Thursday, 14 February 2019

विरोधंकाच्या बालेकिल्लयातच कोटयावधींच्या कामांना आणली मंजुरी. आमदार शंभूराज देसाई.


दौलतनगर दि.1४:-  पाटण मतदारसंघातील जनतेने मोठया विश्वासाने आपल्या ताब्यात मतदारसंघाची आमदारकी दिली त्याच विश्वासाने मतदारसंघातील विकासाची कामे मार्गी लावण्याचे काम आपण गेल्या चार वर्षात केले व करीत आहे. चिटेघर ग्रामस्थांनी त्यांचे ग्रामदैवताच्या देवालयाकरीता सभामंडप दयावे अशी बरेच दिवसांची मागणी आज पुर्ण होत आहे याचा आनंद आहे.चिटेघर असो वा हा भाग असो हा भाग माजी आमदारांचा बालेकिल्ला समजला जातो. विरोधकांच्या याच बालेकिल्ल्यात आपण साडेचार वर्षात कोटयावधींची विकासकामे मंजुर करुन दिली असल्याचा दावा करुनविरोधकांनी यापुर्वी विकासनिधी न देता केवळ टिकाटिपणीच करण्याचे काम केले असून आजही तोच उद्योग सुरु आहे.त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कार्यकर्त्यांनी माणसाला माणूस जोडावा,असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
                   चिटेघर ता.पाटण येथे आ.शंभूराज देसाई यांचे डोंगरी विकास निधीमधून मंजूर झालेल्या सभामंडपाचे कामांचे भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश जाधव,ग्रा.पं.सदस्य संजय पुजारी,ग्रा.पं.सदस्या सिताबाई भोसले,सखाराम शिंदे,तुकाराम भोसले,बापूराव सावंत, हणमंत शिंदे,बाळासो जाधव,कोंडिबा साळुंखे,डोंगरीविभागातील शंभूराज युवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
                       आमदार देसाई म्हणाले, पाटण मतदारसंघातील गावांसह वस्त्यांचा विकास व्हावा हे मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून आपले ध्येय असून विकासकामाला निधी ‍द्यायला आपण कमी पडणार नाही. अशी ग्वाही मी अनेकदा मतदारसंघातील जनतेला दिली आहे. त्यानुसारच आपले काम सुरु असून मागेल त्याला विकास देण्याचे काम आपण करीत आहोत. सातारा जिल्हयात सर्वाधिक मते देऊन मतदारसंघातील जनतेने आपणांस निवडूण दिले. जनतेच्या वि श्वासाला कुठेही तडा न जावू देता गत साडेचार वर्षात सातारा जिल्हयात  सर्वाधिक  निधी आपण पाटण मतदारसंघात मंजुर करुन आणला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.पाटण जिल्हा परिषद मतदारसंघ हा माजी आमदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाने माजी आमदारांना प्रत्येक निवडणूकीत भरभरुन मते देण्याचे काम केले परंतू माजी आमदारांनी त्या मानाने या विभागाचा म्हणावा असा विकास केला नाही. विकास झाला तर या विभागातील जनता सुज्ञ होईल आणि हे आपल्याला घातक आहे या दृष्टीकोनातून त्यांनी या विभागाला विकासापासून कोसो मैल दुरच ठेवण्याचे काम केले. अनेक निवडणूकीमध्ये आम्ही प्रचाराला आलो की चिटेघरच्या बुंवाच्या घरी यायचे या वि भागाची बैठक घ्यायची काय प्रचार असेल तो येथेच व्हायचा परंतू काळ बदलला तसे दिवसही बदलले या विभागात गत दोन निवडणूकीत जनतेने चांगला उठाव केला. आणि विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय या वि भागाने घेतल्यामुळे या विभागातील प्रत्येक गांवामध्ये आणि वाडी वस्तीमध्ये मोठया प्रमाणात आता विकासाचे नवे पर्व सुरु झालेले पहावयास मिळत आहे.या विभागात माजी आमदारांची असणारी दहशत या विभागातील जनतेने मोडीस काढली पाहिजेत्याचा परिणाम विकासकामांच्या माध्यमातून दिसून येत आहे. गत साडेचार वर्षात या विभागातील प्रत्येक वाडीवस्तीवर विकासाचे काम आपण दिले आहे याचा मला मनस्वी खुप आनंद वाटत आहे. केवळ आश्वासन न देता ज्या गांवाने वाडीवस्तींने आपणाकडे काम मागितले त्या त्या गांवाना आणि वाडीवस्तीस आपण काम दिले आहे.विरोधकांच्या बालेकिल्ल्यात आपण साडेचार वर्षात कोटयावधींची विकासकामे मंजुर करुन दिली व ती कामे प्रत्यक्षात सुरु झाली आहेत याचा आनंद व्दिगुणीत आहे.पण काम करायला आपण अन मत मागायला विरोधक असे भविष्यात होता कामा नये याची काळजी या  विभागातील जनतेने घेणे आवश्यक आहे.चिटेघर गांवास विकासाच्या बाबतीत झुकते माप देण्याचा मी कायम प्रयत्न करीन असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सखाराम शिंदे यांनीकेले तुकाराम भोसले यांनी आभार मानले.

अनेक वर्षे विकासापासून वंचीत असलेल्या डोंगरपठारावरील गांवामध्ये विकासाचा झंझावात सुरु आहे आमदार शंभूराज देसाईंचा दावा.



दौलतनगर दि.14:- पाटण मतदारसंघातील दऱ्याखोऱ्यात वसलेल्या व अनेक वर्षे विकासकामांपासून वंचीत असलेल्या पाटण मतदारसंघातील मग ते ढेबेवाडी,कुंभारगांव,काळगांव असो वा पाटण असो किवा तारळेचे डोंगरपठार असेल या डोंगरपठारावरील गांवामध्ये गत साडेचार वर्षात कधीही न झालेला विकासकामांचा झंझावात सुरु असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील अनेक गांवाना व वाडयावस्त्यांना मुलभूत विकासापासून वंचीत ठेवण्याचे काम आपल्या मतदारसंघाच्या माजी आमदारांनी केले ते मी केले नाही व करणार देखील नाही.त्यामुळेच मतदारसंघातील डोंगर पठारावरील गांवामध्ये व वाडया वस्त्यांमध्ये विकासाचे कामे मोठया प्रमाणात दिसू लागली आहेत असा दावा आमदार शंभूराज देसाईंनी केला असून विकासापासून वंचित राहिलेल्या डोंगरपठारावरील गांवामध्ये विकासाचा शिल्लक राहिलेला बॅकलॉग भरुन काढण्याचे काम आपण करीत असल्याचे  प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
                निवी ता.पाटण येथे निवी-कसणी या रस्त्याच्या कामाकरीता आमदार शंभूराज देसाईंनी शासनाच्या हरित ऊर्जा निधी कार्यक्रमातंर्गत मंजुर करुन आणलेल्या निधींच्या कामाचे भुमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.या रस्त्यासाठी त्यांनी सुमारे १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणलेला असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम आमदार शंभूराज देसाईंनी मार्गी लावल्याने येथील नागरिकांमध्ये समाधान दिसून आले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सीमा मोरे,शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,नानासो साबळे,मनोज मोहिते,आनंदराव मत्रे,संजय पाटील,तामिज डांगे आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच निवी व कसणी,कसणी धनगरवाडा,निगडे,माईंगडेवाडी,मत्रेवाडी,जाधववाडी मेंढ येथील नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पिढयानपिढया पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील गांवे आणि वाडया वस्त्या विकासापासून वंचीत ठेवण्याचे काम माजी आमदारांनी केले त्यामुळेच मतदारसंघातील जनतेने त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना घरी बसविले होते. डोंगर फोडून विकास केला असा डांगोरा माजी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते पिटत असले तरी डोंगरपठारावरील किती गांवाना त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या आणि मंत्रीपदाच्या कारकीर्दीमध्ये बारमाही पक्के रस्ते देण्याचे काम केले हे जगजाहीर आहे. या विभागातील निगडे पर्यंतच रस्ता असो व माईंगडेवाडीचा रस्ता असो दे इतक्या वर्षात माजी आमदारांना तो करता आला नाही. रस्त्याचे राहू दया निवी गावाला पिण्याच्या पाण्याची योजना त्यांना इतक्या वर्षात मंजुर करता आली नाही. निवी गांवातील ग्रामस्थांनी आपली हयात त्यांच्या पाठीशी राहण्यात घालविली पंरतू बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशी परिस्थिती असणाऱ्या विरोधकांकडून आपल्याला काही मिळणार नाही या भूमिकेतुन निवी गांवातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपले नेतृत्व मानण्याचा निर्णय घेतला.मत्रेवाडी किंवा जाधववाडी मेंढची पाण्याची योजना असू देत.या गांवातील मागणी केली आणि आपण कामे दिली.आपल्याला यां गांवामध्ये किती मतदान पडते याचा सारासार विचारही आपण कधी केला नाही.निगडयाच्या कार्यक्रमाहून येताना जाधववाडीच्या नागरिकांनी गढूळ पाण्याची बाटली घेवूनच रस्त्यावर उभे होते आमच्या गांवाला असले पाणी येते आमदारसाहेब काही तरी करा असे त्यांनी सांगितले, दुसऱ्याच महिन्यात त्या गांवाला पिण्याच्या पाण्याची योजना मंजुर केली आज मत्रेवाडी आणि जाधववाडी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना पुर्ण झाल्या आहेत. निवीच्या पाणी पुरवठा योजनेला वनविभागाची मान्यता गरजेचे आहे तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला आहे लवकरच यास मान्यता मिळेल. निवी कसणी या गांवामध्ये युवकांची चांगली एकी झाली आहे. विकासाच्या बाबतीत या गांवाना पाठबळ देण्याकरीता मी कटीबध्द आहे. येथील नागरिकांनीही आपले पाठबळ विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे उभे करावे असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.प्रारंभी माजी सरपंच पाटील यांनी प्रलंबित कामांचा पाडाच वाचला व एवढो वर्ष आम्ही ज्यांना पोत्याने मते दिली त्यांनी आपर्यंत आमचा भ्रमनिराश केल्याने आपणच ही कामे मार्गी लावावी अशी विनंती केली.त्यावर आ.शंभूराज देसाई यांनी सगळी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकत्यांनी देसाई गटात जाहीर प्रवेश केला.त्यांचे स्वागत व सत्कार आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच पाटील यांनी केले.
              

विरोधंकाच्या बालेकिल्लयातच कोटयावधींच्या कामांना आणली मंजुरी. आमदार शंभूराज देसाई.




दौलतनगर दि.1४:-  पाटण मतदारसंघातील जनतेने मोठया विश्वासाने आपल्या ताब्यात मतदारसंघाची आमदारकी दिली त्याच विश्वासाने मतदारसंघातील विकासाची कामे मार्गी लावण्याचे काम आपण गेल्या चार वर्षात केले व करीत आहे. चिटेघर ग्रामस्थांनी त्यांचे ग्रामदैवताच्या देवालयाकरीता सभामंडप दयावे अशी बरेच दिवसांची मागणी आज पुर्ण होत आहे याचा आनंद आहे.चिटेघर असो वा हा भाग असो हा भाग माजी आमदारांचा बालेकिल्ला समजला जातो. विरोधकांच्या याच बालेकिल्ल्यात आपण साडेचार वर्षात कोटयावधींची विकासकामे मंजुर करुन दिली असल्याचा दावा करुन विरोधकांनी यापुर्वी विकासनिधी न देता केवळ टिकाटिपणीच करण्याचे काम केले असून आजही तोच उद्योग सुरु आहे.त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कार्यकर्त्यांनी माणसाला माणूस जोडावा,असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
                   चिटेघर ता.पाटण येथे आ.शंभूराज देसाई यांचे डोंगरी विकास निधीमधून मंजूर झालेल्या सभामंडपाचे कामांचे भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश जाधव,ग्रा.पं.सदस्य संजय पुजारी,ग्रा.पं.सदस्या सिताबाई भोसले,सखाराम शिंदे,तुकाराम भोसले,बापूराव सावंत, हणमंत शिंदे,बाळासो जाधव,कोंडिबा साळुंखे,डोंगरी विभागातील शंभूराज युवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
                       आमदार देसाई म्हणाले, पाटण मतदारसंघातील गावांसह वस्त्यांचा विकास व्हावा हे मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून आपले ध्येय असून विकासकामाला निधी ‍द्यायला आपण कमी पडणार नाही. अशी ग्वाही मी अनेकदा मतदारसंघातील जनतेला दिली आहे. त्यानुसारच आपले काम सुरु असून मागेल त्याला विकास देण्याचे काम आपण करीत आहोत. सातारा जिल्हयात सर्वाधिक मते देऊन मतदारसंघातील जनतेने आपणांस निवडूण दिले. जनतेच्या वि श्वासाला कुठेही तडा न जावू देता गत साडेचार वर्षात सातारा जिल्हयात  सर्वाधिक  निधी आपण पाटण मतदारसंघात मंजुर करुन आणला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.पाटण जिल्हा परिषद मतदारसंघ हा माजी आमदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाने माजी आमदारांना प्रत्येक निवडणूकीत भरभरुन मते देण्याचे काम केले परंतू माजी आमदारांनी त्या मानाने या विभागाचा म्हणावा असा विकास केला नाही. विकास झाला तर या विभागातील जनता सुज्ञ होईल आणि हे आपल्याला घातक आहे या दृष्टीकोनातून त्यांनी या विभागाला विकासापासून कोसो मैल दुरच ठेवण्याचे काम केले. अनेक निवडणूकीमध्ये आम्ही प्रचाराला आलो की चिटेघरच्या बुंवाच्या घरी यायचे या वि भागाची बैठक घ्यायची काय प्रचार असेल तो येथेच व्हायचा परंतू काळ बदलला तसे दिवसही बदलले या विभागात गत दोन निवडणूकीत जनतेने चांगला उठाव केला. आणि विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय या वि भागाने घेतल्यामुळे या विभागातील प्रत्येक गांवामध्ये आणि वाडी वस्तीमध्ये मोठया प्रमाणात आता विकासाचे नवे पर्व सुरु झालेले पहावयास मिळत आहे.या विभागात माजी आमदारांची असणारी दहशत या विभागातील जनतेने मोडीस काढली पाहिजे त्याचा परिणाम विकासकामांच्या माध्यमातून दिसून येत आहे. गत साडेचार वर्षात या विभागातील प्रत्येक वाडीवस्तीवर विकासाचे काम आपण दिले आहे याचा मला मनस्वी खुप आनंद वाटत आहे. केवळ आश्वासन न देता ज्या गांवाने वाडीवस्तींने आपणाकडे काम मागितले त्या त्या गांवाना आणि वाडीवस्तीस आपण काम दिले आहे.विरोधकांच्या बालेकिल्ल्यात आपण साडेचार वर्षात कोटयावधींची विकासकामे मंजुर करुन दिली व ती कामे प्रत्यक्षात सुरु झाली आहेत याचा आनंद व्दिगुणीत आहे.पण काम करायला आपण अन मत मागायला विरोधक असे भविष्यात होता कामा नये याची काळजी या  विभागातील जनतेने घेणे आवश्यक आहे.चिटेघर गांवास विकासाच्या बाबतीत झुकते माप देण्याचा मी कायम प्रयत्न करीन असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सखाराम शिंदे यांनी केले तुकाराम भोसले यांनी आभार मानले.

Wednesday, 13 February 2019

मतदारसंघातील एकही वाडीवस्ती मुलभूत विकासापासून वंचित राहणार नाही. आ.शंभूराज देसाई यांची ग्वाही.




दौलतनगर दि.13:- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम गत साडेचार वर्षात मतदारसंघाचा आमदार म्हणून मी करीत आहे. कुंभारगांव असो व काळगांव विभागातील बहुतांशी वाडयावस्त्यांची विकासकामे मार्गी लावण्याचे काम केले आहे. काही कामे शिल्लक असतील तर ती येत्या काही महिन्यात मार्गी लावणेकरीता मी कटीबध्द आहे.पाटण मतदारसंघातील एकही वाडीवस्ती मुलभूत विकासापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
                     चाळकेवाडी (ता.पाटण) येथे आ.शंभूराज देसाई यांचे प्रत्यनातून जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे, पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सीमा मोरे, माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य रघूनाथ माटेकर, शंकरराव चव्हाण,शिवदौलत बँकेचे संचालक नेताजीराव मोरे,मधूकर पाटील,चाळकेवाडी सरपंच नंदा शांताराम चाळके,उपसरपंच भरत चाळके,चंद्रकांत चाळके,महादेवराव पानवळ,प्रकाशराव तवटे आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.   
                     याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, आ.शंभूराज देसाई म्हणाले,कुंभारगांव ते गलमेवाडी रस्त्यावरुन जाताना चाळकेवाडी या रस्त्याची पूर्वी काय अवस्था होती? मागील विधानसभा निवडणुकीत मी या विभागातील जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार चाळकेवाडी रस्ता पुर्ण करुन देण्याचे आश्वासन मी दिले होते त्यानुसार चाळकेवाडी रस्त्याच्या कामांकरीता जिल्हा नियोजन समितीमधून 10 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. यापुर्वी डोंगरी विकास निधीमधून चाळकेवाडी  प्राथमिक शाळा ते भैरवनाथ मंदीर रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्याचे आपण काम केले. चाळकेवाडी येथे गणेश मंदीराकरीता सभामंडप आणि नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांची मागणी आहे. गणेश मंदीराचे सभामंडपाचे काम प्रस्तावित केले आहे तर पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम राष्ट्रीय पेयजल च्या २०१९ च्या आराखडयामध्ये प्रस्तावित केले आहे. ज्याप्रमाणे या गांवाने मला मताधिक्क दिले त्याचप्रमाणे या गांवास विविध विकासकांमे देण्याचेही आपण काम केले आहे. नागनाथ मंडळ चाळकेवाडी ते स्मशानभूमि असा ६०० मीटरचा रस्ता करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे यंदाच्या वर्षीच हेही काम आपण पुर्ण करुन घेवू अशी ग्वाही ते म्हणाले, आज जी कामे आपल्या माध्यमातून या वाडीमध्ये झाली आहेत ती कामे माजी आमदारांच्या काळात झाली होती का? तरीही विरोधक म्हणतात की आपला विकास कुठे दिसत नाही मग ही सुरु असलेली विकास कामे कशाचे प्रतिक आहे. आज कुंभारगांव विभागातील वाडयावस्त्यांची रस्त्यांची परिस्थीती पहाता बहुतांशी वाडयावस्त्यांमध्ये आपण रस्त्यांची कामे पुर्ण केली आहेत अनेक गांवाना जोडणारे छोटे पुल नव्हते ते पुर्ण करुन देण्याचे काम केले आहे.आपले विरोधक नेहमीच विकासकामांबाबत दिशाभूल करतात.मात्र मागील चार वर्षात आपण मतदारसंघाचा कायापालट करत सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात,यासाठी प्रयत्न केले आहेत.गेल्या चार वर्षात काहीही न देता केवळ आता मते मागायला येणाऱ्या विरोधकांना मते मागण्याअगोदर मतदारसंघातील गांवानी आणि वाडयावस्त्यांनी गेल्या चार वर्षात विद्यमान आमदारांनी आम्हाला ही विकासकांमे दिली तुम्ही काय दिले? असा जाब विचारण्याची वेळ आली आहे,या विभागातील जनता विरोधकांच्या भूलथापांना कधीच बळी पडली नाही आणि यापुढेही कधी बळी पडणार नाही याची मला खात्री आहे.आपण साडेचार वर्षात केलेली चौफेर विकासकामे लक्षात घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपला हक्काचा आमदार निवडावा असे आवाहन करुन आमदार शंभूराज देसाई म्हणाले, यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत व प्रास्ताविक भरत चाळके यांनी केले.

Tuesday, 12 February 2019

येणाऱ्या निवडणूकीत मतदारसंघातील जनताच मी केलेला विकास विरोधकांना दाखवेल. आमदार शंभूराज देसाईंचा विश्वास .


       
दौलतनगर दि.09:- माजी आमदार व त्यांचे सुपुत्राना पाटण मतदारसंघात गत चार वर्षात केलेला व सध्या सुरु असलेला कोटयावधी रुपयांचा विकास चिरेबंदी वाडयात बसून दिसत नाही चिरेबंदी वाडयातून जरा बाहेर या व मी काय काय आणि कुठे कुठे विकास केलाय  हे उघडया डोळयांनी पहा असे मी पाटणकर पितापुत्रांना सातत्याने आवाहन करीत आहे तरीही पितापुत्र वाडयातून काही बाहेर पडेनात. त्यांना जमले नाही ते मी करुन दाखवितोय याचे त्यांना वाईट वाटणे सहाजिकच आहे, परंतू जनतेची दिशाभूल करणाऱ्या याच पाटणकर पितापुत्रांना येणाऱ्या निवडणूकीत मी केलेला विकास मतदारसंघातील जनताच गावागावात प्रत्यक्षात दाखवेल असा विश्वास उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
                               कळंञेवाडी (ता.पाटण) येथे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य शासनाच्या २५१५ योजनेमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,प्रकाशराव तवटे,माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य रघूनाथ माटेकर,महादेवराव पानवळ,उपअभियंता एस. व्ही. पाटील, शाखा अभियंता राजाराम खंडागळेयांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होती.
                               याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माजी आमदारांनी तालुक्याची आमदारकी सहावेळा भोगली.या सहा टर्ममध्ये तालुक्यातील जनतेला देण्याकरीता त्यांच्या हातात बरेच काही होते. मात्र हातात असताना जनतेला ते काही देवू शकले नाहीत हे आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे.गेल्या चार वर्षात याच माजी आमदारांना आणि त्यांच्या सुपुत्रांना त्यांच्या पक्षाकडून केवळ आणि केवळ १ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी मिळाला त्यापेक्षा जादा रक्कमेचे एका रस्त्याचे भूमिपुजन मी अनेक गांवामध्ये एका दिवसात केले आहे. त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा यांनी दोन वर्षापुर्वी तालुक्यात येवून प्रत्येक वर्षी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यातील केवळ १ कोटी रुपयेच त्यांना त्यांनी दिले आणि पुढे निधीचे गाजर दाखविले.विरोधासाठी विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे.त्यांनी विरोधक म्हणून विरोध नाही केला तर त्यांना विरोधक कोण म्हणणार.परंतू विरोधकांच्या कार्यकालात पाटण मतदारसंघाची अवस्था काय होती आणि आता चार वर्षात पाटण मतदारसंघात कशाप्रकारे बदल झाला आहे याची तुलना मतदारसंघातील जनता करु लागली आहे.हेच आपल्या विरोधकांना रुचत नाहीये.गत पाच वर्षात विरोधकांच्या काळात पाटण मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी जेवढा निधी आला नाही त्याहून अधिक निधी या चार वर्षात तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील रस्त्याच्या कामांसाठी आणण्यास मला यश मिळाले आहे.आता बांधकाममंत्री असताना जेवढा निधी बांधकाममंत्री यांनी मतदारसंघात आणायला पाहिजे होता त्यापेक्षा जास्त निधी जर केवळ आमदार म्हणून मी मतदारसंघात आणत असेल तर विरोधकांना त्याचे वाईट वाटणे सहाजिकच आहे.मतदारसंघातील व्यथा मांडायला मतदारसंघाचा आमदार विधानसभेत, विधानसभेच्या बाहेर आपले तोंड उघडतो का नाही हे मतदारसंघातील जनतेने उघडया डोळयांनी पाहिले आहे. आता डोळे उघडून पहाण्याची गरज विरोधकांना आहे. त्यांची निष्क्रीयता किती होती व आहे हे जनतेसमोर येवू लागले असल्याने माजी आमदार व त्यांचे सुपुत्र हे आता बेतालपणे वक्तव्य करुन जनतेची डोकी भडकवू पहात आहेत.मतासाठी सर्वसामान्यांची डोकी भडकविण्या व्यतिरिक्त आतापर्यंत पाटणकर पितापुत्रांना काही जमलेच नाही आणि जमणारही नाही त्यामुळे जनतेने त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करायची. मी गत चार वर्षात पाटण मतदारसंघात केलेला कोटयावधी रुपयांचा विकासच मतदारसंघातील जनतेच्या समोर घेवून जाणार आहे. मला विश्वास आहे गत चार वर्षात जेवढा विकास मतदारसंघात झाला तो यापुर्वी कधीच झाला नाही. हीच माझी जमेची बाजू आहे मी केलेल्या कोटयावधी रुपयांच्या विकासकामांना येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मतदारसंघातील जनता भरभरुन साथ देईल असेही ते शेवठी बोलताना म्हणाले.यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

Saturday, 9 February 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या ७०७० गाडीवर डोंगरकपारीतील मरड गावाचे प्रेम. रांगोळीत महिलांनी साकारली ७०७०.



­­
          दौलतनगर दि.०९:- पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची ७०७० ही फॉरच्युनर गाडी पाटण विधानसभा खुप लोकप्रिय झाली आहे. सोशल मिडीयावर तर अनेकदा आमदार शंभूराज देसाईंच्या ७०७० चीच चर्चा जास्त पहावयास मिळते.पाटण मतदारसंघातील जनता आमदार शंभूराज देसाईंवर लोकप्रिय आमदार म्हणून जेवढे प्रेम करते तेवढेच प्रेम त्यांच्या ७०७० गाडीवर करते.७०७० गाडीवरील प्रेमाचा प्रत्यय पाटण तालुक्यातील पाटण आणि सातारा तालुक्याच्या हद्दीवर डोंगरकपारीत वसलेल्या मरड या गावात आला.या गावाच्या रस्त्याच्या भूमिपुजना करीता आमदार शंभूराज देसाई येणार आहेत हे समजल्यानंतर गावातील महिलांनी कार्यक्रमाकरीता काढलेल्या रांगोळीमध्ये ७०७० हा आमदार शंभूराज देसाईंच्या गाडीचा क्रंमाक टाकून आमदार देसाईंचे गावांमध्ये स्वागत केले.आमदार शंभूराज देसाईंनी ही रांगोळी पाहून याचे कौतुक केले.
                             आमदार शंभूराज देसाई हे त्यांनी कोयना भूकंप निधी समितीमधुन मंजुर केलेल्या १० लाख रुपयांच्या मरड गावपोहोच रस्त्याच्या भूमिपुजन समारंभाकरीता मरड गावात गेले होते.पाटणच्या या पठारावरील घेरादातेगड,अवसरी,काठी या गांवातील विविध विकासकामांची भूमिपुजनांचे कार्यक्रम उरकून ते मरड या गावी रात्री १०.०० वा.पोहचत असताना मरडच्या मुख्य रस्त्यावर धनगरवाडा वस्तीला छोटा पुल करुन दिल्याबद्दल आमदार देसाईंच्या स्वागतकरीता धनगरवाडा या वस्तीतील नागरिक आणि महिला या अबालवृध्दांसह रात्री उशीरपर्यंत थांबले होते.आमच्या वस्तीला कधीही न झालेला छोठा पुल बांधून दिल्याबद्दल येथील नागरिकांनी आणि महिलांनी आमदार शंभूराज देसाईंचे रस्त्यावरच स्वागत करुन आमच्या वस्तीला आता रस्ता करुन दया आणि आमची अनेक वर्षाची गैरसोय दुर करा अशी मागणी केली यावर आमदार शंभूराज देसाईंनी तुमचा रस्ता शासनाकडे प्रस्तावित केला आहे. येणाऱ्या काही दिवसातच तो पुर्ण करुन देतो असे आश्वासन दिले यावेळी येथील नागरिकांनी आणि महिलांनी या पुलाच्या भूमिपुजनाला आपले चिरंजीव आमच्याकडे आले होते याची आठवण करुन दिली. यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी सर्वांची विचारपुस करुन रात्र झाली आहे महिलांना व्यवस्थित घेवून घरी जा असे पुरुष मंडळींना सांगितल्यानंतर उपस्थितांतील सर्वजण भारावून गेले. त्यानंतर मरड गांवात आल्यानंतर येथील महिलांनी आमदार देसाईंचे औक्षण करुन स्वागत केले यावेळी येथील महिलांनी समारंभाकरीता गांवामध्ये काढलेल्या रांगोळीमध्ये आमदार शंभूराज देसाईंच्या गाडीचा ७०७० हा क्रमांक टाकून रांगोळी साकारली होती.रांगोळीमध्ये साकारलेले ७०७० पाहून आमदार देसाईंनी महिलांचे कौतुक केले.माझी ७०७० या गांवामध्ये माझेअगोदर रांगोळीच्या रुपाने पोहचली. आता प्रत्यक्षात ७०७० या गांवाला जोडणाऱ्या रस्त्यावरुन आणणेकरीताच मी गांवामध्ये आलो आहे. लवकरच तुमच्या या गांवाचा पुर्ण रस्ता करुन देण्यासाठी मी कटीबध्द आहे.आपली अपेक्षा लवकरच पुर्ण होईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. डोंगरकपारीतील लोक माझेवर जेवढे प्रेम करतात त्याचबरोबर माझे गाडीच्या क्रमांकावरही प्रेम करतात हे पाहून नेत्यावर जनतेचे यापेक्षा आणखी कसले प्रेम हवं आहे असे सांगत आमदार शंभूराज देसाईंनी आनंद व्यक्त केला.


डोंगर फोडून विकास केला म्हणणारे पाटणकरसाहेब, डोंगरातल्या मरड गावाला का रस्ता केला नाही. आमदार शंभूराज देसाईंचा सवाल.





दौलतनगर दि.09:- आमदार असताना डोंगर फोडून विकास केल्याच्या गप्पा हाणणारे माजी आमदार पाटणकरसाहेब मी यापुर्वीही आपणांस तुम्ही आमदार असताना खरोखरच विकास केलाय असे म्हणताय तर मग मी सांगितलेल्या डोंगरपठारावरील मौजे केळेवाडी,म्हारवंड,गाढखोप,शिद्रुकवाडी,गुढे शिबेवाडी,गणेवाडी, हुंबरणे, आंबेघर ते पाळशी,घोट जन्नेवाडी व सडादाढोली,जांभेकरवाडी या रस्त्यांची कामे तुम्हाला का करता आली नाहीत? हे सगळे राहू दया आपल्या पाटण या बालेकिल्ल्यातील मरड या सात ते आठ वस्त्या असणाऱ्या गावाला तुम्हाला इतक्या वर्षात रस्ता देता आला नाही आणि कसल्या विकासाच्या गप्पा हाणता? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार पाटणकरांना केला आहे.
                सन 2018-19 च्या कोयना भूकंप पुनर्वसन निधि समितीमधून आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या मौजे मरड ता.पाटण या गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी पंचायत समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी, माजी पं.स. सदस्य सुरेश जाधव, बबनराव माळी, इंदूताई मिसाळ, विलास पवार, उप.सरपंच,ग्रा.पं.सदस्य,आनंदा बावधने,ग्रा.पं.सदस्या सौ.लक्ष्मी पवार,सिमा झोरे,रखमाबाई पवार, हणमंत मिसाळ,बहिरू झोरे,सार्वजनीक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी चव्हाण आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, शंभूराज डोंगरी युवा संघटनेचे कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले, मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे गोडवे गातो,लाळगोटलेपणा करतो असे म्हणणारे पाटणकरसाहेब,राज्याचे मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत तुमच्याही पक्षात माझेमित्र आहेत तुम्हालाही याची माहिती आहे राज्याचे यापुर्वीचे असणारे मुख्यमंत्री यातील तुमचा एकही मित्र नव्हता व नाही त्याला माझा काय दोष आणि मी मुख्यमंत्र्याचे गोडवे गात असलो तरी त्यांच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणत आहे.हे मतदारसंघातील जनता जाणून आहे. मतदारसंघातील जनतेला मी मुख्यमंत्र्यांचे गोडवे गायलेले चालतात तुमच्याच पोठात का दुखत आहे ? हेच कळेना. मी कुणाचे गोडवे गायचे आणि कुणाचे नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही का एवढे वाईट वाटून घेता. तुमची निष्क्रीयता झाकून नेणेकरीता माझेवर आपण करीत असलेले आरोप न समजण्याइतपत पाटण मतदारसंघातील हिरव्या पट्टयातील व डोंगरपठारावरील जनता आता अज्ञान राहिली नाही जनतेच्या आता सर्व लक्षात येवू लागले आहे.या विभागातील एका गांवाला एक नाहीतर दोन दोन- तीन तीन विकासकांमे करण्याकरीता निधी मंजुर करुन दिला आहे मंजुर केलेल्या निधीचे पुरावे या डोंगरपठारावरील जनतेकडे उपलब्ध आहेत. डोंगरी परीषद या विभागात घेवून मी केवळ तोंडदेखलेपणा केला नाहीतर मागेल त्या गांवाला विकास देण्याचे काम मी केले. माझे माध्यमातून कामे होतायत म्हणूनच मतदारसंघातील आणि डोंगरपठारावरील जनता माझेकडे कामे मागायला येत आहे जो देवू शकतो त्याच्याकडे जनता कामे मागते तुमच्याकडे त्यांना देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे तुम्हाला कोण काय मागणार. माजी मंत्री राहिलेल्या पाटणकरसाहेबांना या विभागाने गेल्या अनेक निवडणूकीत पोत्याने भरभरुन मते दिली.मग मरड गावच्या आणि या गावातंर्गत येणाऱ्या रस्त्याची ही अवस्था का? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी मरड ग्रामस्थांना विचारला. मी गांवात येताना मोकळया हाताने आलो नाही सोबत रस्त्याचे काम घेवून आलोय. या गावातील सभामंडपाचे काम पुर्ण झाले. राज्य शासनाने हरीत ऊर्जा योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील रस्त्यांची कामे करण्याकरीता निधी मंजुर करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मरड ते मिसाळवाडी हा सुमारे ३ किलोमाटरचा रस्ताही करण्याकरीता मी शासनाकडे आग्रही भूमिका मांडली लवकरात लवकर हा ही रस्ता पुर्ण करुन देणेकरीता मी कटीबध्द आहे. रात्रीचे १० वाजले तरी या गावांतील लोक,महिला या कार्यक्रमाला आर्वजुन उपस्थित आहेत हा या गावातील जनतेचा माझेवरील विश्वास आहे. आत्ताचा आमदार आपल्याला काहीतरी देवू शकतो ही भावना पाटण मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. जनतेच्या भावनांशी खेळणे मला कधीच जमले नाही. जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता मला कुणाचे गोडवे गावे लागले तरी ते मी गाणार, पाटणकर दादा, तुम्ही त्याचे एवढे वाईट वाटून घेवू नका असेही आमदार शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.उपस्थितांचे स्वागत सागर मिसाळ तर राम झोरे  यांनी आभार मानले.