Tuesday 9 October 2018

पवनचक्की वाहतूकीमुळे खराब झालेल्या ८ रस्त्यांच्या कामांना १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर. प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय दि.०८ ऑक्टोंबर रोजी पारित. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.­­


­­
     पाटण तालुक्यात पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मिळणेकरीता राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. पाटण तालुक्यात पवनचक्कीच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या एकूण ८ रस्त्यांची कामे ऊर्जामंत्री यांचेकडे प्रस्तावित केली होती या ८ रस्त्यांच्या कामांना १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आवश्यक होता आवश्यक असणारा तो निधी राज्याचे ऊर्जामंत्री यांनी मंजुर केला असून या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि.०८ ऑक्टोंबर, २०१८ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. 
      आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगावर मोठया प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला आहे.या पवनऊर्जा प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतुकीमुळे तालुक्यातील डोंगरपठारावर जाणा-या ग्रामीण रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली होती. या दुरावस्था व वाहतूकीच्यादृष्टीने अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर होणेकरीता राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे पाटण तालुक्यातील ८ ग्रामीण रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती. या रस्त्यांना आवश्यक असणारा निधी मंजुर होणेकरीता सन २०१७ च्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तारांकीत प्रश्न तसेच लक्षवेदी सुचनाही मांडली आहे.लक्षवेदी सुचनेला उत्तर देताना यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीनुसार पवनऊर्जा प्रकल्पाच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या ०८ रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल असे उत्तर दिले होते. त्यानुसार राज्याचे ऊर्जामंत्री यांनी पाटण तालुक्यात पवनऊर्जा प्रकल्पांच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या गावडेवाडी ते खुडुपलेवाडी रस्ता ग्रामा ६४ ची दुरुस्ती करणे ३.०० किमी करीता १ कोटी ८ लाख ७८ हजार, घोट ते जन्नेवाडी ग्रामा ३९ ची दुरुस्ती करणे ७.०० किमीकरीता १ कोटी ३६ लाख,९४ हजार,ढेबेवाडी उमरकांचन जिंती रस्ता इजिमा १३८ भाग जिंती मोडकवाडी ते सातर १०.०० किमीकरीता ३ कोटी ८९ लाख ४२ हजार,डावरी ते चोपडेवाडी ते भालेकरवाडी रस्ता दुरुस्ती करणे १.७०० किमीकरीता ८८ लाख १३ हजार,सातेवाडी नाटोशी ते जाधववाडी नाटोशी रस्ता दुरुस्ती करणे ४.००किमीकरीता १ कोटी २३ लाख, करपेवाडी ते टेटमेवाडी रस्ता ग्रामा ३६५ ची दुरुस्ती करणे ५.७०० किमीकरीता २ कोटी ४८ लाख ४० हजार,लोटलेवाडी काळगाव ते डाकेवाडी ते कसणी रस्ता दुरुस्ती करणे ७.०० किमीकरीता ३ कोटी ७४ लाख ११ हजार, व तळमावले कुंभारगांव मान्याचीवाडी मोरेवाडी माटेकरवाडी ते वरपेवाडी रस्ता दुरुस्ती करणे ५.०० किमीकरीता १ कोटी ८१ लाख २३ हजार असे एकूण १६ कोटी ४९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी आठ कामांना मंजुर करण्यात आला आहे. या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि.०८ ऑक्टोंबर, २०१८ रोजी पारित करण्यात आला आहे. लवकरच या कामांचा निविदा सार्वजनीक बांधकाम विभाग, सातारा यांच्या मार्फत प्रसिध्द करण्यात येतील व या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल असे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे. दरम्यान पाटण तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील हे मोठया लांबीचे रस्ते आमदार शंभूराज देसाईंनी विशेष प्रयत्न करुन मंजुर करुन आणलेबद्दल या आठ गांवातील जनतेने आमदार शंभूराज देसाईंचे प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त करुन त्यांना धन्यवाद व्यक्त केले आहेत.
चौकट:- कोटींच्या आकडयाकरीता माजी आमदार पुत्रांनी या चार वर्षातील शासन निर्णय काढून पहावेत.
माजी आमदार पुत्र मी जाहीर करीत असलेले कोटींचे आकडे खरे का खोटे आहेत हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती आहेत. तुम्हाला ते दिसत नाहीत आठच रस्त्यांच्या कामांकरीता १६ कोटी ५० लाखांचा निधी मंजुर करुन आणला आहे. माजी आमदारपुत्रांना याची खात्री करावयाची असेल तर त्यांनी दि.०८ ऑक्टोबर,२०१८ रोजीचा उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय काढून पहावा.यासारखे अनेक शासन निर्णय या चार वर्षात शासनाकडून करुन घेतले आहेत.असे अनेक शासन निर्णय त्यांना शासन दफतरी पहावयास मिळतील असेही आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

1 comment: