राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत
संशोधन व विकास अंतर्गत सन २०१७-१८ करीता सुचविण्यात आलेल्या चार रस्त्यांच्या कामांना
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या
प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१० ऑक्टोंबर,२०१८
रोजी पारित केला असून चार रस्त्यांच्या कामांकरीता ८ कोटी ०१ लाख २५ हजार रुपयांचा
निधी मंजुर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली
आहे.
पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे
की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य
शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत संशोधन व विकास अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये
आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी चार कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे
गतवर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते.
या कामांना राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या चार रस्त्यांच्या
कामांकरीता ८ कोटी ०१ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजुर दिला आहे. यामध्ये महाबळवाडी
ते सडादाढोली रस्ता करणे २.५०० किमी १ कोटी ५४ लाख ३२ हजार,जळवखिंड ते जांभेकरवाडी
रस्ता करणे १.२५० किमी ८८ लाख ६० हजार,शिरळ ते मिरासवाडी रस्ता करणे १.२५० किमी ७६
लाख ६४ हजार व गणेवाडी ठोमसे पोहोच रस्ता करणेकरीता ५.५६० किमी ४ कोटी ४१ लाख १६ हजार
रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे तर या चारही कामांची पाच वर्षाकरीता नियमीत देखभाल
दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे सडादाढोली रस्ता ९ लाख ४१ हजार, जांभेकरवाडी रस्ता ०४
लाख ९३ हजार,मिरासवाडी रस्ता ४ लाख ३७ हजार व गणेवाडी ठोमसे रस्ता २१ लाख ८२ हजार रुपयांची
तरतूदही शासनाने केली असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या
ग्रामविकास विभागाने दि.१० ऑक्टोंबर,२०१८ रोजी पारित केला आहे या कामांच्या निविदा
लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी
पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार
शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या चार गांवातील ग्रामस्थांनी आमदार
शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment