पाटण तालुक्यातील युवकांच्या आग्रहास्तव दि.१०ऑक्टोंबर रोजी पाटणचे युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस दौलतनगर ता.पाटण याठिकाणी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.युवकांच्या गराडयात आणि मांदियाळीत सुमारे तीन ते चार तास वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारणारे युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचा यंदाच्या वर्षी युवकांच्या आग्रहास्तव दौलतनगरला आयोजीत केलेल्या वाढदिवसामुळे पाटण तालुक्यातील युवकांच्या उत्साहामध्ये वाढ झाली असून यशराज देसाईंचा वाढदिवस पाटण तालुक्यातील युवक वर्गाने उत्सवाप्रमाणे तालुक्यात साजरा केला.
पाटणचे लोकप्रिय आमदार उत्कृष्ट संसदपटु यांचे चिरंजीव आणि अल्पावधीतच पाटण तालुक्यातील युवकांच्या गळयातील ताईत बनलेले यशराज देसाई यांचेकडे पाटण तालुक्यातील युवकवर्ग हा पाटणचे युवा नेतृत्व म्हणून पाहू लागला आहे.तालुक्यातील युवक वर्गात यशराज देसाई यांची मोठी के्रझ असून तालुक्यातील विविध निवडणूकीच्या प्रचाराच्या माध्यमातून तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून यशराज देसाई यांनी आपल्या अभ्यासू वकृत्वशैलीमुळे युवकांच्या मनामध्ये युवा नेतृत्वाचे स्थान पटकावले आहे.यंदाच्या वर्षी यशराज यांचा वाढदिवस हा दौलतनगर ता.पाटण याठिकाणी साजरा करावयाचा असा आग्रह पाटण तालुक्यातील युवा वर्गाने केला त्याप्रमाणे हा वाढदिवस कारखाना कार्यस्थळावर मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
सुरवातीस तालुक्याचे मुख्यव्दार असणा-या चाफळ फाटा याठिकाणी चाफळ विभागाच्या वतीने यशराज देसाईंचे जंगी स्वागत तालुक्यात करण्यात आले.त्यानंतर त्यांनी मरळी गावची ग्रामदैवत श्री निनाई देवीचे दर्शन घेवून कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब),स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळा,लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करुन कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. कारखाना कार्यस्थळावर वाढदिवसानिमित्त त्यांचे हस्ते शालेय मुलांना खाऊवाटप,शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.युवा कार्यकर्त्यांनी व शंभूराज युवा संघटना पाटण तालुका यांच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार शुभेच्छा देणा-या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हार,तुरे,गुच्छ न आणता मोठया प्रमाणात शालेय साहित्य,वहया यशराज देसाईंना शुभेच्छांच्या रुपाने भेट दिल्या.पाटण तालुक्यातील प्रत्येक विभागातील युवक तसेच आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वा खालील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी यशराज देसाईंची दुपारी ०४ वाजेपर्यंत कारखाना कार्यस्थळावर भेट घेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुपारी ०४ नंतर सातारा येथील निवासस्थानी त्यांनी श्रीमती विजयादेवी देसाई मासाहेब,आई सौ.स्मितादेवी देसाई, काकी सौ.अस्मितादेवी देसाई यांचे आर्शिवाद घेतले. भगिनी ईश्वरी देसाई, बंधू जयराज देसाई व आदित्यराज देसाई यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दुरध्वनीवरुन यशराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.दौलतनगरला प्रारंभी वडील आमदार शंभूराज देसाई,चुलते मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे यशराज यांनी आर्शिवाद घेतले.कारखाना कार्यस्थळावर प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,नायब तहसिलदार राजेंद्र तांबे,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,माजी उपसभापती डी आर पाटील,कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक अशोक डिगे,बबनराव भिसे,गजानन जाधव,आंनदराव चव्हाण,शशिकांत निकम,सोमनाथ खामकर विकास गिरी गोसावी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,सुग्रा खोंदू, प्रदिप पाटील तांबवे,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,सौ.सुभद्रा शिरवाडकर,सौ.सिमा मोरे,बशीर खोंदू,नथुराम कुंभार,माजी संचालक टि डी जाधव,बबनराव शिंदे,अशोकराव पाटील रासाटी, बबनराव माळी,सदानंद साळुंखे,शंभूराज युवा संघटनेतील भरत साळुंखे,अभिजित पाटील,नाना साबळे,अंकुश महाडिक, मनोज मोहीते,माणिक पवार,एकनाथ जाधव,गौरव परदेशी,संजय पवार,सचिन जाधव,रणजित पाटील,तुषार चव्हाण, उत्तम मोळावडे,शंकर पवार,किसन गालवे,गणेश भिसे,बाबा मोकाशी,सुनील शेडगे,मुजम्मील खोंदु,विष्णु पवार,दादा जाधव,अभय आफळे,शंकर देसाई,डॉ.विजय संकपाळ,मनोज पाटील,जोतिराज काळे,सुरेश कदम,सचिन पाटील बेलदरे, सुरेश जाधव,राजाराम मोहिते,शंकर साळुंखे नथुराम सावंत,जयवंत पवार,धनंजय केंडे,दिलिपराव जानुगडे,प्रकाश तवटे, दिलीप सपकाळ,अशोक पाटील तळीये,अमोल पाटील,विजय शिंदे,रमेश गालवे,दिनकर कोळेकर,तुषार देशमुख,प्रसाद देवळेकर,विनायक भोमकर,संदिप,राजेश चव्हाण,गोविंद गोटुगडे,बाळासाहेब सुर्यवंशी,महेश पाटील,दिलीप भिलारे,रणजित शिंदे, विकास देशमुख,सुनील देसाई, संजय जाधव,नेताजी मोरे,विश्वास निकम,शंकर माने,नवनाथ पाळेकर या प्रमुख युवा कार्यकर्त्यांसह तालुक्याच्या प्रत्येक विभागातील शंभूराज युवा संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यशराज देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment