४ हजार,ढेबेवाडी उमरकांचन जिंती रस्ता इजिमा १३८ भाग जिंती मोडकवाडी ते सातर १०.०० किमीकरीता ३ कोटी ८९ लाख ४२ हजार,डावरी ते चोपडेवाडी ते भालेकरवाडी रस्ता दुरुस्ती करणे १.७०० किमीकरीता ८८ लाख १३ हजार,सातेवाडी नाटोशी ते जाधववाडी नाटोशी रस्ता दुरुस्ती करणे ४.००किमीकरीता १ कोटी २३ लाख, करपेवाडी ते टेटमेवाडी रस्ता ग्रामा ३६५ ची दुरुस्ती करणे ५.७०० किमीकरीता २ कोटी ४८ लाख ४० हजार,लोटलेवाडी काळगाव ते डाकेवाडी ते कसणी रस्ता दुरुस्ती करणे ७.०० किमीकरीता ३ कोटी ७४ लाख ११ हजार, व तळमावले कुंभारगांव मान्याचीवाडी मोरेवाडी माटेकरवाडी ते वरपेवाडी रस्ता दुरुस्ती करणे ५.०० किमीकरीता १ कोटी ८१ लाख २३ हजार असे एकूण १६ कोटी ४९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी आठ कामांना मंजुर करण्यात आला आहे. या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि.०८ ऑक्टोंबर, २०१८ रोजी पारित करण्यात आला आहे. लवकरच या कामांचा निविदा सार्वजनीक बांधकाम विभाग, सातारा यांच्या मार्फत प्रसिध्द करण्यात येतील व या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल असे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे. दरम्यान पाटण तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील हे मोठया लांबीचे रस्ते आमदार शंभूराज देसाईंनी विशेष प्रयत्न करुन मंजुर करुन आणलेबद्दल या आठ गांवातील जनतेने आमदार शंभूराज देसाईंचे प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त करुन त्यांना धन्यवाद व्यक्त केले आहेत.
चौकट:- कोटींच्या आकडयाकरीता माजी आमदार पुत्रांनी या चार वर्षातील शासन निर्णय काढून पहावेत.
माजी आमदार पुत्र मी जाहीर करीत असलेले कोटींचे आकडे खरे का खोटे आहेत हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती आहेत. तुम्हाला ते दिसत नाहीत आठच रस्त्यांच्या कामांकरीता १६ कोटी ५० लाखांचा निधी मंजुर करुन आणला आहे. माजी आमदारपुत्रांना याची खात्री करावयाची असेल तर त्यांनी दि.०८ ऑक्टोबर,२०१८ रोजीचा उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय काढून पहावा.यासारखे अनेक शासन निर्णय या चार वर्षात शासनाकडून करुन घेतले आहेत.असे अनेक शासन निर्णय त्यांना शासन दफतरी पहावयास मिळतील असेही आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

Monday, 1 October 2018

सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी गावच्या पुरसंरक्षक भिंतीचे प्रस्ताव मान्यतेला सादर करा. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन मंत्री ना.गिरीश महाजनांच्या मंत्रालयीन अधिका-यांना सुचना.



दौलतनगर दि.01: पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणा-या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने या गावांना पुरसंरक्षक भिंती बांधण्यास व कोयना नदीवर घाट बांधणेस जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंची आग्रहाची मागणी होती.त्यांनी यासंदर्भात लक्षवेदी सुचना देखील मांडली होती.त्यानुसार साजूर,तांबवे बौध्दवस्ती,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाना जलसंपदा विभागाने मान्यताही दिली आहे.त्या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या आहेत.उर्वरीत सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे प्रस्ताव मान्यतेकरीता जलसंपदा विभागाकडे सादर झाले आहेत त्या प्रस्तावांना तात्काळ मान्यता देणेकरीता सदरचे तीन प्रस्ताव लगेचच सादर करा अशा सुचना जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या विनंतीवरुन मंत्रालयीन अधिका-यांना दिल्या.
              राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन हे पाटण आणि सातारा दौ-यावर आले असताना पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाना पुरसंरक्षक भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणे या कामांचे प्रस्तावाना जलसंपदा विभागाने मान्यता देणेचे प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे प्रलंबीत असल्याची बाब जलसंपदा मंत्री यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जलसंपदा मंत्री ना.महाजन यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरुन मंत्रालयीन अधिका-यांना पाटण विधानसभा मतदारसंघातील उर्वरीत सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे पुरसंरक्षक भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणे या कामांचे प्रस्ताव तात्काळ मान्यतेकरीता सादर करा अशा सुचना दिल्या. यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंपदा मंत्री यांचे आभार व्यक्त केले.पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या उर्वरित सांगवड गावाच्या पुरसंरक्षक भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणेकरीता 5 कोटी 43 लाख 72 हजार, बनपेठवाडी (येराड) 2 कोटी 3८ लाख 8७ हजार व गुंजाळीकरीता 3 कोटी 46 लाख 85 हजार असे अंदाजपत्रक संबधित यंत्रणेकडून तयार करण्यात आले आहे.या तीन गावांचे प्रस्ताव रक्कम रुपये २ कोटीच्या वरील असल्याने शासनाकडे मंजुरीकरीता प्रलंबीत राहिले आहेत.राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेवून मंत्रालयीन अधिकारी यांना मान्यतेसंदर्भात सुचना केल्याने लवकरच या उर्वरीत तीन गांवाच्या कामांनाही आवश्यक असणारा अंदाजपत्रकानुसारचा निधी मंजुर होवून ही कामे सुरु करता येतील असा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे. 
चौकट:- पुरसरंक्षण भिंतीच्या कामांकरीता १० टक्के लोकवर्गणीचीही अट शिथील करण्यास मान्यता.
             पुरसरंक्षण भिंतीच्या कामांकरीता १० टक्के लोकवर्गणी भरण्याचा शासन निर्णय असून मतदारसंघातील साजूर,तांबवे बौध्दवस्ती,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाना ही लोकवर्गणी भरणे शक्य नसल्याने या सर्व कामांसदर्भातील १० टक्के लोकवर्गणीचीच अट शिथील करावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंपदामंत्री यांचेकडे केल्यानंतर तातडीने जलसंपदा मंत्री ना.महाजन पाटण मतदारसंघातील पुरसंरक्षक भिंतीच्या कामांची १० टक्के लोकवर्गणीची अट शिथील करण्यास मान्यता दिली असून तशाप्रकारच्या सुचनाही त्यांनी भ्रमणध्वनीवरुन मंत्रालयीन जलसंपदा अधिका-यांना दिल्या.

Saturday, 29 September 2018

बरेच वर्षे रखडलेल्या उरुल ल.पा तलावातील खातेदारांना ४.५० कोटी रुपयांची भूसंपादनाची रक्कम मंजुर. आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश.



दौलतनगर दि.२९:- उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत असलेल्या उरुल लघू पाटबंधारे तलावाकरीता भूसंपादन केलेल्या खातेदारांना त्यांच्या भूसंपादनाची रक्कम मंजुर झाली नसल्याने ल.पा तलावाचे काम ब-याच वर्षापासून रखडले आहे.तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी यामध्ये पुढाकार घेवून आपली राजकीय ताकद राज्याचे जलसंधारणमंत्री यांचेकडे वापरुन गतवर्षी जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे गतवर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये बैठक घेतल्याने खातेदारांच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लागला असून आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे उरुल ल.पा तलावातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील खातेदारांना एकूण ४ कोटी ५० लाख ८५ हजार ३०१ रुपयांची भूसंपादनाची रक्कम मंजुर झाली आहे.त्यामुळे लवकरच उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामालाही गती मिळणार आहे.
                                 पाटण तालुक्यातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत उरुल लघू पाटबंधारे तलाव असून या तलावाचे काम हे या तीन गावातील बाधित खातेदारांना भूसंपादनाची रक्कम न दिल्यामुळे अनेक वर्षापासून बंद होते व आजही बंद आहे.या गावातील खातेदारांनी त्यांच्या भूसंपादनाची रक्कम लवकरात लवकर मिळावी याकरीता अनेक वर्षे प्रयत्न केले मात्र सदरची रक्कम मिळू शकली नाही. प्रयत्न करुनही भूसंपादनाची रक्कम मिळत नसल्याने या खातेदारांनी तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. आमदार शंभूराज देसाईंनी येथील खातेदारांना बरोबर घेवून राज्याचे जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे गतवर्षी या कामांसंदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये दि.०८.०८.२०१७ रोजी बैठक घेतली व या बैठकीत उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गावातील खातेदारांच्या भूसंपादनाचा विषय मांडला.यामध्ये उरुलचे एकूण १७.९५ हेक्टर आर क्षेत्र असून ठोमसे ४.५१ हेक्टर आर व बोडकेवाडी १२.२२ हेक्टर आर क्षेत्र आहे.यासंदर्भात अंतिम निवाडा ३०.११.२०१५ रोजी झाला आहे. उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाकरीता अनुक्रमे २ कोटी ९२ लाख १० हजार ६६२ रुपये, ९४ लाख ७५ हजार ६४६ रुपये व ६३ लाख ९८ हजार ९९३ रुपये असे एकूण ४ कोटी ५० लाख ८५ हजार ३०१ रुपये भूसंपादनाची रक्कम होत आहे.ती ४ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे केल्यानंतर मंत्री ना.शिंदे यांनी यास तात्काळ मान्यता देवून जलसंधारण विभागाच्या मंत्रालयीन अधिकारी यांना लवकरात लवकर उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम तात्काळ मंजुर करुन वाटप करावी असे आदेश दिले होते.
                          त्यानुसार उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम ही संपादन मंडळाने दि.१२.०९.२०१८ रोजी भूसंपादन विभाग १६ जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांचेकडे वर्ग केली आहे.बरेच वर्षे रखडलेली भूसंपादनाची रक्कम मंजुर करुन घेतलेबद्दल उरुल,ठोमसे व बोडकेवाडी येथील संपादित क्षेत्रातील बाधित खातेदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.भूसंपादनाच्या रक्कमेचे वाटप झालेनंतर लवकरच उरुल ल.पा.तलावाच्या कामांस सुरुवात करण्याकरीता आपण कटीबध्द असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.उरुल लघू पाटबंधारे तलावाची उंची २०.६० मीटर असून लांबी ६६० मीटर आहे. या तलावामध्ये १९०० स.घ.मी. इतका पाणीसाठा अपेक्षित असून या तलावामुळे सुमारे २४३ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. भूसंपादनाच्या रक्कमेचे वाटप झालेनंतर लवकरच उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामाला गती देण्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी दिली असल्यामुळे या विभागातील शेतक-यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर (कॅम्प) घेवून भूसंपादनाच्या रक्कमेचे वाटप.
             संपादित क्षेत्रातील बाधित खातेदारांची कागदपत्रे, बँक खात्याच्या तपशिलाची पुर्तता करुन ही रक्कम मंजुर करुन आणणेकरीता सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत तलावाच्या ठिकाणी एकत्रित शिबीर (कॅम्प) घेवून भूसंपादनाची रक्कम ही ऑनलाईन खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती भूसंपादन विभाग १६ जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांचेमार्फत देण्यात आली आहे.


पिंपळोशी ग्रामपंचायतीच्या सरपंच व कार्यकर्ते यांचा देसाई गटामध्ये प्रवेश. आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते सरपंच, कार्यकर्त्यांचा सत्कार.



दौलतनगर दि.२९:- राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे नेतृत्व मानणा-या पिंपळोशी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.विमल ज्ञानदेव निकम यांनी राष्ट्रवादी पक्षाला जाहिरपणे रामराम ठोकून पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मान्य करीत देसाई गटामध्ये जाहिर प्रवेश केला आहे. प्रवेश करणा-या सरपंच सौ.विमल ज्ञानदेव निकम व कार्यकर्ते यांचा आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात येवून देसाई गटामध्ये स्वागत करण्यात आले.
                  पिंपळोशी ता.पाटण येथील गावातील स्थानिक राष्ट्रवादी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभाला कंटाळून ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.निकम यांनी तालुक्याचे दमदार आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचा आम्ही कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांसमवेत आम्ही देसाई गटामध्ये प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सरपंच सौ. विमल निकम, ज्ञानदेव निकम, विशाल जगन्नाथ निकम,अस्लम गणी सय्यद यांनी जाहिरपणे आमदार देसाई गटामध्ये प्रवेश केला. पिंपळोशी गावच्या सरपंच व ग्रामस्थ यांचे देसाई गटामध्ये सहर्ष स्वागत असून यापुढे पिंपळोशी गावाच्या विकासासाठी आमदार म्हणून माझे सर्वोत्परी सहकार्य राहील असे आश्वासन आमदार शंभूराज देसाई यांनी पिंपळोशीच्या सरपंच व ग्रामस्थांना दिले.

Friday, 28 September 2018

आमदार शंभूराज देसाईंचा रस्त्यातच जनता दरबार.जिथे आमदारसाहेब भेटतील तिथे केलेल्या विकासकामांचीच चर्चा,अन कामांचीच मागणी.




दौलतनगर दि.२:- महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची पाटण विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार म्हणून ओळख संपुर्ण महाराष्ट्रभर आहे.दांडगा जनसंपर्क,लोकांचा गोतावळा आणि मतदारसंघातील जनतेच्या सुखदु:खात कायम सहभागी असणारे आमदार म्हणून त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.विविध कार्यक्रमाच्या,शासकीय बैठकांच्या,लग्नसोहळयांच्या निमित्ताने अनेकदा रस्त्याने येता-जाताना आमदारसाहेब दिसले की,मतदारसंघातील जनता त्यांना हात करतात आणि वेगवेगळया कैफियत त्यांच्या पुढे मांडतात.ज्या जनतेमुळे आपण निवडून आलो आहे त्यांच्या कैफियत सोडवयाला कार्यालयच पाहिजे असे काही नाही तर रस्त्यावर उभे राहूनही त्यांचे प्रश्न एैकुन घेता येतात आणि ते सोडविताही येतात ही भूमिका आमदार शंभूराज देसाईंची असल्याने जिथे आमदारसाहेब भेटतील मग ते कोणतेही कार्यालय असो वा रस्ता तिथेच त्यांचा जनता दरबार सुरु झाल्याचे अनेकदा पहावयास मिळते आहे.
              २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत १८८२४ इतक्या प्रचंड मतांनी संपुर्ण सातारा जिल्हयात एक नंबरची मते घेवून निवडून आलेले महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आलेनंतर निवडणूकीच्या विजयी सभेत त्यांनी उपस्थित जनसमुदायापुढे नतमस्तक होवून आज आमदार म्हणून मी तुमच्यापुढे उभा आहे तो या मतदारसंघातील जनतेमुळे.या सभेच्या माध्यमातून मी मतदारसंघातील जनतेपुढे नतमस्तक होवून नमन करतो.असे सांगून मतदारसंघातील जनतेची मने त्यांनी जिंकली होती.आमदार म्हणून त्यांनी जिकंलेली मने आजही कायम आहेत. गत चार वर्षात यामध्ये दिवसेदिवसे त्यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांच्यामुळे भरच पडत आहे.सातारा जिल्हयात सर्वाधिक विकासकामे पाटण विधानसभा मतदारसंघात सुरु आहेत याचे दाखले शासकीय दरबारी पहावयास मिळत आहे.मतदारसंघातील प्रलंबीत विविध विकासकामांकरीता शासनाच्या तिजोरीतून हवा असणारा निधी मंजुर करुन आणण्याकरीता आमदार देसाईंचे सातत्याचे प्रयत्न आणि पाठपुरावा मदतीस आहे.अहोरात्र मतदारसंघातील विविध विकासकामांचाच ध्यास मनी बाळगून २४ बाय ७ याप्रमाणे मतदारसंघाचे आमदार म्हणून ते मतदारसंघातील जनतेकरीता उपलब्ध आहेत.माझे कामाच्या रुपाने विकासकामरुपी शिल्पावरील एखादया पायरीवर इतिहासातील हिरोजी इंदलकरांसारखे नाव मतदारसंघातील जनतेने नोदंवावे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे हे त्यांनी जाहीरपणे जनतेपुढे मांडले आहे.जनतेला दिलेला शब्द पाळण्याकरीता कितीही शिकस्त करायला लागली तरी ते तयारी दाखवितात आणि दिलेला शब्द पाळतात हे त्यांचे गुणवैशिष्ट असल्यामुळे जनतेला त्यांना कामे सांगून ती सोडवून घेणेकरीता अधिकच प्रेरणा मिळते.आमदार श्ंभूराज देसाई यांचेपुढे एखादा विषय सोडवून घेणेसाठी मांडला तर तो विषय शितापीने ते सोडविताच हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.गाव तिथे रस्ता,गाव तिथे पिण्याच्या पाण्याची योजना,मोठी पुले,छोटी पुले,शाळा खोल्या,ग्रामपंचायतींची कार्यालये,कोयना नदीकाठच्या गांवाना संरक्षण देणेकरीता पुरसंरक्षक भिंती, धरणांची रखडलेली कांमे तसेच पुनर्वसने,कोयना प्रकल्पग्रस्तांची कामे,जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गांवाना पाणी मिळवून देणे,डोंगरी भागात अनेक ठिकाणी गंजलेले पोल बदलणे,वाढीव पोल मंजुर करणे,गांवा गांवामध्ये वाडीवस्तीवर पथदीप उर्जीकरण करणे,स्मशानभूमिच्या सुधारणा,स्मशानभूमिंना जोडणारे रस्ते,गावे वाडया स्वच्छ राहणेकरीता स्वच्छता अभियान राबवणे,वृक्षलागवड करणेकरीता प्रेरणा देणे यासारखे जनतेच्या मुलभूत गरजा प्राधान्याने पुर्ण करण्याचे उदीष्टच मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांनी ठेवले असून आपल्या उदीष्टाप्रमाणे त्यांचे कामकाज सुरु आहे.या मुलभूत गरजांच्या कामाबरोबर मतदारसंघातील अनेकजण आपली वैयक्तीक कामे घेवूनही आमदार शंभूराज देसाई यांची भेट घेतात आणि आपली कैफियत मांडून ती कैफियत आमदार देसाई यांच्याकडून सोडवून घेतात.आपल्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती त्याचे काम झाले म्हणून समाधानानेच गेला पाहिजे याकरीता ते स्वत: लक्ष घालतात. त्यांच्या निवासस्थानावर तर रोजच जनता दरबार भरलेला असतो परंतू भेटेल तिथे मग ते एखादयाचे लग्नात असो वा, शासकीय कार्यालयात कोणत्याही बैठकीत असो किंवा मतदारसंघात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरत असताना असो प्रश्न घेवून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे एैकुन घेवून त्यावर ते तोडगा काढतात.
चौकट:- असाच एक रस्त्यावरचा जनता दरबार पहावयास मिळाला त्यानिमित्ताने...
       धडामवाडी व लोहारवस्ती केरळ येथील जनता त्यांची झालेली कामे व करावयाची कामे सांगण्याकरीता आमदार शंभूराज देसाईंकडे येत असताना त्यांनी आमदार देसाई यांची नवारस्ता येथे रस्त्यावरच भेट घेतली व झालेली कामे व करावयाच्या कामांचा पाढा वाचत करावयाच्या कामांचा शब्द त्यांचेकडून घेतला आणि केलेल्या कामांबाबत त्यांचा सत्कारही केला.आमदार शंभूराज देसाईंचे असे जनता दरबार नित्याने पाटण मतदारसंघात पहावयास मिळतात.